MPSC Science
67K subscribers
8.6K photos
54 videos
354 files
716 links
Download Telegram
New Doc 13 - Page 1
नमस्कार मित्रानो ,

आपल्या चॅनेल ला किती स्टार द्याल ?

सर्वप्रथम खालील लिंक वर क्लिक करा ,
त्यानंतर एक Telegram Channels Boat अशी स्क्रीन ओपन होईल ,
त्याच्या खाली तळाशी start वर क्लिक करा ,
तिथे तुम्हाला

⭐️
⭐️⭐️
⭐️⭐️⭐️
⭐️⭐️⭐️⭐️
⭐️⭐️⭐️⭐️⭐️

असे स्टार दिसतील , त्यापैकी आपण आम्हाला किती रेटींग्ज ( तारांकित ) म्हणजे किती स्टार देऊ इच्छिता त्यावर क्लिक करा .

त्यानंतर आपण आणखी रिप्लाय देऊन आपले आमच्या चॅनेल विषयीचे मतही मांडू शकता .

आणखी रिप्लाय देऊन आपण विविध विषयांची चॅनेल पण शोधू शकता .

चला तर मग खालील लिंक वर क्लिक करून आम्हाला 5⭐️ रेटिंग्स द्या:

https://telegram.me/tchannelsbot?start=MPSCScience
____________________________________
Rate us
पहा पारा आणि अल्युमिनीअम यांची अभिक्रिया कशी होते
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
कमी गुरुत्वाकर्षणाच्या ठिकाणी पाणी कसे पितात ? पहा
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
लोह्चुम्बकाच्या साहाय्याने पहा कशी करता येईल जादू:
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
🔹त्रास लेप्टोस्पायरोसिसचा:

आज देखील काही संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढत आहे. हे आजार योग्य काळजी घेतल्यास टाळता येऊ शकतात. असाच एक आजार म्हणजे लेप्टोस्पायरोसिस. या आजाराचे प्रमाण पावसाळ्यात वाढते म्हणून त्यासंदर्भात दक्षता घेणं गरजेचं आहे.

संसर्गजन्य आजारांमुळे मानवजातीला आतापर्यंत भरपूर नुकसान सोसावं लागलं आहे. पण प्रगत विज्ञानामुळे आणि निरनिराळ्या लसी आणि अँटीबायोटिक्सच्या सहाय्याने, संसर्गजन्य रोगांचे प्रमाण काही अंशी अटोक्यात आणण्यास यश आलं आहे. मात्र आज देखील काही संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढत आहे. हे आजार योग्य काळजी घेतल्यास टाळता येऊ शकतात. असाच एक आजार म्हणजे लेप्टोस्पायरोसिस. या आजाराचे प्रमाण पावसाळ्यात वाढते म्हणून त्यासंदर्भात दक्षता घेणं गरजेचं आहे. लेप्टोस्पायरोसिस हा आजार झूनॉटिक (Zoonotic म्हणजे प्राण्यांपासून मनुष्याला होणारा) आजारांच्या श्रेणीमधील आहे.

लेप्टोस्पायरा नामक स्पायरोचीट या जातीच्या विषाणू (Bacteria) पासून तो होतो. प्रथम लेप्टोस्पायराचे जिवाणू सस्तन प्राणी (Mammals) जसे, उंदीर, मांजर, कुत्री, गाय, डुक्कर इत्यादीमध्ये ससंर्ग करतात आणि या प्राण्यांच्या मूत्र (Urine) वाटे, हे जिवाणू पाणी अथवा जमिनीत मिसळतात. लेप्टोस्पायराचे जिवाणू असलेल्या पाण्याशी आणि ओलसर जमिनीशी संपर्क आल्यास मनुष्यास या जिवाणूची लागण होते. त्वचेची अखंडता बाधीत झाल्यास, जसे त्वचेला जखम असल्यास, लेप्टोस्पायरा शरीरात प्रवेश मिळवू शकतात. तसंच डोळे, नाक, तोंड आणि जनेंद्रीयांच्या ओलसर त्वचेतून (Mucosa) देखील लेप्टोस्पायरा शरीरात प्रवेश करू शकतात.

सर्वाधिक धोका कोठे ?

लेप्टोस्पायरोसिस होण्याचा धोका पावसाळ्यात सर्वाधिक असतो. तुंबलेलं पाणी, पाण्याची छोटी मोठी तळे किंवा पुराचे पाणी ज्यामध्ये लेप्टोचे जिवाणू आहेत. अशा पाण्याशी संपर्क आल्यास, लेप्टोस्पायरोसिसची लागण होऊ शकते. तसंच प्राण्यांशी संपर्क येणारे व्यक्ती (उदा. वेटिरिनरी व्यवसाय, प्रयोगशाळेत काम करणारे आणि प्राण्यांच्या कत्तलखान्यात काम करणाऱ्या व्यक्तींना देखील या आजाराचा धोका अधिक असतो.

आजाराची लक्षणं :
रूग्णास फ्ल्यू सदृष्य आजाराची लक्षणं दिसून येतात. जसं ताप, थंडी, अंगदुखी, खोकला, डोक दुखी, स्नायूंचं दुखणं, डोळे लाल होणं इत्यादी. बरेच रूग्ण एखाद्या आठवड्याच्या कालावधीनंतर ताप कमी होऊन बरे होतात. पण काही रूग्णांमध्ये ३-४ दिवस बरं वाटल्यावर पुन्हा लक्षणं सुरू होतात आणि ती गंभीर स्वरूपाची असू शकतात. शरीरातील मुख्य अवयवांना बाधा होते आणि Multisystem Involvement मुळे रूग्ण दगावू शकतो.

या अवयवांना बाधा होऊ शकते :
यकृत (Liver) : कावीळीची लक्षणं दिसतात मूत्रपिंड (Kidney) : मूत्रपिंडाची कार्यक्षमता कमी होऊन ते निकामी होऊ शकते. लघवीचे प्रमाण कमी झाल्यास तात्पुरतं डायलेसीस करावं लागू शकतं. फुप्फुस : फुप्फुसाला बाधा झाल्यास, रूग्णास खोकला, छातीत दुखणं व खोकल्यातून रक्त येऊ शकते. श्वासोच्छश्वासाच्या त्रासासारखी गंभीर समस्या उद्भवून कृत्रिम श्वासोच्छश्वासाचे यंत्राची रूग्णास गरज भासू शकते. तसंच रक्तातील पेशी कमी होऊन अंगावर लाल ठिपके अथवा लाल-काळे चट्टे उमटू शकतात. नाकातोंडातून अथवा लघवीद्वारे रक्तस्त्राव होऊ शकतो. वरील सर्व लक्षणं, लेप्टोस्पायरोसिस या विशिष्ट आजाराची नसल्यामुळे डेंग्यू किंवा कॉम्प्लिकेटेड मलेरिया, इत्यादी आजार असल्याची संभ्रमावस्था निर्माण होऊ शकते.

निदान :
लेप्टोस्पायरोसिसच्या जिवाणूंविरूद्ध शरिरातील अँटिबॉडिज (Antibodies) ची चाचणी ELISA, MAT किंवा PCR टेस्टे द्वारे करून लेप्टोस्पायरोसिसचे निदान करता येते. * तसंच लिव्हर आणि किडणी या चाचण्या (lft, rft) सी.बी.सी, एक्स-रे या द्वारे निदान करण्यास मदत होऊ शकते.

उपचार :
सौम्य स्वरूपाचा आजार असल्यास बाह्य रूग्ण विभागातून गोळ्या-औषध घेणं आणि गुंतागुंतीच्या वरील नमूद केलेल्या लक्षणांबद्दल सतर्क राहाणं तसंच डॉक्टरांच्याच सल्ल्याने औषधोपचार करणं गरजेचं आहे.

प्रतिबंध :
लेप्टोस्पायरोसिसच्या प्रतिबंध करणं महत्त्वाचं आहे. घरामध्ये आणि वस्त्यांमध्ये स्वच्छता ठेवणं गरजेचं आहे. जेणेकरून उंदरांचे प्रमाण वाढणार नाही. पावसाळ्यात योग्य काळजी घेणं, साचलेल्या पाण्यात अथवा पुराच्या पाण्यातून मार्गक्रमण करणं टाळणं, विशेषतः पायास जखम असल्यास. लेप्टोस्पायरोसिसची साथ असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने Doxycycline 200 mg आठवड्यातून एक टॅबलेट घेतल्यास काही प्रमाणात संरक्षण मिळू शकेल.
सामान्य विज्ञान इयत्ता 8 वी शॉर्ट नोट्स :

सूर्य हा एक तारा असून त्या भोवती पृथ्वीसहित आठ ग्रह फिरतात.

 चंद्र हा पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे.
 प्रत्येक दिवशी चंद्रोदय आदल्या दिवसापेक्षा सुमारे ५० मिनिटे उशिरा होतो.
 चंद्राला पृथ्वीभोवती एक परिभ्रमण करण्यास २७.३ दिवस लागतात.
 एका अमावस्येपासुन दुसर्‍या आमवस्येपर्यंतचा काळ २९.५ दिवसांचा असतो.

 एकूण ८८ तारकासमूह मानले जातात. त्यातील ३७ तारकासमूह उत्तर खगोलीय तर ५१ तारकासमूह दक्षिण खगोलीय आहेत.

 प्राचीन भारतीय खगोल अभ्यासकांनी २७ नक्षत्रांची कल्पना केली आहे.

 प्लूटो आणि त्याच्यासारख्या इतर खगोलीय वस्तूंना आता बटुग्रह म्हणून ओळखतात.

 बुधाचा परिभ्रमणकाळ फक्त ८८ दिवस तर नेपच्यूनचा सुमारे १४६ वर्षे इतका मोठा असतो.
  बुध हा सूर्याचा सगळ्यात जवळचा आणि सगळ्यात लहान ग्रह आहे.
 पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह म्हणजे शुक्र. त्याला पहाटतारा म्हणतात.

 पृथ्वीच्या कक्षेत असलेल्या बुध आणि शुक्र यांना अंतर्ग्रह, तर कक्षेबाहेरील ग्रहांना बाह्यग्रह म्हणतात.
 मंगळ हा पहिला बाह्यग्रह आहे.

  सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह म्हणजे गुरु
 गुरूला एकूण ६३ उपग्रह आहेत.
 शनि या ग्रहाची घनता पाण्यापेक्षा कमी आहे.

 शुक्राप्रमाणे युरेनस देखील पूर्वेकडून पश्चिमेकडे स्वत: भोवती परिवलन करतो.

 धूमकेतूचे पुच्छ सूर्याच्या विरुद्ध बाजूने असते.
 हॅले हा धूमकेतू ७६ वर्षानी दिसतो. आता २०६० मध्ये दिसेल.

 भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट १९ एप्रिल १९७५ रोजी सोडण्यात आला.
 त्यानंतर इन्सॅट, आय.आर.एस., कल्पना - १, एज्युसॅट, भास्कर, इ. उपग्रह आपण अवकाशात सोडले आहेत.
 ‘इस्त्रो’ या संस्थेमार्फत आतापर्यंत २१ उपग्रह सोडण्यात आले.

 GMRT म्हणजे जयंट मिटेरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप.
टाटा इन्सिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR) ने ती खोडद येथे बसविली.

 आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे धोक्यात आलेल्या वनस्पती व अन्य वन्य प्राणी यांच्या संरक्षणासाठीचा करार १९७५ पासून अंमलात आला आहे.

जैवविविधतेच्या संरक्षणासाठी ब्राझील रिओ-द-जनिरो येथे झालेल्या १९९२ च्या वसुंधरा परिषदेत जैववैविध्य करारावर सह्या करण्यात आल्या.

  ५ मार्च १८७२ रोजी जॉर्ज वेस्टिंग हाऊस या संशोधकाने रेल्वेसाठी एअर ब्रेक प्रथम वापरले.

 चुंबकाकडे लोह, निकेल, कोबाल्ट या धातूंचे तुकडे आकर्षित होतात.

 मोकळ्या टांगलेल्या स्थितीमध्ये दक्षिणोत्तर स्थिर राहणे, हे चुंबकाचे वैशिष्ट आहे.

 इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्युट्रॉन हे अनुतील मूलकण आहेत.
 अणूच्या केंद्रकात प्रोटॉन आणि न्युट्रॉन असतात. अणूच्या केंद्रकाभोवती इलेक्ट्रॉन परिभ्रमण करतात.
  प्रोटॉन धनप्रभारीत, इलेक्ट्रॉन ऋण प्रभारीत तर न्युट्रॉनवर कोणताच प्रभार नसतो.
 अणुक्रमांक (Z) म्हणजेच अणुतील इलेक्ट्रॉन किंवा प्रोटॉनची संख्या.
 अनुवस्तुमानांक म्हणजे अणुतील प्रोटॉन आणि न्युट्रॉन यांच्या संख्याची बेरीज.
  मूलद्रव्याच्या संस्थानिकात अणुक्रमांक सारखाच असून अणूवस्तुमानांक भिन्न असतो.
 मूलद्रव्याच्या इतर मूलद्रव्यांशी संयोग पावण्याचा क्षमतेला संयुजा म्हणतात.

 विषाणूंभोवती प्रथिनांचे आवरण असते.
 जीवणूंमध्ये केंद्रकाऐवजी मुक्त गुणसुत्रे असतात.
 स्टॅफिलोकोकस जीवाणू खधापदार्थावर वाढताना एण्टेरोटॉक्झिन नावाचे विषारी रसायन तयार करतात.
 पेनिसिलीन नावाचे प्रतिजैविक पेनिसिलिअमपासून बनले आहे.

 साथीचे रोग- कॉलरा, विषमज्वर, इन्फ्लुएंझा, हगवण, डोळे येणे, इ.
 संसर्गजन्य रोग – क्षय, इन्फ्लुएंझा, इ
 संपर्कजन्य रोग – खरूज, इसब, गजकर्ण, इ.

 पिसळलेला कुत्रा, माकड, मांजर किंवा ससा यांच्या चावल्यामुळे रेंबीज होतो.

 रोबर्ट कॉक याने क्षय रोगाचे जिवाणू शोधून काढले.

 WHO तर्फे क्षयरोग निर्मुलन कार्यक्रम राबविला जातो. त्यासाठी DOT केंद्र  काढली आहेत. (Directly Observed Treatment)
 मनुष्यप्राणी ‘व्हीब्रिओ कॉलरा’ या कॉलर्‍याचा जिवाणू वाहक आहे.

 लसीकरण – बीसीजी, त्रिगुणी पोलिओ, गोवर, व्दिगुणी, धनुर्वात, कविळ-ब.
 त्रिगुणी लस घटसर्प, धनुर्वात व डांग्या खोकला या रोगांस प्रतिबंध करते.   
_____________________________________
For more join us @MPSCScience
आज महान शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचा जन्मदिन .

वाचा सविस्तर @MPSCScience
*जयंत विष्णू नारळीकर*
*भारतीय खगोलशास्त्रज्ञ व लेखक*
*जन्म - जुलै १९, १९३८*
नारळीकरांचा जन्म कोल्हापूर येथे जुलै १९, १९३८ रोजी झाला. त्यांचे वडील, रँग्लर विष्णू वासुदेव नारळीकर हे एक प्रसिद्ध गणितज्ञ, वाराणसी येथील बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित विभागचे प्रमुख होते. त्यांची आई सुमती विष्णू नारळीकर ह्या संस्कृत विदुषी होत्या. जयंत नारळीकरांचे शालेय शिक्षण वाराणसी येथे झाले. इ.स. १९५७ साली त्यांनी विज्ञानाची पदवी (B.Sc.) प्राप्त केली.या परीक्षेत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते ब्रिटनमधील केंब्रिज येथे गेले. तेथे त्यांना बीए, एमए व पीएचडी च्या पदव्या मिळाल्या. शिवाय, रँग्लर ही पदवी, खगोलशास्त्राचे टायसन मेडल व इतर अनेक बक्षिसे मिळाली. १९६६ साली नारळीकर यांचा विवाह मंगला सदाशिव राजवाडे (गणितज्ञ) ह्यांच्याशी झाला. त्यांना तीन मुली आहेत - गीता, गिरिजा व लीलावती. १९७२ साली ते भारतात परतले. त्यांनी मुंबई येथील टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या (टी.आय.एफ.आर.) खगोलशास्त्र विभागात प्रमुख म्हणून पद स्वीकारले. १९८८ साली त्यांची पुणे येथील आयुका संस्थेचे संचालक म्हणून नियुक्ती झाली. डॉ. नारळीकर यांच्या पत्नी मंगला नारळीकर ह्या ’नभात हसते तारे’ या पुस्तकाच्या सहलेखिका आहेत. ’पाहिलेले देश भेटलेली माणसं’ हे त्यांनी स्वतंत्रपणे लिहिलेले पुस्तक आहे.
संशोधन
स्थिर स्थिती सिद्धान्त
चार दशकांहून अधिक कालावधीपासून त्यांचे खगोलभौतिकी क्षेत्रात संशोधन सुरू आहे. त्याच बरोबर सतत पुस्तके लिहिण्याचा कार्यक्रमही चालू आहे. सामान्य माणसाला खगोलशास्त्र समजवण्यासाठी त्यांनी गेली अनेक वर्षे प्रयत्न केले आहेत. यासाठी सर्व प्रसारमाध्यमांचा ते उपयोग करतात. त्यांच्या 'यक्षांची देणगी' या पहिल्याच पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे.
साहित्यातील भर
विविध मराठी नियतकालिकांतून जयंत नारळीकर सातत्याने विज्ञानचिषयक माहितीने भरलेले ललित लेखन प्रसिद्ध होत असते. नारळीकरांच्या पुस्तकांची जगांतील अनेक भाषांत रूपांतरे झाली आहेत.
*विज्ञानकथा पुस्तके*
अंतराळातील भस्मासुर
अभयारण्य
टाइम मशीनची किमया
प्रेषित
यक्षांची देणगी
याला जीवन ऐसे नाव
वामन परत न आला
व्हायरस
*इतर विज्ञानविषयक पुस्तके*
आकाशाशी जडले नाते
गणितातील गमतीजमती
युगायुगाची जुगलबंदी गणित अन् विज्ञानाची (आगामी)
नभात हसरे तारे (सहलेखक : डॉ. अजित केंभावी आणि डॉ. मंगला नारळीकर)
विज्ञान आणि वैज्ञानिक
विज्ञानगंगेची अवखळ वळणे विज्ञानाची गरुडझेप
विश्वाची रचना
विज्ञानाचे रचयिते
सूर्याचा प्रकोप
Facts And Speculations In Cosmology (सहलेखक : Geoffrey Burbidge)
Seven Wonders Of The Cosmos
*आत्मचरित्र*
चार नगरांतले माझे विश्व
*पुरस्कार*
१९६५मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाला. २००४मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळाला. २०१०मध्ये त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला. त्यांना भटनागर पुरस्कार आणि एम. पी. बिरला हे पुरस्कारही मिळाले आहेत. २०१४साली मिळालेला तेनाली (हैदराबाद) येथील नायुदअम्मा ट्रस्टचा डॉ. वाय. नायुदअम्मा स्मृती पुरस्कार-२०१३ जयंत नारळीकर यांच्या आत्मचरित्राला दिल्लीच्या साहित्य अकादमीचा २०१४ सालचा पुरस्कार मिळाला आहे. ’यक्षाची देणगी’ या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार अमेरिकेतील फाउंडेशनतर्फे दिला जाणारा साहित्यविषयक जीवनगौरव पुरस्कार (२०१२)
चरित्र
डॉ. विजया वाड यांनी डॉ. नारळीकर यांचे ’विज्ञान यात्री डॉ.जयंत नारळीकर’ या नावाचे चरित्र लिहिले आहे.
@MPSCScience

🔹उष्णता

उष्णता हा ऊर्जेचा एक प्रकार असून कोणत्याही प्रकारच्या ऊर्जेचे रूपांतर करुन ती मिळविता येते.

थंडीच्या दिवसात आपण हातावर हात घासतो. या प्रकियेत यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर उष्णता उर्जेत होते.

जेव्हा आपण गिझरचे बटण चालू करतो तेव्हा विधुत ऊर्जेचे रूपांतर उष्णता उर्जेत होते. या उलट जेव्हा पाणी तापविले जाते तेव्हा पाण्याचे रूपांतर वाफेत होते.

वाफेच्या इंजिनामध्ये वाफेचे रूपांतर यांत्रिक उर्जेत होते व वाफेच्या इंजिनाच्या सहाय्याने रेल्वे धावते.

पाण्याचे असंगत आचरण=>

सामान्यपणे द्रव मर्यादित तापमानापर्यंत तापविल्यास त्याचे प्रसरण होते व थंड केल्यास त्याचे आकुंचन होते.

परंतु पाण्याचे तापमान 4℃ पेक्षा कमी झाले असता पाणी वैशिष्ट्यपूर्ण व अपवादात्मक आचरण दाखवते.

0℃ तापमानाचे पाणी तापविले असता सुरूवातीस 4℃ तापमान होईलपर्यंत त्याचे प्रसरणाऐवजी आकुंचन होते.

4℃ या तापमानास पाण्याचे आकारमान न्युनतम होते आणि 4℃ च्या पुढे तापमान गेल्यास पाण्याचे आकारमान वाढत जाते.

पाण्याचे 0℃पासून 4℃ पर्यंत पाण्याचे तापमान वाढविल्यास त्याचे आकारमान वाढण्याऐवजी कमी होते.

4℃ या तापमानास पाण्याचे आकारमान न्यूनतम (Minimum) असते. म्हणून पाण्याची घनता 4℃ ला उच्चतम (Maximum) असते.

पाण्याचे असंगत आचरण होपच्या उपकरणाच्या सहाय्याने दाखविता येते.

बर्फ पाण्यावर तरंगते याचाच अर्थ त्याची घनता 0℃ तापमानाच्या पाण्यापेक्षा कमी आहे असा होतो.

थंड प्रदेशामध्ये हिवाळ्यात वातावरणाचे तापमान 0℃ पेक्षाही कमी होऊ शकते. तापमान कमी होत जाते तसतसे तळी आणि तलावातील पाणी आकुंचन पावू लागते. त्याची घनता वाढते. ते तळाकडे जाऊ लागते. ही क्रिया संपूर्ण पाण्याचे तापमान 4℃होईपर्यंत चालू राहते.

तापमान 4℃ पेक्षा कमी होऊ लागल्यानंतर ते आकुंचन पावण्याऐवजी प्रसरण पावू लागते.
___________________________________
Join our telegram Channel @MPSCScience
@MPSCScience

🔹बल

निसर्गात आढलाणाऱ्या आणि परस्परांपासून भिन्न असणाऱ्या सर्व बलांचे 4 मुख्य गटात वर्गीकरण करता येते.

गुरुत्व बल

विधुत चुंबकीय बल

केंद्रकीय बल

क्षीण बल

गुरुत्वबल (Gravitational Force)=>

सफरचंद खालीच का पडले ? या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात न्यूटन यांनी गुरुत्वबलाचा शोध घेतला.

न्यूटनच्या म्हणण्यानुसार विश्वातील प्रत्येक वस्तु दुसर्या वस्तूला स्वत:कडे ओढते. या प्रकारे प्रयुक्त आकर्षणबलास 'गुरुत्वबल' असे म्हणतात.

हे बल परस्परांकडे आकर्षित होणार्‍या दोन वस्तूंच्या वस्तुमानावर अवलंबून असते. ओढणार्‍या वस्तूंचे वस्तूमान जास्त असेल तर बलाचे परिमाणही जास्त असते.

एखाधा वस्तूवर समान अंतरावर पृथ्वीचे गुरुत्वबल हे चंद्राच्या गुरुत्वबलापेक्षा अधिक असते. कारण चंद्राचे वस्तुमान पृथ्वीच्या वस्तुमानापेक्षा कमी असते.

गुरुत्वबल दोन वस्तूंमधील अंतरावरदेखील अवलंबून असते. जर दोन वस्तूंमधील अंतर कमी असेल तर त्यांच्यातील गुरुत्वबल जास्त असते.

न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम असे सांगतो की विश्वातील कोणत्याही दोन वस्तु कोठेही असल्या तरी त्यांच्या परस्परांना आकर्षित करणारे गुरुत्वबल प्रयुक्त असते. हे बल त्या वस्तूंच्या वस्तुमानाच्या गुणकाराशी समानुपाती व वस्तूंमधील अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती असते.

F=G m1 m2 /r2 G = विश्वगुरुत्व स्थिरांक

SI पद्धतीत G = 6.67 × 10-11 Nm2/kg2

CGS पद्धतीत G = 6.67 × 10-8 dyne.cm2/g2

पृथ्वीचे गुरुत्व त्वरण=>

एखादी वस्तु विशिष्ट उंचीवरून हवेतून खाली सोडली तर ती सरळ खाली येते. खाली येताना वेग वाढतो. याचा अर्थ त्याच्यात त्वरण निर्माण होते. यालाच 'गुरुत्व त्वरण' असे म्हणतात.
____________________________________
Join our Telegram channel @MPSCScience
@MPSCScience

🔹शक्ती

कार्य जलद किंवा मंद होण्याचे प्रमाण म्हणजे 'शक्ती' होय.

कार्य करण्याच्या दरास 'शक्ती' म्हणतात.

केलेले कार्य समान असले तरी त्यांनी वापरलेली शक्ती वेगवेगळी असे शकते.

गच्चीवरील पाण्याची टाकी एक माणूस दिवसभरत बादलीच्या सहाय्याने भरू शकतो, तर तेच काम करण्यासाठी मोटारीला 5 मिनिटे लागू शकतात.

शक्ती (P) = कार्य/काल = w/t

शक्तीचे एकक=>

SI प्रणालीत शक्तीचे एकक वॅट आहे.

1 वॅट = 1 ज्युल/सेकंद

1 किलोवॅट = 1000 वॅट

औधोगिक क्षेत्रामध्ये शक्ती मोजण्यासाठी अश्वशक्ती Horse Power या एककाचा वापर प्रचलित आहे.

1 अश्वशक्ती = 746 वॅट

व्यावहारिक उपयोगासाठी शक्तीचे एकक किलोवॅट तास हे आहे.

1 किलोवॅट ही शक्ती म्हणजे 1000 J प्रति सेकंद या प्रमाणे केलेले कार्य.

1 Kwhr = 1 Kw × 1 hr

= 1000w × 3600 s

= 3.6 × 106 Joules

घरगुती वापर, औधोगिक, व्यावहारीक उपयोगासाठी हे एकक वापरतात.
___________________________________
join our telegram channel @MPSCScience
@MPSCScience

🔹प्लेटलेट्स म्हणजे काय?
हा प्रश्न अनेकांना पडला असेल.त्या प्रश्नाचं उत्तर या लेखात मिळेल.

हिमोग्लोबिन, प्लाझ्माप्रमाणे प्लेटलेट्स हादेखील रक्तातील एक महत्त्वाचा घटक आहे. रक्त पातळ होऊ न देण्याचं तसंच
रक्तवाहिन्यांना इजा झाल्यास रक्तस्त्राव अधिक प्रमाणात होऊ न देण्याचं काम या ‘प्लेटलेट्स’ करतात.

या प्लेटलेट्स मुळातच एखाद्या प्लेटप्रमाणे दिसतात. त्यामुळे त्यांना ‘प्लेटलेट्स’ हे नाव शास्त्रज्ञांनी दिलं आहे.या पेशींसाठी वैद्यकीय भाषेत ‘थ्रोम्बोसाइट्स’ ही संज्ञा वापरली आहे.

रक्तामध्ये प्रामुख्याने तीन पेशी असतात. लालपेशी (आरबीसी),पांढऱ्या पेशी (डब्लूबीसी)
आणि प्लेटलेट्स (तंतुकणिका). त्यापैकी रक्तामध्ये ‘प्लेटलेट्स’ची संख्या सर्वाधिक असते.प्लेटलेट्स या मोठया हाडांतील
रक्तमज्जेत (रेड बोनमॅरो) असणाऱ्या मेगा कॅरोसाइट्स या पेशींपासून तयार होतात.
त्यांचं रक्तातील आयुष्य सर्वसाधारणपणे 5-9 दिवसांचं असतं. जुन्या झालेल्या प्लेटलेट्स प्लीहा (स्टीन) आणि यकृत (लिव्हर) या मध्ये नाश पावतात.

प्लेटलेट्सचं कार्य

रक्तवाहिन्यांतून वाहणारं रक्त हे प्रवाही राहणं महत्त्वाचं असतं. ऑक्सिजन वहनाचं प्रमुख कार्य रक्तातून होतं. तसंच रक्त शरीरातील विभिन्न अवयवांचे पेशीस्तरांवर पोषण करते.
एखादी जखम झाल्यास रक्तवाहिन्यांमधून रक्त अधिक प्रमाणात वाहून गेल्यास जीवितहानी देखील होऊ शकते. अशा वेळेस जखम झालेल्या ठिकाणी प्लेटलेट्स आणि फायबर एकत्र येऊन रक्तप्रवाह खंडित करण्याचं काम करतात. त्यामुळेच प्लेटलेट्सना ‘मानवी शरीराची कवचकुंडलं’ म्हटलं जातं.

प्लेटलेट्सची संख्या

सर्वसाधारणपणे मानवी शरीरातील प्लेटलेट्सची संख्या दीड ते साडेचार लाख इतकी असते. संख्या प्रमाणापेक्षा अधिक झाल्यास रक्ताची गुठळी होऊन, रक्तवाहिन्यांतील रक्तप्रवाहाला अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे हृदयरोग, स्ट्रोक यांसारखे आजार होतात. हातापायाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण झाल्यास,
शरीराचा तो भाग बधीर होऊन निकामी होऊ शकतो. संख्या प्रमाणापेक्षा कमी झाल्यास रक्तस्त्राव अधिक होतो. म्हणजे नाकातून, हिरडयांमधून, थुंकीतून रक्त पडतं. त्वचेवर लालसर ठिपके येतात. मासिक रज:स्रव अधिक प्रमाणात होतो. जखम झाल्यास रक्तस्रव आटोक्यात येत नाही. जास्त रक्त गेल्याने थकवा येतो.

प्लेटलेट्स कमी होण्याची कारणं

• डेंग्यू, मलेरियाचा ताप
• अनुवंशिक आजार
• केमोथेरपी

संख्या कमी झाल्यास...

डेंग्यू, मलेरिया या साथीच्या तापात प्लेटलेट्सची संख्या अचानक कमी होऊ शकते. त्यामुळे 2-3 दिवसांचा ताप आल्यास,
त्या त्या रोगांची लक्षणे दिसल्यास वैद्यकीय सल्ल्याने त्वरित रक्ततपासणी (सीबीसी टेस्ट) करून घ्यावी. त्यानुसारच उपाययोजना करावी.

प्लेटलेट्सची संख्या कमी झाल्यास लक्षात ठेवायच्या गोष्टी :

• लसूण खाऊ नये.
• अधिक श्रमाचे व्यायाम तसंच दगदग करु नये.
• अ‍ॅस्प्रिन, कोल्डडॅगसारखी औषधे घेऊ नयेत.
• दात घासताना ब्रश लागणार नाही, याची दक्षता घ्यावी.
• सु-या, कातरी वापरताना काळजीने वापरावे.
• बद्धकोष्ठता होणार नाही, याची काळजी घ्यावी.
• त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

प्लेटलेट्स कमी झाल्यास, त्या बाहेरून घ्याव्या लागतात. इतर कुठलेही उपाय अजून खात्रीशीररीत्या सिद्ध झालेले नाहीत.
प्लेटलेट्ससाठी गोळया किंवा औषधंही नाहीत.
पौष्टिक आहारातूनच प्लेटलेट्सचं प्रमाण नियंत्रणात ठेवता येतं.

नैसर्गिकरीत्या ब्लड प्लेटलेट्स वाढवण्यात मदत करतील हे 7 पदार्थ .

जर तुम्ही शरीरात कमी होत चाललेल्या प्लेटलेट्समुळे चिंताग्रस्त असाल तर घाबरू नका कारण तुम्ही तुमचा आहारात काही पदार्थांचा समावेश करून ब्लड प्लेटलेट्स नैसर्गिक पद्धतीने वाढवू शकता.

शरीरात प्‍लेटलेट्सची संख्या कमी होण्याच्या स्थितीला थ्रोम्बोसायटोपेनिया नावाने ओळखले जाते. या निरोगी व्यक्तीच्या शरीरात सामान्य प्लेटलेट काउंट 150 हजार ते 450 हजार प्रती मायक्रोलीटर असतो. परंतु जेव्हा हा काउंट 150 हजार प्रती मायक्रोलीटरपेक्षा खाली येतो तेव्हा याला लो प्लेटलेट मानले जाते. काही विशिष्ठ प्रकरच्या औषधी, अनुवांशिक रोग, कँसर, केमोथेरपी ट्रीटमेंट, अल्कोहलचे जास्त सेवन आणि काही विशिष्ठ प्रकारचे आजार उदा. डेंग्यू, मलेरिया, चिकनगुण्या झाल्यानंतर ब्लड प्लेटलेट्सची संख्या कमी होते.

नैसर्गिक पद्धतीने प्लेटलेट्स वाढण्व्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा....

१.पपई -

पपईचे फळ आणि झाडाची पानं दोन्हींचा उपयोग कमी असलेल्या प्लेटलेट्स थोड्याच दिवसात वाढवण्यास मदत करते. 2009 मध्ये मलेशिया येथे वैज्ञानिकांनी केलेल्या एका सर्व्हेमध्ये आढळून आले की, डेंग्यू आजारात रक्तातील कमी होणाऱ्या प्लेटलेटची संख्या पपई पानांच्या रसाचे सेवन केल्याने वाढू शकते. पपईचे पानं तुम्ही चहाप्रमाणे पाण्यात उकळून घेऊ शकता. याची चव ग्रीन टी प्रमाणे असते
.

२.गुळवेल

गुळवेलचे ज्यूस ब्लड प्लेटलेट वाढवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पडते. डेंग्यू झालेल्या रुग्णाने याचे सेवन प्लेटलेट्स वाढवण्यासाठी कर्वे तसेच यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते. दोन चमचे गुळवेल सत्व एक चमचा मधासोबत दिवसातून दोन वेळेस घ्यावे किंवा गुळवेलची काडी रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावी आणि सकाळी उठल्यानंतर हे पाणी गाळून प्यावे. या उपायाने ब्लड प्लेटलेट वाढण्यास मदत होईल. गुळवेल सत्व आयुर्वेदिक मेडिकल स्टोअरवर सहजपणे उपलब्ध होते.

३.आवळा

प्लेटलेट्स वाढवण्यासाठी आवळा लोकप्रिय आयुर्वेदिक उपचार आहे. आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात उपलब्ध असलेले व्हिटॅमिन 'सी' प्लेटलेट्स वाढवण्याचे आणि तुम्ही प्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करते. दररोज सकाळी नियमितपणे रिकाम्या पोटी 3-4 आवळे खावेत. दोन चमचे आवळ्याच्या ज्यूसमध्ये मध टाकून तुम्ही हे मिश्रण घेऊ शकता.

४.भोपळा

भोपळा कमी प्लेटलेट कांउटमध्ये सुधार करणारा उपयुक्त आहार आहे. भोपळा व्हिटॅमिन 'ए' ने समृद्ध असल्यामुळे प्लेटलेटचा योग्य विकास होण्यास मदत करतो. हा कोशिकांमध्ये उत्पन्न होणाऱ्या प्रोटीनला नियंत्रित करतो. यामुळे प्लेटलेट्सचा स्तर वाढवण्यास मदत होते. भोपळ्याच्या अर्धा ग्लास ज्यूसमध्ये दोन चमचे मध टाकून दिवसातून दोन वेळेस घेतल्यास रक्तातील प्लेटलेट्सची संख्या वाढते.

५.पालक

पालक व्हिटॅमिन 'के'चा चांगला स्रोत असून अनेकवेळा कमी प्लेटलेट विकाराच्या उपचारामध्ये याचा उपयोग केला जातो. व्हिटॅमिन 'के' योग्य पद्धतीने होणाऱ्या ब्लड क्‍लॉटिंगसाठी आवश्यक आहे. अशाप्रकारे पालक जास्त प्रमाणात होणाऱ्या ब्लीडींगचा धोका कमी करण्यात सहाय्यक ठरतो. दोन कप पाण्यामध्ये 4 ते 5 पालकाची ताजी पानं थोडावेळ उकळून घ्या. त्यानंतर हे पाणी थंड झाल्यानंतर यामध्ये अर्धा ग्लास टोमॅटोचा रस मिसळा. हे मिश्रण दिवसातून दोन ते तीन वेळेस घ्या. या व्यतिरिक्त तुम्ही पालकाचे सेवन सलाड, सूप, भाजी स्वरुपात करू शकता.

६.नारळ पाणी

शरीरात ब्लड प्लेटलेट वाढवण्यात नारळ पाणी खूप सहाय्यक ठरते. नारळ पाण्यामध्ये इलेक्ट्रोलाइट्स भरपूर प्रमाणात असतात. या व्यतिरिक्त हे पाणी मिनरलचा उत्तम स्रोत आहे. हे शरीरातील ब्लड प्लेटलेट्सची कमतरता भरून काढण्यास उपयुक्त आहे.

७.बीट

बीटचे सेवन प्लेटलेट वाढवणार सर्वात लोकप्रिय आहार आहे. नैसर्गिक अँटीऑक्‍सीडेंट आणि हेमोस्टॅटिक गुणांनी भरपूर असल्यामुळे, बीट प्लेटलेट काउंट थोड्याच दिवसात वाढवण्याचे काम करते. दोन ते तीन चमचे बीट रस एक ग्लास गाजराच्या रसामध्ये मिसळून घेतल्यास ब्लड प्लेटलेट्सची संख्या जलद गतीने वाढते. यामध्ये उपलब्ध असलेल्या अँटीऑक्‍सीडेंट गुणामुळे शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढते.
_____________________________________
For more updates Join us @MPSCScience
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
यशाचा मटा मंत्र - 28 july