MPSC Science
67K subscribers
8.6K photos
54 videos
355 files
716 links
Download Telegram
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
Forwarded from MPSC Science
शोध जैवतंत्रज्ञानाचा
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
कृत्रिम बुद्धिमत्ता आणि करियरच्या संधी
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
उत्प्रेरकांची कमाल
मानवी रक्तगट
🌷🌷मूत्रपिंड🌷🌷

🌿माणसाच्या शरीरातील मूत्रपिंड (kidney) हा अवयव गडद लाल, घेवड्याच्या शेंगेच्या (bean-shaped) आकाराचा असतो.

🌷मूत्रपिंड दोन असून प्रत्येकी साधारणपणे १० सेंमी. लांब, ५ सेंमी. रुंद व ४ सेंमी. जाड असतात.

🌷 उजवे मूत्रपिंड हे डाव्या मूत्रपिंडाच्या किंचित खाली असते.


🌷🎋🌷🎋🌷🎋🌷🎋🎋🌷🌷🎋🌷
🌷🌷कार्य🌷🌷

🌿मूत्रपिंडे अशुद्ध रक्‍त शुद्ध करण्याचे काम करत असतात.

🌿मूत्रपिंडात आलेल्या रक्तातून उत्सर्जक पदार्थ निराळे काढले जातात व ते मूत्र मार्गातून विसर्जित होतात

🌿 या शिवाय त्यात ‘डी-३‘ हे जीवनसत्त्व आणि एरिथ्रोपोइटिन-दोन नावाचे संप्रेरक तयार होते.

🌿ड जीवनसत्त्व मानवी शरीरातल्या कॅल्शियमचे संतुलन ठेवण्यासाठी लागते. एरिथ्रोपोइटिनमुळे रक्ताच्या लाल पेशी तयार होतात.

🌿शरीरातले आम्ल व अल्कली यांचे संतुलन कायम राखण्याचे कार्यही मूत्रपिंडे करतात..

🌿मूत्रपिंडतज्‍ज्ञ डॉक्टरला नेफ्रॉलॉजिस्ट म्हणतात.


🎋🌷🎋🌷🎋🌷🎋🌷🎋🌷🌷🎋🎋
🎋🎋मूत्रपिंड रोपण🎋🎋


🌲दहामधील एका व्यक्तीचे मूत्रपिंड अकार्यक्षम असण्याची शक्यता असते. मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा या सार्‍यांचा एकत्रित परिणाम मूत्रपिंडांच्या आरोग्यावर होत असतो.

🌲 मूत्रपिंड खराब होण्याची दोन महत्त्वाची कारणे म्हणजे मधुमेह आणि उच्च रक्तदाब. रक्तदाबातील चढउतारामुळे किडनी निकामी होण्याचे प्रमाण वाढते. या अवयवास विकार झाल्यावर रक्तशुद्धीकरण योग्य होत नाही.

🌲त्यामुळे किडनीचे आरोग्य सुधारण्यासाठी मूत्रपिंडारोपण अथवा डायलिसिस या दोहोपैकी एक पर्याय वापरला जाऊ शकतो.

🌿🎋🌿🎋🌿🎋🌿🎋🌿🎋🌿🎋🌿🎋
👇👇यकृत👇👇

🌷🌷यकृत हा असा अवयव आहे, की जो अविरतपणे काम करत राहतो. किरकोळ बिघाड झाला तरी यकृत तो दर्शवत नाही, म्हणूनच सहसा यकृतातील बिघाड लक्षात येतो तोपर्यंत खूप नुकसान झालेले असू शकते.🌷🌷