MPSC Science
67K subscribers
8.6K photos
54 videos
354 files
716 links
Download Telegram
Forwarded from Loksatta - लोकसत्ता
Forwarded from Loksatta - लोकसत्ता
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
विज्ञानवाटा
भारतातील प्रमुख दूरसंचार कंपन्यांचे ग्राहक
🔹वैज्ञानिक क्षेत्राशी संबंधित काही संस्था


१) *अणू शक्ती आयोग*
A.E.C , मुंबई

२) *भाभा ऑटमिक रिसर्च सेंटर*
B.A.R.C , तुर्भे

३) *इंदिरा गांधी सेंटर फॉर ऑटोमिक रिसर्च*
I.G.C.A.R , कल्पकम

४) *सेंटर फॉर ऍडवांस टेक्नोलॉजी*
C.A.T , इंदौर

५) *इंडियन स्पेस रिसर्च आर्गनाइजेशन*
I.S.R.O , बंगळूुर

६) *विक्रम साराभाई स्पेस सेंटर*
V.S.S.C , तिरुवनंतपुरम

७) *फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी*
P.R.L , अहमदाबाद

८) *श्रीहरिकोटा रेंज*
श्रीहरिकोटा

९) *स्पेस ऍप्लीकेशन सेंटर*
S.A.C , अहमदाबाद

१०) *डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन*
D.R.D.O

११) *नॅशनल इन्फ़ॉर्मेशन सिस्टम फॉर साइन्स अँड टेक्नोलॉजी*
N.I.S.S.A.T

१२) *इंडियन इन्सिटट्यूट ऑफ़ साइन्स*
I.L.S , बंगळूर

१३) *इंडियन साइन्स काँग्रेस असोसिएशन*
I.S.C.A

१४) *डिपार्टमेंट ऑफ़ साइन्स अँड टेक्नोलॉजी*
D.S.T

१५) *सर्वे ऑफ़ इंडिया*
S.L , देहरादून

१६) *इंडियन कौन्सिल ऑफ़ मेडिकल रिसर्च*
I.C.M.R

१७) *कन्झुमर रिसर्च अँड ऐज्यूकेशन सोसायटी*
C.R.E.S , अहमदाबाद

१८) *नॅशनल रिमोट सेन्सिंग एजन्सी*
N.R.S.A
Forwarded from MPSC Science
नमस्कार मित्रानो ,

आपल्या चॅनेल ला किती स्टार द्याल ?

सर्वप्रथम खालील लिंक वर क्लिक करा ,
त्यानंतर एक Telegram Channels Boat अशी स्क्रीन ओपन होईल ,
त्याच्या खाली तळाशी start वर क्लिक करा ,
तिथे तुम्हाला

⭐️
⭐️⭐️
⭐️⭐️⭐️
⭐️⭐️⭐️⭐️
⭐️⭐️⭐️⭐️⭐️

असे स्टार दिसतील , त्यापैकी आपण आम्हाला किती रेटींग्ज ( तारांकित ) म्हणजे किती स्टार देऊ इच्छिता त्यावर क्लिक करा .

त्यानंतर आपण आणखी रिप्लाय देऊन आपले आमच्या चॅनेल विषयीचे मतही मांडू शकता .

आणखी रिप्लाय देऊन आपण विविध विषयांची चॅनेल पण शोधू शकता .

चला तर मग खालील लिंक वर क्लिक करून आम्हाला 5⭐️ रेटिंग्स द्या:

https://telegram.me/tchannelsbot?start=MPSCScience
____________________________________
Rate us
LASSA ताप याबद्दल माहिती
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
Just Completed milestone of 1,00,000 members.

Join us @eMPSCkatta
Forwarded from Loksatta - लोकसत्ता
जॉईन करा @MPSCScience
कोशिका : (पेशी, पेशिका). कोणत्याही प्राण्याच्या अथवा वनस्पतीच्या शरीराच्या कोणत्याही भागाची किंवा सूक्ष्म शरीराची सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने तपासणी केली, तर ती व्यक्ती एक किंवा अनेक सूक्ष्म घटकांची बनलेली आढळते. संरचना व कार्ये यांच्या दृष्टीने ह्या घटकाला जीवनाचे एकक मानतात व यालाच ‘कोशिका’ म्हणतात. सु. ३०० वर्षांपूर्वी रॉबर्ट हूक (१६३५–१७०३) ह्या इंग्रज शास्त्रज्ञांनी प्रथमतः बुचाचे अतिशय पातळ काप सूक्ष्मदर्शकातून पाहिले, त्यावेळी त्यांना त्यात अनेक कप्पे दिसले. १६६७ मध्ये त्यांनी लिहिलेल्या
मायक्रोग्रॅफीया या ग्रंथात ह्या कप्प्यांना प्रत्येकी ‘सेल’ (कोशिका) हे नाव दिले, कारण त्यांना ती सर्व संरचना मधमाश्यांच्या पोळ्याप्रमाणे दिसली. त्यानंतर आजपर्यंत इंग्रजीत तेच नाव वापरात आहे; तथापि हूक यांची त्या संज्ञेमागील निर्जीव चौकट ही मूळ कल्पना आज बदलेली आहे. त्यामध्ये त्यांनी पाहिलेल्या द्रव पदार्थास ‘पोषक रस’ असे नाव दिले होते; परंतु एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत हा रस म्हणजेच खरे जीवद्रव्य आहे, हे समजले नव्हते. १६७१ मध्ये इटालियन शास्त्रज्ञ मार्चेल्लो मालपीगी व इंग्रज शास्त्रज्ञ नीहेमिया ग्रू यांच्या शारीरविषयक (शरीररचनाविषयक) ग्रंथामुळे वनस्पति-शारीराचा पाया घातला गेला. पुढे जीवद्रव्याचे महत्त्व कळल्यावर श्लायडेन, मोल, नॅगेली, कोन, माक्स शूल्ट्झ, स्ट्रासबुर्गर इत्यादींनी केलेल्या संशोधनाने कोशिकेसंबंधीच्या ज्ञानात अधिक भर पडून ⇨
कोशिकाविज्ञान ही विज्ञानशाखा स्वतंत्र रीतीने विकास पावू लागली. १८३८-३९ मध्ये श्लायडेन व श्वान यांनी पुढील कोशिका-सिद्धांत प्रस्थापित केला. ‘सर्व सजीवांत आढळणारी व संरचना आणि कार्य या दृष्टीने मौलिक बाबतींत साम्य दर्शविणारी जीवद्रव्ययुक्त कोशिका हा घटक जीवनाचे एकक आहे.’
काही प्रारंभिक प्राणी (आदिप्राणी) व वनस्पती (आदिवनस्पती) यांचे शरीर फक्त एका कोशिकेचे असून तिची संरचनाही फार गुंतागुंतीची असते, कारण तिच्यात सामान्य कोशिकांगाशिवाय पचन, गती, उत्सर्जन (निरुपयोगी द्रव्ये बाहेर टाकणे) वगैरेंकरिता आवश्यक अशी वैशिष्ट्यपूर्ण इतर अनेक कोशिकांगे आढळतात [→ शैवले; प्रोटोझोआ]. बहुतेक मोठ्या जीवप्रकारांत शरीर अनेक कोशिकांचे बनलेले असून शरीरातील जीवप्रक्रिया ज्या भिन्नभिन्न अवयवांकडून होतात त्यांतील कोशिका त्या त्या कार्याकरिता वैशिष्ट्य पावलेल्या असतात. आधुनिक सामाजिक जीवनात आढळणारी श्रम-विभागणी अनेककोशिक शरीरातही आढळते. प्रत्येक कोशिकेचे जीवन सर्व शरीराच्या जीवनाशी एकरूप झालेले असते; तथापि प्रत्येक कोशिकेत स्वतंत्रपणे आवश्यक ते फेरबदल करण्याचे सामर्थ्य टिकून राहते ही गोष्ट कोशिका-सिद्धांताशी सुसंगत आहे. समूहातील एखाद्या कोशिकेत स्रवण, विभाजन किंवा मृत्यू ह्यांपैकी काहीही होऊ शकते. सर्वांची सुसूत्र क्रियाशीलता मात्र संप्रेरकांच्या [उत्तेजक अंत:स्रावांच्या, → हॉर्मोने] प्रभावामुळे किंवा शरीरातील तंत्रिकायुक्त (मज्जातंतुयुक्त) यंत्रणेमुळे चालू राहते.
आकारमान व संख्या : कोंबडीच्या अंड्यातल्याप्रमाणे भरपूर पिवळा बलक असलेल्या मोठ्या कोशिका फारच थोड्या असतात. काही तंत्रिका-कोशिकांप्रमाणे (मज्जापेशींप्रमाणे) फक्त एकच शाखा खूप लांब (१ मी.) व काही मायक्रॉन (१ मायक्रॉन= १०-३ मिमी.) व्यास असलेल्या अशा आढळतात. वनस्पतीतील ⇨
प्रकाष्ठ व ⇨ परिकाष्ठ यांतील काही सूत्रे (धागे) १-३ किमी. (आवृतबीजीत) किंवा २-८ मिमी. (प्रकटबीजीत) व ⇨ आर्टिकसी त २०-५५० मिमी. पर्यंत लांब असतात. बहुतेक सर्व कोशिका फार सूक्ष्म असून त्यांचे मोजमाप मायक्रॉन एककात करावे लागते. साधारणपणे 3 मायक्रॉनपेक्षा चौपट मोठी किंवा ०·५ मायक्रॉनपेक्षा लहान कोशिका क्वचित आढळते. काही सूक्ष्मजंतूंचा (उदा., मायक्रोकॉकस वंशातील सूक्ष्मजंतूंचा) व्यास ०·२ मायक्रॉन असतो. मृदूतकातील [→ मृदूतक] कोशिकांचा व्यास सु. ०·०१-०·१ मिमी. पर्यंत असतो. कोणत्याही एका जातीत सर्वच कोशिका इतरांपेक्षा सापेक्षतः मोठ्या किंवा लहान असू शकतात. उदा., पृष्ठवंशी (पाठीचा कणा असलेल्या) प्राण्यांत अस्थियुक्त माशांमध्ये कोशिका फारच लहान असतात, तर सॅलॅमँडरात त्या मोठ्या असतात; परंतु मनुष्याच्या शरीरातील कोशिका मात्र आकारमानात मध्यम प्रकारच्या असतात. प्रकलाचे (कोशिकेतील कार्यांवर नियंत्रण ठेवणाऱ्या जटिल गोलसर पुंजाचे) आकारमानसुद्धा सापेक्षतः कोशिकेच्या आकारमानाशी सुसंगत असते; परंतु इतर कोशिकांगांचे तसे नसते. रोटिफेरासारख्या लहान अनेककोशिक प्राण्यांचे शरीर काही थोड्या कोशिका-शतकांचे बनलेले असते, परंतु अधिक मोठ्या जातींत कोशिकांची संख्या प्रचंड असते. मनुष्याच्या मेंदूच्या बाह्यांगात १०१० तंत्रिका-कोशिका असतात, तर सामान्य मनुष्यात २·५ x १०१२ लाल रक्तकोशिका (रक्ताणू) म्हणजे प्रत्येक रक्तबिंदूत सु. ५ x १०८ असतात.
अकोशिकीय संरचना : वर सांगितल्याप्रमाणे सर्व सजीव कोशिकामय असतात, परंतु काही सजीवांत तितका विकास