MPSC Science
67K subscribers
8.6K photos
54 videos
354 files
716 links
Download Telegram
🌷🌷पेशीजन्य रोग (Cellular Disease)🌷🌷

🌺कर्करोग/ कॅन्सर (Cancer)🌺

व्याख्या: पेशींच्या अनियंत्रित विभाजनातून शरीराच्या कोणत्याही भागात अनावश्यक पेशींच्या गाठी/ समुह तयार होणे म्हणजेच कर्करोग होय. अश्या अनावश्यक पेशींच्या समूहालाच गाठ (Tumour) असे म्हणतात.
गाठीचे प्रकार (Types Of Tumours)

निरुपद्रवी गाठ (Benign Tumour): अशा प्रकारच्या गाठींचा परिणाम शरीरातील इतर अवयवांवर होत नाही.

दुर्दम्य गाठ (Mallignant Tumour):अशा प्रकारच्या गाठींचा परिणाम अंतर्गत अवयवांच्या कार्यावर होतो. आणि यामुळेच कर्करोगाच्या स्थितीला दूर्दम्यता (Mallignancy) असेही म्हणतात.

रक्ताद्वारे कॅन्सरच्या वाढत असलेल्या पेशी जेव्हा सर्व शरीरभर पसरतात त्या स्थितीला Metastatis असे म्हणतात.

मानवी शरीरातील कोणत्याही अवयवात कॅन्सर होऊ शकतो. सर्वाधिक तोंडाचा, स्तनांचा, आणि रक्ताचा कॅन्सर बघायला मिळतो.

लक्षणे: कर्करोगाची लक्षणे सुरुवातीला आढळत नाहीत. न भरणाऱ्या जखमा, असाधारण रक्तस्त्राव, अपचन, ताप, वजन कमी होणे, खूप थकवा जाणवणे, त्वचेमध्ये बदल होणे.
🌷🌷कर्करोगाची कारणे: 🌷🌷

कर्करोग निर्माण करणाऱ्या घटकांचे तीन गट केले जाते.

1) अपसारी/ प्रारणे ऊर्जा (radiant Energy):

अतिनील किरणे, क्ष- किरणे, आणि गॅमा किरणे कर्करोगजन्य असतात. ही किरणे विविध मार्गांनी डी. एन. ए. रेणूंची हानी करतात.
डी. एन. ए. वरील परिणांव्यतिरिक क्ष-किरणे आणि गॅमा किरणे उतींमध्ये घटक मुक्त मूलके निर्माण करतात.
जगातील सुमारे 10% लोकांना यामुळे कर्करोग होतो.

2) रासायनिक सयुंगे (Chemical Compounds):

जगातील सुमारे 80% लोकांना विविध रासायनिक सयुंगांमुळे कर्करोग होतो.
उदा. आर्सेनिक, कोबाल्ट, कॅडमिअम, अल्फोटॉक्सिन -B-1, अबेसटॉस, पोलिसायक्लिक हाड्रोकार्बन, बेन्झीन, बेरिलियम, निकेल, डॉक्टीनोमायसिन या संयुगांचा परिणाम DNA रेणूंतील ग्वानिन या नत्ररेणूवर होतो.

3) विषाणू (Viruses):

कॅन्सर घडवून आणण्याची क्षमता असलेल्या जनुकांना कर्करोग जनुक म्हणतात. काही रोगांचे विषाणू कर्करोगजनक स्थिती निर्माण करतात. त्याचे प्रमाण 5% आहे.
उदा: हिपॅटिटिस -B आणि हिपॅटिटिस -C च्या विषाणूमुळे यकृताचा कर्करोग होतो.
राउस -सार्कोमा हर्पस विषाणूमुळे रक्ताचा कर्करोग होतो.
पॅपिलोमा विषाणूमुळे त्वचेचा कर्करोग होतो.

4) इतर घटक (Miscllaneous):

जगातील सुमारे 5% लोकांना अनारोग्यादायी सवयीमुळे कर्करोग होतो व दिवसेंदिवस यांचे प्रमाण वाढत चालले आहे.
धूम्रपान आणि तंबाखू सेवनामुळे तोंड, स्वरयंत्र, फुप्फुस, ग्रसनी, ग्रासनिका, स्वादुपिंड इत्यादींचा कर्करोग होतो.
अतिमद्यप्राशनामुळे यकृत व ग्रासनलिका यांचा कर्करोग होतो.
अतिमेदयुक्त आहारामुळे स्तनांचा कर्करोग

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
🌺🌺कर्करोगाचे प्रकार 🌺🌺

कार्सिनोमा - अभिस्तर पेशींचा किंवा त्वचेचा रोग

सार्कोमा - संयोजी उतींचा कर्करोग

लिम्फोमा- लसिकापेशींचा कर्करोग

ल्युकेमिया - रक्ताचा/ श्वेतपेशींचा कर्करोग

सेमिनोमा- वृषणाचा कर्करोग

डीसजर्मीनोमा - अंडाशयाचा कर्करोग

ब्लास्टोमा - अपरीकव पेशींचा कर्करो
🌷🌷कर्करोगाची चाचणी🌷🌷

कर्करोगाच्या चाचणीसाठीबायोप्सी (Biopsy) चाचणी मार्गांचा वापर केला जातो. यामध्ये शंकास्पद उतींचा छोटा तुकडा काढून सूक्ष्मदर्शकाखाली त्याचे निरीक्षण केले जाते.
🌷🌷कर्करोगाचा उपचार/ प्रतिबंध (Prevention/ Treatment):🌷🌷

१) कर्करोगग्रस्त पेशी व उटी पूर्णपणे काढून टाकणे

२) रेडियो थेरपी चा वापर: मानवी शरीरातील कॅन्सरच्या उपचारासाठी कोबाल्ट 60 चा वापर, थायरॉईड ग्रंथींच्या कर्करोगाच्या उपचारासाठी किरणोत्सारी आयोडीनचा वापर, जीभ आणि गर्भाशयाच्या कॅन्सरच्या उपचारासाठी किरणोत्सारी सुयांचा वापर

३) किमो थेरपी: कँसरविरोधी औषधांचा वापर, प्रामुख्याने रक्ताच्या कॅन्सरच्या उपचारासाठी

ऍस्पिरीन या औषधांमुळे कर्करोगामुळे होणारा संभाव्य मृत्यूचा धोका 7% ने कमी झाला आहे.

टॅमॉक्झिफेन किंवा रॅलोक्झिफेनमुळे स्त्रियांमध्ये ब्रेस्ट कँसर होण्याचा धोका कमी होऊ शकतो.

विषाणूंमुळे होणाऱ्या कर्करोगाविरुद्ध मानवी पॅपिलोमा विषाणू लस आणि हिपॅटिटिस-बी ची लस यांचा वापर केला जातो.
कर्करोग शरीरात इतरत्र कसा पसरतो

कर्करोगाचे निदान योग्य वेळी न होऊ शकल्यास तो मूळ भागातून हळूहळू शरीराच्या इतर भागांमध्ये पसरत जातो. कर्करोगाच्या पेशी लागण झालेल्या भागापासून फुटून शरीरात इतरत्र पसरल्यामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण जवळजवळ ९० टक्के इतके आहे. या इन्फोग्राफमध्ये पाहा.
Forwarded from MPSC Science
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
कमी गुरुत्वाकर्षणाच्या ठिकाणी पाणी कसे पितात ?
🌷🌷संयुगांची निर्मिती🌷🌷

व्याख्या:- ज्या मूलद्रव्यांच्या बाह्यतम कक्षा अपूर्ण असतात. अशी मूलद्रव्ये रासायनिक अभिक्रिया करून स्थिर इलेक्ट्रॉन संरुपण प्राप्त करतात म्हणजेच बाह्यतम कक्षा पूर्ण करतात. त्या रासायनिक अभिक्रिया दोन प्रकारे घडून येतात.



1) इलेक्ट्रॉन ची देवाणघेवाण 2) इलेक्ट्रॉनची भागीदारी
1) इलेक्ट्रॉन ची देवाणघेवाण

इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण धातू आणि अधातू यामध्ये होते.

धातूंच्या बाह्यतम कक्षेत 4 पेक्षा कमी इलेक्ट्रॉन असल्यामुळे ते इलेक्ट्रॉन गमावतात आणि अधातूंच्या बाह्यतम कक्षेत 4 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन असल्यामुळे ते इलेक्ट्रॉन कमावतात

🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿
🍀🍀धातु (Metal):🍀🍀

आपल्या बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉन गमावून धन आयनांची निर्मिती करतात त्यांनाच कॅटायन असे म्हणतात आणि धातूंचा या गुणधर्माला विद्युत धन गुणधर्म असे म्हणतात

🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿
🍀🍀धातु (Metal):🍀🍀

आपल्या बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉन गमावून धन आयनांची निर्मिती करतात त्यांनाच कॅटायन असे म्हणतात आणि धातूंचा या गुणधर्माला विद्युत धन गुणधर्म असे म्हणतात

🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿
🌿🌿2) इलेक्ट्रॉनची भागीदारी🌿🌿

समान किंवा भिन्न अधातूमध्येच इलेक्ट्रॉनची भागीदारी होते. समांतर धातूमध्ये भागीदारी झाल्यास रेणू तयार होतात तर भिन्न अधातूमध्ये भागीदारी झाल्यास संयुगे तयार होतात.

अधातूमध्ये भागीदारी होताना त्यांच्या बाह्यतम कक्षा जोडल्या जातात. त्यानंतर प्रत्येक अधातू बाह्यतम कक्षा पूर्ण करण्यासाठी लागणारे इलेक्ट्रॉंन भागीदारीमध्ये वापरतात आणि ते इलेक्ट्रॉन दोन्ही मूलद्रव्यासाठी सामाईक असतात.
🌷🌷रासायनिक बंध:🌷🌷

संयुगातील तसेच रेणूतील दोन किंवा अधिक अणूंना एकत्र बांधून ठेवण्यासाठी कारणीभूत असलेल्या आकर्षण शक्तीला रासायनिक बंध असे म्हणतात.

रासायनिक बंध इलेक्ट्रॉनची देवाण-घेवाण होऊन किंवा इलेक्ट्रॉनची भागीदारी होऊन तयार होतो त्यानुसार रासायनिक बंधाचे दोन प्रकार पडतात.
🌷🌷व्हिटॅमिन डी 🌷🌷

कॅल्शियम , मॅग्नेशियम आणि फॉस्फेट आणि इतर अनेक जैविक प्रभावांच्या आतड्यांसंबंधी शोषण वाढविण्यासाठी जबाबदार चरबी-विद्रव्य सेकोस्टेरॉइड्सचा एक गट आहे . [
१] मानवांमध्ये, या गटातील सर्वात महत्वाची संयुगे आहेत जीवनसत्व डी 3(ज्याला Cholecalciferol देखील म्हणतात ) आणि व्हिटॅमिन डी 2 ( एर्गोकाल्सीफेरॉल ) आहेत. 
.🌷 आवर्त सारणी तील आडव्या ओळींना आवर्तन तर उभ्या ओळींना गण म्हणतात . 

🌷२.आवर्तन ७ तर गण १८ आहेत. 

🌷३. आवर्तनात १ ते ७ अंक आहेत.प्रत्येक आवर्तनाची सुरुवात नवीन कक्षेत इलेक्ट्रोन भरण्याने होते. आवर्तन क्रमांक हा कक्षेच्या क्रमांका इतका  असतो . 

🌷४. पहिले आवर्तन-सर्वात लहान -२ मूलद्रव्ये 
     दुसरे व तिसरे आवर्तन -लघुआवर्तन-८ मूलद्रव्ये   
    चौथे व पाचवे आवर्तन -दीर्घ आवर्तन-१८ मूलद्रव्ये 
    सहावे आवर्तन - सर्वात दीर्घ - ३२ मूलद्रव्ये 
    सातवे आवर्तन -अपूर्ण 

🌷५. गणांना १ ते १८ क्रमांक दिले असून ज्या मूलद्रव्यांचेइलेक्ट्रोन संरुपण सारखे आहे त्यांना सारख्या गणात ठेवले आहे .

🌷६. समान गणातील मूलद्रव्ये समान रासायनिक गुणधर्म दाखवतात . 

🌷७. आवर्तसारणी मध्ये डाव्या बाजूला
धातू तर उजव्या बाजूला अधातू आहेत. 


🌿🌿आवर्त सारणी🌿🌿