MPSC Science
67K subscribers
8.6K photos
54 videos
354 files
716 links
Download Telegram
1) देवी (Small Pox):

हा रोग variola व्हायरस या विषाणूंमुळे होतो.

या रोगामुळे मज्जासंस्थेला प्रादुर्भाव होतो.

या रोगाचा प्रसार खोकल्यापासून उडणाऱ्या दूषित थेंबांमुळे होतो.

लक्षणे: ताप, संसर्गानंतर ३/४ दिवशी अंगावर पुळ्या, पुढील टप्प्यात आंधळेपणा

लस: देवीची लस

1975 पासून भारतात देवीची लास देण्यात येत आहे.

2) कांजण्या (Chicken Pox)

हा रोग Vericella -zoster या विषाणूमुळे होतो.

हा रोग मुख्यतः लहान मुलांचा आहे. मात्र, तो तरुणांना सुद्धा होऊ शकतो.

हा रोग धोकादायक नाही.

लक्षणे: ताप, डोकेदुखी, संसर्गाच्या पहिल्या दिवशीच पुरळ

लस: उपलब्ध नाही. मात्र, एकदा होऊन गेल्यावर आयुष्यभर संरक्षण.

3) गोवर (Measles)

हा रोग Myxovirus या विषाणूंमुळे होतो.

हा रोग खूप संसर्गजन्य असून मुख्यतः पाच वर्षाखालील मुलांना होतो व या रोगामध्ये दुय्यम संसर्गाची भीती खूप असते.

लक्षणे: ताप, कोरडा घसा, तिसऱ्या दिवशी तोंडांत पांढरा ठिपका, चौथ्या दिवशी पुरळ

लस: गोवर विरोधी लस – आयुष्यभर संरक्षण

भारतात गोवर हे बालमृत्यूचे प्रमुख कारण आहे.


4) रुबेला (Rubella किंवा Gernman measles)

हा रोग Myxovirus या विषाणूमुळे होतो.

हा रोग खूप संसर्गजन्य असून मुख्यतः पाच वर्षाखालील मुलांना होतो व या रोगामध्ये दुय्यम संसर्गाची भीती खूप असते.

या रोगांमुळे मानेतील ग्रंथींना प्रादुर्भाव होतो.

लक्षणे: ताप, मानेतील ग्रंथींचा दाह, संसर्गाच्या पहिल्या दिवशी पुरळ,

गर्भारपणाच्या पहिल्या चार महिन्यात आईला झाल्यास मूल मतिमंद तसेच बहिरे होण्याची शक्यता असते.

लस: रुबेला -विरोधी लस. जीवनभर संरक्षण.

5) गालफुगी (Mums)

हा रोग Paramyxo Virus या विषाणूंमुळे होतो.

या रोगाचा प्रादुर्भाव लाळेच्या ग्रंथींना होतो. लाळेच्या ग्रंथींना सूज आल्याने गाळ फुगल्यासारखा दिसतो.

लक्षणे: ताप, लाळेच्या ग्रंथींना सूज, अन्न-पाणी गिळण्यास त्रास.

हा मुख्यतः लहान मुलांना होतो, मात्र तरुण माणसास झाल्यास तो वांझ होऊ शकतो.

लस: गालफुगीविरोधी लस.


6) पोलिओ (Poliomycetis):

हा रोग Entero virus या विषाणूमुळे होतो.

या रोगाचा प्रादुर्भाव मध्यवर्ती मज्जासंस्थेला होतो.

या रोगामुळे हात – पाय लुळें होऊ शकतात व असा प्रादुर्भाव मुख्यतः लहानपणीच होत असतो.

लस: पोलिओच्या विरोधी दोन लसींचा वापर केला जातो.

१) Salf V – शरीरात इंजेकशनद्वारे दिली जाते.

२) सेबीने – तोंडाद्वारे दिली जाते.

WHO ने भारतासाठी Sebine या लसीची शिफारस केली आहे.

November 1995 पासून भारताने प्लस पोलिओ इम्युनायझेशन कार्यक्रमाची सुरुवात केली आहे. या कार्यक्रमा अंतर्गत पाच वर्षाखालील मुलांना OPV (Oral Polio Vaccine) दिले जाते.
🌷🌷भौतिकशास्त्र (Physics)🌷🌷

द्रव्य, कार्य
ऊर्जा, शक्ती, सदिश राशी, अदिश राशी
विस्थापन, चाल, वेग त्वरण, बल, गती, दाब
धाराविद्युत, चुंबकत्व, विद्युत चुंबक, दोलने व लहरी
ध्वनी, प्रकाश
उष्णता, किरणोत्सारिता, अर्धवाहक
🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀
🌷🌷रसायनशास्त्र (Chemistry)🌷🌷

द्रव्याचे गुणधर्म, अणू, रेणू ,
आम्ल,आम्लारी,क्षार,मूलद्रव्य,
संयुगे, मिश्रण, विद्युत अपघटन, विद्युत विलेपन,
धातू व अधातू, रासायनिक बंध व अभिक्रिया, कार्बनी संयुगे,
औद्योगिक रसायनशास्त्र (काच प्लास्टिक, साबण इत्यादी) मृदा, अन्न इत्यादी

🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀
◾️हृदयरोग (Heart Diseases):

जन्मतःच हृदयात दोष असणे (Congenital heart disease)-

जन्मतःच हृदयात दोष असणाऱ्या मुलांना Blue Baby असे म्हणतात. कारण, त्यांचे ओठ, नखे तसेच, त्वचा निळसर रंगाची बनते.
*संशोधक आणि त्यांनी लावलेले शोध*


1. *सापेक्षता सिद्धांत* : आईन्स्टाईन

2. *गुरुत्वाकर्षण* : न्यूटन

3. *फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट* : आईन्स्टाईन

4. *किरणोत्सारिता* : हेन्री बेक्वेरेल

5. *क्ष-किरण* : विल्यम रॉटजेन

6. *डायनामाईट* : अल्फ्रेड नोबेल

7. *अणुबॉम्ब* : ऑटो हान

8. *विशिष्टगुरुत्व* : आर्किमिडीज

9. *लेसर* : टी.एच.मॅमन

10. *रेडिअम* : मेरी क्युरी व पेरी क्यूरी

11. *न्युट्रॉन जेम्स* : चॅड्विक

12. *इलेक्ट्रॉन* : थॉम्पसन

13. *प्रोटॉन* : रुदरफोर्ड

14. *ऑक्सीजन* : लॅव्हासिए

15. *नायट्रोजन* : डॅनियल रुदरफोर्ड

16. *कार्बनडाय ऑक्साइड* : रॉन हेलमॉड

17. *हायड्रोजन* : हेन्री कॅव्हेंडिश

18. *विमान* : राईट बंधू

19. *रेडिओ* : जी.मार्कोनी

20. *टेलिव्हिजन* : जॉन बेअर्ड
🌺हे माहीत आहे का ? 🌺

🌷🌷 विशिष्ठ विषयाच्या अभ्यासाला काय म्हणतात. 🌷🌷

● हवामनाचा अभ्यास - मीटिअरॉलॉजी

● रोग-आजार यांचा अभ्यास - पॅथॉलॉजी

● ध्वनींचा अभ्यास - अॅकॉस्टिक्स

● ग्रह-तार्यांचा अभ्यास -अॅस्ट्रॉनॉमी

● वनस्पतीचा अभ्यास - बॉटनी

● मानवीवर्तनाचाअभ्यास - सायकॉलॉजी

● प्राणी जीवांचा अभ्यास - झूलॉजी

●पृथ्वीच्या पृष्ठभागाचा अभ्यास -जिऑलॉजी

● कीटकजीवनाचा अभ्यास - एन्टॉमॉलॉजी

● धातूंचा अभ्यास - मेटलर्जी

● भूगर्भातील पदार्थांचा अभ्यास -मिनरॉलॉजी

● जिवाणूंचा अभ्यास -बॅकेटेरिओलॉजी

● विषाणूंचा अभ्यास - व्हायरॉलॉजी

● हवाई उड्डाणाचे शास्त्र - एअरॉनाटिक्स

● पक्षीजीवनाचाअभ्यास -ऑर्निथॉलॉजी

●सरपटनार्याप्राण्यांचे शास्त्र - हर्पेटलॉलॉजी

● आनुवांशिकतेचा अभ्यास - जेनेटिक्स

● मज्जासंस्थेसंबंधीचा अभ्यास - न्यूरॉलॉजी

● विषासंबंधीचा अभ्यास - टॉक्सिकॉलॉजी

● ह्रदय व त्यांची कार्ये यांच्याशी संबंधीत शास्त्र - कार्डिऑलॉजी

● अवकाश प्रवासशास्त्र -अॅस्ट्रॉनॉटिक्स

● प्राणी शरीर शास्त्र -अॅनाटॉमी

● मानववंशशास्त्र (मानव जातीचा अभ्यास) -अँथ्रापॉलॉजी

● जीव-रसायनशास्त्र - बायोकेमिस्ट्री

● सजीवानसंबंधीचा अभ्यास (जीवशास्त्र) - बायोलॉजी

● रंगविज्ञानाचे शास्त्र - क्रोमॅटिक्स

●मानववंशासंबंधीचा अभ्यास - एथ्नॉलॉजी

● उद्यानरोपन, संवर्धन व व्यवस्थापन यांचे शास्त्र - हॉर्टिकल्चर

● शरीर-इंद्रिय-विज्ञानशास्त्र - फिजिअॉलॉजी

● फलोत्पादनशास्त्र -पॉमॉलॉजी

● मृतप्राणी भूसा भरून ठेवण्याचा शास्त्र - टॅक्सीडर्मी

● भूपृष्ठांचा अभ्यास - टॉपोग्राफ
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷


१. पचलेल्या अन्नाचे रक्तात अवशोषन होऊन त्याचा ऊपयोग उर्जा निर्मीतीसाठी केला जातो.
या क्रियेला काय म्हणतात?

1)पचन
2)अवशोषण (absorption)
*3)सात्मिकरन (Assimilation)*
4)उत्सर्जन (Excretion)

5 steps of Digestion

Ingestion ➡️Digestion➡️Absorption➡️Assimilation➡️Egestion


२. आधुनिक आवर्तसारणीचे मांडणी कोणी केली?

1)डोबेरायनर
2)न्यूलँडस
3)मेंडेलिव
4)हेन्री मोस्ले


३. पुढीलपैकी कोणते व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स मध्ये नाही?

1)थायमिन
2)रायबोफ्लेविन
3)फॉलिक ऍसिड
4)एस्कॉर्बिक ऍसिड
5)वरीलपैकी सर्व येतात.

व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्समध्ये खालील 8 जीवनसत्त्वे असतात.

व्हिटॅमिन बी 1 थायामिन
बी 2 रिबोफ्लेविन
बी 3 नियासिन
बी 5 पँटोथेनिक ऍसिड
बी 6 पायरिडॉक्साइन
बी 7 बायोटिन
बी 9 फॉलिक ऍसिड
बी 12 सायनोकोबालामिन

एस्कॉर्बिक ऍसिड =व्हिटामीन C


४. मुलद्रव्याच्या अणूमध्ये बाहेरच्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन असतात तेव्हा इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होत नाही?

1)12
2)6
3)7
4)8



५.खालील विधानांचा विचार करा.व योग्य विधाने निवडा

1)अणुमधील प्रोटोन्स व न्युट्रोन्स ची संख्या म्हणजे अणु अंक होय.
2)कोणत्याही मुलद्रव्याचे रासायनिक गुणधर्म अणुअंकानुसार नियंत्रीत होतात.
3)अणुअन्काला मुलद्रव्याचे रासायनिक ओळख म्हणतात.

A)1 व 2
B)2 व 3
C) फक्त 1
D)1,2 व 3

अणुमधील प्रोटोन्स व न्युट्रोन्स ची संख्या म्हणजे अणु वस्तुमान अंक(Mass Number)होय.

अणुमधील प्रोटोन्स ची संख्या म्हणजे अणुअंक होय.


६. 1803 मध्ये कोणत्या शास्त्रज्ञाने अणुसिध्दंत मांडला ?

1)चांडविक
2)रुदरफोर्ड
3)डाल्टन
4)थॉमसन


७. 1911 मध्ये कोणत्या शास्त्रज्ञाने सोन्याच्या पत्र्याचा वापर केला आणी अणुमध्ये एक अतिशय लहान भरीव असे अणुकेंद्रक असते हे सिध्द केले?

1)चांडविक
2)रुदरफोर्ड
3)डाल्टन
4)थॉमसन


८. न्युट्रोन चा शोध कोणी लावला?

1)चांडविक
2)रुदरफोर्ड
3)कणाद
4)थॉमसन

इलेक्ट्रॉन=थॉमसन
प्रॉटोन=गोल्डस्टीन


९. खालील विधाने पाहा..

*1)पाणी हे मिश्रण आहे.*
*2)हायड्रोजन व ओक्सिजन चे 1:2 प्रमाणात संयोग होऊन पाणी बनते*

A)दोन्ही विधाने चूक
B)दोन्ही विधाने अचुक
C)फक्त विधान 1 चूक
D )फक्त विधान 2 चूक

*पाणी हे संयुग आहे.
*हायड्रोजन व ओक्सिजन चे 2:1 प्रमाणात संयोग होऊन पाणी बनते*


१० *खालीलपैकी संप्लवनशील पदार्थ कोणते?
1)नवसागर व कापूर
2)कोळसा व शिसे
3)हिरा व चुना


A)1 व 2
B)2 व 3
C) फक्त 1
D)1,2 व 3


११. *अर्सेनीक ,सिलिकॉन व सेलेनियम ही कोणती उदाहरणे आहेत?*

1)धातू
2)अधातू
3)धातूसदृश्य
4)वरीलपैकी सर्व


१२. *पाणी किती फरनहेट( °f) ला गोठते?*

1)31°f
2)0°f
3)32°f
4]37°f



१३. *खालीलपैकी सत्य विधान ओळखा.*

1)इलेक्ट्रॉन धन प्रभारित असतात.
2)न्युट्रोन ऋन प्रभारित असतात.
3)प्रोटोन्स प्रभार रहित असतात.

A)1 व 2
B)1,2 व 3
C) फक्त 1
D)यापैकी एकही नाही

1)इलेक्ट्रॉन ~धन~ ऋण प्रभारित असतात.
2)न्युट्रोन ~ऋन~ प्रभार रहित असतात.
3)प्रोटोन्स ~प्रभार रहित~ धन प्रभारित असतात.
🌷🌷प्रजनन (Reproduction):🌷🌷

प्रत्येक सजीव स्वतः सारख्याच नवीन सजीवाची निर्मिती करतात या क्रियेलाच प्रजनन असे म्हणतात. यातील मूलभूत क्रिया म्हणजे DNA ची प्रत तयार करणे होये. या DNA च्या प्रती तयार होत असताना नेहमी काही सूक्ष्म बदल/ परिवर्तन घडून येते. त्यामुळे DNA च्या प्रति मूळ DNA सारख्या असतात. परंतु मूळ DNA शी जुळणाऱ्या नसतात.

प्रजननाचे प्रकार (Types Of Reproduction):

सजीवातील प्रजननाचे अलैंगिक प्रजनन आणि लैंगिक प्रजनन हे दोन प्रकार पडतात.
_______________
जॉईन करा @MPSCScience
काही संसर्गजन्य रोग
🌷🌷पेशीजन्य रोग (Cellular Disease)🌷🌷

🌺कर्करोग/ कॅन्सर (Cancer)🌺

व्याख्या: पेशींच्या अनियंत्रित विभाजनातून शरीराच्या कोणत्याही भागात अनावश्यक पेशींच्या गाठी/ समुह तयार होणे म्हणजेच कर्करोग होय. अश्या अनावश्यक पेशींच्या समूहालाच गाठ (Tumour) असे म्हणतात.
गाठीचे प्रकार (Types Of Tumours)

निरुपद्रवी गाठ (Benign Tumour): अशा प्रकारच्या गाठींचा परिणाम शरीरातील इतर अवयवांवर होत नाही.

दुर्दम्य गाठ (Mallignant Tumour):अशा प्रकारच्या गाठींचा परिणाम अंतर्गत अवयवांच्या कार्यावर होतो. आणि यामुळेच कर्करोगाच्या स्थितीला दूर्दम्यता (Mallignancy) असेही म्हणतात.

रक्ताद्वारे कॅन्सरच्या वाढत असलेल्या पेशी जेव्हा सर्व शरीरभर पसरतात त्या स्थितीला Metastatis असे म्हणतात.

मानवी शरीरातील कोणत्याही अवयवात कॅन्सर होऊ शकतो. सर्वाधिक तोंडाचा, स्तनांचा, आणि रक्ताचा कॅन्सर बघायला मिळतो.

लक्षणे: कर्करोगाची लक्षणे सुरुवातीला आढळत नाहीत. न भरणाऱ्या जखमा, असाधारण रक्तस्त्राव, अपचन, ताप, वजन कमी होणे, खूप थकवा जाणवणे, त्वचेमध्ये बदल होणे.
🌷🌷कर्करोगाची कारणे: 🌷🌷

कर्करोग निर्माण करणाऱ्या घटकांचे तीन गट केले जाते.

1) अपसारी/ प्रारणे ऊर्जा (radiant Energy):

अतिनील किरणे, क्ष- किरणे, आणि गॅमा किरणे कर्करोगजन्य असतात. ही किरणे विविध मार्गांनी डी. एन. ए. रेणूंची हानी करतात.
डी. एन. ए. वरील परिणांव्यतिरिक क्ष-किरणे आणि गॅमा किरणे उतींमध्ये घटक मुक्त मूलके निर्माण करतात.
जगातील सुमारे 10% लोकांना यामुळे कर्करोग होतो.

2) रासायनिक सयुंगे (Chemical Compounds):

जगातील सुमारे 80% लोकांना विविध रासायनिक सयुंगांमुळे कर्करोग होतो.
उदा. आर्सेनिक, कोबाल्ट, कॅडमिअम, अल्फोटॉक्सिन -B-1, अबेसटॉस, पोलिसायक्लिक हाड्रोकार्बन, बेन्झीन, बेरिलियम, निकेल, डॉक्टीनोमायसिन या संयुगांचा परिणाम DNA रेणूंतील ग्वानिन या नत्ररेणूवर होतो.

3) विषाणू (Viruses):

कॅन्सर घडवून आणण्याची क्षमता असलेल्या जनुकांना कर्करोग जनुक म्हणतात. काही रोगांचे विषाणू कर्करोगजनक स्थिती निर्माण करतात. त्याचे प्रमाण 5% आहे.
उदा: हिपॅटिटिस -B आणि हिपॅटिटिस -C च्या विषाणूमुळे यकृताचा कर्करोग होतो.
राउस -सार्कोमा हर्पस विषाणूमुळे रक्ताचा कर्करोग होतो.
पॅपिलोमा विषाणूमुळे त्वचेचा कर्करोग होतो.

4) इतर घटक (Miscllaneous):

जगातील सुमारे 5% लोकांना अनारोग्यादायी सवयीमुळे कर्करोग होतो व दिवसेंदिवस यांचे प्रमाण वाढत चालले आहे.
धूम्रपान आणि तंबाखू सेवनामुळे तोंड, स्वरयंत्र, फुप्फुस, ग्रसनी, ग्रासनिका, स्वादुपिंड इत्यादींचा कर्करोग होतो.
अतिमद्यप्राशनामुळे यकृत व ग्रासनलिका यांचा कर्करोग होतो.
अतिमेदयुक्त आहारामुळे स्तनांचा कर्करोग

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
🌺🌺कर्करोगाचे प्रकार 🌺🌺

कार्सिनोमा - अभिस्तर पेशींचा किंवा त्वचेचा रोग

सार्कोमा - संयोजी उतींचा कर्करोग

लिम्फोमा- लसिकापेशींचा कर्करोग

ल्युकेमिया - रक्ताचा/ श्वेतपेशींचा कर्करोग

सेमिनोमा- वृषणाचा कर्करोग

डीसजर्मीनोमा - अंडाशयाचा कर्करोग

ब्लास्टोमा - अपरीकव पेशींचा कर्करो
🌷🌷कर्करोगाची चाचणी🌷🌷

कर्करोगाच्या चाचणीसाठीबायोप्सी (Biopsy) चाचणी मार्गांचा वापर केला जातो. यामध्ये शंकास्पद उतींचा छोटा तुकडा काढून सूक्ष्मदर्शकाखाली त्याचे निरीक्षण केले जाते.
🌷🌷कर्करोगाचा उपचार/ प्रतिबंध (Prevention/ Treatment):🌷🌷

१) कर्करोगग्रस्त पेशी व उटी पूर्णपणे काढून टाकणे

२) रेडियो थेरपी चा वापर: मानवी शरीरातील कॅन्सरच्या उपचारासाठी कोबाल्ट 60 चा वापर, थायरॉईड ग्रंथींच्या कर्करोगाच्या उपचारासाठी किरणोत्सारी आयोडीनचा वापर, जीभ आणि गर्भाशयाच्या कॅन्सरच्या उपचारासाठी किरणोत्सारी सुयांचा वापर

३) किमो थेरपी: कँसरविरोधी औषधांचा वापर, प्रामुख्याने रक्ताच्या कॅन्सरच्या उपचारासाठी

ऍस्पिरीन या औषधांमुळे कर्करोगामुळे होणारा संभाव्य मृत्यूचा धोका 7% ने कमी झाला आहे.

टॅमॉक्झिफेन किंवा रॅलोक्झिफेनमुळे स्त्रियांमध्ये ब्रेस्ट कँसर होण्याचा धोका कमी होऊ शकतो.

विषाणूंमुळे होणाऱ्या कर्करोगाविरुद्ध मानवी पॅपिलोमा विषाणू लस आणि हिपॅटिटिस-बी ची लस यांचा वापर केला जातो.