MPSC Science
67.1K subscribers
8.6K photos
54 videos
354 files
716 links
Download Telegram
Forwarded from MPSC Alerts
राज्यसेवा पूर्व परीक्षा अभ्यासक्रम

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
💥ध्वनी :💥

⭐️ध्वनी म्हणजे ऐकण्याची संवेदना’.

⭐️ध्वनीचे स्वरूप :‘ध्वनी ही एक प्रकारची ऊर्जा असून ती आपल्या कानात ऐकण्याची संवेदना निर्माण करते’.

⭐️ध्वनीची निर्मिती आघाताने, छेडल्याने, हवा फुंकल्याने, ओरखडल्याने, विविध वस्तु हालल्याने अशा अनेक कारणाने होवू शकते.

⭐️प्रत्येक उदाहरणात कंपन ध्वनीच्या निर्मितीस कारणीभूत ठरतात.

कंपन : वस्तूची जलद गतीने पुढे-मागे होणारी हालचाल म्हणजे कंपन होय.

उदा. तंतुवाद्यातील तारेची कंपने
ध्वनीचे प्रसारण :

💥ध्वनी हे तरंगाच्या स्वरुपात प्रसारित होतो.

💥वस्तु विक्षोभित होते आणि कंप पावते तेव्हा ध्वनी निर्माण होतो.

💥ध्वनी भौतिक वस्तूतून किंवा पदार्थातून प्रसारित होतो त्याला माध्यम म्हणतात. ते घन, द्रव किंवा वायु असू शकते.

💥ध्वनी निर्वात पोकळीतून प्रवास करू शकत नाही.

💥प्रत्येक्षात कंपित वस्तूपासून ऐकणार्‍यापर्यंत कण प्रवास करीत नाहीत.
ध्वनी तरंगाची वैशिष्ट्ये :

💥जेव्हा ध्वनी तरंग माध्यमातून प्रवास करतात तेव्हा माध्यमाची घनता व दाब यामध्ये बदल होतो.

💥संपीडने : कणांची एकत्रित गर्दी असणारे भाग म्हणजे संपीडने होय.

संपीडनांपाशी घनता तसेच दाब उच्च असतो.

💥विरलने : कमी दाबाचे असे भाग की जेथे कण विखुरलेले असतात त्याला विरलने म्हणतात.

💥विरलनापाशी घनता तसेच दाब कमी असतो.

💥दोन लगतच्या संपीडनातील किंवा दोन लगतच्या विरलनातील अंतरास तरंगलांबी म्हणतात.

💥त्याचे SI पद्धतीत एकक मीटर तर तरंगलांबी ग्रीक अक्षर लॅम्डा ने दर्शवतात.
वारंवारता :

💥घनतेचे उच्चतम किंमतीपासून कमीत कमी किंमतीपर्यंत आणि पुन्हा उच्चतम किंमतीपर्यंत होणारा बदल एक आंदोलन घडवितो.

एकक कालावधीत होणारी आंदोलनाची संख्या म्हणजे तरंगाची वारंवारता होय.

ध्वनी तरंगाची वारंवारता ग्रीक अक्षर न्यू ने दर्शवितात.

त्याचे SI पद्धतीत एकक हर्टझ असून ते Hz ने दर्शवितात.

(note- हर्टंझ (1857-1894) जर्मन भौतिकशास्त्रज्ञ. सर्वप्रथम त्यांनी बिनतारी संदेशवहनाचे प्रसारण व तरंगांची स्वीकृत केली. )

♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
♦️♦️तरंगकाल :♦️♦️

लगतची दोन संपीडणे किंवा विरलने यांना ठराविक बिंदु पार करून जाण्यास लागणारा वेळ म्हणजे ‘तरंगकाल’ होय.💥

💥माध्यमाच्या घनतेमध्ये एक संपूर्ण आंदोलन होण्यास लागणारा वेळ हा ध्वनी लहरीचा तरंगकाल असतो.

💥तो ‘T‘ने दर्शविला जातो.

💥SI पद्धतीत तरंगकालाचे एकक सेकंद आहे.

💥u=1/t
Forwarded from MajhiTest.com
-----|| MajhiTest ||-----

◆◆●◆|| Online Test Series ||◆●◆◆

★राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 टेस्ट सिरीज★

सामान्य अध्ययन पेपर : 1 - 10 टेस्ट

CSAT पेपर - 2 - 10 टेस्ट

विषयानुसार 6 टेस्ट

एकूण 26 पेपर फक्त 350 रुपयांमध्ये

◆◆|| 6 ऑक्टोबर ते 17 ऑक्टोंबर दरम्यान प्री - बुकिंग केल्यास टेस्ट सिरीज मिळावा फक्त 250 रुपयांमध्ये ||◆◆

मोबाईल युसर: आजच भेट द्या: www.m.majhitest.com

PC/Laptop युसर:
http://majhitest.com

किंवा खालील लिंक वरती क्लिक करून डाउनलोड करा माझी टेस्ट अँड्रॉइड ऍप्लिकेशन-
https://rb.gy/jobmf3

संपर्क: 9552251100

जॉईन करा @MajhiTest
Forwarded from MPSC Alerts
स्पर्धा परीक्षेद्वारे पदभरतीकरीता दिनांक 8 ऑक्टोबर 2021 अखेर प्राप्त झालेल्या 1917 पदांच्या मागणीपत्रांचा तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

प्रस्तुत प्रसिद्धीपत्रकात नमूद सहायक कक्ष अधिकारी व राज्यकर निरीक्षक ही दोन्ही पदे अराजपत्रित गट-ब संवर्गाची असून राजपत्रित गट-ब पदांपासून वेगळेपण दाखविण्याकरीता व सांख्यिकीय सुलभतेसाठी हेतुपुरस्सर अशा प्रकारे दर्शवण्यात आली आहेत.

जाहीर पदसंख्या ही केवळ स्पर्धा परीक्षांकरीता प्राप्त मागणीपत्रांमधील असून अनुभव/विशेष अर्हतेवर आधारित सरळसेवा भरतीसाठी 2021 या वर्षाकरीता साधारणपणे 3800 पदांची मागणीपत्रे दिनांक 8 ऑक्टोबर,2021 पर्यंत प्राप्त झाली आहेत. मागणीपत्रांचा पदनिहाय तपशील स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
Forwarded from MajhiTest.com
◆MajhiTestDailyGK◆

ही माहिती तुमच्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा.

फॉलो करा - fb.com/MajhiTest

टेलिग्राम चॅनेल जॉईन करा- t.me/MajhiTest

फॉलो करा - instragram.com/majhitest

फॉलो करा - sharechat.com/MajhiTest
♻️♻️अंतःस्त्रावी संस्था♻️♻️ (Endocrine System)

आपल्या शरीरात विविध ठिकाणी काही विशिष्ट अवयव रासायनिक पदार्थांची निर्मिती करतात. या रासायनिक पदार्थांनाच विकरे किंवा संप्रेरके असे म्हणतात. आपल्या शरीरात जी अवयव विकरे किंवा संप्रेरके स्रवतात त्यांना ग्रंथी असे म्हणतात. आणि अशा ग्रंथींच्या समुहापासून अंतःस्त्रावी संस्था तयार होते. अंतः स्त्रावी ग्रंथीतून स्त्रवणारे संप्रेरके सरळ रक्तात मिसळतात कारण त्यांच्या वहनासाठी माध्यम नसते. म्हणून त्यांना नलिका विरहित ग्रंथी असेही म्हणतात.

अंतःस्त्रावी ग्रंथीशिवाय आपल्या शरीरात काही विशिष्ट ठिकाणी बाह्यस्त्रावी ग्रंथी असतात. यातून स्रवणाऱ्या संप्रेरकांच्या वहनासाठी नलिका असते. म्हणून यांना नलिकायुक्त ग्रंथी असेही म्हणतात.


♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️
अंतःस्त्रावी ग्रंथी (Endocrine Glands):

🔆1)  पियुषिका ग्रंथी (Pitutary Gland):

ही सर्वात लहान अंतःस्त्रावी ग्रंथी असून आपल्या शरीरात मेंदूमध्ये आढळते. या ग्रंथीला मास्टर ग्रंथी असे म्हणतात. कारण, या ग्रंथीमुळे इतर ग्रंथीचे कार्य नियंत्रित केले जाते.

 या ग्रंथीतून सोमॅटोट्रॉपिन हे वृद्धी संप्रेरक स्त्रवत असते.

हे विकर जास्त प्रमाणात स्रवल्यास व्यक्ती जास्त उंच होतो, तर कमी प्रमाणात स्रवल्यास त्या व्यक्तींची उंची कमी राहते.

कार्य : आपल्या शरीरात वाढ, विकास, प्रजनन, इतर ग्रंथींचे कार्य नियंत्रण करते.