MPSC Science
66.9K subscribers
8.6K photos
54 videos
356 files
716 links
Download Telegram
🌷🌷संयुगांची निर्मिती🌷🌷

व्याख्या:- ज्या मूलद्रव्यांच्या बाह्यतम कक्षा अपूर्ण असतात. अशी मूलद्रव्ये रासायनिक अभिक्रिया करून स्थिर इलेक्ट्रॉन संरुपण प्राप्त करतात म्हणजेच बाह्यतम कक्षा पूर्ण करतात. त्या रासायनिक अभिक्रिया दोन प्रकारे घडून येतात.



1) इलेक्ट्रॉन ची देवाणघेवाण 2) इलेक्ट्रॉनची भागीदारी
1) इलेक्ट्रॉन ची देवाणघेवाण

इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण धातू आणि अधातू यामध्ये होते.

धातूंच्या बाह्यतम कक्षेत 4 पेक्षा कमी इलेक्ट्रॉन असल्यामुळे ते इलेक्ट्रॉन गमावतात आणि अधातूंच्या बाह्यतम कक्षेत 4 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन असल्यामुळे ते इलेक्ट्रॉन कमावतात

🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿
🍀🍀धातु (Metal):🍀🍀

आपल्या बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉन गमावून धन आयनांची निर्मिती करतात त्यांनाच कॅटायन असे म्हणतात आणि धातूंचा या गुणधर्माला विद्युत धन गुणधर्म असे म्हणतात

🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿
🍀🍀धातु (Metal):🍀🍀

आपल्या बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉन गमावून धन आयनांची निर्मिती करतात त्यांनाच कॅटायन असे म्हणतात आणि धातूंचा या गुणधर्माला विद्युत धन गुणधर्म असे म्हणतात

🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿
🌿🌿2) इलेक्ट्रॉनची भागीदारी🌿🌿

समान किंवा भिन्न अधातूमध्येच इलेक्ट्रॉनची भागीदारी होते. समांतर धातूमध्ये भागीदारी झाल्यास रेणू तयार होतात तर भिन्न अधातूमध्ये भागीदारी झाल्यास संयुगे तयार होतात.

अधातूमध्ये भागीदारी होताना त्यांच्या बाह्यतम कक्षा जोडल्या जातात. त्यानंतर प्रत्येक अधातू बाह्यतम कक्षा पूर्ण करण्यासाठी लागणारे इलेक्ट्रॉंन भागीदारीमध्ये वापरतात आणि ते इलेक्ट्रॉन दोन्ही मूलद्रव्यासाठी सामाईक असतात.
🌷🌷रासायनिक बंध:🌷🌷

संयुगातील तसेच रेणूतील दोन किंवा अधिक अणूंना एकत्र बांधून ठेवण्यासाठी कारणीभूत असलेल्या आकर्षण शक्तीला रासायनिक बंध असे म्हणतात.

रासायनिक बंध इलेक्ट्रॉनची देवाण-घेवाण होऊन किंवा इलेक्ट्रॉनची भागीदारी होऊन तयार होतो त्यानुसार रासायनिक बंधाचे दोन प्रकार पडतात.
🌷🌷व्हिटॅमिन डी 🌷🌷

कॅल्शियम , मॅग्नेशियम आणि फॉस्फेट आणि इतर अनेक जैविक प्रभावांच्या आतड्यांसंबंधी शोषण वाढविण्यासाठी जबाबदार चरबी-विद्रव्य सेकोस्टेरॉइड्सचा एक गट आहे . [
१] मानवांमध्ये, या गटातील सर्वात महत्वाची संयुगे आहेत जीवनसत्व डी 3(ज्याला Cholecalciferol देखील म्हणतात ) आणि व्हिटॅमिन डी 2 ( एर्गोकाल्सीफेरॉल ) आहेत. 
.🌷 आवर्त सारणी तील आडव्या ओळींना आवर्तन तर उभ्या ओळींना गण म्हणतात . 

🌷२.आवर्तन ७ तर गण १८ आहेत. 

🌷३. आवर्तनात १ ते ७ अंक आहेत.प्रत्येक आवर्तनाची सुरुवात नवीन कक्षेत इलेक्ट्रोन भरण्याने होते. आवर्तन क्रमांक हा कक्षेच्या क्रमांका इतका  असतो . 

🌷४. पहिले आवर्तन-सर्वात लहान -२ मूलद्रव्ये 
     दुसरे व तिसरे आवर्तन -लघुआवर्तन-८ मूलद्रव्ये   
    चौथे व पाचवे आवर्तन -दीर्घ आवर्तन-१८ मूलद्रव्ये 
    सहावे आवर्तन - सर्वात दीर्घ - ३२ मूलद्रव्ये 
    सातवे आवर्तन -अपूर्ण 

🌷५. गणांना १ ते १८ क्रमांक दिले असून ज्या मूलद्रव्यांचेइलेक्ट्रोन संरुपण सारखे आहे त्यांना सारख्या गणात ठेवले आहे .

🌷६. समान गणातील मूलद्रव्ये समान रासायनिक गुणधर्म दाखवतात . 

🌷७. आवर्तसारणी मध्ये डाव्या बाजूला
धातू तर उजव्या बाजूला अधातू आहेत. 


🌿🌿आवर्त सारणी🌿🌿
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
नवीन मूलद्रव्यांचे नामकरण
🌷🌷गॅलगीकाय🌷🌷

🌷5 ते 8 कोशाचे बनलेलं असतात

🌷कोशना कुंडे म्हणतात त्यामध्ये विकर असतात

🌷पेशींचा रासायनिक कारखाना म्हणून वर्णन केले जाते

🌷पेशीतील स्त्रवी अंगक आहे

🌷संसलेशीत पदार्थचे परिवर्तन विभागणी करते

🌷विकर मेद यांचे अपेक्षित ठिकाणी वहन करते

🌷पेशींभित्तिका प्रद्रव्यापटल व लयकारिका यांच्या निर्मितीस मदत करते

🌷🌷🌷🍀🍀🍀🌷🌷🌷🍀🍀🍀🌷🌷
🌻लयकारिका🌻

हे साधे एकपटलीय कोष असतात

अनेक पाचक विकर असतात

वनस्पती पेशीत अल्प प्रमाण असते

टाकाऊ पदार्थ ची विल्हेवाट लावतात

विषारी सूक्ष्मजीवना मारतात

उध्वस्त करणारे पथक म्हणतात

आत्मघाती पिशव्या म्हणतात

उपासमारीच्या काळात यांचा खूप उपयोग होतो

🌷🌷🌷🍀🍀🍀🌷🌷🌷🍀🍀🍀🌷🌷🌷