MPSC Science
67.1K subscribers
8.6K photos
54 videos
354 files
716 links
Download Telegram
1.  मानवी शरीरात एकूण मनक्यांची संख्या किती?

 32

 33

 40

 15

उत्तर : 33

 2. मानवी ‘मज्जासंस्थेचा’ अभ्यास कोणत्या शास्त्रात करतात?

 न्यूरॉलॉजी

 नफोललॉजी

 डी.एन.ए.

 यापैकी नाही

उत्तर :न्यूरॉलॉजी

 3. जीवनसत्व ‘क’ कोणत्या फळात सर्वाधिक आढळते?

 आवळा

 गाजर

 केळी

 पेरु

उत्तर :आवळा

 4. खाद्यपदार्थात खाण्याच्या सोडयाचा सर्वाधिक वापर केल्यास कोणत्या जिवनसत्वाचा नाश होतो?

 क

 अ

 ड

 ई

उत्तर :क

 5. हाडांच्या वाढीसाठी कोणते जिवनसत्व आवश्यक असते?



 ब

 क

 ड

उत्तर :ड

 6. कुष्ठरोगाच्या जिवाणूंचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला?

 डॉ. हॅन्सन

 डॉ. रोनॉल्ड

 डॉ.बेरी

 डॉ. नेकेल्सन

उत्तर :डॉ. हॅन्सन

 7. जागतिक आरोग्य संघटनेच्या माध्यमातून कोणत्या सालापासून जगामध्ये लसीकरण कार्यक्रम हाती घेण्यात आला?

 1975

 1974

 1973

 1972

उत्तर :1974

 8. रोगाचे निदान करण्यासाठी शरीरातील एखाद्या भागाचा तुकडा घेण्याच्या पद्धतीला कोणत्या नावाने संबोधतात?

 पायोप्सी

 सर्जरी

 डेप्सोन

 यापैकी नाही

उत्तर :पायोप्सी

 9. खालीलपैकी कोणते औषध ‘क्षयरोगासाठी’ वापरतात?

 स्ट्रेप्टोमायसिन

 पेनिसिलिन

 डेप्सोन

 ग्लोबुळिन

उत्तर :स्ट्रेप्टोमायसिन

 10. पोलिओ रोग शरीराच्या कोणत्या भागास इजा करतो?

 हाड

 डोळा

 पाय

 मज्जासंस्था

उत्तर :मज्जासंस्था

 11. ‘बीसीजी लस’ —– या रोगापासून बचाव करते?

 पोलिओ

 क्षयरोग

 रातअंधळेपणा

 कुष्ठरोग

उत्तर :क्षयरोग

 12. खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने हृदयरोगाची पहिली शस्त्रक्रिया यशस्वी केली?

 विल्यम हार्वे

 डॉ. एडिसन

 ख्रिश्चन बर्नार्ड

 डेव्हिडसन

उत्तर :ख्रिश्चन बर्नार्ड

 13. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी ‘हत्तीरोग संशोधन केंद्र’ आहे?

 पुणे

 वर्धा

 नागपूर

 मुंबई

उत्तर :वर्धा

 14. झोपेच्या तक्रारीवर उपयुक्त असलेले ‘माफीन’ कोणत्या झाडापासून मिळवितात?

 अफू

 गांजा

 उस

 खैर

उत्तर :अफू

 15. खालीलपैकी कोणता रोग ‘गरोदर स्त्रीला’ घातक ठरू शकतो?

 क्षयरोग

 देवी

 पोलिओ

 कावीळ

उत्तर :कावीळ

 16. रक्तातील तांबडया पेशीचा नाश होणे हे कोणत्या रोगाचे लक्षण आहे?

 क्षयरोग

 मलेरिया

 नारू

 मोतीबिंदु

उत्तर :मलेरिया

 17. मानवी ‘त्वचा’ शी संबंधित असलेला रोग कोणता?

 खरूज

 एक्झिमा

 वरील दोन्ही

 यापैकी नाही

उत्तर :वरील दोन्ही

 18. 98 मी. उंचीच्या मनोर्‍यावरुन खाली फेकलेला एक चेंडू किती सेकंदामध्ये खाली पडेल?

 15 सें.

 8 सें.

 10 सें.

 12 सें.

उत्तर :10 सें.

 19. समुद्रसपाठीवर पाण्याचा ‘उल्कलन’ बिंदु किती आहे?

 100° से.

 120° से.

 1000° से.

 90° से.

उत्तर :90° से.

 20. एक ज्युल म्हणजे —– कॅलरी ऊर्जा होय?

 4.2 कॅलरी

 3.4 कॅलरी

 2.4 कॅलरी

 9.0 कॅलरी

उत्तर : 4.2 कॅलरी
🌷🌷एकपेशीय आदिजीवांमुळे होणारे रोग (Protozoal Disease):🌷🌷
1) हिवता/ मलेरिया (Malaria):

🌷रोगकारक: हा रोग प्लाझमोडियम व्हायरस नावाच्या आदिजीवांमुळे होतो.

🌷परिणाम: रक्ताभिसरण संस्थेवर परिणाम होतो.

🌷प्रसार: हिवतापाचा प्रसार ऍनाफिलस डासाची मादी चावल्यामुळे होतो.

🌷लक्षणे: ठराविक कालखंडाने येणारा ताप, थंडी वाजणे, यकृत व प्लिहा मोठ्या होणे, ऍनिमियाची कमी अधिक तीव्रता इत्यादी.


हिवतापाच्या अवस्था (Stages Of Malaria):

1) शीत अवस्था (Cold Stage): या अवस्थेत थंडी वाजते आणि शरीराचे तापमान वाढतेल. ही अवस्था 2-4 तास आढळते.

2) उष्ण अवस्था (Hot Stage): या अवस्थेत शरीराचे तापमान 41 अंश पर्यंत वाढते तसेच प्रचंड डोकेदुखी आढळते. ही अवस्था 2-6 तास आढळते.

3) घाम अवस्था (Sweat Stage): या अवस्थेत ताप कमी होऊन प्रचंड घाम येतो. ही अवस्था 15-20 मिनिट आढळते.

लस: अर्टिमिसिलीन – कॉम्बिनेशन थेरपी (ACT), क्लोरोक्वाईन, मेफ्लोक्वाईन, डॉक्झीसायक्लिन, प्रायमाक्विन

जागतिक आरोग्य संघटनेने गरोदर स्त्रियांसाठी क्विनाईन आणि क्लिंडामायसिन ही औषधे सुचविली आहे.

🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷
🌷असंसर्गजन्य रोग (Non Communicable Or Non Infectious Diseases):🌷


🌷🌺🌷🌺🌷🌺🌷🌺🌷🌺🌷🌺🌷🌺
🌷व्याख्या:

जे रोग संसर्गातून किंवा संक्रमणातून पसरत नाहीत त्या रोगांना असंसर्गजन्य किंवा असंक्रामक रोग (Non Infectious Disease) म्हणतात. असे रोग काही विशिष्ट कारणामुळे व्यक्तीच्या शरीरातच उद्भवतात.


यामध्ये पुढील रोगांचा समावेश होतो.



🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷
🌷अ. हृदय आणि रक्ताभिसरणाचे रोग :🌷

1) उच्च रक्तदाब /उच्चताण (Hypertension):
व्यक्तीचे वय, आनुवंशिक कारणे, अतिलठ्ठपणा, क्षारांचे/ मिठाचे सेवन (५ग्रॅम/ दिन पेक्षा जास्त), संतुप्त मेद, मद्य, मधुमेह, वृकरोग यांसारख्या कारणांमुळे निर्माण होणाऱ्या स्थितीस उच्चताण म्हणतात. अशा स्थितीचे लक्षण म्हणजे रक्तदाबाची वाढलेली पातळी होय.
जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) व्याख्येनुसार १६०/९५ mm of Hg एवढा किंवा जास्त रक्तदाब म्हणजे उच्चंरक्तदाब होय. यांवरून प्रौढांमधील उच्चताण म्हणजे 160 mm of Hg एवढा किंवा जास्त प्रकुंचनी रक्तदाब (Systolic pressure) आणि /किंवा 95 mm of Hg एवढा किंवा जास्त हृदप्रसरणी रक्तदाब (diastolic pressure) होय. यालाच आपण High B.P. असे म्हणतो.


🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀
🌷ब) सांगाडा व स्नायूंचे रोग :🌷

१) सांधे दुखी (Arthritis) :
सांध्यांमध्ये वेदना
गुडघे, बोटाचे शेवटे सांधे, खांदे इत्यांदींमध्ये वेदना होते. मात्र, मनघट, कोपर, बोटांचे इतर सांधे इत्यांदीमध्ये वेदना होत नाही.


२) संधीवात (Rheumatism) :
सांध्यांचा दाह
बोटाचे मधले सांधे, हाताचे सांधे, मनगट, गुडघे, कोपर इत्यादींचा दाह.


३) संधीरोग/ वातरक्ताचा रोग (Gout) :
रक्तात युरिक ऍसिडचे प्रमाण वाढल्यास ते सांध्यांमध्ये जाऊन साचते. त्यामुळे सांधे सुजतात व खूप वेदना.



🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀
🌷क) मधुमेह/ डायबेटिस (Diabetes Mellitus)

हा रोग कर्बोदकांच्या अनियमित चयापचयामुळे तसेच स्वादुपिंडाच्या अयोग्य कार्यामुळे निर्माण होतो.

१) कर्बोदकांच्या चयापचयामध्ये तयार झालेली साखर शरीरांच्या पेशींमध्ये योग्य प्रमाणात शोषली न गेल्यास तिचे रक्तातच प्रमाण वाढते.


२) रक्तातील साखरेच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवण्याचे कार्य स्वादुपिंडातून स्रवणाऱ्या इन्सुलिनमार्फत केले जात असते. हे इन्सुलिन स्वादुपिंडातील islets of Langerhans नावाच्या ग्रंथीपैकी बीटा पेशींमधून स्त्रवत असते. या ग्रंथींच्या कार्यात बिघाड झाल्यास इन्सुलिन योग्य प्रमाणात तयार होत नाही. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते.

इन्सुलिनची कमतरता किंवा इन्सुलिनच्या क्रियेतील दोष निर्माण होण्याची विविध कारणे आहेत.

१) स्वादुपिंडाचे विकार, जसे इंफ्लेमेशं व सिस्टिक फायब्रासिस,

२) जैविकदृष्टया कमी परिणामकारक इन्सुलिनची निर्मिती

३) बीट पेशींचा नाश

४) आनुवंशिक दोष, जसे इन्सुलिन जनुकांचे उत्परिवर्तन इत्यादी.


🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀
🌷लक्षणे –

3Ps म्हणजे पॉलियुरिया (Polyuria : बहुमूत्रता), पॉलिडिप्सिया (Polydipsia: खूप तहान लागणे) आणि पॉलिफेजिया (Polyphagia: वजन खूप कमी होणे).


तसेच जखमा लवकर न भरणे, अतिशय थकवा येणे, अचानक वजन कमी होणे, दृष्टी अंधुक होणे आणि वेसावधपणा अशी लक्षणे मधुमेहात जाणवतात.


🌷🌿🌷🌿🌷🌿🌿🌿🌷🌿🌷🌿🌷🌿
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
अणुऊर्जा
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
प्रकाशाचा मार्गबदल
🌷🌷पोलिओ (Poliomycetis)🌷🌷

हा रोग Entero virus या विषाणूमुळे होतो.

या रोगाचा प्रादुर्भाव मध्यवर्ती मज्जासंस्थेला होतो.

या रोगामुळे हात – पाय लुळें होऊ शकतात व असा प्रादुर्भाव मुख्यतः लहानपणीच होत असतो.

लस: पोलिओच्या विरोधी दोन लसींचा वापर केला जातो.

१) Salf V – शरीरात इंजेकशनद्वारे दिली जाते.

२) सेबीने – तोंडाद्वारे दिली जाते.

WHO ने भारतासाठी Sebine या लसीची शिफारस केली आहे.

November 1995 पासून भारताने प्लस पोलिओ इम्युनायझेशन कार्यक्रमाची सुरुवात केली आहे. या कार्यक्रमा अंतर्गत पाच वर्षाखालील मुलांना OPV (Oral Polio Vaccine) दिले जाते.

🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀
🌷🌷गालफुगी (Mums)🌷🌷


हा रोग Paramyxo Virus या विषाणूंमुळे होतो.

या रोगाचा प्रादुर्भाव लाळेच्या ग्रंथींना होतो. लाळेच्या ग्रंथींना सूज आल्याने गाळ फुगल्यासारखा दिसतो.

लक्षणे: ताप, लाळेच्या ग्रंथींना सूज, अन्न-पाणी गिळण्यास त्रास.

हा मुख्यतः लहान मुलांना होतो, मात्र तरुण माणसास झाल्यास तो वांझ होऊ शकतो.

लस: गालफुगीविरोधी लस.

🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌷
🌷🌷रुबेला (Rubella किंवा Gernman measles)🌷🌷

हा रोग Myxovirus या विषाणूमुळे होतो.

हा रोग खूप संसर्गजन्य असून मुख्यतः पाच वर्षाखालील मुलांना होतो व या रोगामध्ये दुय्यम संसर्गाची भीती खूप असते.

या रोगांमुळे मानेतील ग्रंथींना प्रादुर्भाव होतो.

लक्षणे: ताप, मानेतील ग्रंथींचा दाह, संसर्गाच्या पहिल्या दिवशी पुरळ,

गर्भारपणाच्या पहिल्या चार महिन्यात आईला झाल्यास मूल मतिमंद तसेच बहिरे होण्याची शक्यता असते.

लस: रुबेला -विरोधी लस. जीवनभर संरक्षण.


🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀
🌷🌷गोवर (Measles)🌷🌷

हा रोग Myxovirus या विषाणूंमुळे होतो.

हा रोग खूप संसर्गजन्य असून मुख्यतः पाच वर्षाखालील मुलांना होतो व या रोगामध्ये दुय्यम संसर्गाची भीती खूप असते.

लक्षणे: ताप, कोरडा घसा, तिसऱ्या दिवशी तोंडांत पांढरा ठिपका, चौथ्या दिवशी पुरळ

लस: गोवर विरोधी लस – आयुष्यभर संरक्षण

भारतात गोवर हे बालमृत्यूचे प्रमुख कारण आहे.

🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀
🌺🌺कांजण्या (Chicken Pox)🌺🌺

हा रोग Vericella -zoster या विषाणूमुळे होतो.

हा रोग मुख्यतः लहान मुलांचा आहे. मात्र, तो तरुणांना सुद्धा होऊ शकतो.

हा रोग धोकादायक नाही.

लक्षणे: ताप, डोकेदुखी, संसर्गाच्या पहिल्या दिवशीच पुरळ

लस: उपलब्ध नाही. मात्र, एकदा होऊन गेल्यावर आयुष्यभर संरक्षण.

🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿