MPSC Science
67.1K subscribers
8.6K photos
54 videos
354 files
716 links
Download Telegram
. 🌺🌺 रक्त (Blood) 🌺🌺
__________________________________
🌷- रक्त हा लाल रक्त पेशी (आरबीसी किंवा एरथ्रोसाइट्स), पांढर्‍या रक्त पेशी (ल्युकोसाइट्स) आणि बिंबिका (प्लेटलेट्स किंवा थ्रोम्बोसाइट्स) यांनी बनलेला व गुंतागुंतीची (जटिल) रचना असलेला जैविक द्रव पदार्थ आहे.

🌷- रक्ताचा मुख्य घटक पाणी आहे. रक्त हा एकमेव द्रव उती आहे. रक्तामध्ये लाल रक्तपेशींचे प्रमाण सर्वाधिक असते. या पेशींमधील हिमोग्लोबिन या घटकामुळे रक्त लाल रंगाचे दिसते.

-🌷 हिमोग्लोबिनमुळे प्राणवायू आणि कार्बन डायॉक्साइड रक्तात विरघळू शकतात आणि त्यांचे वहन करणे सुलभ बनते.

🌷- पांढर्‍या रक्त पेशींमुळे संसर्गाला प्रतिबंध होतो तर बिंबिकांमुळे रक्ताची गुठळी होण्यास मदत होते. पृष्ठ्वंशी प्राण्यांचे रक्त तांबड्या रंगाचे असते.

🌷- संधिपाद प्राणी आणि मृदुकाय प्राण्यांच्या रक्तामध्ये प्राणवायू वहनानासाठी हिमोग्लोबिनऐवजी हिमोसायनिन असते.

🌷- कीटक आणि काहीं मृदुकाय प्राण्यामध्ये हिमोलिंफ नावाचा द्रव, प्राणवायू वहनाचे कार्य करतो. हिमोलिंफ बंद रक्तवाहिन्यामध्ये नसते. ते रक्तवाहिन्या आणि शरीर यांच्या मधल्या पोकळ्यांमधून वाहते.

🌷- बहुतेक कीटकांच्या रक्तामध्ये प्राणवायू वहनासाठी हिमोग्लोबिन सारखा वाहक रेणू नसतो.

🌷- रक्त हा संयोजी उतींचा द्रवरूप प्रकार आहे.
शुद्ध रक्ताचा रंग लाल भडक असून चव खारट असते.

🌷- रक्त आम्लारी / अल्कलीधर्मी असून त्याचा सामू (pH) 7.35 ते 7.45 आहे. रक्त द्रवरूप तसेच स्थायूरुप घटकांचे बनलेले असते.

🌷- रक्तातील द्रवरूप भागाला रक्तद्रव्य किंवा प्लाझ्मा असे म्हणतात. रक्तातील स्थायूरुप भागाला रक्तपेशी असे म्हणतात.

🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀
🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷

१) हवेत जर आर्द्रतेचे प्रमाण अधिक असेल तर बाष्पोत्सर्जनाची क्रिया......
१) वाढते
२) मंदावते 🅾
३) कमी होते
४) समान राहते

२) शरीरास सर्वाधिक उर्जा पुरविण्याचे कार्य कोणता घटक करतो.......
१) साखर🅾
२)जीवनसत्वे
३) प्रथिने
४) पाणी

४) प्रकाश-संश्लेषण क्रियेत ऑक्सिजन .......तून दिला जातो.
१) पाणी🅾
२) कार्बन डाय ऑक्साईड
३) हरित द्रव्य
४) नायट्रोजन

५) निसर्गचक्रातील प्राथमिक उत्पादक कोणाला म्हणतात?
१) जीवाणू
२) मासा
३) हिरव्या वनस्पती🅾
४) मानवी प्राणी

६) खालीलपैकी कोणत्या वनस्पतीत हरितद्रव्य नसते ?
१) बुरशी🅾
२) शैवाल
३) दगडफूल
४) नेचे

७) क्लोराईड ऑफ लाइन यांचे व्यवहारीक नाव खालीलपैकी कोणते ?
१) तुरटी
२) विरंजक चुर्ण 🅾
३) चुनखडी
४) धुण्याचा सोडा

८) ज्या हायड्रोकार्बन मधील दोन कार्बन अणूच्या संयूजा बंधने संतृप्त नसतील तर अशा हायड्रोकार्बनला .........हायकार्बन असे म्हणतात.
१) संतृप्त
२) असंतृप्त🅾
३) वलयांकित
४) वरील सर्व

९) अन्न बिघाडातील महत्वपूर्ण घटक हा .........ची वाढ होय.
१) सुक्ष्मजीव 🅾
२) किटक
३) विषाणू
४) कृमी

१०) कुष्ठरोगाची प्राथमिक लक्षणे कोणत्या भागावर दिसतात?
१) डोळे
२) कान
३) त्वचा🅾
४) नाक

११) समान कार्य करणा-या पेशींच्या समुहाला ..........म्हणतात.
१) ऊती🅾
२) केंद्रक
३) मूल
४) अभिसार

१२) १८७३ मध्ये लुईस पाश्चरने .........हा नवा सिध्दांत मांडला
१) स्वयंप्रेरीत जीव निर्मिती
२) जंतूपासून रोगोद्भव🅾
३) साथीचे रोगविषयक
४) यापैकी नाही

🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷
भारताने स्विकारलेले विविध पर्यावरण विषयक आंतरराष्ट्रीय करार-

१) रामसर करार -
वर्ष - १९७१

* दलदली प्रदेशाचे पान पक्ष्यांचा प्रमुख अधिवास म्हणून संवर्धन व धोरणी वापर

अमलात येण्याचे वर्ष - १९७५

भारताने मान्य केला - १९८२

२) CITES -
वर्ष - १९७३

* संकटग्रस्त प्राणी व वनस्पतींमधील आंतरराष्ट्रीय व्यापाराचे नियंत्रण

*अमलात येण्याचे वर्ष - १९७६

* भारताने मान्य केला - १९८०

३) बोन करार -
वर्ष -१९७९

* स्थलांतर करणाऱ्या वन्य प्राण्यांचे व त्यांच्या अधिवासाचे संवर्धन व व्यवस्थापन

* अमलात येण्याचे वर्ष - १९८३

* भारताने मान्य केला -१९८३

४) व्हिएन्ना करार -
वर्ष - १९८५

* ओझोन थर संरक्षण* अमलात येण्याचे वर्ष - १९८८

* भारताने मान्य केला - १९९१

५) बँसेल करार -
वर्ष - १९८९

* हानिकारक त्याज पदार्थांची सीमापार होणारी हालचाल व विल्हेवाट

* अमलात येण्याचे वर्ष - १९९२

* भारताने मान्य केला - १९९२

६) UNFCCC -
वर्ष - १९९२

* हवामान बदल रोखणे

* अमलात येण्याचे वर्ष - १९९४

* भारताने मान्य केला - १९९३

७) UNFCCC अंतर्गत क्योटो करार - वर्ष - १९९७

* हरितवायू उत्सर्जनात घट

* अमलात येण्याचे वर्ष - २००५

* भारताने मान्य केला - २००२

८) CBD जैवविविधता करार - वर्ष -१९९२

* जैवविविधता व जैविक संसाधनांचे संवर्धन व व्यवस्थापन

* अमलात येण्याचे वर्ष - १९९३

* भारताने मान्य वर्ष - १९९४

९) CBD अंतर्गत कार्टाजेना प्रोटोकॉल -
वर्ष - २०००

* जनुकीय संशोधित जीवांच्या सीमापार होणाऱ्या जैवसुरक्षाहालचालींवर , हाताळणीवर व वापरावर नियंत्रण

* अमलात येण्याचे वर्ष - २००३

* भारताने मान्य केला - २००३

१०) वाळवंटीकरणाविरूद्ध संघर्षासाठी संयुक्त राष्ट्राचाकरार -
वर्ष - १९९४

* वाळवंटीकरणाविरूद्ध संघर्ष व दुष्काळ ( विशेषतः आफ्रिकेत ) निवारण

* अमलात येण्याचे वर्ष - १९९६

* भारताने मान्य केला - १९९६

११) रोटरडँम करार -
वर्ष - १९९८

* हानिकारक रसायनांच्या आंतरराष्ट्रीय व्यापारात पूर्वसुचित मान्यतेची पद्धत अमलात आणणे व त्यातून पर्यावरणाचे व मानवी आरोग्याचे संरक्षण करणे .

* अमलात येण्याचे वर्ष - २००४

* भारताने मान्य केला - २००५

१२) स्टॉकहोम करार -
वर्ष - २००१

*अ) मानवी आरोग्य व पर्यावरणांचे टिकून राहणाऱ्या सेंद्रिय प्रदुषकांपासून संरक्षण .

ब) एंडोसल्फान बंदी संबंधित करार

* अमलात येण्याचे वर्ष - २००४

* भारताने मान्य केला - २००६
______________________________
🌷🌷चेतासंस्था – Nervous System: 🌷🌷
मानवी शरीरातील क्रियांवर नियंत्रण २ संस्थांद्वारे ठेवले जाते.

🌷१) रासायनिक संस्था (Chemical System): 🌷

🌷यामध्ये हार्मोन्स संप्रेरकांसारख्या विशेष पदार्थांचा समावेश होतो.

🌷हार्मोन्स अंतःस्त्रावी गंथींमधून स्रवतात. हार्मोन्स हे चयापचय, मृदू स्नायूंच्या हालचाली इत्यादी हळू चालणाऱ्या प्रक्रियांचे नियंत्रण करतात.

🌷🍀🌷🍀🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷
🌺२) चेता संस्था (Nervous System):

🌷व्याख्या: मानवाच्या विविध क्रियांकर नियंत्रण ठेवून या क्रियांमध्ये एकसूत्रीपणा आणणाऱ्या संस्थेला ‘चेतासंस्था’ म्हणतात.

🌷मानवी शरीरातील चेतासंस्थेतील मेंदु, चेतारज्जू आणि चेतापेशी यांच्या साहाय्याने चेतनियंत्रण घडवून आणले जाते. यापासून आपली चेतासंस्था बनलेली असते.

🌷मानवी चेतासंस्था तीन मुख्य अवयवांची बनलेली असते.

🌷मेंदू (Brain)

🌿चेतारज्जू (Spinal Cord)

🌿चेतापेशी (Nerve Cells).



🍁🍀🍁🍀🍂🍁🍀🍁🍀🍀🍁🍀🍁🍀
🌷चेतासंस्थेचे भाग – मानवी शरीरातील विविध ज्ञानेंद्रियांच्या साहाय्याने प्राप्त झालेल्या संवेदनांना प्रतिसाद देण्यासाठी आपली चेतासंस्था खालील तीन भागात विभागली जाते.

🌸मध्यवर्ती चेतासंस्था (Central Nervous System)

🌸परिघीय चेतासंस्था (Peripheral Nervous System)

🌸स्वायत्त चेतासंस्था (Autonomous Nervous System).


🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷
🌷🌷मध्यवर्ती चेतासंस्था (Central Nervous System): 🌷🌷

🌾मध्यवर्ती चेता संस्था मेंदू आणि चेतारज्जू / मेरुरज्जू यांची बनलेली असते.
🌾मेंदू भोवती कर्पर (Cranium) कवटीच्या हाडांचे संरक्षणात्मक आवरण असते. चेतारज्जूला कशेरुस्तंभाचे म्हणजेच पाठीच्या कण्याचे संरक्षणात्मक आवरण असते.
🌾मध्यवर्ती चेतासंस्था आणि हाडे यांच्या पोकळीत संरक्षणात्मक आवरण असते त्यांना मस्तिष्कावरण (Meaninges) असे म्हणतात.
🌾मध्यवर्ती चेतासंस्थेचे कार्य ऐच्छिक स्वरूपाचे असते, म्हणजेच शरीरातील सर्व क्रियांचे नियंत्रण आणि समन्वय घडवून आणणे.



🌾🌷🌾🌷🌾🌷🌾🌷🌾🌷🌾🌷🌾🌷
🌺2. परिघीय चेतासंस्था (Peripheral Nervous System): 🌺

🌷परिघीय चेतासंस्थेमध्ये मध्यवर्ती चेतासंस्थेपासून निघणाऱ्या सर्व चेतांचा समावेश होतो. या चेता शरीरातील सर्व अवयवांना मध्यवर्ती चेतासंस्थेशी जोडण्याचे कार्य करतात.
🌷परिघीय चेतासंस्थेचे कार्य ऐच्छिक प्रकारचे असते.
मेंदूपासून निघणाऱ्या चेतांना कर्पार चेता (Cranial Nerves) म्हणतात, तर 🌷🌷मज्जारज्जूपासून निघणाऱ्या चेतांना मेरुचेता (Spinal Nerves) म्हणतात.
🌷मानवी शरीरात कर्पार चेतांच्या (Cranial Nerves) 12 जोड्या तर मेरुचेतांच्या (Spinal Nerves) 31 जोड्या असतात.


🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🌷
🍀3. स्वायत्त चेतासंस्था (Autonomous Nervous System):🍀

🌷स्वायत्त चेतासंस्था हि हृदय, फुप्फुस, जठर इत्यादीं अनैच्छिक अवयवांतील चेतांची बनलेली असते.

🌷मानवी शरीरातील अनैच्छिक क्रियांवर नियंत्रण ठेवण्याचे कार्य स्वायत्त चेतासंस्था करतात.

उदा. रक्तदाबाचे नियंत्रण, पाचकरस स्त्रावण्याची क्रिया, शरीराचे तापमान.



🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀
Forwarded from MPSC Maharashtra
आजचे फेसबुक Live सेशन ची लिंक : https://m.facebook.com/story.php?story_fbid=1433886236803428&id=285006821631210
🌷🌷स्नायू संस्था (Muscular System)🌷🌷
🌷🌷स्नायू संस्था (Muscular System):🌷🌷

मानवी स्नायू संस्था पुढील तीन स्नायूंपासून बनलेली असते.

अस्थी स्नायू,
मृदू स्नायू आणि
हृदय स्नायू.


🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀
🌷स्नायूंमुळे आपल्या शारीरिक हालचाली घडून येतात.
शरीराला मजबुती देऊन आकार नियंत्रित ठेवतात तसेच रक्ताचे वहन संपूर्ण शरीरात करतात.

🌷मानवी शरीरात एकूण 400 स्नायू असतात. प्रौढ मनुष्याच्या शरीरात एकूण 639 स्नायू असतात.
पुरुषांच्या एकूण वजनाच्या तुलनेत 40% तर स्त्रियांच्या एकूण वजनाच्या तुलनेत 30% स्नायूंचे वजन असते.

🌷हे स्नायू हाडांशी किंवा इतर स्नायूंशी जोडलेले असतात. स्नायू संस्थेतील स्नायू स्नायुतंतूच्या लांब पेशींपासून बनलेले असतात.

🌷या पेशींमध्ये संकोची प्रथिन (Contractile Protein) असते व त्या प्रथिनांमुळेच स्नायूंचे आकुंचन-प्रसरण घडून येते.

🌷हे संकोची प्रथिन अकँटीन आणि मायोसीन या तंतूपासन बनलेले असते.
स्नायूंच्या अभ्यासाच्या शास्त्राला Myology असे म्हणतात.
स्नायूंचे तीन प्रकार आहेत.


🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷