MPSC Science
67.1K subscribers
8.6K photos
54 videos
354 files
716 links
Download Telegram
🌷🌷मानवी रक्ताभिसरण संस्था (Human Circulatory System):🌷🌷

🌷मानवी रक्ताभिसरण संस्था हृदय आणि रक्तवाहिन्या या दोन अवयवांपासून बनलेली असते. आपल्या शरीरात पदार्थांचे अभिसरण रक्त या माध्यमातून होत असते.

🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌿🌷🌿🌷
🍀🍀रक्त (Blood):🍀🍀

रक्त हा संयोजी उतींचा द्रवरूप प्रकार आहे.
शुद्ध रक्ताचा रंग लाल भडक असून चव खारट असते.
रक्त आम्लारी / अल्कलीधर्मी असून त्याचा सामू (pH) 7.35 ते 7.45 आहे.
रक्त द्रवरूप तसेच स्थायूरुप घटकांचे बनलेले असते.
रक्तातील द्रवरूप भागाला रक्तद्रव्य किंवा प्लाझ्मा असे म्हणतात.
रक्तातील स्थायूरुप भागाला रक्तपेशी असे म्हणतात.

🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷
🌷🌷१) रक्तद्रव्य (Plasma):🌷🌷

🌹 फिकट पिवळसर रंगाचे द्रव असून रक्तामध्ये एकूण आकारमान 55% असते.

🌹यामध्ये 90% पाणी तर 10% विद्राव्य प्रथिने असतात.

🌹विद्राव्य प्रथिनांमध्ये अल्ब्युमिन, ग्लोब्युलिन आणि फायब्रिनोजन यांचा समावेश होतो.

🌹या व्यतिरिक्त रक्तद्रव्यात ग्लुकोज, रक्त गोठविणारे घटक, सोडियम, कॅल्शियम, क्लोराईड आणि बायकार्बोनेटचे आयन विद्युत अपघटनी द्रावणाच्या स्वरूपात तसेच संप्रेरके आणि कार्बन डायॉकसाईड हे घटक असतात. अल्ब्युमिन रक्तातील पाण्याचे प्रमाण संतुलित ठेवते त्यामुळे परासरण दाब (Osmotic Pressure) नियंत्रित केला जातो.

🌹ग्लोब्युलिन रोगजंतूंविरुध्द्व लढा देतात.

🌹फायब्रिनोजन आणि प्रोथ्रॉम्बिन रक्त गोठण्याच्या क्रियेत मदत करतात.

🌹रक्तद्रव्यामध्ये शरीरातील प्रथिनांची बचत होते.

🌹रक्तातील विद्युत अपघटनी आयन चेता आणि स्नायूंचे कार्य नियंत्रित करतात.

🌹रक्तातील बायकार्बोनेट्समुळे कार्बन डायॉकसाईड चे वहन होण्यास मदत होते.

🌹रक्तद्रव्यातील गोठविणाऱ्या घटकांव्यतिरिक्त असलेल्या भागाला ब्लड सिरम किंवा शुद्ध रक्त असे म्हणतात.
🌷🌷२) रक्तपेशी (Blood Cells):🌷🌷

रक्तातील पेशींना हिमॅटोसाईट्स असेही म्हणतात. रक्तपेशींचे ३ प्रकार आहेत.

आपल्या रक्तातील एकूण आकारमानाच्या 45% आकारमान रक्तपेशींचे तर उर्वरित 55% आकारमान रक्तद्रव्याचे म्हणजेच प्लाझ्माचे असते.

तांबडया रक्तपेशींमध्ये हिमोग्लोबिन नावाचे प्रथिन असून त्यातील लोह या क्षाराच्या साहाय्याने फुफ्फुसांकडून उतींकडे ऑक्सिजनचे तर उतींकडून फुफ्फुसांकडे कार्बन डायॉकसाईडचे वहन केले जाते.


🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀
02. खालील धातुंचा क्रियाशिलतेनुसार उतरता क्रम ओळखा :
अ) अॅल्यमिनिअम
ब) जस्त क) सोने ड) प्लॅटीनम
Anonymous Quiz
24%
1) अ-ब-ड-क
33%
2) अ-ब-क-ड
30%
3) ड-क-ब-अ
14%
4) क-ब-ड-अ
03. खालीलपैकी कोणते उदाहरण रासायनिक बदलाचे (Chemical change) आहे?
अ) दुधाचे रूपांतर दह्यात होणे.
ब) दुधात पाणी मिसळणे. क) बर्फाचे पाण्यात रूपांतर होणे ड) लोखंड गंजणे
Anonymous Quiz
9%
1) अ,ब व क
9%
2) ब व क
59%
3) अ व ड
23%
4) वरील सर्व
04. आकाशात पावसाळ्यात निर्माण होणारे इंद्रधनुष्य खालीलपैकी कोणत्या घटकांमुळे निर्माण होते?
अ) प्रकाशाचे अपवर्तन
ब) प्रकाशाचे अपस्करण क) आंतरिक परिवर्तन
Anonymous Quiz
19%
1) फक्त अ
27%
2) फक्त ब
15%
3) अ व ब
39%
4) वरील सर्व
05. अयोग्य नसलेले विधान ओळखा.
अ) मानवाची ध्वनी ऐकण्याची मर्यादा 20 हर्टझ ते 20,000 हर्टझ् या दरम्यान असते.
ब) ध्वनीचा वेग प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त असतो. क) व्यक्तीचे वय जसजसे वाढत जाते तसे त्याची उच्च वारंवारतेचा ध्वनी ऐकण्याची क्षमता कमी होत जाते.
Anonymous Quiz
10%
1) अ व ब
16%
2) ब व क
41%
3) अ व क
33%
4) वरील सर्व
🍀🍀मानवी रक्ताभिसरण संस्था (Human Circulatory System):🍀🍀