MPSC Science
66.9K subscribers
8.6K photos
54 videos
356 files
717 links
Download Telegram
🌺2. गतीचे जडत्व :🌺

वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे गतिमान अवस्थेत बदल होवू शकत नाही त्यास गतीचे जडत्व म्हणतात.
उदा. चालत्या बसमधून उतरणारा प्रवासी पुढच्या दिशेने पडतो.

🌺3. दिशेचे जडत्व :🌺

वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे ती आपल्या गतीची दिशा बदलू शकत नाही यास दिशेचे जडत्व म्हणतात.
उदा. चाकूला धार करतांना धार लावण्याच्या चाकांच्या स्पर्शरेषेवरून ठिणग्या उडताना दिसतात

🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷
🌹न्यूटनचे गतीविषयक नियम :🌹

🌺पहिला नियम :🌺

‘जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्यरत नसेल तर तिच्या विराम अवस्थेत किंवा सरल रेषेतील एकसमान गतीमध्ये सातत्य राहते’. यालाच ‘जडत्वाचा नियम’ असे म्हणतात.
उदा. बस अचानक सुरू होते तेव्हा प्रवाशांना मागच्या दिशेला धक्का बसतो.

🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷
🌺दूसरा नियम :🌺

‘संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समाणूपाती असतो आणि संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेने होते’.
उदा. गच्चीवरून समान आकाराचे बॉल खाली टाकणे.

संवेग –
वस्तूमध्ये सामावलेली एकूण गती म्हणजे संवेग होय.
p=mv
संवेग परिवर्तनाचा दर = संवेगात होणारा बदल / वेळ
mv-mu/t
m(v-u)/t.

🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷
🌺तिसरा नियम :🌺

‘प्रत्येक क्रिया बलास समान परिमानाचे एकाच वेळी घडणारे प्रतिक्रिया बल अस्तित्वात असते व त्याच्या दिशा परस्पर विरुद्ध असतात’.
उदा. जेव्हा बंदुकीतून गोळी मारली जाते तेव्हा बंदूक गोळीवर बल प्रयुक्त करते आणि त्यामुळे गोळीला अधिक वेग प्राप्त होतो.

🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌿🌷🌿🌷🌿🌷🌿
🍀पेशींच्या अभ्यासाच्या शास्त्राला पेशीशास्त्र (Cytology) असे म्हणतात.

🍀रॉबर्ट हुक यांनी पेशी हे नाव दिले.

🍀पेशीतील विविध घटकांच्या संशोधनानंतर काही जर्मन शास्त्रज्ञानीं विविध सजीवांचे निरीक्षण करून पेशी विषयी आपले विचार मांडले त्यांनाच पेशीसिद्धांत असे म्हणतात.

१) एम. जे. शिल्डेन (1938) २) थिओडोर श्वान यांनी पेशी सिद्धांत मांडला.

🍀पेशींचा आकार अतिशय लहान आहे व उघड्या डोळ्यांनी पेशींचे निरीक्षण करता येत नाही.

🍀पेशींचा आकार मोजण्याचे एकक (μm) आहे.

🍀पेशींचा आकार 0.1 μm ते 18 cm असू शकते.

🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷
अ. क्र. सजीव पेशी पेशींचा आकार
१) अमीबा अनियमित (Irregular)
२) स्पायरोगायरा आयताकृती (Rectangular)
३) जिवाणू दंडाकृती (Cylindrical)
४) अंडपेशी गोलाकार (Rounded)
५) शुक्रपेशी सर्पिलाकृती (Sprial)
६) तांबड्या पेशी द्विअंतर्वक्री (Bi-Concave)
७) चेतापेशी शाखीय (Branched)
८) मेदपेशी अंडाकृती (Oval)
९) त्वचेतील पेशी स्तंभाकृती (Columnar)
१०) स्नायूपेशी विटाकृती (Bricks Shapes).

🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🌷
** पेशींचे प्रकार :

🌷आदिकेंद्रकी पेशी (Prokaryotic Cell)

🌷दृश्यकेंद्रकी पेशी (Eukaryotic Cell).
🌷आदिकेंद्रकी पेशी(Prokaryotic Cell) :

ज्या पेशींमध्ये स्पष्ट दिसणारे केंद्रक आणि पेशी अंगके नसतात त्या पेशींना आदिकेंद्रकी पेशी म्हणतात.
आदिकेंद्रकी पेशी लहान आकाराच्या असून त्यांचा आकार 1-10 μm असतो.
पेशी द्रव्य अंडी केंद्रक द्रव्य एकच असतात.
आदिकेंद्रकी पेशीतील केंद्रकाला आवरण नसते.
या पेशींमध्ये गुणसूत्रांची एकच जोडी असते.
DNA चा रेणू केंद्रकाच्या अस्पष्ट भागात असतो.
DNA असलेल्या अस्पष्ट भागाला केंद्रकसदृश (Nucleoid) असे म्हणतात.
आदिकेंद्रकी पेशींमध्ये तंतूकणिका नसतात.
रायबोसोम्सचे कण असतात.

🌿🌷🌿🌿🌿🌿🌿🌷🌿🌿🌿🌿
🌺दृश्यकेंद्रकी पेशी (Eukaryotic Cell)

ज्या पेशींमध्ये स्पष्ट दिसणारे केंद्रक आणि पेशी अंगके असतात अश्या पेशींना दृश्यकेंद्रकी पेशी असे म्हणतात.
दृश्यकेंद्रकी पेशींचा आकार 5-100 μm असतो, व ह्या आकाराने मोठ्या असतात.
या पेशींमध्ये गुणसूत्रांच्या अनेक जोड्या असून DNA, RNA च्या शृंखला असतात.
वनस्पती आणि प्राणी दोघांमध्ये या पेशी आढळतात.
उदा: अमीबा, शैवाल, वनस्पती, प्राणी, कवक, प्लाझमोडियम.

टीप: मानवी शरीरात 60 ते 90 ट्रिलियन (1 ट्रिलियन =1012 ) पेशी असतात. या सर्व पेशी मिळून पृथ्वीला 4.5 फेऱ्या होतील.
मानवी मेंदू हा सर्वाधिक पेशींपासून बनलेला अवयव आहे.


🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
विज्ञानवाटा: मधमाश्यांचे भाषाशास्त्र
पृथ्वी भोवतीच्या हवेच्या आवरणास वातावरण म्हणतात. वातावरणाचे खालील स्तर पडतात.


🌺1. तपांबर

भूपृष्ठापासून तेरा किलोमीटर ऊंची पर्यंतच्या हवेच्या थर तपांबर म्हणून ओळखला जातो. या थराची विषुववृत्तावरील जाडी जवळजवळ सोळा किलोमीटर असून ध्रुवावर ती सहा किलोमिटरच्या दरम्यान आहे.
समुद्रसपाटीपासून जसजसे उंच जावे तसतसे तापमान कमी कमी होत जाते. या कारणामुळे समुद्रसपाटीपासून उंच ठिकाणी थंड हवेची ठिकाणे निर्माण झालेली आहेत. या थरामधील हवेत खालील वायु आढळतात.

🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷
🌷हवेतील घटक घटकाचे प्रमाण🌷

🌷नायट्रोजन 78.03%

🌷ऑक्सीजन 20.99%

🌷कार्बडायक्साईड 00.03%

🌷ऑरगॉनवायु 00.94%

🌷हैड्रोजनवायु 00.01%

🌷पाण्याची वाफ, धुळ व इतर घटक 0.01%

🌷एकूण हवा 100.00%.
🌺2. तपस्तब्धी

भुपृष्ठापासून जवळजवळ दहा किलोमिटरच्या उंचीपर्यंत वातावरणाच्या तापमानात सतत घट होत जाते. त्यानंतर तीन किलोमीटरच्या थरातील तापमानात कोणताही बदल होत नसल्यामुळे वातावरणाचा हा थर स्थिर तापमानाचा थर म्हणून ओळखला जातो. या थराला तपस्तब्धी असे म्हणतात.


🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌿🌷🌿🌷
🌺3. स्थितांबर

तपस्तब्धीनंतर वातावरणाच्या या थराला सुरुवात होते. स्थितांबराच्या या भागाची जाडी जवळजवळ 13 ते 50 किलोमीटर पर्यंत आहे. या थरामधील सुरुवातीच्या 32 ते 40 किलोमीटर उंचीच्या भागात तापमान सारखेच आढळते. स्थितांबरामध्ये खालील स्थराचे अस्तित्व आढळते.
ओझोनोस्पीअर – स्थितांबराच्या खालच्या भागात ओझोन वायुचा स्तर आहे. हा थर ओझोनोस्पीअर या नावाने ओळखला जात असून या थरामध्ये सूर्यापासून आलेली अल्ट्राव्होयलेट किरणे शोषली जातात.
मध्यांबर – स्थितांबरचा वर मध्यांबर आहे. या भागात तापमानाचे प्रमाण सर्वात कमी आहे.
🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌿🌷🌿🌷🌿🌷
🌺4. आयनाबंर

मध्यांबराच्या पलीकडील हवेच्या भागास आयनांबर म्हणतात. या थराची जाडी 80 ते 500 किलोमीटर पर्यंत आहे. या भागात हवेचे अत्यंत विरळ अस्तित्व आहे. सूर्यापासुन आलेल्या अल्ट्राव्होयलेट किरणाची हवेच्या अणूवर प्रक्रिया होऊन तेथे आयनांबर थर निर्माण झालेला आहे. यामध्ये खालील स्तर आढळतात.
इ-लेअर – या थरातील 100 ते 208 किलोमिटरचा थर इ-लेअर (E-Layaer) म्हणून ओळखला जातो. या थरामधून पृथ्वीवरील नेभोवाणीकडून निघालेल्या मध्यम रेडिओ लहरी पृथ्वीवर प्रवर्तित होतात.
एफ-लेअर – त्यानंतरचा थर (F-Layer) एफ-लेअर म्हणून ओळखला जातो. या थरामधून पृथ्वीवरील नभोवाणी केंद्रामधून निघालेल्या लघु रेडिओ लहरी पृथ्वीवर परावर्तीत होतात.


🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷
🌺5. बाहयांबर

आयनाबंराच्या पलीकडील हवेच्या भागास बाहयांबर म्हणतात. या थरात उंचीनुसार तापमान वाढत जाते. या भागात हायड्रोजन सारख्या हलक्या वायूचे अस्तित्व आढळते.


🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌿🌷🌿