🔹आधार पे अॅपद्वारे असे करा पेमेंट...
Join @MPSCScience
केवळ शहरीच नाही तर ग्रामीण भागातील गरीब आणि अशिक्षित लोकांमध्येही डिजिटल पेमेंट लोकप्रिय करण्यासाठी भारत सरकार प्रयत्नशील आहे. त्यादृष्टीने सरकारने उचललेले पाऊल म्हणजे 'आधार पे अॅप'! या अॅपद्वारे केवळ तुमच्या फिंगरप्रिंटच्या आधारे आर्थिक व्यवहार करणे शक्य होणार आहे. चला तर पाहुयात या इन्फोग्राफिक्समधून, कसे करता येतील पेमेंट्स आधार पे अॅपच्या माध्यमातून...

Forwarded from MPSC PSI STI ASO (Official) ™
रक्ताच्या कर्करोगाचे प्रकार
सर्वात प्राणघातक कर्करोगांमध्ये रक्ताच्या कर्करोगाचा सहावा क्रमांक आहे. रक्ताच्या कर्करोगाचे तीन मुख्य प्रकार आहेत.
सर्वात प्राणघातक कर्करोगांमध्ये रक्ताच्या कर्करोगाचा सहावा क्रमांक आहे. रक्ताच्या कर्करोगाचे तीन मुख्य प्रकार आहेत. ल्युकेमिया, लिम्फोमा आणि मायेलोमा. ल्युकेमिया हा सर्वाधिक आढळणारा रक्ताचा कर्करोग आहे. त्यानंतर लिम्फोमा आणि मायेलोमाचे रुग्ण आढळतात. दरवर्षी देशभरात ल्युकेमियाचे ३५,००० नवे रुग्ण, लिम्फोमाचे ३२,००० नवे रुग्ण तर मायेलोमाचे ७,००० नवे रुग्ण आढळतात आणि रक्ताच्या कर्करोगामुळे दरवर्षी सुमारे ५०,००० व्यक्तींचा मृत्यू होतो. त्यामुळे लोकांना रक्ताच्या कर्करोगाविषयी जाणीव करून देणं महत्त्वाचं आहे.
रक्ताच्या कर्करोगामुळे रक्तपेशींच्या कार्यात अडथळा निर्माण होतो. याची सुरुवात बोन मॅरोमध्ये होते, जिथे रक्ताची निर्मिती केली जाते. बोन मॅरोमधील स्टेम सेल्स परिपक्व होऊन लाल रक्तपेशी, पांढऱ्या रक्तपेशी आणि प्लेटलेट्समध्ये रुपांतरीत होतात. रक्ताच्या बहुतेक कर्करोगांमध्ये रक्तेपेशींच्या विकासाच्या प्रक्रियेत असाधारण प्रकारच्या रक्तपेशीच्या अनियंत्रित वाढीमुळे अडथळा निर्माण होतो. या कर्करोगाच्या पेशी सामान्य कार्य करणाऱ्या लाल रक्तपेशी, पांढऱ्या रक्तपेशी आणि प्लेटलेट्सच्या निर्मितीमध्ये अडथळा निर्माण करतो आणि त्यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा करणं, जंतूसंसर्गाला प्रतिकार करणं किंवा गंभीर प्रकारचा रक्तस्त्राव थांबवणं यासारख्या कार्यांमध्ये अडथळा निर्माण होतो.
कोणतंही कारण नसताना कमी झालेलं वजन, थकवा, अशक्तपणा जाणवणं किंवा धाप लागणं, चटकन जखम होणं किंवा रक्तस्त्राव होणं, लसिका गाठींचा आकार वाढणं, पोटात अस्वस्थ वाटणं, वारंवार किंवा पुन्हा-पुन्हा संसर्ग होणं, रात्री ताप येणं/ घाम येणं, हाडांमध्ये/सांध्यांमध्ये वेदना होणं, त्वचेला कंड सुटणं आणि हाडांमध्ये वेदना (बरगड्या, पाठ) इत्यादी रक्ताच्या कर्करोगाची लक्षणं आहेत. कर्करोगाच्या प्रकारानुसार ही लक्षणं बदलू शकतात.
🐝 @BeePublication