MPSC Science
66.8K subscribers
8.6K photos
54 videos
356 files
717 links
Download Telegram
🌿🌿मासिक पाळीच्या आवर्तनातील टप्पे🌿🌿

🍁ह्या चक्रांमध्ये ३ टप्पे असतात -

🌾 (अंडे बाहेर सोडले जाण्याआधी)

🌾ओव्ह्यूलेटरी (अंडे बाहेर सोडले जाणे)

🌾ल्युटिल (अंडे बाहेर सोडल्यानंतर)

🌿🌿फॉलिक्युलर टप्पा🌿🌿

हा टप्पा रक्त वाहण्याचा पहिल्या दिवशी सुरू होतो (दिवस १) परंतु ह्या टप्प्याचे खरे वैशिष्ट्य म्हणजे ओव्हरीजमध्ये फॉलिकलची विकास होणे.फॉलिक्युलर टप्प्याच्या सुरुवातीला गर्भाशयाचे अस्तर (एंडोमेट्रियम) गर्भाच्या पोषणासाठी आवश्यक असे द्रव भरून फुगते. अंड्याचे फलन न झाल्यास एस्ट्रोजेन तसेच प्रोजेस्टेरॉनचे प्रमाण कमी असते. ह्याचा परिणाम म्हणून एंडोमेट्रियमचे वरचे थर बाहेर टाकले जातात आणि मासिक पाळीचे रक्त वाहण्यास सुरूवात होते. साधारण ह्याच वेळी पिट्युटरी ग्रंथींमधून फॉलिकलला उत्तेजित करणार्‍या संप्रेरकांची निर्मिती जरा जास्त प्रमाणात केली जाते.

ह्या संप्रेरकामार्फत साधारणतः ३ ते १० फॉलिकल्स तयार केली जातात. प्रत्येकात एक अंडे असते. ह्याच टप्प्यात, ह्या संप्रेरकांचे प्रमाण कमी होऊ लागल्यानंतर, ह्यांपैकी एकाच डॉमिनंट फॉलिकलची वाढ होत राहते. कालांतराने ते स्वतःच एस्ट्रोजेन तयार करू लागते आणि इतर फॉलिकल्स नष्ट होतात.

फॉलिक्युलर टप्पा सुमारे १३-१४ दिवसांचा असतो. तिन्ही टप्प्यांपैकी ह्या टप्प्याच्या कालावधीत सर्वाधिक बदल होत राहतात. मेनोपॉजच्या वेळी हा टप्पा ही कमी दिवसांचा असतो. ल्युटिनायझिंग संप्रेरकांचे प्रमाण वाढते तेव्हा हा टप्पा संपतो व परिणामी अंडे बाहेर सोडले जाते (ओव्ह्यूलेशन).
🌾🌾ओव्ह्यूलेटरी टप्पा🌾🌾

ल्युटिनायझिंग संप्रेरकांचे प्रमाण वाढते तेव्हा हा टप्पा सुरू होतो. ल्युटिनायझिंग संप्रेरकामुळे डॉमिनंट फॉलिकलला उत्तेजना मिळून अखेरीस ते बीजांडकोशाच्या भिंतीतून बाहेर येते व अंडे बाहेर सोडले जाते.

ह्यानंतर फॉलिकलला उत्तेजित करणार्‍या संप्रेरकांचे प्रमाण मंदपणे वाढते. फॉलिकलला उत्तेजित करणाऱ्या संप्रेरकांचे प्रमाण वाढण्यामागील कारण अजून नीटसे समजलेले नाही. हा टप्पा साधारणतः १६ ते ३२ तास चालतो व अंडे बाहेर सोडण्याच्या क्रियेने ह्याची सांगता होते.

अंडे बाहेर सोडले गेल्यानंतर १२ ते २४ तासांनी, ल्युटिनायझिंग हार्मोनमधील वाढ लघवी तपासल्यानंतर दिसून येते. हे प्रमाण मोजल्याने एखादी स्त्री फलनक्षम आहे अथवा नाही हे समजते. अंडे सोडल्यानंतर अधिकतम १२ तासांपर्यंत त्याचे फलन होऊ शकते.

अंडे बाहेर सोडले जाण्याआधी पुनरुत्पादक नलिकेत (रिप्रॉडक्टिव्ह ट्रॅक) शुक्रजंतू हजर असल्यास फलनाची शक्यता जास्त असते. 
🌾🌾ल्युटिल टप्पा🌾🌾

ओव्ह्यूलेशननंतर हा टप्पा सुरू होतो आणि, फलन न झाल्यास, सुमारे १४ दिवस चालून पुढील मासिक पाळीच्या आधी संपतो.

ह्यामध्ये अंडे बाहेर सोडल्यानंतर फाटलेले फॉलिकल पुनः सांधले जाते आणि त्यातून बनलेल्या आकृतीस कॉर्पस ल्युटेअम असे म्हणतात. ह्यामधून वाढत्या प्रमाणात प्रोजेस्टेरॉन तयार केले जाते. फलन झालेच तर त्या दृष्टीने गर्भाशयाची तयारी करण्याचे काम ह्या कॉर्पस ल्युटेअमतर्फे केले जाते. कॉर्पस ल्युटेअमद्वारे तयार झालेल्या प्रोजेस्टेरॉनमुळे एंडोमेट्रियमची जाडी वाढते व भावी गर्भास आवश्यक ती पोषकद्रव्ये त्यात भरली जातात. तसेच प्रोजेस्टेरॉनमुळे सर्व्हिक्स (ग्रीवा) मधील म्युकस (श्लेष्मा) घट्ट होऊन गर्भाशयात वीर्य किंवा इतर जीवाणूंच्या प्रवेशाची शक्यता कमी होते.

प्रोजेस्टेरॉनमुळे ह्या टप्प्यादरम्यान शरीराचे एकंदर तापमानही किंचित वाढते व पुढील मासिक पाळी चालू होईपर्यंत ते तसेच वाढलेले राहते. ह्या वाढीव तापमानावरूनही ओव्ह्यूढलेशनची शक्यता आजमावता येते. ह्या टप्प्यामध्ये इस्ट्रोजेनचे प्रमाण जास्त असते. 
🌾🌾कालावधी🌾🌾

वय वर्षे वीसच्या टप्प्यातील मुली आणि रजोनिवृतीपूपुर्व काळातील स्त्रिया त्यांच्या दृष्टीने ‘नियमित’ ही तुलनात्मक संज्ञा आहे. काही स्त्रियांच्या बाबतीत मासिक पाळी ही कधीच नियमित नसते. पहिल्या पाळीच्या अनुषंगाने पुढची पाळी कधी येईल याचा अंदाज वर्तविणे कधीकधी शक्य नसते. जास्त ताण पडणे, आजारपण, संतती नियमनांच्या गोळ्यांचा वापर अथवा त्यासाठी काही हार्मोन्सचा वापर अशा अनेक कारणांमुळे पाळी अनियमित येणे शक्य असते. संततिनियमनासाठी तथाकथित “तालबद्ध प्रक्रिया" (र्‍हिदम मेथड) ही एक असुरक्षित पद्धत समजली जाते.
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
विज्ञानवाटा:सजीव सृष्टी संकटात
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
विज्ञान नावाचा चमत्कार
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
🔹संशोधक व त्यांनी लावलेले शोध

क्र. शोध संशोधक
1. सापेक्षता सिद्धांत = आईन्स्टाईन
2. गुरुत्वाकर्षण= न्यूटन
3. फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट= आईन्स्टाईन
4. किरणोत्सारिता हेन्री =बेक्वेरेल
5. क्ष-किरण विल्यम= रॉटजेन
6. डायनामाईट =अल्फ्रेड नोबेल
7. अणुबॉम्ब= ऑटो हान
8. प्ंजा सिद्धांत= मॅक्स प्लॅक
9. विशिष्टगुरुत्व= आर्किमिडीज
10. लेसऱ =टी.एच.मॅमन
11. रेडिअम =मेरी क्युरी व पेरी क्यूरी
12. न्युट्रॉन =जेम्स चॅड्विक
13. इलेक्ट्रॉन= थॉम्पसन
14. प्रोटॉन =गोल्डस्टीन
15. ऑक्सीजन =लॅव्हासिए
16. नायट्रोजन =डॅनियल रुदरफोर्ड
17. कार्बनडाय ऑक्साइड =रॉन हेलमॉड
18. हायड्रोजन =हेन्री कॅव्हेंडिश
19. विमान =राईट बंधू
20. रेडिओ =जी.मार्कोनी
21. टेलिव्हिजन =जॉन बेअर्ड
22. विजेचा दिवा =थाॅमस एडीसन
23. सेफ्टी लॅम्प =हंप्रे डेव्ही
24. डायनामो =मायकेल फॅराडे
25. रिव्होल्व्हर =सॅम्युअल कोल्ट
26. मशीनगन =रिचर्ड गॅटलिंग
27. वाफेचे इंजिन =जेम्स वॅट
28. टेलिफोन =अलेक्झांडर ग्राहम बेल
29. थर्मामीटर = गॅलिलिओ
30. सायकल= मॅक मिलन
31. अणू भट्टी =एन्रीको फर्मी
32. निसर्ग निवडीचा सिद्धांत= चार्ल्स डार्विन
33. अनुवंशिकता सिद्धांत =ग्रेगल मेंडेल
34. पेनिसिलीन = अलेक्झांडर फ्लेमिंग
35. इन्शुलीन = फ्रेडरिक बेंटिंग
36. पोलिओची लस = साल्क
37. देवीची लस = एडवर्ड जेन्नर
38. अॅंटीरॅबिज लस = लुई पाश्चर
39. जीवाणू = लिवेनहाँक
40. रक्तगट = कार्ल लँन्डस्टँनर
41. मलेरियाचे जंतू = रोनाल्ड रॉस
42. क्षयाचे जंतू = रॉबर्ट कॉक
43. रक्ताभिसरण = विल्यम हार्वे
44. हृदयरोपण = डॉ. ख्रिश्चन बर्नार्ड
45. डी.एन.ए.जीवनसत्वे = वॅटसन व क्रीक
46 जंतूविरहित शस्त्रक्रिया= जोसेफ लिस्टर
47. होमिओपॅथी = हायेमान
--------------------------------------------------
अधिक माहितीसाठी जॉईन करा @eMPSCkatta
Forwarded from VideoKatta
आज सायंकाळी 6 वाजता....

https://youtu.be/qkhO1aWdeOk
Forwarded from VideoKatta
Forwarded from VideoKatta
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
सामान्य विज्ञानाची तयारी...