MPSC Science
67.1K subscribers
8.6K photos
54 videos
354 files
716 links
Download Telegram
Forwarded from Loksatta - लोकसत्ता
Forwarded from Loksatta - लोकसत्ता
Forwarded from MPSC Material
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from ραиκαנ gοяє
Forwarded from ραиκαנ gοяє
Forwarded from ραиκαנ gοяє
Forwarded from Study bird🐦
Forwarded from Study bird🐦
Forwarded from Study bird🐦
Forwarded from Study bird🐦
Forwarded from Study bird🐦
Forwarded from Study bird🐦
New Doc 37 - 2016 मधील काही भारतीय पदचिन्हे
Forwarded from Study bird🐦
आगकाड्या : कोणत्याही खरखरीत पृष्ठावर किंवा विशिष्ट प्रकारच्या पृष्ठावर घासल्यास पेट घेईल असे रासायनिक पदार्थांचे मिश्रण ज्या काडीच्या किंवा कागदी पट्ट्याच्या अथवा सुरळीच्या टोकास लाविलेले असते, तिला ‘आगकाडी’ असे म्हणतात.

 

लाकडावर लाकूड घासले गेल्याने वणवा लागतो असे आढळल्यावरून प्राचीन काळी यज्ञाकरिता अग्नी उत्पन्न करण्याचे अरणी-घुसळदांडू हे उपकरण प्रचारात आले असावे. गारगोटी आणि लोखंड यांच्या घर्षणाने ठिणगी पाडण्याची युक्ती म्हणजेच चकमक त्यानंतर माहीत झाली. या ठिणग्यांनी प्रथम कापूस पेटवीत. त्यानंतर कापसाऐवजी गंधकात बुडविलेल्या काड्या वापरात आल्या.

 

रासायनिक विक्रियेने विस्तव उत्पन्न करण्याच्या प्रयत्नांना एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी चालना मिळाली. पोटॅशियम क्लोरेट, साखर व डिंक यांचे मिश्रण लावलेल्या काड्या सल्फ्यूरिक अम्लात बुडविल्याने पेट घेतात, असे दिसून आल्यावर ‘तत्काळ अग्नी’ (इन्स्टंटेनियस-लाइट) या नावाची आगकाडी प्रचारात आली. तथापि ती वापरणे धोक्याचे आणि गैरसोयीचे असल्यामुळे लवकरच मागे पडली.

 

रासायनिक द्रव्यांच्या घर्षणाने पेटेल अशी आगकाडी १८२७ मध्ये जॉन वॉकर (इंग्लंड) यांनी बनविली. अँटिमनी सल्फाइड, पोटॅशियम क्लोरेट, डिंक किंवा स्टार्च यांच्या मिश्रणाचे गुल या काडीच्या टोकाला लाविलेले असे. काचेची पूड लावलेल्या किंवा दुसऱ्या कोणत्याही खरखरीत पृष्ठावर ते घासले की पेट घेई. परंतु अशी काडी ओढल्यावर इतस्तत: ठिणग्या उडत आणि अपायकारक व दुर्गंधी धूर होत असे त्यामुळे ती लोकप्रिय झाली नाही.

 

वरील मिश्रणातील अँटिमनी सल्फाइडाऐवजी पांढरा फॉस्फरस वापरून बनविलेल्या ‘ल्युसिफर’ आगकाड्या १८३१ मध्ये निघाल्या. परंतु पांढऱ्या फॉस्फरसाच्या संपर्कामुळे आगकाड्यांच्या कारखान्यातील कामगारांना ‘फॉसीजॉ’ नावाचा जबड्यांच्या हाडाचा रोग होतो, असे जेव्हा दिसून आले तेव्हा त्यांचे उत्पादन कायद्याने बंद करण्यात आले. अँटोन फोन श्रोट्टे यांनी १८४५ मध्ये तांबड्या फॉस्फरसाचा शोध लावला. हा बिनविषारी असून सहजासहजी पेटत नाही त्यामुळे त्याचा उपयोग आगकाड्यांकरिता करणे शक्य झाले.

 

स्वीडनमध्ये लुंडस्ट्रॉम यांनी १८५५ मध्ये प्रथम सुरक्षित आगकाडी बनविली. ही काडी कोणत्याही खरखरीत पृष्ठावर घासून पेटविता येत नाही; ती पेटविण्याकरिता विशिष्ट रासायनिक मिश्रण लावलेला पृष्ठभाग लागतो. हिचे दुसरे वैशिष्ट्य हे की, तिच्यामध्ये घर्षणजन्य उष्णतेने पेट घेणारे द्रव्य (तांबडा फॉस्फरस) आणि अँटिमनी सल्फाइड व खरखरीतपणा आणणारा एखादा पदार्थ यांचे मिश्रण आगपेटीच्या अरुंद बाजूच्या पृष्ठाला लावलेले असते आणि त्या योगाने प्रज्वलित होणारी द्रव्ये काडीच्या गुलात असतात. या विभागणीमुळे या आगकाड्या पूर्वीच्या काड्यांपेक्षा जास्त सुरक्षित ठरतात. गुलामध्ये पोटॅशियम क्लोरेट, पोटॅशिम डायक्रोमेट, मँगॅनीज डाय-ऑक्साइड, गंधक, काचेची बारीक पूड, सरस इ. द्रव्ये असतात. यांतील पहिली तीन द्रव्ये ज्वलनास आवश्यक असलेला ऑक्सिजन पुरवितात व त्यामुळे प्रथम गंधक जळू लागतो. कारण काडीच्या लाकडापेक्षा तो अधिक सुलभतेने पेटतो. त्यानंतर काडी पेट घेते. आगकाडीकरिता वापरावयाच्या काड्या अमोनियम फॉस्फेट किंवा बोरिक अम्ल यांच्या विद्रावात बुडवून नंतर सुकवितात त्यामुळे काडीची ज्योत विझविल्यावर लाकूड जळत राहत नाही. काडीच्या एका टोकाला सु. १० मिमी. लांबीपर्यंत पॅराफीन मेणाचा पातळ थर देतात व नंतर ते टोक गुल बनविण्याच्या मिश्रणात बुडवून काढतात. पॅराफिनामुळे काडीचे ज्वलन सुलभ होते. सेव्हने व काहेन यांनी १८९८ मध्येफॉस्फरस सेस्क्विसल्फाइड वापरून घर्षक काड्या तयार केल्या.

 

बहुतेक सर्व देशांत आगकाड्यांचा पुरवठा पातळ लाकडी पेट्यांतून केला जातो. पेटीचे दोन भाग असतात : (१) आतील खण व (२) खणाच्या चार बाजू झाकील असे पातळ लाकडी झाकण - त्यात हा खण सरकवून बसविता येतो. झाकणाच्या दोन बाजूंना घर्षक मिश्रण लावलेले असते. काही देशांत आगकाड्या कागदाच्या केलेल्या असून त्या पुठ्ठ्याच्या पुस्तकासारख्या वेष्टनात ठेवलेल्या असतात. आगकाड्यांचे व आगपेट्यांचे इतरही अनेक प्रकार आढळतात. आगकाड्या बनविण्याच्या बहुतेक सर्व कृती यंत्राने केल्या जातात.

 

कच्चा माल : आगकाड्या तयार करण्यासाठी विशेष प्रकारचे लाकूड व कागद, खळ अथवा डिंक आणि आवश्यक ती रसायने यांची गरज असते.

 

लाकूड : हलके, मऊ व सच्छिद्र, गाठी किंवा तडे नसलेले, रचनेत सरळ व ज्याचे पातळ तक्ते निघतील असे लाकूड काड्यांकरिता लागते. काडी ओढताना ती मोडू नये इतपत कठीणपणा त्यास असावा लागतो. खण व झाकण यांकरिता लागणारे लाकूड नितळ पृष्ठाचे लागते. अशा लाकडामुळे घर्षकाचा लेप सर्वत्र सारखा देता येतो व कागद चांगला चिकटतो. काड्या व पेट्या यांसाठी अ‍ॅस्पेन,टिलिया जॅपोनिका, सिमनॉक, कॉटनवुड, बालसम, पॉपलर, पोप्रावुड व सावर या झाडांचे लाकूड सामान्यत: वापरतात. भारतात उपलब्ध असणारे मलबार अ‍ॅस्पेन, अशोक इ. लाकडांच
Forwarded from Study bird🐦
े प्रकार काड्या व पेट्या यांसाठी उपयोगी ठरले आहेत.

 

रसायने व इतर पदार्थ : गंधक, पोटॅशियम क्लोरेट, पोटॅशियम डायक्रोमेट, मँगॅनीज डाय-ऑक्साइड, आयर्न ऑक्साइड, अँटिमनी सल्फाइड, तांबडा फॉस्फरस, डिंक, सरस इत्यादींचा उपयोग आगकाडीच्या निर्मितीत केला जातो.
Forwarded from Deleted Account
पर्यावरणीय आपत्ती (Environmenthazards)

नैसर्गिक प्रक्रिया तसेच मानवी कृती यांमुळे सजीवांना अपायकारक ठरणाऱ्या आणि ठरू शकतील अशा घटना जैविक, रासायनिक, यांत्रिक, पर्यावरणीय अथवा प्राकृतिक कारकांपैकी कोणत्याही कारकामुळे मानव, इतर सजीव अथवा पर्यावरण यास अपायकारक व हानिकारक ठरणाऱ्या स्थितीस पर्यावरणीय आपत्ती म्हणतात. मानवी समाजाची किती प्रमाणात हानी होते, यानुसार पर्यावरणीय आपत्तीची तीव्रता ठरविली जाते. अशा स्थितीमुळे पर्यावरणाची गुणवत्ता ढासळते. पर्यावरण आपत्तीला कारणीभूत ठरणाऱ्या कारकांनुसार त्यांचे पुढील दोन प्रकारात वर्गीकरण केले जाते :

(१) नैसर्गिक आणि (२) मानवकृत.

नैसर्गिक आपत्तीमध्ये भौमिक 'अंतर्जात' आपत्ती आणि वातावरणीय अथवा बहिर्जात आपत्ती यांचा समावेश होतो. भौमिक आपत्तीस पृथ्वीचे अंतर्जात बल कारणीभूत ठरते. भूपृष्ठाखाली खोलवर ही घटना घडते. यात ज्वालामुखी उद्रेक, भूकंप आणि भूमिपात इत्यादींचा समावेश होतो. भूकवचाखालील औष्णिक स्थितीमुळे या घटना घडतात. त्यामुळे भूकवचाचा समतोल बिघडतो. या आपत्तीमुळे मानवी जीव व इतर सजीवांना मोठ्या प्रमाणात धोका पोहोचतो. मानवी वस्ती, धरणे, मालमत्ता इत्यादींची हानी होते. पर्यावरणाची गुणवत्ता घटते. या प्रकारच्या आपत्तींना प्रतिबंध घालता येत नाही. तसेच त्यांचे पूर्वव्यवस्थापन करता येत नाही. मात्र, काही वेळा विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या आधारे त्याबाबत पुर्वानुमान करता येते.

वातावरणीय आपत्ती सामान्यपणे हवा व हवामानाशी संबंधित असतात. वातावरणीय प्रक्रियांमुळे वातावरणात प्रचंड बदल होऊन वातावरणीय आपत्ती येते. परिणाम घडवून आणणारी कारके दृश्य स्वरूपात नसली तरी हवामानतज्ज्ञांमार्फत त्यांची उपकरणाद्वारे नोंद घेता येते. वातावरणीय आपत्तीचे दोन वर्ग केले जातात : (१) अपसामान्य घटना : यात चक्रीवादळे, विजा पडणे, गारांची वादळे, अग्नी इत्यादींचा समावेश होतो. अपसामान्य बहिर्जात आपत्तीमुळे वादळे होऊन सुपीक जमिनीत क्षार साठून ती ओसाड आणि पडीक होते, मानवाला आणि इतर सजीवांना धोका पोहोचतो. (२) संचयी वातावरणीय आपत्ती : यात पूर, अवर्षण, शीतवृष्टी, उष्णलहरी इत्यादींचा समावेश होतो. संचयी वातावरणीय आपत्तीमुळे (उदा., पूर, अवर्षण यांमुळे) मानवी जीवन, मालमत्ता तसेच नैसर्गिक पर्यावरण यांची हानी होते. अशा नैसर्गिक वातावरणीय आपत्तींचे वैज्ञानिक पुर्वानुमान करू शकतात. त्यामुळे सुरक्षेचे उपाय योजून अशा आपत्तींचे परिणाम टाळता येऊ शकतात. धरणे, जलाशय व निर्वनीकरण यांमुळेही काही वातावरणीय आपत्ती संभवतात. या मानवकृत आपत्ती आहेत. त्यासाठी पर्यावरण प्रभाव मूल्यांकनानुसार मानवी कृतींचे मूल्यमापन करणे गरजेचे असते.

मानवी कृतींमुळे पर्यावरणाची अवनती होते व मानवी समाजाची भरून काढता न येणारी हानी होते. मानवकृत पर्यावरण आपत्तींचे पुढीलप्रमाणे तीन वर्ग करता येतात ; (१) प्राकृतिक आपत्ती : यात मानवी कृतींमुळे घडून येणारे भूमिकंपन, भूमिपात, मृदाक्षरण इत्यादींचा समावेश होतो. (२) रासायनिक आपत्ती , यात विषारी रसायने आणि वायू, अणुस्फोट, सागर तेलगळती, वायुगळती इत्यादींमुळे उद्भवणाऱ्या आपत्तींचा समावेश होतो. (३) सामाजिक आपत्ती : यात लोकसंख्या विस्फोट, नैतिकता व धार्मिक मूल्यांची अवनती, रसायने व युद्धात जैविक अस्त्रांचा वापर, बहुमजली इमारतींची रचना इत्यादींमुळे उद्भवणाऱ्या आपत्तींचा समावेश होतो.

निरनिराळ्या पर्यावरणीय आपत्तींमुळे जी संकटे ओढवतात त्यांपासून संरक्षण व्हावे, पर्यावरण अवनती कमी व्हावी व मानवासह इतर सजीवांच्या जीवास धोका होणार नाही यासाठी मानवाने प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे. मानव स्वत: एक सामाजिक व नैसर्गिक पर्यावरणाचा महत्त्वाचा घटक आहे. या आपत्तींना सामोरे जाण्यासाठी तो सर्व तऱ्हेने सक्षम व्हावा, यासाठी विविध योजना शासकीय व अशासकीय स्तरावरील विविध संघटना, संस्थांमार्फत केल्या जातात. मागील काही वर्षांत पर्यावरणीय आपत्ती व्यवस्थापनाला विशेष महत्त्व आले आहे आणि पर्यावरणीय आपत्ती कशा टाळता येतील याकडे कल वाढत आहे. प्रदेश, राज्य, राष्ट्र यांच्या सीमांतर्गत व सीमाबाह्य क्षेत्रातदेखील आपत्तीग्रस्त स्थिती निवारण्याचे प्रयत्न वाढत आहेत.

पर्यावरणी आपत्ती व्यवस्थापनात समस्या निराकरण प्रक्रियेला महत्त्वाचे स्थान आहे. आपत्तीचा धोका ओळखणे, जोखमीचे मूल्यांकन व नियंत्रण करणे, त्यांचे मूल्यमापन करणे व त्याचा आढावा घेणे हा पर्यावरणी आपत्ती व्यवस्थापनाचा एक भाग आहे.
🐝 @BeePublication