MPSC Science
57.7K subscribers
8.64K photos
54 videos
366 files
735 links
Download Telegram
🌿पृष्ठभागीय ऊती :🌿

🌷वनस्पतींचा संपुर्ण पृष्ठभाग हा पृष्ठभागीय  उतींच्या थराने बनतो .

🌷या आपित्वाचीय पेशी सपाट असतात.

🌷हि ऊती वनस्पतीच्या सर्व भागांचे संरक्षण करते.

🌷निवडूंगासारख्या वनस्पतींचे बाह्य आवरण हे जाडसर असते.

🌷बाह्य आवरणातील पेशी नेहमी मेणासारखा पदार्थ स्त्रवत असतात. त्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन रोखले जाते.

🌷वातावरणा बरोबर वायूंचे देवाणघेवाण करण्यासाठी पानांच्या बाह्य आवरणाला सूक्ष्मछिद्रे असतात . त्यांना पर्णरंध्रे  असे म्हणतात.

🌷पर्णरंध्रा भोवती घेवड्याच्या आकाराच्या दोन रक्षक पेशी असतात. त्या पर्णरंध्राची उगढझाप नियंत्रित करतात.

🌷पर्णरंध्रा मधून बाष्पउत्सर्जन होते.
🌿जटील स्थायी ऊती 🌿:

🍃जटील स्थायी ऊती मधील पेशींमध्ये एकमेकांत समन्वय असतो.

🍃संवहणी ऊती हि जटील ऊती आहे . मुले, खोड , पाने यामध्ये हि असते . ती पाणी व अन्न यांचे वहन करते.

🍃मूळ,खोड व पानातील संवाहणी ऊती एकमेकांशी जोडलेल्या असतात. संवाहणी ऊती हे उच्च स्तरीय वनस्पतींचे महत्त्वाचे कार्य आहे.

🍃जलवाहिनी व रसवहिनि  हि संवाहिनी ऊती ची उदाहरणे आहेत.
🍂जलवाहिनी :🍂

🍁पेशीभित्तिका जाड असून बहुतेक पेशी मृत असतात.

🍁त्यांचे मुखेत्वे खालील प्रकार पडतात.

🍁वाहिनिका: या पेशी मृत झाल्यावर त्यांच्यातील पेशिद्रव्याचे विघटन होते. त्यानंतर तयार झालेल्या पोकळ जाळ्यातून पाण्याचे वहन होऊ शकते.

🍁वाहिन्या : वाहिनिका पेक्षा रुंद असतात. पाणी व क्षार यांचे वहन  होते.

🍁जलवाहिनी : ऊती अन्न साठवते.

🍁जलवाहिनी तंतू : मजबुती देतात.

🍁रसवहिनी : या चार प्रकारच्या पेशीपासून बनलेल्या आहेत.

🍁चलन नलिका : सच्छिद्र  पटल असते.
🍁रसवहिनी : या चार प्रकारच्या पेशीपासून बनलेल्या आहेत.

🍁चलन नलिका : सच्छिद्र  पटल असते.

🍁सहपेशी : या चाळण नलिके भोवती असतात .तिच्या कार्यावर नियंत्रण ठेवतात.

🍁रसवाहिनी तंतू :मुखेत्वे खोडात असून वनस्पतींना मजबुती देतात.

🍁रसवाहिनी मुलऊती : इतर सर्व प्रकारच्या पेशींना एकत्र ठेवण्यचे काम या पेशी करतात.रसवाहिन्या अन्नाचे वहन करतात.पानाकडून शर्करा व अमिनोम्लाचे वनस्पतींच्य खोड व मुळाकडे वहन करतात.
🌿प्राणी ऊती :🌿

🍀 ऊती :🍀

प्राण्यांच्या शरीरामध्ये अनेक प्रकारचे अवयव समन्वयाने काम करीत असतात.

स्नायूपेशी या तंतूरुपात असतात.त्या त्यांची लांबी बदलू शकतात.स्नायू हे उतीचे उदाहरण आहे.

ऑक्सिजन आणि पोषद्राव्याचे सर्व पेशींकडे वाहन करणारे रक्त सुद्धा उतीचे उदाहरण आहे.

प्राणी उतीची अभिस्तर ऊती , संयोजी ऊती , स्नायू ऊती ,चेता ऊती, या प्रमाणे वर्गीकरण केले आहे.

प्राणी शरीरातील बाह्य आणि संरक्षक आवरण अभिस्तर ऊती पासून बनलेले असतात.
शरीरातील इंद्रियसंस्था वेगवेगळी ठेवण्याचे कार्य अभिस्तर ऊती करते.

रक्तवाहिन्या मधील स्तर , फुफुसातील वायुकोश , अन्ननलिका व तोंडातील आतील स्र्तारात सरल पट्टकि अभिस्तर ऊती आढळतात.

आतड्यातील आतील स्तरात स्तंभीय अभिस्तर ऊती असतात .त्यांच्यामार्फत पाचक रस स्त्रवले जातात.

श्वसन मार्गामध्ये रोमक स्तंभीय अभिस्तर असते.

वृक्कनालीकांचाआतील सतार, लाळग्रंथींच्या नलिका यामध्ये घनाभरूप अभिस्तर ऊती असतात.

त्वाचे मधून घाम , तैलद्रव्य , श्लेष्मल पदार्थ इ.स्त्रावण्याचे कार्य ग्रंथील अभिस्तर ऊती मार्फत केले जाते.
🍁संयोजी ऊती :🍁

🌿संयोजी ऊतीमध्ये अधारक असते आणि त्या आधारकामध्ये पेशी रुतलेल्या असतात . अधारक हे जेली सारखे द्रवरूप दाट किंवा दृढ असते.

संयोजी उतींचे प्रकार पुढीलप्रमाणे :

🍃अस्थी: स्नायूंना घट्ट धरून ठेवतात.मुख्य अवयवांना आधार देतात.

🍃रक्त: हे द्रवरूप संयोजी ऊती आहे. यामध्ये लोहित रक्त कणिका , श्वेतरक्तकणिका आणि रक्तपट्टीका,असतात.रक्तद्रवात प्रथिने , क्षार , संप्रेरके असून शरीराच्या विविध भागाकडे वायू , पोषकद्रव्य व संप्रेरके यांचे वहन केले जाते.
🍃अस्थीबंध: यामुळे दोन हाडे जोडली जातात. लवचिक आणि मजबूत असतो.

🍃स्नायुरज्जू: यांच्याद्वारे स्नायू हाडांशी जोडले जातात. तंतुमय ,मजबूत परंतु कमी लवचिक असतात. नेत्रागोलास त्याच्या भोवतालच्या हाडासी जोडतात.

🍃कास्थी: कास्थीमुळे हाडाच्या संध्याच्या ठिकाणी नरमपणा येतो. या पेशी नाक , कान, श्वास नलिका , स्वरयंत्रातील पोकळी यामध्ये आढळतात.

🍃विरळ ऊती: त्वचा व स्नायू यांच्या दरम्यान, रक्तवाहिनिच्या भोवताली , चेतातंतू व अस्थिमज्जेत आढळतात.
🌾स्नायू ऊती :🌾

🌷स्नायू ऊती या स्नायूतंतुच्या लांब पेशी पासून बनलेल्या असतात.

🌷स्नायूंमध्ये असणारे 'संकोची प्रथिन' द्वारे स्नायूंची हालचाल होते.

🌷ज्या स्नायुद्वारे आपल्या शरीराच्या हालचालीवर आपल्या मनाप्रमाणे नियंत्रण ठेवता येते त्यास ऐच्छिक स्नायू असे म्हणतात.

🌷या पेशी मधील पेशी लांब,दंडगोलाकार,अशाखीय ,बहुकेंद्रकीय असतात.

🌷ऐच्छिक स्नायुंना कंकाल स्नायू किंवा पट्टकि स्नायू असे देखील म्हणतात.
🌿चेताऊती :🌿

मेंदू,चेतारज्जू,चेतातंतू हे सर्व चेता उतींनी बनलेले असतात.

या उतीतील पेशींना चेतापेशी  असे म्हणतात. चेतापेशीमध्ये केंद्रक व पेशीद्र्व्य असते.पेशीद्रव्यातून लांब , केसासारखे बारीक तंतू निघतात त्यास अक्षतंतू  म्हणतात.

एखाद्या चेतापेशीची लांबी एक मीटर इतकीही असू शकते.

अनेक चेता तंतू संयोजी उतीद्वारे एकत्र येऊन चेता तयार करतात.

या ऊती चेतना ग्रहण करतात आणि या चेतना अत्यंत जलद गतीने शरीरातील एका भागाकडून दुसऱ्या भागाकडे वहन करतात.
🌸जडत्व :🌸

वस्तूची स्थिर अथवा गतिमान अवस्थेतील बदलाला विरोध करण्याची प्रवृत्ती म्हणजे जडत्व होय.

जेव्हा एखाद्या स्थिर अवस्थेतील वस्तूवर कोणतेही बाह्यबल प्रयुक्त नसेल तर ती वस्तु स्थिर अवस्थेतच राहते. तसेच गतिमान वस्तु आहे त्याच वेगाने सतत गतिमान राहते
जडत्वाचे प्रकार :

🌿1. विराम अवस्थेतील जडत्व :

वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे ती विराम अवस्थेत बदल करू शकत नाही, त्यास विराम अवस्थेतील जडत्व असे म्हणतात.

उदा. बस अचानक सुरू होते तेव्हा प्रवाशांना मागच्या दिशेला धक्का बसतो.
🌿2. गतीचे जडत्व :

वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे गतिमान अवस्थेत बदल होवू शकत नाही त्यास गतीचे जडत्व म्हणतात.

उदा. चालत्या बसमधून उतरणारा प्रवासी पुढच्या दिशेने पडतो.
🌿3. दिशेचे जडत्व :

वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे ती आपल्या गतीची दिशा बदलू शकत नाही यास दिशेचे जडत्व म्हणतात.

उदा. चाकूला धार करतांना धार लावण्याच्या चाकांच्या स्पर्शरेषेवरून ठिणग्या उडताना दिसतात.
🌿न्यूटनचे गतीविषयक नियम :🌿

🌷पहिला नियम :

'जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्यरत नसेल तर तिच्या विराम अवस्थेत किंवा सरल रेषेतील एकसमान गतीमध्ये सातत्य राहते'.

यालाच 'जडत्वाचा नियम' असे म्हणतात.

उदा. बस अचानक सुरू होते तेव्हा प्रवाशांना मागच्या दिशेला धक्का बसतो.