MPSC Science
57.7K subscribers
8.64K photos
54 videos
366 files
735 links
Download Telegram
आम्ले व आम्लारी
आम्ले व आम्लारी
601)खालीलपैकी कोणता धातू सर्वात हलका धातू म्हणून ओळखले होते?
Anonymous Quiz
39%
1)लिथिऊम
36%
2)पारा
17%
3)शिसे
8%
4)कथिल
604)सपाट अरश्याची वक्रता त्रिज्या ही
Anonymous Quiz
36%
1) 0 असते
37%
2)अनंत असते
22%
3) 0 ते अनंत यातील कोणतेही
4%
4)यापैकी नाही
605)एकाद्या माध्यमाचे तापमान वाढवले असता त्यातील प्रकाशाचा वेग
Anonymous Quiz
46%
1) वाढतो
24%
2)कमी होतो
18%
3)तेवढाच राहतो
12%
4)माध्यमावर अवलंबून असतो
🌾🌾उष्णतेची एकके (Units of Heat)  :🌾🌾

·    🌿     CGS आणि MKS पद्धतीमध्ये उष्णता वेगवेगळ्या एककामध्ये मोजतात.

·     🌿    MKS पद्धतीमध्ये उष्णता तापमान 14.50C ते 15.50C ने वाढविण्यासाठी लागणार्‍या उष्णतेस 1 Kcal उष्णता म्हणतात.

·      🌿   CGS पद्धतीमध्ये उष्णता कॅलरीमध्ये मोजतात.

·   🌿      एक ग्रॅम पाण्याचे तापमान 14.50C ते 15.50C पर्यंत 10C ने वाढविण्यासाठी लागणार्‍या उष्णतेस एक कॅलरी उष्णता असे म्हणतात. 

·       🌷  1 कॅलरी = 4.18 ज्यूल. 
🍁 विशिष्टउष्मा धारकता (Specific Heat Capacity) :🍁

·    🍀     विशिष्ट उष्माधारकता 'C' या चिन्हाने दर्शवितात.

·     🍀    विशिष्ट उष्माधारकतेचे MKS पद्धतीत एकक Kcal/kg0C हे आहे.

·      🌿   CGS पद्धतीत त्याचे एकक Cal/g0 हे आहे.

·     🌿    एक ग्रॅम वस्तुमान असलेल्या वेगवेगळ्या पदार्थातील वाढणारे तापमान समान नसते.

·       🌿  एकक वस्तुमानाच्या पदार्थाचे तापमान 10C ने वाढविण्यासाठी लागणारी उष्णता म्हणजे त्या पदार्थाची 'विशिष्ट उष्माधारकता' होय.

·       🍀  काही पदार्थाच्या विशिष्ट उष्माधारकता पुढीलप्रमाणे आहेत.
🌿दाब बद्दल संपूर्ण माहिती🌿

·       🍀  अणकुचीदार खिळा हातोडीने लाकडामध्ये ठोकल्यास सहज ठोकला जातो. परंतु खिळा बोथट असेल तर तो लाकडात सहज जात नाही.

·    🍀     खिळ्याच्या डोक्यावर हतोड्याच्या सहाय्याने लावलेले बल खिळ्याच्या टोकाकडे संक्रमित होते. अणकुचीदार खिळ्याच्या टोकाजवळचे क्षेत्रफळ किमान असल्यामुळे टोकाकडे बलाचा परिणाम सर्वाधिक होते व खिळा लवकर लाकडात ठोकला जातो.

·     🍀    बोथट खिळ्याच्या टोकाकडील क्षेत्रफळ विभागले जाऊन त्याचा टोकाकडील परिणाम कमी होतो. म्हणून तो लवकर लाकडात जात नाही.

·     🍀    यावरून दोन्ही खिळ्यावरचे बल समान असले तरीही त्याचा परिणाम टोकाकडील क्षेत्रफळानुसार भिन्न असतो.

·     🍀    लाकडी चौकटीमध्ये स्क्रू बसवताना पेचकस स्क्रुला लंब ठेवून पेचकसवर बल लावले जाते. पेचकस स्क्रुला लंब नसल्यास लावलेल्या बलाच्या मानाने कमी परिणाम दिसतो.
🌿🌿प्लावक बल (Buoyant Force)  :🌿🌿

·         बोटांनी दाबून पाण्याच्या तळाशी नेलेला लाकडी ठोकळा बोट काढताच उसळी मारून पाण्याच्या पृष्ठभागाशी येतो.

·         पाण्यात बुडलेला असल्याने ठोकळ्यावर कार्य करणारे पाण्याचे बल ठोकळ्याला वर ढकलते.

·         द्रवात बुडलेल्या वस्तूला वर ढकलणार्यार बलाला प्लावी बल असे म्हणतात. प्लावी बलालाच प्लावक बल किंवा उत्प्रनोद असेही म्हणतात.

·         द्रवात बूडालेल्या वस्तूचे आकारमान जास्त असल्यास प्लावक बल अधिक असते.

·         द्र्वाची घनता जास्त असल्यास प्लावक बल अधिक असते.

·         द्र्वामध्ये एखादा पदार्थ तरंगणार की बुडणार हे प्लावाकबल ठरविते. प्लावक बल वस्तूच्या वजनापेक्षा जास्त असल्यास वस्तु तरंगते. 

प्लावक बल वस्तूच्या वजनापेक्षा कमी असल्यास वस्तु बुडते. प्लावक बल वस्तूच्या वजना इतके असल्यास वस्तु द्रवाच्या आतमध्ये तरंगते.