MPSC Science
66.8K subscribers
8.6K photos
54 videos
356 files
717 links
Download Telegram
🔹वसुंधरेचा " अलार्म कॉल '

पृथ्वीच्या विनाशास कारणीभूत ठरणाऱ्या तापमानवाढीस मानवी हस्तक्षेपच निश्चितपणे जबाबदार आहे , हे संशोधनातून वारंवार सिद्ध झाले आहे . जगभरातील संशोधक हे वारंवार कानी- कपाळी ओरडून सांगत आहेत. बस्स झालं ! विकास आणि प्रगतीच्या अधिपत्याखाली गेली 200 वर्षे निसर्गावर तुम्ही अमर्याद सत्ता गाजविली . विजय मिळवलात . आता त्याला ठार मारू नका ! ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेट चेंज हा विषय सहज घेण्यासारखा राहिला नाही , तर तो आता जगभरातील प्रत्येकाच्या घराघराला जाऊन भिडला आहे . दुष्काळ , पूर , रोगराई या माध्यमांतून त्याचे दुष्परिणाम तो भोगत आहे . असे असताना मात्र अलीकडे " क्लायमेट चेंज ' हा आंतराराष्ट्रीय पातळीवर परराष्ट्र धोरणातील वादाचा मुद्दा बनत चालला आहे . संपूर्ण मानवजातीचे भवितव्य व कल्याण यात दडले असताना हे दुर्दैवी आणि चिंताजनक आहे .

अमेरिकेसारखे विकसित देश याची जबाबदारी भारत , चीनन , ब्राझीलसारख्या विकसनशीलसारख्या देशांवर ढकलत आहेत. याउलट मागील दोनशे वर्षांतील प्रदूषणाच्या " कर्तृत्वा' ची जबाबदारी विकसित देशांनी घ्यावी . ग्लोबल वॉर्मिंग हे विकसित देशांचे अपत्य आहे . त्यांनीच कार्बन उर्त्सजनात अधिक कपात केली पाहिजे, अशी भूमिका विकसनशील राष्ट्र घेत आहेत. राष्ट्राराष्ट्रांमधील अंगुलीदर्शकाचा खेळ थांबविण्याची ही वेळ आहे .

मुळात विकासाची भूक अमर्याद असते . ऊर्जेचा कमी वापर करून कुठलेच राष्ट्र आपली प्रगती थांबविण्याचा मुर्खपणा करणार नाही . जागतिक स्पर्धेत मानवजातीच्या कल्याणापेक्षा प्रतिस्पर्धी राष्ट्रांवर अंकुश ठेवण्यासाठी आणि कुरघोड्या करण्यासाठी प्रगती हवी असते . हे जरी खरे असले तरी अलीकडच्या काही वर्षांमध्ये निसर्ग धोक्याची घंटा देत आहे , याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. पृथ्वी तापत आहे . ती आणखी तापत चालली आहे . यंदाच्या वर्षी तिने " अलार्म कॉल ' दिला . सन 2016 ची नोंद " हॉटेस्ट इअर ' सर्वाधिक तापमानाचे वर्ष म्हणून होत आहे . ही वाटचाल धोक्याच्या पातळीकडे निघाली आहे , हे मात्र निश्चित . परिणामी आज ना उद्या या ग्रहावरून आपले बस्तान उठवावे लागेल , यासाठी दुसरे एखादे घर शोधावे लागेल . नव्हे दुसरं घर शोधणं सुरू झाले आहे . ग्रहशोधकार्यचे सूतोवाच ज्येष्ठ संशोधक हॉकिन्स यांनी नुकतेच केले आहे .

मी सांगेल तो अंतिम शब्द याचं स्मरण वसुंधरेने करून दिले आहे . या सर्व नैसर्गिक उलथापालथीच्या पाश्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पॅरीस करार धुडकावण्याची धमकी दिली . जागतिक तापमानवाढ दोन अंश सेल्सिअसपर्यंत रोखण्याचा करार पॅरीस येथील हवामान परिषदेत गेल्यावर्षी करण्यात आला . जीवाश्म इंथनासारखे स्वस्त इंथन वापरणाऱ्या देशांनी स्वच्छ ऊर्जेचा मार्ग अनुसरण्यासाठी सन 2020 पासून त्यांना 10 अब्ज डॉलर्स मदतीची तरतूदही करण्यात आली . भारत -चीनसारखे देश प्रदूषण वाढवत आहेत, असा तक्रारीचा सूर काढत विकसित देश आपली जबाबदारी विकसनशील देशांवर ढकलत असल्याचे चित्र दिसत आहे .

अध्यक्ष ट्रम्प यांनी तर अप्रत्यक्ष मार्गने असे सुचविले आहे , की अमेरिकेने आपले आर्थिक संसाधन क्लायमेट चेंजसारख्या समस्येवर वाया घालविण्याऐवजी ते शुद्ध पाणी, अन्नधान्य उत्पादनातील वाढ व रोगराई निवारण यांसारख्या विषयांवर खर्च करावे , ही विसंवादाची भाषा आहे .

सारांश क्लायमेंट चेंजने किंवा वातावरणातील बदलाने आता सर्वांनाच स्पर्श केला आहे , हे विसरून चालणार नाही . वास्तव हे आहे , की क्लायमेंट चेंज हा राष्ट्रांच्या सीमा पाहत नाही . समोर कोण आहे ते पाहत नाही ; मग तो गरीब असेल अथवा श्रीमंत. ट्रम्प आहेत की पुतीन , झिंपिंग आहेत की मोदी . वास्तविक हे जागतिक आव्हान आहे . त्याला परतवण्यासाठी गरज आहे ती जागतिक दृढ ऐक्याची!
#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹स्वदेशी बनावटीच्या पृथ्वी २ चे यशस्वी प्रक्षेपण; अण्वस्त्रे वाहून नेण्यास सक्षम

ओडिशातील बालासोर जिल्ह्यातील चांदीपूरहून पृथ्वी २ क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण झाले. सकाळी ९.३५ वाजता एकीकृत परीक्षण केंद्रातील परिसर ३ येथील मोबाईल लाँचरवरुन या क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण केले. पृथ्वी २ ला दोन इंजिने आहेत. द्रवरुप इंधनावरही हे क्षेपणास्त्र चालते. तसेच यामध्ये ५०० ते १००० किलो स्फोटके वाहून नेण्याची क्षमता आहे.

पृथ्वी २ मध्ये जमिनीवरुन जमिनीवर ३५० किलोमीटरपर्यंतच्या टप्प्यात अचूक मारा करण्याची क्षमता आहे. आजची चाचणी यशस्वी झाल्याचे डीआरडीओने सांगितले. यापूर्वी १२ ऑक्टोबर २००९ ला पृथ्वी २ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली होती. पृथ्वी २ क्षेपणास्त्र २००३ मध्ये सैन्यात दाखल झाले असून, नऊ मीटर लांबीचे एकाच टप्प्यात थेट लक्ष्यभेद करण्याची क्षमता असलेले अतिशय प्रभावी स्वदेशी बनावटीचे क्षेपणास्त्र आहे.
देशातील सर्वात मोठ्या द्रुतगती महामार्गावर उतरली लढाऊ विमाने…
#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹देशातील सर्वात मोठ्या द्रुतगती महामार्गावर उतरली लढाऊ विमाने…

देशातील सर्वात मोठ्या आणि आगरा लखनऊ द्रुतगती महामार्गावर हवाई दलाच्या मिराज २००० चे प्रात्यक्षिक पाहायला मिळाले. उत्तरप्रदेशमधील नव्या महामार्गच्या लोकार्पण सोहळ्यापूर्वी लढाऊ विमाने महामार्गावर उतरुन पुन्हा उड्डाण करताना दिसली. या महामार्गावरील बांगरमऊ आणि गंज-मुरादाबाद दरम्यान तीन किलोमीटरच्या पट्टा हा हवाई दलाच्या लढाऊ विमानांच्या उड्डाण आणि लॅडिगसाठी निवडण्यात आला आहे. हवाई दलातील कोणकोणती विमाने या ठिकाणाहून उड्डाण करतील याबाबत अद्याप कोणतीही सविस्तर माहिती उपलब्ध नाही.

देशातील सर्वात मोठ्या महामार्गासाठी १५ हजार कोटी इतका खर्च करण्यात आला असून या महामार्गाचे काम २३ महिन्यामध्ये पूर्ण करुन कमी कालावधीत हा महामार्ग उभारला असल्याचा दावा उत्तरप्रदेश सरकारने केला आहे. आगरा ते लखनऊ या दोन शहरांना जोडणाऱ्या महामार्ग फिरोजाबाद -मैनपूरी- इटावा- ओरिया- कन्नोज -हरदोई- कानपूर -उन्नाव या शहरातून लखनऊ ला जोडला जाईल. या महामार्गामुळे आगरा -लखनऊ या दोन शहराच्या दरम्यानचे ३०२ किलोमीटर अंतर पार करण्यासाठी लागणारा ५ ते ६ तासांच्या वेळ कमी होऊन हे अंतर कमी वेळात पार करणे शक्य होणार आहे.

यापूर्वी मागील वर्षी भारतीय हवाईदलाने मथुरा जवळच्या राया गावत यमुना महामार्गावर लढाऊ विमान उतरविले होते. युद्दपरिस्थितीमध्ये देशातील किती महामार्ग लढाऊ विमाने उतरविण्यासाठी उपयोगात आणता येऊ शकतात. याची चाचणी म्हणून हवाई दलाने या महामार्गावर देखील मिराज-२००० विमान उतरविण्यात आले होते.
#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹सौर ऊर्जा क्षमता 10 गिगावॅटवर

छतावरील आणि ऑफ-ग्रिड प्रकारातील सोलर पॅनेलमुळे देशातील सौर ऊर्जा निर्मिती 10 गिगावॅटवर पोहोचली आहे. या वर्षात 5.1 गिगावॅट वीजनिर्मिती सौर क्षेत्रातून करण्यात येईल अशी अपेक्षा आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत या वर्षी 137 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे, असे ब्रिज टु इंडिया या संस्थेने म्हटले आहे.

पुढील वर्षापासून देशातील वार्षिक ऊर्जा निर्मिती 8 ते 10 गिगावॅट सरासरीने वाढण्याची शक्यता आहे. सरकारकडून या क्षेत्राला समर्थन मिळाल्याने आणि क्षेत्रात स्पर्धा वाढल्याने किमतीत गेल्या दोन वर्षात चांगली वाढ झाली आहे. चीन आणि अमेरिका या दोन देशानंतर भारत जगातील तिसरी बाजारपेठ पुढील वर्षी बनण्याची शक्यता आहे. गेल्या पाच वर्षात 10 गिगावॅट सौर ऊर्जेची निर्मिती करण्यास आपण यशस्वी ठरलो, तर पुढील पाच वर्षात 100 गिगावॅटचा टप्पा पार करता येईल का असे अनेकांकडून विचारण्यात येत आहे. मात्र हा मैलाचा दगड असेल असे संस्थेची व्यवस्थापकीय संचालक विनय रुस्तगी यांनी सांगितले.

उदय या योजनांमुळे देशातील कमी विक्रीच्या ठिकाणी मागणी मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. यामुळे कमी वेळात सकारात्मक निकाल दिसून आला. सध्या 17 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी यामध्ये सहभाग घेतला आहे. सर्वात जास्त तामिळनाडू या राज्यात सौर ऊर्जेचा वापर मोठय़ा प्रमाणात करण्यात येत आहे. यानंतर राजस्थान, आंध्र प्रदेश, गुजरात, तेलंगणा, मध्य प्रदेश आणि पंजाब या राज्यांचा क्रमांक लागतो. या सात राज्यांतून एकूण सौर ऊर्जेमध्ये 80 टक्के हिस्सा आहे. मात्र महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश यासारख्या ऊर्जेचा मोठया प्रमाणात वापर करणारी राज्ये अजूनही वापरात मागे पडत आहेत.
Forwarded from DDNewsLive
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
DDNewsLive (Facebook)
#Health: #BrainTumors के लक्षण, कारण और उपचार
#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹आकाशगंगेच्या प्रभामंडळात फिकट दीर्घिकेचा शोध

आकाशगंगेच्या प्रभामंडळात असलेली बटू उपदीर्घिका सापडली असून ती सर्वात फिकट आहे. त्यातून दीर्घिकांची निर्मिती व कृष्णद्रव्याचे अवकाशातील विखुरणे याबाबत नवीन माहिती मिळणार आहे. या बटू उपदीर्घिकेचे नाव व्हिरगो १ असून ती कन्या तारकासमूहात आहे. जपानच्या टोहोकू विद्यापीठाच्या संशोधकांनी ही दीर्घिका शोधली असून आकाशगंगेच्या प्रभामंडळात अशा अनेक फिकट उपदीर्घिका असू शकतात असे त्यांचे मत आहे. सध्या अशा ५० उपदीर्घिका शोधण्यात आलेल्या असून त्यातील ४० फिकट व ड्वार्फ स्फेरॉइडल गॅलेक्सिज प्रकारातील आहेत. त्यातील अनेक दीर्घिका अलीकडे शोधल्या असून त्यांची प्रकाशमानता उणे ८ आहे. यापूर्वी २.५ ते ४ मीटर व्यासाच्या दुर्बिणीतून दीर्घिका शोधण्यात आल्या आहेत, त्यामुळे जास्त प्रकाशमान दीर्घिका शोधल्या गेल्या आहेत. दूरच्या व कमी प्रकाशमान दीर्घिका यात शोधण्यात आल्या नव्हत्या. आता ८.२ मीटर सुबारू दुर्बीण व हायपर सुप्राइम कॅम उपकरणाने शोध घेतला असता फिकट व बटू दीर्घिका सापडत आहेत. या दोन्ही उपकरणांची माहिती तपासून पाहिली असता कन्या तारकासमूहात जास्त घनतेचे तारे दिसले होते, ते प्राचीन तारका प्रणालीचे निदर्शक आहेत, असे टोहोकू विद्यापीठाचे डायसुक होमा यांनी सांगितले. आता शोधण्यात आलेली दीर्घिका ही फिकट असून तिची प्रकाशमानता उणे ०.८ आहे. होमा यांना व्हिर्गो १ दीर्घिका मसाशी छिबा यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षण करताना सापडली आहे. तिची त्रिज्या १२४ प्रकाशवर्षे आहे. यापूर्वी सेग्यू १ ही फिकट म्हणजे कमी प्रकाशमान दीर्घिका स्लोन डिजिटल स्काय सव्र्हेत, तर सेटस २ दीर्घिका डार्क एनर्जी सव्र्हेत सापडली होती. सेटस २ या दीर्घिकेच्या शोधावर अजून शिक्कामोर्तब होणे बाकी आहे. व्हिर्गो १ ही आतापर्यंत शोधलेली सर्वात फिकट दीर्घिका असून ती सूर्यापासून २ लाख ८० हजार प्रकाशवर्षे दूर आहे. आकाशगंगेच्या प्रभामंडळात अनेक फिकट दीर्घिका असू शकतात, असे छिबा यांनी म्हटले आहे.