MPSC Science
66.8K subscribers
8.6K photos
54 videos
356 files
717 links
Download Telegram
वातावरणीय दाब :

· पृथ्वीभोवती हवेचे एक जाड आवरण आहे. त्यालाच वातावरण असे म्हणतात.

· पृथ्वीवर आणि पृथ्वीवरील सर्व पदार्थांवर हवेचा दाब असतो. त्याला 'वातावरणीय दाब' असे म्हणतात.

· पृथ्वीच्या एकक क्षेत्रफळावर पडणार्यार हवेच्या स्तंभाच्या वजनाला त्या ठिकाणचा वातावरणीय दाब म्हणतात.

· हवेचा दाब दर्शविणार्याव उपकरणाला साधा हवा दाबमापी म्हणतात.

· समुद्रसपाटीवर हवादाबमापीच्या नळीमधील पार्या ची उंची 760 मीमी. असते. म्हणजेच समुद्रसपाटीवर हवेचा दाब 760 मीमी.

· समुद्रसपाटीवरील हवेचा दाब प्रमाणदाब मानला जातो. तो 1 वातावरणदाब म्हणून गणला जातो.

· 760 मी मी. पार्यारच्या स्तंभाच्या वजनावरून समुद्रसपाटीवरील हवेचा दाब 101400 N/m2 एवढा भरतो.

· समुद्रसपाटीवरून जसजसे वर जावे तसतसे त्या जागेवरील हवेच्या स्तंभाची उंची कमी होते. त्यामुळे हवेचा दाब कमी होतो.

· खूप उंचावर गेले की हवेचा दाब कमी झाल्याने दोन दाबातील फरक वाढतो. त्यामुळे नाकातील रक्तवाहिन्या फुटून रक्तस्त्राव होण्याची शक्यता असते.

· ढोबळमानाने पाहिल्यास समुद्रसपाटीवरील हवेत समान दाबाचे आडवे पट्टेच तयार झाल्याचे दिसून येते.

· समुद्रसपाटीवर विषुववृत्ताजवळचा प्रदेश हा कमी वातावरणीय दाबाचा पट्टा आहे.

· 300 उत्तर आणि 300 दक्षिण या अक्षवृत्ताजवळ अधिक दाबाचे, तर आर्क्टिक आणि अंटार्क्टिक ध्रुवाजवळ कमी दाबाचे पट्टे आहेत.

· उत्तर दक्षिण ध्रुवाजवळ अधिक दाबाचे प्रदेश आहेत.

· तापमान बदलाबरोबरच हवेचा दाबही कमी जास्त होतो. जमीन सूर्याच्या उष्णतेने तापली की तेथील हवा तापून प्रसरण पावते. ती वरवर जाते. आजूबाजूला पसरते. तेथे हवेचा दाब कमी होतो. याउलट रात्री जमीन थंड झाल्यावर हवेचा दाब पारत वाढतो.

· दुपारी जमीनीवरील हवेचा दाब पाण्यावरच्या हवेच्या दाबापेक्षा कमी होतो. त्यामुळे समुद्राकडून जमिनीकडे खारे वारे वाहतात.

· सूर्यास्तानंतर जमीन लवकर थंड होतो. त्यामानाने समुद्रावरील हवा उष्ण राहते. म्हणून रात्री जमीनीवरील हवेचा दाब अधिक होतो. त्यामुळे मतलई वारे जमीनिकडून समुद्राकडे वाहतात.
Forwarded from MPSC Science
सामान्य विज्ञान इयत्ता 8 वी शॉर्ट नोट्स :

सूर्य हा एक तारा असून त्या भोवती पृथ्वीसहित आठ ग्रह फिरतात.

 चंद्र हा पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे.
 प्रत्येक दिवशी चंद्रोदय आदल्या दिवसापेक्षा सुमारे ५० मिनिटे उशिरा होतो.
 चंद्राला पृथ्वीभोवती एक परिभ्रमण करण्यास २७.३ दिवस लागतात.
 एका अमावस्येपासुन दुसर्‍या आमवस्येपर्यंतचा काळ २९.५ दिवसांचा असतो.

 एकूण ८८ तारकासमूह मानले जातात. त्यातील ३७ तारकासमूह उत्तर खगोलीय तर ५१ तारकासमूह दक्षिण खगोलीय आहेत.

 प्राचीन भारतीय खगोल अभ्यासकांनी २७ नक्षत्रांची कल्पना केली आहे.

 प्लूटो आणि त्याच्यासारख्या इतर खगोलीय वस्तूंना आता बटुग्रह म्हणून ओळखतात.

 बुधाचा परिभ्रमणकाळ फक्त ८८ दिवस तर नेपच्यूनचा सुमारे १४६ वर्षे इतका मोठा असतो.
  बुध हा सूर्याचा सगळ्यात जवळचा आणि सगळ्यात लहान ग्रह आहे.
 पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह म्हणजे शुक्र. त्याला पहाटतारा म्हणतात.

 पृथ्वीच्या कक्षेत असलेल्या बुध आणि शुक्र यांना अंतर्ग्रह, तर कक्षेबाहेरील ग्रहांना बाह्यग्रह म्हणतात.
 मंगळ हा पहिला बाह्यग्रह आहे.

  सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह म्हणजे गुरु
 गुरूला एकूण ६३ उपग्रह आहेत.
 शनि या ग्रहाची घनता पाण्यापेक्षा कमी आहे.

 शुक्राप्रमाणे युरेनस देखील पूर्वेकडून पश्चिमेकडे स्वत: भोवती परिवलन करतो.

 धूमकेतूचे पुच्छ सूर्याच्या विरुद्ध बाजूने असते.
 हॅले हा धूमकेतू ७६ वर्षानी दिसतो. आता २०६० मध्ये दिसेल.

 भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट १९ एप्रिल १९७५ रोजी सोडण्यात आला.
 त्यानंतर इन्सॅट, आय.आर.एस., कल्पना - १, एज्युसॅट, भास्कर, इ. उपग्रह आपण अवकाशात सोडले आहेत.
 ‘इस्त्रो’ या संस्थेमार्फत आतापर्यंत २१ उपग्रह सोडण्यात आले.

 GMRT म्हणजे जयंट मिटेरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप.
टाटा इन्सिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR) ने ती खोडद येथे बसविली.

 आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे धोक्यात आलेल्या वनस्पती व अन्य वन्य प्राणी यांच्या संरक्षणासाठीचा करार १९७५ पासून अंमलात आला आहे.

जैवविविधतेच्या संरक्षणासाठी ब्राझील रिओ-द-जनिरो येथे झालेल्या १९९२ च्या वसुंधरा परिषदेत जैववैविध्य करारावर सह्या करण्यात आल्या.

  ५ मार्च १८७२ रोजी जॉर्ज वेस्टिंग हाऊस या संशोधकाने रेल्वेसाठी एअर ब्रेक प्रथम वापरले.

 चुंबकाकडे लोह, निकेल, कोबाल्ट या धातूंचे तुकडे आकर्षित होतात.

 मोकळ्या टांगलेल्या स्थितीमध्ये दक्षिणोत्तर स्थिर राहणे, हे चुंबकाचे वैशिष्ट आहे.

 इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्युट्रॉन हे अनुतील मूलकण आहेत.
 अणूच्या केंद्रकात प्रोटॉन आणि न्युट्रॉन असतात. अणूच्या केंद्रकाभोवती इलेक्ट्रॉन परिभ्रमण करतात.
  प्रोटॉन धनप्रभारीत, इलेक्ट्रॉन ऋण प्रभारीत तर न्युट्रॉनवर कोणताच प्रभार नसतो.
 अणुक्रमांक (Z) म्हणजेच अणुतील इलेक्ट्रॉन किंवा प्रोटॉनची संख्या.
 अनुवस्तुमानांक म्हणजे अणुतील प्रोटॉन आणि न्युट्रॉन यांच्या संख्याची बेरीज.
  मूलद्रव्याच्या संस्थानिकात अणुक्रमांक सारखाच असून अणूवस्तुमानांक भिन्न असतो.
 मूलद्रव्याच्या इतर मूलद्रव्यांशी संयोग पावण्याचा क्षमतेला संयुजा म्हणतात.

 विषाणूंभोवती प्रथिनांचे आवरण असते.
 जीवणूंमध्ये केंद्रकाऐवजी मुक्त गुणसुत्रे असतात.
 स्टॅफिलोकोकस जीवाणू खधापदार्थावर वाढताना एण्टेरोटॉक्झिन नावाचे विषारी रसायन तयार करतात.
 पेनिसिलीन नावाचे प्रतिजैविक पेनिसिलिअमपासून बनले आहे.

 साथीचे रोग- कॉलरा, विषमज्वर, इन्फ्लुएंझा, हगवण, डोळे येणे, इ.
 संसर्गजन्य रोग – क्षय, इन्फ्लुएंझा, इ
 संपर्कजन्य रोग – खरूज, इसब, गजकर्ण, इ.

 पिसळलेला कुत्रा, माकड, मांजर किंवा ससा यांच्या चावल्यामुळे रेंबीज होतो.

 रोबर्ट कॉक याने क्षय रोगाचे जिवाणू शोधून काढले.

 WHO तर्फे क्षयरोग निर्मुलन कार्यक्रम राबविला जातो. त्यासाठी DOT केंद्र  काढली आहेत. (Directly Observed Treatment)
 मनुष्यप्राणी ‘व्हीब्रिओ कॉलरा’ या कॉलर्‍याचा जिवाणू वाहक आहे.

 लसीकरण – बीसीजी, त्रिगुणी पोलिओ, गोवर, व्दिगुणी, धनुर्वात, कविळ-ब.
 त्रिगुणी लस घटसर्प, धनुर्वात व डांग्या खोकला या रोगांस प्रतिबंध करते.   
_____________________________________
For more join us @MPSCScience
प्रकाश

महत्वाचे मुद्दे:

· सभोवतालचा रंगबेरंगी देखावा आणि प्रकृतीक सौंदर्य पाहण्याचा आनंद आपल्याला डोळ्याच्या विशिस्ट संवेदना आणि प्रकाश यामुळे होतो.

· विद्युत चुंबाकीय प्रारण या नावाने ऊर्जेचे रूप म्हणजे प्रकाश. प्रकाशामुळे डोळ्याला दृष्टी प्राप्त होते.

· क्ष-किरण, दृश्य प्रकाश, रेडियो लहरी, हे सर्व विद्युत चुंबकीय वर्णपटलाचे भाग आहेत.

· प्रकाश किरणांची तरंग लांबी 4×10-7 m ते 7×10-7 m च्या दरम्यान असते.

· प्रकाशाच्या प्रसारणाच्या मार्गाला प्रकाश किरण म्हणतात.

· अनेक प्रकाश किरण एकत्र येऊन शलाका तयार होतात.

· प्रकाश किरण त्यांच्या उगमस्थांनापासून सरळ रेषेत प्रवास करतात.

· जर प्रकाशाच्या प्रसारणाच्या दिशेने एखादी वस्तु आली तर तिची छाया तयार होते.
आरसा :

· आपण दररोज वापरतो त्यापैकी सपाट आरशाशी आपला जास्त संबंध आहे.

· आरसा हा परवर्तंनशील पृस्ठभाग आहे.

· सपाट आरसा म्हणजे सपाट काच असून तिच्या एका पृस्ठभागावर परावर्तक पातळ लेप देऊन त्यावर लाल रंग दिल्याने परावर्तक थराचे संरक्षण केलेले असते.

· आरशाचा दूसरा प्रकार म्हणजे वक्र गोलाकार आरसा होय.

· तो गोलाकार परवर्तनशील पृष्ठभागाचा एक भाग असतो. त्याचा काटछेद हा वर्तुळपाकळी असतो. काचेच्या एका पृष्ठभागावर परावर्तक लेप देऊन दूसरा पृष्ठभाग चकचकीत केलेला असतो.

अंतर्वक्र आरसा -

· जर गोलाकार पृष्ठभागाचा आतला भाग चकचकीत असेल तर त्याला अंतर्वक्र आरसा म्हणतात.

· आतल्या पृष्ठभागावरून परावर्तन होते. त्यालाच अभिसारी आरसा म्हणतात.

· कारण मुख्य अक्षाला समांतर असणारे किरण परावर्तनानंतर एका बिंदुजवळ अभिसारीत होतात.

बहिर्वक्र आरसा -

· जर गोलाकार पृष्ठभागाचा बाहेरचा भाग चकचकीत असेल तर त्याला बहिर्वक्र आरसा म्हणतात.

· बाहेरचा पृष्ठभागावरून परावर्तन होते.

· मुख्य अक्षाला समांतर असणारे किरण परावर्तनानंतर अपसारीत होत असल्याने या आरशाला आपसरी आरसा असे म्हणतात.


गोलाकार आरशाशी संबंधित संज्ञा :

वक्रता मध्य - (C) Centre of Curvature

· गोलाकार आरसा ज्या गोलचा भाग आहे त्याच्या केंद्रबिंदूला वक्रता मध्य किंवा वक्रता केंद्र म्हणतात.

ध्रुव - (p) Pole

· गोलीय आरशाच्या मध्यबिंदूला ध्रुव किंवा गुरुत्व मध्य म्हणतात.

मुख्य अक्ष - Principal Axis

· आरशाचा ध्रुव आणि वक्रतामध्य यामधून जाणार्‍या सरळ रेषेला मुख्य अक्ष म्हणतात.

वक्रता त्रिज्या - (R) Radius of Curvature

· आरशाचा वक्रता मध्य व ध्रुव यांच्यामधील अंतराला 'वक्रता त्रिज्या' म्हणतात.

अंतर्वक्र आरशाची नाभी - (F) Focus

· अंतर्वक्र आरशाच्या मुख्य अक्षाला समांतर असणारे किरण परावर्तनानंतर एका बिंदुजवळ येतात. त्यालाच 'अंतर्वक्र आरशाची नाभी' म्हणतात.

नाभीय अंतर - (F) Focal Length

· आरशाचा ध्रुव आणि नाभी यांच्यामधील अंतराला आरशाचे 'नाभीय अंतर' म्हणतात.
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
लढा लेप्टोपायरसिसशी
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
जगभरात कुपोषणाचे प्रमाण वाढले
Forwarded from MPSC Science
विज्ञान व तंत्रज्ञान विकास

जॉईन करा @MPSCScience
Forwarded from MPSC Science
आज महान शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचा जन्मदिन .

वाचा सविस्तर @MPSCScience
Forwarded from MPSC Science
*जयंत विष्णू नारळीकर*
*भारतीय खगोलशास्त्रज्ञ व लेखक*
*जन्म - जुलै १९, १९३८*
नारळीकरांचा जन्म कोल्हापूर येथे जुलै १९, १९३८ रोजी झाला. त्यांचे वडील, रँग्लर विष्णू वासुदेव नारळीकर हे एक प्रसिद्ध गणितज्ञ, वाराणसी येथील बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित विभागचे प्रमुख होते. त्यांची आई सुमती विष्णू नारळीकर ह्या संस्कृत विदुषी होत्या. जयंत नारळीकरांचे शालेय शिक्षण वाराणसी येथे झाले. इ.स. १९५७ साली त्यांनी विज्ञानाची पदवी (B.Sc.) प्राप्त केली.या परीक्षेत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते ब्रिटनमधील केंब्रिज येथे गेले. तेथे त्यांना बीए, एमए व पीएचडी च्या पदव्या मिळाल्या. शिवाय, रँग्लर ही पदवी, खगोलशास्त्राचे टायसन मेडल व इतर अनेक बक्षिसे मिळाली. १९६६ साली नारळीकर यांचा विवाह मंगला सदाशिव राजवाडे (गणितज्ञ) ह्यांच्याशी झाला. त्यांना तीन मुली आहेत - गीता, गिरिजा व लीलावती. १९७२ साली ते भारतात परतले. त्यांनी मुंबई येथील टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या (टी.आय.एफ.आर.) खगोलशास्त्र विभागात प्रमुख म्हणून पद स्वीकारले. १९८८ साली त्यांची पुणे येथील आयुका संस्थेचे संचालक म्हणून नियुक्ती झाली. डॉ. नारळीकर यांच्या पत्नी मंगला नारळीकर ह्या ’नभात हसते तारे’ या पुस्तकाच्या सहलेखिका आहेत. ’पाहिलेले देश भेटलेली माणसं’ हे त्यांनी स्वतंत्रपणे लिहिलेले पुस्तक आहे.
संशोधन
स्थिर स्थिती सिद्धान्त
चार दशकांहून अधिक कालावधीपासून त्यांचे खगोलभौतिकी क्षेत्रात संशोधन सुरू आहे. त्याच बरोबर सतत पुस्तके लिहिण्याचा कार्यक्रमही चालू आहे. सामान्य माणसाला खगोलशास्त्र समजवण्यासाठी त्यांनी गेली अनेक वर्षे प्रयत्न केले आहेत. यासाठी सर्व प्रसारमाध्यमांचा ते उपयोग करतात. त्यांच्या 'यक्षांची देणगी' या पहिल्याच पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे.
साहित्यातील भर
विविध मराठी नियतकालिकांतून जयंत नारळीकर सातत्याने विज्ञानचिषयक माहितीने भरलेले ललित लेखन प्रसिद्ध होत असते. नारळीकरांच्या पुस्तकांची जगांतील अनेक भाषांत रूपांतरे झाली आहेत.
*विज्ञानकथा पुस्तके*
अंतराळातील भस्मासुर
अभयारण्य
टाइम मशीनची किमया
प्रेषित
यक्षांची देणगी
याला जीवन ऐसे नाव
वामन परत न आला
व्हायरस
*इतर विज्ञानविषयक पुस्तके*
आकाशाशी जडले नाते
गणितातील गमतीजमती
युगायुगाची जुगलबंदी गणित अन् विज्ञानाची (आगामी)
नभात हसरे तारे (सहलेखक : डॉ. अजित केंभावी आणि डॉ. मंगला नारळीकर)
विज्ञान आणि वैज्ञानिक
विज्ञानगंगेची अवखळ वळणे विज्ञानाची गरुडझेप
विश्वाची रचना
विज्ञानाचे रचयिते
सूर्याचा प्रकोप
Facts And Speculations In Cosmology (सहलेखक : Geoffrey Burbidge)
Seven Wonders Of The Cosmos
*आत्मचरित्र*
चार नगरांतले माझे विश्व
*पुरस्कार*
१९६५मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाला. २००४मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळाला. २०१०मध्ये त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला. त्यांना भटनागर पुरस्कार आणि एम. पी. बिरला हे पुरस्कारही मिळाले आहेत. २०१४साली मिळालेला तेनाली (हैदराबाद) येथील नायुदअम्मा ट्रस्टचा डॉ. वाय. नायुदअम्मा स्मृती पुरस्कार-२०१३ जयंत नारळीकर यांच्या आत्मचरित्राला दिल्लीच्या साहित्य अकादमीचा २०१४ सालचा पुरस्कार मिळाला आहे. ’यक्षाची देणगी’ या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार अमेरिकेतील फाउंडेशनतर्फे दिला जाणारा साहित्यविषयक जीवनगौरव पुरस्कार (२०१२)
चरित्र
डॉ. विजया वाड यांनी डॉ. नारळीकर यांचे ’विज्ञान यात्री डॉ.जयंत नारळीकर’ या नावाचे चरित्र लिहिले आहे.
महत्वाचे मुद्दे :

· अनविकरणीय – हवा, माती, खनिजे, पाणी (निर्माण करणे आवाक्याबाहेरचे असते).

· हवा प्रदूषणाचे हवेतील कार्बनडायऑकसाईडचे प्रमाण वाढत असल्याने जागतिक तपमानवाढीचे उदभवले आहे.

· इस्त्राईल मधील जॉर्डन नदीवर कालवे काढून जलसिंचनाची सोय केल्याने वाळवंटी भागात उत्तम शेती करता येते.

· समुद्राच्या पाण्यात मॅग्नेशिअम क्लोराईड, सोडीयम क्लोराईड हे क्षार असतात.

· तारावरील जमिनीवर ठराविक अंतरावर आडवे चर खणून पावसाचे पाणी चरात अडवून धरले जाते यालाच 'नालाबंर्डिंग' असे म्हणतात.

· 20 ऑगस्ट हा दिवस अक्षय्य ऊर्जा दिवस म्हणून पाळला जातो.

· वनस्पती व प्राण्यातील विशिष्ट जणूके दुसर्याह वनस्पतीत व प्राण्यात थेट सोडून हव्या त्या गुणधर्माची नवीन प्रजाती प्रयोग शाळेत निर्माण करता येऊ शकते त्याला जैविक तंत्रज्ञान असे म्हणतात.

· डोडो व भारतीय चित्ता यांची जणूके आपण कायमची हरवून बसलो आहोत.

· संयुक्त राष्ट्रसंघाने दरडोई 50 ली. पाण्याची गरज रोजची असल्याचे सुचवले आहे.

· पृथ्वीचा 71% भाग पाण्याने व्यापलेला आहे.

· 22 मार्च हा जागतिक जलदिन म्हणून साजरा करण्यात येतो.

· जलाशयाच्या पृष्ठभागावर सेटील अल्कोहोलचा शिडकावा केल्यास बाष्पीभवन कमी होते.

· वनस्पतीच्या पानातील हरितद्रव हे प्रकाश उर्जेचे रूपांतर रसायनिक उर्जेत करते.

· अभ्रक हे उष्णतेचे सुवाहक तर विजेचे दुर्वाहक आहे.

· वायूंचे प्रसारण हे स्थायू आणि द्रवाच्या प्रसारणापेक्षा अधिक असते.

· भट्टीचे तापमान मोजण्यासाठी वापरण्यात येणार्‍या तापमापीला 'पायरोमीटर' म्हणतात.

· आयोडीन व नॅप्थालिन हे संप्लवनशील पदार्थ आहेत.

· अमीबा,पॅरमॅशिअम, क्लोरेल्ला हे एकपेशीय सजीव आहेत.

· सजीवांची रचना आणि कार्य पेशीच्या पातळीवर होत आहेत.

· समान कार्य करणार्‍या पेशीच्या समूहाला 'उती' असे म्हणतात.

· उती पातळीवर संघटन असणारे सजीव – मॉस, शैवाल, जलव्याल.

· ठराविक काम एकत्रितपणे करण्यासाठी इंद्रिय समूहाला 'इंद्रिय संस्था' म्हणतात.

· प्राण्यांच्या किंवा वनस्पतींचा समूह ज्या विशिष्ट जागेत राहून विकसित होतो त्या जागेस 'अधिवास' म्हणतात.

· एकपेशीय जीवामध्ये विभाजन पद्धतीने प्रजनन होते. उदा. जिवाणू, क्लोरेल्ला.

· कालिका पासून होणार्याा प्रजननास कलिकयन म्हणतात. उदा. किन्व (यीस्ट)

· पुमंग हा नर घटक तर जयांग हा स्त्री घटक असतो.

· पुमंगातील परागकण जायांगाच्या कुक्षीवर पडल्यास ते रुजतात. याला 'परागण' असे म्हणतात.

· अंड्यात वाढणार्याज जीवांना अंडज म्हणतात. तर गर्भाशयातून जन्मणारे जरायूज.

· सस्तन प्राण्यांच्या हृदयाचे चार कप्पे असतात.

· हृदयाकडून शरीराच्या निरनिराळ्या भागाकडे रक्त वाहून नेणार्यान रक्तवाहिन्यांना 'धमण्या' म्हणतात.

· शरीराच्या भागाकडून हृदयाकडे अशुद्ध रक्त वाहून नेणार्‍या रक्तवाहिन्यांना 'शिरा' म्हणतात.

· धमन्यांना फाटे फुटून त्या केसासारख्या बनतात. त्यांना 'केशिका' म्हणतात.

· अॅनेमिया, थालेसेमिया, कॅन्सर ग्रस्त रुग्णांना बाहेरून रक्तपुरवठा केला जातो.

· अन्न घटकातील अमिनोआम्लाचा शरीरबांधणीसाठी उपयोग होतो.

· अळूच्या पानात कॅल्शिअम ऑक्झॅलेटचे स्फटिक असतात.

· मूलद्रव्याच्या अतीसूक्ष्म कणाला 'अणू' म्हणतात.

· पुढील मूलद्रव्यात दोन अणू असतात- ऑक्सीजन, हायड्रोजन, क्लोरिन, नायट्रोजन.

· रणगाड्याचे कठीण कवच तयार करण्यासाठी अॅल्युमिनियम, मॅग्नेशिअम हे धातू आणि नायलोन व फायबर ग्लास हे पदार्थ वापरतात.

· 20 Hz ते 20000 Hz दरम्यानच्या वारंवारितेचा ध्वनी माणसाला ऐकता येतो. त्याला 'श्राव्य ध्वनी' म्हणतात.

· अवश्राव्य ध्वनीच्या मदतीने वाटवाघळला समोरच्या वस्तूची जाणीव होते.

· 20 C या तापमानावर ध्वनीचा वेग सुमारे 340 m/s असतो.

· अँबरला ग्रीक भाषेत 'इलेक्ट्रॉन' म्हणतात.

· काचेची दांडी रेशमी वस्त्रावर घांसल्यास धन विद्युतप्रभार निर्माण होतो.

· एबोनाईटची दांडी उनी कपड्यावर घासली की तिच्यावर ऋण प्रभार निर्माण होतो.

· आकाशातील विजेचा धोका टळण्यासाठी उंच इमारतीवर तडीतवाहक बसवतात.

· छ्दमपादाच्या सहाय्याने अमीबा पुढे सरकतो.

· स्वादूपिंडामधून इन्शुलिन स्त्रवते तर यकृतामधून पित्तरस स्त्रवतो.

· शर्करांचे प्रकार – फ्रूक्टोज, सुक्रोज, ग्लुकोज, लॅक्टोज, इ.

· प्रथिने ही मूलत: नट्रोजनयुक्त कार्बनी पदार्थ आहेत.

· प्रथिने शरीर बांधणीच्या कामात महत्वाची भूमिका बजावतात.

· आनुवांशिक गुणधर्माचे नियोजन करणारे डी – ऑक्सीरायबो न्यूक्लिक आम्ल (DNA), रायबो न्यूक्लिक असिड (RNA) हे नायट्रोजन युक्त पदार्थ आहेत.

· 'अ' जीवनसत्वाच्या अभावी रातआंधळेपणा होतो.

· 'ब' जीवनसत्वाच्या अभावी जीभ लाल, त्वचा रखरखीत, बेरीबेरी

· 'क' जीवनसत्वाच्या अभावी हिरड्यातून रक्त येणे, स्कव्ह्री

· 'ड' जीवनसत्वाच्या अभावी मुडदुस पाठीला बाक येणे, पायाची हाडे वाकणे.

· कॅल्शिअमच्या अभावी हाडे ठिसूळ बनतात. दातांची झीज होते.

· फॉस्फरसच्या त्रुटिम
ुळे वजनात घट होते व वाढ खुंटते.

· लोहाच्या अभावामुळे पंडूरोग, रक्तक्षय (अॅनेमिया) हा विकार होतो.

· आयोडीनच्या अभावामुळे गलगंड (गॉयटर) हा रोग होतो.

· आपल्या मानेत असणार्यां अवटू ग्रंथीमधून थायरोस्झिन संप्रेरक स्त्रवते.

· प्राण्यांच्या शरीरातील जीवनक्रिया आणि हालचाली नियंत्रित करणार्याप रासायनिक पदार्थांना 'संप्रेरके' म्हणतात.

· जणूके पेशीच्या केंद्रकामध्ये समवलेली असतात. उंची वाढण्यास करणीभूत असलेले वृद्धी संप्रेरके मेंदू मधील पियुषिकेत तयार होते.

· किटकभक्षी वनस्पती – दवबिंदू (ड्रोसेरा), घटपर्णी या आहेत.

· जहाजावर किती माल भरावा याचा निर्देश करण्यासाठी जहाजाच्या खालच्या भागावर रेषा आखलेल्या असतात. त्यांना प्लीम सोल रेषा म्हणतात.

· लोलकातून गेल्यावर सूर्यचा प्रकाश सात रंगात विभागतो. त्यामध्ये तांबडा रंग वर असतो तर जांभळा रंग सर्वात खाली असतो.

· रंगाचा क्रम – तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा, जांभळा

· उष्णतेचे स्थलांतर तीन प्रकारे होते – वहन, अभिसरण, प्रारण.

· थर्मासफ्लास्क मध्ये गरम किंवा थंड वस्तू तापमानामध्ये फरक न होता दीर्घकाळ त्याच तापमानावर गरम किंवा थंडच राहते.

· गरम पदार्थ गरम ठेवण्यासाठी जी भांडी वापरतात त्यांना 'थर्मोवेयर' म्हणतात.

· उष्णतेचे सुवाहक – तांबे, लोह, अल्युमिनिअम, इ.

उष्णतेचे दुर्वाहक – माती, लाकूड, काच, इ.

· रक्त देण्याची प्रक्रिया म्हणजे रक्तदान तर रक्त घेण्याची प्रक्रिया 'रक्त पराधन' होय.

· रक्तामध्ये युरिया साचून राहिल्यास चक्कर येते.

· प्रजनन मुख्यत्वे पुढील दोन प्रकारे होते –
अलैंगिक प्रजनन :

वनस्पती -

1. शाकीय प्रजनन - मूळापासून (रताळे), खोडापासून (हळद, कांदा, बटाटा, शवंती), पानापासून (पानफुटी, कलेंचा)

2. विभाजन - एकपेशी, सजीव, जिवाणू, क्लोरेल्ला, शैवाल

3. कलिकायन - किन्व यीस्ट

4. बिजाणूजन्य - बुरेशी

5. खंडिभवन - शैवाल, स्पायरोगायरा
लैंगिक प्रजनन:

वनस्पती -

· सपुष्प वनस्पतीमध्ये फुलांचा लैंगिक प्रजननात सहभाग असतो.

प्राणी -

· नर आणि मादीच्या संयोगातून गर्भोशयात युग्मनज तयार होतो आणि वाढीतून नवीन जीव तयार होतो.

· वृक्काचे (किडनी) कार्य कृत्रिम पद्धतीने केले जाते. त्या क्रियेला 'डायलेसिस (व्याष्लेषण)' म्हणतात.

· बल्बच्या दिव्यात तंगस्टनची तार असते. तंगस्टनची संज्ञा W आहे. वुलफ्रेम (Wolfram) या जर्मन नावावरून ती घेतली आहे.

· आंदोलन काल (T) हा दोलकाच्या लांबीवर अवलंबून असतो. लांबी वाढवली की काल वाढतो.

· कुत्री, वटवाघूळ हे प्राणी अवश्राव्य ध्वनी एकू शकतात.

· परावर्तन होताना ध्वनीची येणारी दिशा आणि परावर्तीत दिशा लंबाशी सारखाच कोन करतात.

· जे सजीव स्वत:चे अन्न स्वत: तयार करतात त्यांना स्वयंपोषी म्हणतात. तर ज्यांना अन्नासाठी इतरांवर अवलंबून रहावे लागते त्यांना परपोषी म्हणतात.

· विकरांच्या क्रियेमुळे अन्नातील घटकांचे विघटन होऊन तयार झालेल्या रसायनिक पदार्थांचे रक्तात शोषण होते आणि त्यांचा वाढीसाठी, झीज भरून काढण्यासाठी उपयोग होतो याला सात्मिकरन म्हणतात.

· हिरव्या वनस्पतींना अन्न तयार करण्यासाठी कार्बन डायोक्साइड, प्रकाश, हरितद्रव, पाणी या घटकाची गरज असते.

· आयोडीन द्रावणाने पदार्थ पिष्टमय आहे किंवा नाही याची परीक्षा करता येते.
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
नवीन मूलद्रव्यांचे नामकरण
क्षयरोग त्याची लक्षणे व उपचार

· हा संसर्गजन्य आजार असून तो 'मायक्रोबॅक्टेरियम' ट्युबरक्युलोसिंस' या जिवाणूमुळे होतो.

· या जिवाणूचा शोध 'सर रॉबर्ड कॉक' यांनी 24 मार्च 1882 रोजी लावला म्हणून 'कॉक्स इन्फेक्शन' असेही म्हणतात.

· जागतिक क्षयरोग दिन 24 मार्च रोजी साजरा करण्यात येतो.

· क्षयरोगचा प्रसार हवेमार्फत (रुग्णाच्या खोकण्याने, शिकण्याने) होतो.

· क्षयरोगाचे जंतू मुख्यतः फुप्फुसावर परिणाम करतात म्हणून फुप्फुसाच्या क्षयरोगाचे प्रमाण सर्वात जास्त आहे.
क्षयरोगाचे प्रकार :

1. फुप्फुसाचा 2. इतर अवयवांचा (ग्रंथी, हाडे/सांधे, मूत्रपिंड, मेंदूआवरण, आतड्यांचा, कातडीचा इ.)
क्षयरोगाची लक्षणे :

1. तीन आठवडे किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीचा खोकला,

2. हलकासा परंतु संध्याकाळी वाढणारा ताप

3. वजन कमी होणे

4. थुंकीतून रक्त पडणे

5. भूक मंदावणे इ.
क्षयरोगाचे निदान :

लहान मुलांमधील क्षयरोग निदानासाठी 'मोन्टोक्स टेस्ट' वापरली जाते.

1. थुंकी तपासणी (बेडका) : सर्वात खात्रीशीर, कमी खर्चाची पद्धत. संशयित रुग्णाच्या थुंकीचे तीन नमुने तपासण्यात येतात.

2. 'क्ष-किरण' तपासणी (X-Ray) : छातीचा एक्स-रे काढून करतात. वरील तपासणीपेक्षा कमी खात्रीशीर. विशिष्ट तज्ञांची आवश्यकता असते.
प्रतिबंधक लस -

0 ते 1 वर्ष बालकांना क्षयरोग प्रतिबंधक लस टोचण्यात येते. त्या लसीला 'बी.बी.सी' (बॅसिलस कॉलमेटग्युरिन) असे म्हणतात.

राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम 1962 साली सुरू करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये एक्स-रे तपासणीवर जास्त भर

होता तसेच औषधोपचाराचा कालावधी जास्त होता.(दीर्घ मुदतीचा)

सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम (RNTCP) सन 1992-93 मध्ये सुरू करण्यात आला.
क्षयरोग औषधोपचार :

सुधारित कार्यक्रमामध्ये क्षय रुग्णांना प्रत्यक्ष देखरेखीखाली चार प्रकारच्या गोळ्या तसेच 'स्ट्रेप्टोमायसीन' हे इन्जेक्शन देण्यात येते.

1. सदर औषधोपचार पद्धतीला डॉट्स (DOTS) असे म्हणतात.

2. DOTS - Directly Observed Treatment With Short Cource Cheniotherapy (प्रत्यक्ष निरीक्षणाखाली दिलेल्या अल्प मुदतीचा क्षयरोग औषधोपचार)
क्षयरोगाची लक्षणे :

1. तीन आठवडे किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीचा खोकला,

2. हलकासा परंतु संध्याकाळी वाढणारा ताप

3. वजन कमी होणे

4. थुंकीतून रक्त पडणे

5. भूक मंदावणे इ.
क्षयरोगाचे निदान :

लहान मुलांमधील क्षयरोग निदानासाठी 'मोन्टोक्स टेस्ट' वापरली जाते.

1. थुंकी तपासणी (बेडका) : सर्वात खात्रीशीर, कमी खर्चाची पद्धत. संशयित रुग्णाच्या थुंकीचे तीन नमुने तपासण्यात येतात.

2. 'क्ष-किरण' तपासणी (X-Ray) : छातीचा एक्स-रे काढून करतात. वरील तपासणीपेक्षा कमी खात्रीशीर. विशिष्ट तज्ञांची आवश्यकता असते.
प्रतिबंधक लस -

0 ते 1 वर्ष बालकांना क्षयरोग प्रतिबंधक लस टोचण्यात येते. त्या लसीला 'बी.बी.सी' (बॅसिलस कॉलमेटग्युरिन) असे म्हणतात.

राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम 1962 साली सुरू करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये एक्स-रे तपासणीवर जास्त भर

होता तसेच औषधोपचाराचा कालावधी जास्त होता.(दीर्घ मुदतीचा)

सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम (RNTCP) सन 1992-93 मध्ये सुरू करण्यात आला.
क्षयरोग औषधोपचार :

सुधारित कार्यक्रमामध्ये क्षय रुग्णांना प्रत्यक्ष देखरेखीखाली चार प्रकारच्या गोळ्या तसेच 'स्ट्रेप्टोमायसीन' हे इन्जेक्शन देण्यात येते.

1. सदर औषधोपचार पद्धतीला डॉट्स (DOTS) असे म्हणतात.

2. DOTS - Directly Observed Treatment With Short Cource Cheniotherapy (प्रत्यक्ष निरीक्षणाखाली दिलेल्या अल्प मुदतीचा क्षयरोग औषधोपचार)
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
शेवटी करून दाखवलंच.....!

▪️चांद्रयान २ ची वैशिष्ट्ये काय?

― चांद्रयान २ चे वजन ३.८ टन इतके आहे.

― भविष्यातील अनेक मोहिमांसाठी चांद्रयान २ एक चांगलं उदाहरण ठरणार आहे.

― या मोहिमेद्वारे भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवापर्यंत पोहचणार आहे. या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न अद्याप कुणीही केलेला नाही.
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
🔹चंद्रावर माणसाची स्वारी

संपूर्ण पोस्ट पाहण्यासाठी INSTANT VIEW बटनावर क्लिक करा....
आकाशगंगा :

· सूर्य हा एक तारा असून त्या भोवती पृथ्वीसहित 8 ग्रह फिरतात.

· चंद्र हा पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे.

· प्रत्येक दिवशी चंद्रोदय आदल्या दिवसापेक्षा सुमारे 50 मिनिटे उशिरा होतो.

· चंद्राला पृथ्वीभोवती एक परिभ्रमण करण्यास 27.3 दिवस लागतात.

· एका अमावस्येपासुन दुसर्यार आमवस्येपर्यंतचा काळ 29.5 दिवसांचा असतो.

· एकूण 88 तारकासमूह मानले जातात. त्यातील 37 तारकासमूह उत्तर खगोलीय तर 51 तारकासमूह दक्षिण खगोलीय आहेत.

·

· प्राचीन भारतीय खगोल अभ्यासकांनी 27 नक्षत्रांची कल्पना केली आहे.

· प्लूटो आणि त्याच्यासारख्या इतर खगोलीय वस्तूंना आता बटुग्रह म्हणून ओळखतात.

· बुधाचा परिभ्रमणकाळ फक्त 88 दिवस तर नेपच्यूनचा सुमारे 146 वर्षे इतका मोठा असतो.

· बुध हा सूर्याचा सगळ्यात जवळचा आणि सगळ्यात लहान ग्रह आहे.

· पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह म्हणजे शुक्र. त्याला 'पहाटतारा' म्हणतात.

· पृथ्वीच्या कक्षेत असलेल्या बुध आणि शुक्र यांना 'अंतर्ग्रह', तर कक्षेबाहेरील ग्रहांना 'बाह्यग्रह' म्हणतात.

· 'मंगळ' हा पहिला बाह्यग्रह आहे.

· सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह म्हणजे 'गुरु'

· गुरूला एकूण 63 उपग्रह आहेत.

· शनि या ग्रहाची घनता पाण्यापेक्षा कमी आहे.

· शुक्राप्रमाणे युरेनस देखील पूर्वेकडून पश्चिमेकडे स्वत: भोवती परिवलन करतो.

· धूमकेतूचे पुच्छ सूर्याच्या विरुद्ध बाजूने असते.

· हॅले हा धूमकेतू 76 वर्षानी दिसतो. आता 2060 मध्ये दिसेल.

· भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट 19 एप्रिल 1975 रोजी सोडण्यात आला.

· त्यानंतर इन्सॅट, आय.आर.एस., कल्पना - 1, एज्युसॅट, भास्कर, इ. उपग्रह आपण अवकाशात सोडले आहेत.

· ‘इस्त्रो’ या संस्थेमार्फत आतापर्यंत 21 उपग्रह सोडण्यात आले.

· GMRT म्हणजे जयंट मिटेरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप.

· टाटा इन्सिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR) ने ती खोडद येथे बसविली.

· आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे धोक्यात आलेल्या वनस्पती व अन्य वन्य प्राणी यांच्या संरक्षणासाठीचा करार 1975 पासून अंमलात आला आहे.

· जैवविविधतेच्या संरक्षणासाठी ब्राझील रिओ-द-जनिरो येथे झालेल्या 1992 च्या वसुंधरा परिषदेत जैववैविध्य करारावर सह्या करण्यात आल्या.


चुंबकत्व :

· 5 मार्च 1872 रोजी जॉर्ज वेस्टिंग हाऊस या संशोधकाने रेल्वेसाठी एअर ब्रेक प्रथम वापरले.

· चुंबकाकडे लोह, निकेल, कोबाल्ट या धातूंचे तुकडे आकर्षित होतात.

· मोकळ्या टांगलेल्या स्थितीमध्ये दक्षिणोत्तर स्थिर राहणे, हे चुंबकाचे वैशिष्ट आहे.
Forwarded from MPSC Material
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from MPSC Science
🔹रासायनिक अभिक्रिया

● रासायनिक बदल
● अभिक्रियांचे प्रकार

जॉईन करा @MPSCScience