MPSC Science
66.9K subscribers
8.6K photos
54 videos
356 files
716 links
Download Telegram
🔹Greenhouse effect हरितगृह परिणाम
हरितगृह परिणाम:-

सूर्याकडून पृथ्‍वीकडे येणारी ऊर्जा लघू प्रारणांच्‍या (Short Waves) रूपाने येते. पृथ्‍वीकडून उत्‍सर्जित होणारी ऊर्जा दीर्घ प्रारणांच्‍या (Lonh waves) रूपाने आढळते. वातावरणातील जलबाष्‍प, कार्बन डाय ऑक्‍साईड हे घटक सूर्याकडून पृथ्‍वीकडे येणार्‍या प्रारणांसाठी पारदर्शक आहेत. परंतु पृथ्‍वीकडून अवकाशात उत्‍सर्जित होणारी दीर्घ प्रारणे मात्र हे घटक अडवतात. वातावरणाच्‍या अध:स्‍तरात अडलेल्‍या दीर्घ प्रारणांमुळे वातावरणाचे तापमान वाढते. यालाच हरितगृह परिणाम असे म्‍हणतात.



हरितगृह परिणामामुळेच पृथ्‍वीचे वातावरण उबदार बनले आहे. त्‍यामुळेच पृथ्‍वीवर सजीव सृष्‍टीचे अस्तित्‍व आढळते. म्‍हणजेच हरितगृह परिणाम आवश्‍यक व
उपकारक आहे. या परिणामाचा उपयोग शेतीमध्‍ये केला जातो. काही पिकांना दमट हवामानाची गरज असते. ते निर्माण करण्‍यासाठी प्‍लास्टिकचा कागद वापरून हरितगृह निर्माण केले जाते.

प्‍लास्टिक कागदामुळे पृथ्‍वीकडून अवकाशात जाणारी दीर्घ प्रारणे अडवली जातात. त्‍यामुळे हरितगृहामधील तापमान वाढते. वाढलेल्‍या तापमानामुळे हवेतील आर्द्रतेचे प्रमाणही वाढते. थंड हवामानाच्‍या प्रदेशात प्‍लास्टिक कागदाऐवजी काचेचा उपयोग केला जातो. या रचनेला ग्‍लास हाऊस असे म्‍हणतात. या ग्‍लास हाऊसमध्‍ये अत्‍यंत कमी तापमान असणार्‍या प्रदेशातही पिके घेता येतात.

हरितगृह परिणामात वाढ:-
मानवाच्‍या विविध क्रियांमुळे वातावरणातील हरितगृह घटकांचे प्रमाण वाढले आहे. जलबाष्‍प, कार्बन डाय ऑक्‍साइड यांच्‍याप्रमाणेच कार्बन मोनोक्‍साइड, सल्‍फर डाय ऑक्‍साइड, सल्‍फर ट्राय ऑक्‍साइड, मिथेन, नायट्रोजन डाय ऑक्‍साइड, क्‍लोरोफ्‍ल्‍युरो कार्बन्स हेदेखील हरितगृह वायू आहेत. त्‍यांचे वातावरणातील प्रमाण लक्षणीयरि‍त्‍या वाढले आहे. त्‍यामुळे वातावरणाचे तापमान वाढत आहे. यालाच ‘जागतिक तापमानवाढ' असे म्हणतात. ही जागतिक तापमानवाढच मानवनिर्मित हवामान बदलाचे मुख्‍य कारण आहे.


हवामान बदलाचे परिणाम अल्‍पकालीन व दीर्घकालीन स्‍वरूपाचे आढळतात:-


सागर जल पातळीत वाढ
महासागरांचे आम्‍लीकरण
मासेमारीवर परिणाम
प्रवालींचा नाश व विरंजन
हिमरेषांच्‍या उंचीत वाढ
तापमान, पाऊस, कार्बन डाय ऑक्‍साइडचे प्रमाण या घटकांचा शेतीवर मोठा प्रभाव पडतो.
विज्ञान - रेडिओ खगोलशास्त्राचा सुरवात
संगणकाविषयी माहिती भाग :

DOT म्हणजे - डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन
 
SSA म्हणजे - सर्व शिक्षा अभियान
 
SARI म्हणजे - सस्टेनेबल अॅक्सेस इन रूरल इंडिया
 
CIC म्हणजे - कॉम्युनिटी इन्फ्रोर्मेशन सेंटर
 
CIC ची सुरुवात झाली - 17 ऑगस्ट 2002
 
ई-वेस्ट म्हणजे - इलेक्ट्रॉनिक कचरा
 
सॉफ्टवेअर चोरी रोखण्यासाठीचा कायदा - इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी अॅक्ट
 
नॅशनल अॅरोलॅटिक लॅब - बंगळुरू
 
सी-डॅक चे मुख्यालय - पुणे
 
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी - मुंबई
 
'अनुराग' ही संगणकविषयक संस्था - हैदराबाद
 
संगणकाच्या चौथ्या पिढीचा कालावधी - 1970-80
 
मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये लिहिताना अक्षरांखाली हिरवी रेषा संकेत आहे - व्याकरणातील चुका
 
मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये लिहिताना अक्षरांखाली लाल रेषा संकेत आहे - स्पेलिंग मिस्टेक
 
रिसायकल बिन या चित्राने दर्शवितात - डस्ट बिन
 
नेटस्केप नेव्हीगेटर प्रकार आहे - ब्राऊझरचा
 
डॉसची आज्ञावली या भाषेत असते - अमेरिकन
 
बारकोड रिडर्सना म्हणतात - हॅन्डहेल्ड स्कॅनर
 
ई-मेल म्हणजे - इलेक्ट्रॉनिक मेलिंग  
'अँड्रॉइड एन'ची वैशिष्ट्ये
★|| eMPSCkatta ||★
.
पेपर - 4 : विज्ञान व तंत्रज्ञान विकास या घटकाची तयारी कशी करावी ?
.
अर्थव्यवस्थेच्या विकासाचा विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विकासाशी जवळून संबंध असल्याने ‘विज्ञान-तंत्रज्ञान’ हा घटक अर्थशास्त्राशी संबंधित एमपीएससीच्या मुख्य परीक्षेच्या पेपर ४ मध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. या घटकाची तयारी कशी करावी, याविषयी..
वाचा सविस्तर : http://empsckatta.blogspot.in/2015/10/blog-post_54.html?m=1
-------------------------------------------------
🔹ध्वनी:

'ध्वनी म्हणजे ऐकण्याची संवेदना'.
ध्वनीचे स्वरूप :'ध्वनी ही एक प्रकारची ऊर्जा असून ती आपल्या कानात ऐकण्याची संवेदना निर्माण करते'.

ध्वनीची निर्मिती आघाताने, छेडल्याने, हवा फुंकल्याने, ओरखडल्याने, विविध वस्तु हालल्याने अशा अनेक कारणाने होवू शकते.

प्रत्येक उदाहरणात कंपन ध्वनीच्या निर्मितीस कारणीभूत ठरतात.

कंपन : वस्तूची जलद गतीने पुढे-मागे होणारी हालचाल म्हणजे कंपन होय.

उदा. तंतुवाद्यातील तारेची कंपने



ध्वनी हे तरंगाच्या स्वरुपात प्रसारित होतो.

वस्तु विक्षोभित होते आणि कंप पावते तेव्हा ध्वनी निर्माण होतो.

ध्वनी भौतिक वस्तूतून किंवा पदार्थातून प्रसारित होतो त्याला माध्यम म्हणतात. ते घन, द्रव किंवा वायु असू शकते.

ध्वनी निर्वात पोकळीतून प्रवास करू शकत नाही.

प्रत्येक्षात कंपित वस्तूपासून ऐकणार्‍यापर्यंत कण प्रवास करीत नाहीत.
ध्वनी तरंगाची वैशिष्ट्ये :

जेव्हा ध्वनी तरंग माध्यमातून प्रवास करतात तेव्हा माध्यमाची घनता व दाब यामध्ये बदल होतो.

संपीडने : कणांची एकत्रित गर्दी असणारे भाग म्हणजे संपीडने होय.

संपीडनांपाशी घनता तसेच दाब उच्च असतो.

विरलने : कमी दाबाचे असे भाग की जेथे कण विखुरलेले असतात त्याला विरलने म्हणतात.

विरलनापाशी घनता तसेच दाब कमी असतो.

दोन लगतच्या संपीडनातील किंवा दोन लगतच्या विरलनातील अंतरास तरंगलांबी म्हणतात.

त्याचे SI पद्धतीत एकक मीटर तर तरंगलांबी ग्रीक अक्षर लॅम्डा ने दर्शवतात.

वारंवारता :

घनतेचे उच्चतम किंमतीपासून कमीत कमी किंमतीपर्यंत आणि पुन्हा उच्चतम किंमतीपर्यंत होणारा बदल एक आंदोलन घडवितो.

एकक कालावधीत होणारी आंदोलनाची संख्या म्हणजे तरंगाची वारंवारता होय.

ध्वनी तरंगाची वारंवारता ग्रीक अक्षर न्यू ने दर्शवितात.

त्याचे SI पद्धतीत एकक हर्टझ असून ते Hz ने दर्शवितात.

(note- हर्टंझ (1857-1894) जर्मन भौतिकशास्त्रज्ञ. सर्वप्रथम त्यांनी बिनतारी संदेशवहनाचे प्रसारण व तरंगांची स्वीकृत केली. )
तरंगकाल :

लगतची दोन संपीडणे किंवा विरलने यांना ठराविक बिंदु पार करून जाण्यास लागणारा वेळ म्हणजे 'तरंगकाल' होय.

माध्यमाच्या घनतेमध्ये एक संपूर्ण आंदोलन होण्यास लागणारा वेळ हा ध्वनी लहरीचा तरंगकाल असतो.

तो 'T'ने दर्शविला जातो.

SI पद्धतीत तरंगकालाचे एकक सेकंद आहे.

u=1/t


ध्वनीचा वेग :

तरंगावरील संपीडन किंवा विरलनासारख्या एखाद्या बिंदुने एकक कालावधीत कापलेले अंतर म्हणजे ध्वनीचा वेग होय.

वेग=अंतर/काल

एका तरंगकालात कापलेले अंतर,

वेग= तरंगलांबी/तरंगकाल

वेग= वारंवारता*तरंगलांबी

मानवी श्रवण मर्यादा :

मानवी कानांची ध्वनी ऐकण्याची मर्यादा सुमारे 20 हर्टझ ते 20,000 हर्टझ आहे.

पाच वर्षाच्या आतील मुले आणि कुत्र्यांसारखे काही प्राणी 25000 हर्टझ पर्यंत ध्वनी एकू शकतात.


श्रव्यातील ध्वनी :

20000 हर्टझ पेक्षा अधिक वारंवारता असणार्‍या ध्वनीला श्रव्यातील ध्वनी असे म्हणतात.

निसर्गात डॉल्फिन्स, वटवाघुळे, उंदीर वगैरे तो निर्माण करू शकतात.

उपयोग :

जहाजावरून जहाजावर संपर्क साधण्यासाठी श्रव्यातील ध्वनी उपयोगी ठरते.
ध्वनीचे परिवर्तन :

ध्वनी तरंगांचे घन किंवा द्रव पृष्ठभागावरून परावर्तन होते.

ध्वनीच्या परावर्तनासाठी फक्त मोठ्या आकाराचा खडबडीत किंवा चकचकीत पृष्ठभागाच्या अडथळ्याची आवश्यकता असते.

प्रतिध्वनी :

मूल ध्वनीची कोणत्याही पृष्ठभागावरून परावर्तनामुळे होणारी पुनरावृत्ती म्हणजे प्रतिध्वनी होय.

अंतर= वेग*काल

निनाद :

एखाद्या ठिकाणाहून ध्वनी तरंगांचे पुन्हा पुन्हा परावर्तन होऊन, ध्वनीतरंग एकत्र येऊन सतत जाणवेल असा ध्वनी तयार होतो.त्याचा परिणाम ध्वनीचे सातत्य राहण्यात होतो त्यालाच निनाद म्हणतात.


सोनार (SONAR):

Sound Navigation And Ranging याचे लघुरूप म्हणजे SONAR होय.

पाण्याखालील वस्तूचे अंतर, दिशा आणि वेग श्रव्यातील ध्वनी तरंगाच्या उपयोग करून SONAR मोजते.
🔹एड्स AIDS

लोंगफोर्म –
AIDS- Aquired (प्राप्त), Immuno (प्रतिकारशक्ती), Dfficiency (अभाव), Syndrome (लक्षणसमुह)

 व्याख्या – प्रतिकारशक्तीच्या अभावाने प्राप्त झालेल्या अनेक रोगलाक्षणांच्या एकत्रित समूह म्हणजेच 'एड्स' होय.
 एड्स हा H.I.V. विषाणूमुळे होणारा आजार आहे. (Human Immuno dfficiency Virus- मानवाची प्रतिकारशक्ती कमी करणारा विषाणू)
 एड्सच्या H.I.V. विषणूचा शोध 1983 साली डॉ. ल्यूक मोण्टिग्रेयर (फ्रेंच) व डॉ. रॉबर्ट गॅलो (अमेरिकन) या शास्त्रज्ञांनी लावला
 जगामध्ये 1981 साली अमेरिकेत एड्सचा पहिला रुग्ण आढळला.
 भारतामध्ये 1883 साली मद्रासमध्ये पहिला H.I.V. पॉझिटिव्ह रुग्ण आढळला.
 भारतामध्ये मे 1986 साली मुंबई शहरात पहिला एड्सचा रुग्ण आढळला.
 जगात सर्वात जास्त H.I.V. ग्रस्त रुग्ण – भारत देशात
 भारतात सर्वात जास्त H.I.V. ग्रस्त रुग्ण – महाराष्ट्र राज्यात
 महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त H.I.V. ग्रस्त रुंग – सांगली जिल्ह्यात
 महाराष्ट्रात शहरांपैकी सर्वात जास्त H.I.V. ग्रस्त रुग्ण – मुंबई शहरात
 जागतिक एड्स दिन – 1 डिसेंबर
 NARI (नारी) National AIDS Research Institute (भोसरी) पुणे.
 NACO (नौको) National AIDS Control Organization दिल्ली.
 MSACS – Maharashtra state AIDS Control Society (वडाळा) मुंबई.     

रोगप्रसाराचे प्रमुख मार्ग

H.I.V. बाधित व्यक्तीशी असुरक्षित लैंगिक संबंध.
 H.I.V. बाधित व्यक्तीचे रक्त किंवा रक्तघटक निरोगी व्यक्तीस दिल्यास. (रक्त संक्रमण)
 H.I.V. बाधित रुग्णास वापरलेल्या सुया/सिरिंजेस निर्जतुक न करता परत वापरल्यास.
 H.I.V. बाधित गरोदर मातेपासून तिच्या होणार्‍या बाळाला (नाळेमार्फत) (H.I.V. बाधित व्यक्तीशी हस्तांदोलन केल्याने, चुंबन घेतल्याने, एकत्र बसण्याने, एकत्र जेवल्याने, एकत्र राहण्याने एड्स या रोगाचा प्रसार होत नाही.)

सर्वसामान्य लक्षणे

अकारण वजनात 10% पेक्षा जास्त घट होणे.
 सतत बारीक ताप, रात्रीचा घाम येणे. (1 महिन्यापेक्षा जास्त कालावधी)
 सतत जुलाब होणे व कोणत्याही औषधाने ते बारे न होणे.
 तोंडात, अन्ननलिकेत चट्टे उठणे.
 3 महिन्यापेक्षा जास्त काळ राहणारी 'लसिका ग्रंथाची' (लिम्फ ग्लॅंड) सूज, गंभीर लक्षणे :- 1) नुमोनिया 2) मेंदूज्वर 3) हरपीस 4) विविध प्रकारचे कर्करोग 5) क्षयरोग
 आधिशयन काळ – 5 ते 8 वर्षे/सर्वसाधारण: (कधी-कधी 8 ते 10 वर्षे)

एड्स निदानाच्या चाचण्या

इलायझा चाचणी (ELISA Test) H.I.V. संसर्गाचे प्राथमिक निदान होते. सर्वत्र उपलब्ध. गवाक्ष काळात (3 ते 5 महीने) निगेटिव्ह (नकारात्मक) येऊ शकते. म्हणून ही चाचणी परत 3 महिन्यांनी करावी लागते.
 वेस्टर्न ब्लॉट (Westrn Blot) हमखास 100% खात्रीशीर चाचणी. इलायझा चाचणी होकारात्मक आल्यास H.I.V. संसर्गाची खात्री या चाचणीने करता येते.
 पी.सी.आर. (P.C.R. Test) – जगात सर्वांची सुधारित / प्रगत चाचणी. डी.एन.ए. ची तपासणी करतात. लागण झाल्यास तिसर्यावच दिवशी निदान होऊ शकते.
 मार्च 1985 – एलयाझा तपासणीची उपलब्धता.
 जुलै 1987 – 'झिडोव्ह्युडीन' हे औषध एड्स उपचारासाठी उपलब्ध

एड्सवरील औषधे :

झिडोव्ह्युडीन (Zidovudine), (नेव्हरॅपिन) ही सर्व औषधे फक्त विषाणूंची वाढ थोपवितात व रुग्णाचे आयुष्मान वाढवितात.
 H.I.V. बाधित गर्भवतीकडून होणार्याु बाळाला H.I.V. च संसर्ग टाळण्यासाठी सध्या ग्रामीन रुग्णालयांमध्ये मोफत औषधोपचार करण्यात येतो, त्यास 'अॅंटी रिट्रोव्हायरला थेरपी' असे म्हणतात. (Anti Retroviral Therapy Treatment)
 
🔹मिठ ( NaCl )

उपयोग -
मिठाचा जर योग्य प्रमाणात वापर केला, तर अनेक आजारांवर ते उपयुक्त ठरते.

१. ओवा, मीठ व जिरे वाटून त्याची बारीक पूड घेतल्याने अपचनातून निर्माण झालेली पोटदुखी कमी होते.
२. लहान मुलांना जर कृमी झाले असतील, तर मिठाचे पाणी सकाळीच पिण्यास दिल्यास कृमी संडासावाटे बाहेर पडतात.
३. हात किंवा पाय मुरगळल्यास त्यावर हळद व मिठाचा लेप लावावा. सूज लगेचच कमी होते.
४. घसा किंवा दाढ दुखत असेल, तर मिठाच्या पाण्याने गुळण्या कराव्यात.

दुष्परिणाम -
१. मिठाचा वापर जर अतिरिक्त प्रमाणात केला, तर आमाशय व आतडय़ातील श्लष्मिक कफाचे नुकसान होऊन दाह निर्मिती होते.
२. मिठाचे अतिरिक्त सेवन केल्याने त्वचाविकार, रक्तदाब, सर्वाग सूज, मूत्रविकार, संधिवात, वंध्यत्व हे विकार उद्भवतात. मीठ जास्त प्रमाणात खाल्ल्यास ते आतडय़ामधून कॅल्शिअमचे शोषण करण्यास अडथळा आणते. त्याचबरोबर निर्माण झालेले कॅल्शियम शरीरातून बाहेर काढते. यामुळे हाडांची झीज हा विकार जडतो.
🔹जीवनसत्वे व त्याचे स्त्रोत

💢सर फ्रेडीरिक गॉवलॅड हॉपकिन नावाच्या शास्त्रज्ञाने जिवनसत्वाचा शोध लावला.

💢सजीवांना या पोषणतत्वाची सूक्ष्म प्रमाणात गरज असली तरी, त्याच्या अभावी होणार्या आजाराची परिणामता फार मोठी आहे.

💢आपल्याला खालील जिवनसत्वाची गरज असते.

🌀 1. सत्व - अ

💢शास्त्रीय नांव - रेटीनॉल

💢उपयोग - डोळे व त्वचा यांच्या आरोग्याकरिता

💢अभावी होणारे आजार - त्वचा, रोग व रात आंधळेपणा

💢स्त्रोत - टमाटे, अंडी, यकृत, भाज्या फळे, आवळा, सोयाबीन, मांस

🌀 2. सत्व - ब1

💢शास्त्रीय नांव - थायमिन

💢उपयोग - चेतासंस्थेचे आरोग्य

💢अभावी होणारे आजार - बेरीबेरी

💢स्त्रोत - धन्य, यीस्ट, यकृत,

🌀 3. सत्व- ब2

💢शास्त्रीय नांव - रायबोफ्लेविन

💢उपयोग - चयापचय क्रियेकरिता

💢अभावी होणारे आजार - पेलाग्रा

💢स्त्रोत - अंडी, यकृत, मांस, दूध व शेंगदाणे


🌀4. सत्व - ब3
💢शास्त्रीय नांव - नायसीन

💢उपयोग - त्वचा व केस

💢अभावी होणारे आजार - त्वचारोग व केस पांढरे

💢स्त्रोत - दूध, टमाटे, उस, यीस्ट, अंडी


🌀5. सत्व - ब6
💢शास्त्रीय नांव - पिरीडॉक्सीन

💢उपयोग - रक्त संवर्धनाकरिता

💢अभावी होणारे आजार - अॅनामिया

💢स्त्रोत - यकृत व पालेभाज्या


🌀6. सत्व - ब10
💢शास्त्रीय नांव - फॉलीक

💢उपयोग - अॅसीडरक्ताचे आरोग्य राखणे

💢अभावी होणारे आजार - अॅनामिया

💢स्त्रोत - यकृत


🌀7. सत्व - क
💢शास्त्रीय नांव - अॅस्कार्बिक, अॅसीड

💢उपयोग - दात व हिरड्यांच्या आरोग्याकरिता

💢अभावी होणारे आजार - स्कव्हा, हिरड्या सुजणे, हिरड्यांमधून रक्त येणे

💢स्त्रोत - लिंबुवगाय फळे, टोमॅटो, आवळा, संत्री, मोसंबी इत्यादि


8. सत्व - ड
💢शास्त्रीय नांव - कॅल्सिफेरॉल

💢उपयोग - दात, हिरड्या, हाडे व त्वचेचे आरोग्य

💢अभावी होणारे आजार - अस्थिचा मृदुपणा, दंतक्षय व त्वचा रोग

💢स्त्रोत - मासे, कोर्ड लिव्हर, ऑईल, अंडी सूर्याची कोवळी किरणे


🌀9. सत्व - इ
💢शास्त्रीय नांव - टोकोफेरॉल

💢उपयोग - योग्य प्रजननासाठी

💢अभावी होणारे आजार - वांझपणा

💢स्त्रोत - अंकुरित कडधान्ये, हिरव्या पालेभाज्या


🌀10. सत्व- के

💢शास्त्रीय नांव - नॅप्थोक्विनान

💢उपयोग - रक्त गोठण्यास मदत

💢अभावी होणारे आजार - रक्त गोठत नाही

💢स्त्रोत - पालेभाज्या व कोबी
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
पावसाळ्यात डेंग्यू झालेल्यांच्या संख्येत वाढ होते. काही वेळा या आजारामुळे मृत्यू होतो. हा धोका टाळण्यासाठी काळजी घेणे हाच उत्तम उपाय आहे.

@MPSCScience
पावसाळ्यात अनेकांना चिकुनगुन्या हा आजार होतो. या आजारामुळे काही मृत्यू होतो पण पुरेशी काळजी घेतल्यास चिकुनगुन्या झालेली व्यक्ती खडखडीत बरी होऊ शकते.

Join us @MPSCScience
रात्री उशिरा जेवून लगेच झोपल्यामुळे शरीराची हालचाल मंदावते. अन्न पचनाचा वेग मंदावतो. त्यामुळे रात्री उशिरा जेवून लगेच झोपणारे नकळपणे विविध समस्यांना आमंत्रण देऊ लागतात.

Join us @MPSCScience
डासांविषयी काही माहिती
LHC - Large Hydrogen Collider - भाग 1
LHC - Large Hydrogen Collider - भाग 2
LHC - Large Hydrogen Collider - भाग 3
विश्वाच्या x रे साठी पुढचे पाऊल