Forwarded from MPSC Science
📌भारताने स्विकारलेले विविध पर्यावरण विषयक आंतरराष्ट्रीय करार-
१) रामसर करार -
वर्ष - १९७१
* दलदली प्रदेशाचे पान पक्ष्यांचा प्रमुख अधिवास म्हणून संवर्धन व धोरणी वापर
* अमलात येण्याचे वर्ष - १९७५
* भारताने मान्य केला - १९८२
२) CITES -
वर्ष - १९७३
* संकटग्रस्त प्राणी व वनस्पतींमधील आंतरराष्ट्रीय व्यापाराचे नियंत्रण
*अमलात येण्याचे वर्ष - १९७६
* भारताने मान्य केला - १९८०
३) बोन करार -
वर्ष -१९७९
* स्थलांतर करणाऱ्या वन्य प्राण्यांचे व त्यांच्या अधिवासाचे संवर्धन व व्यवस्थापन
* अमलात येण्याचे वर्ष - १९८३
* भारताने मान्य केला -१९८३
४) व्हिएन्ना करार -
वर्ष - १९८५
* ओझोन थर संरक्षण* अमलात येण्याचे वर्ष - १९८८
* भारताने मान्य केला - १९९१
५) बँसेल करार -
वर्ष - १९८९
* हानिकारक त्याज पदार्थांची सीमापार होणारी हालचाल व विल्हेवाट
* अमलात येण्याचे वर्ष - १९९२
* भारताने मान्य केला - १९९
२६) UNFCCC -
वर्ष - १९९२
* हवामान बदल रोखणे
* अमलात येण्याचे वर्ष - १९९४
* भारताने मान्य केला - १९९३
७) UNFCCC अंतर्गत क्योटो करार - वर्ष - १९९७
* हरितवायू उत्सर्जनात घट
* अमलात येण्याचे वर्ष - २००५
* भारताने मान्य केला - २००२
८) CBD जैवविविधता करार - वर्ष -१९९२
* जैवविविधता व जैविक संसाधनांचे संवर्धन व व्यवस्थापन
* अमलात येण्याचे वर्ष - १९९३
* भारताने मान्य वर्ष - १९९४
९) CBD अंतर्गत कार्टाजेना प्रोटोकॉल -
वर्ष - २०००
* जनुकीय संशोधित जीवांच्या सीमापार होणाऱ्या जैवसुरक्षाहालचालींवर , हाताळणीवर व वापरावर नियंत्रण
* अमलात येण्याचे वर्ष - २००३
* भारताने मान्य केला - २००३
१०) वाळवंटीकरणाविरूद्ध संघर्षासाठी संयुक्त राष्ट्राचाकरार -
वर्ष - १९९४
* वाळवंटीकरणाविरूद्ध संघर्ष व दुष्काळ ( विशेषतः आफ्रिकेत ) निवारण
* अमलात येण्याचे वर्ष - १९९६
* भारताने मान्य केला - १९९६
११) रोटरडँम करार -
वर्ष - १९९८
* हानिकारक रसायनांच्या आंतरराष्ट्रीय व्यापारात पूर्वसुचित मान्यतेची पद्धत अमलात आणणे व त्यातून पर्यावरणाचे व मानवी आरोग्याचे संरक्षण करणे .
* अमलात येण्याचे वर्ष - २००४
* भारताने मान्य केला - २००५
१२) स्टॉकहोम करार -
वर्ष - २००१
*अ) मानवी आरोग्य व पर्यावरणांचे टिकून राहणाऱ्या सेंद्रिय प्रदुषकांपासून संरक्षण .
ब) एंडोसल्फान बंदी संबंधित करार
* अमलात येण्याचे वर्ष - २००४
* भारताने मान्य केला - २००६
______________________________________
Join us here @MPSCScience

🚀 क्रायोजेनिक इंजिन - criogenic engine 🚀
राज्यसेवा मुख्य परीक्षेत विज्ञान व तंत्रज्ञान एक महत्त्वाचा घटक आहे. त्यात मागील वर्षात येऊन गेलेल्या प्रश्नांचे विश्लेषण आधी बघू व त्यानंतर क्रायोजेनिक इंजिन या अवकाश तंत्रज्ञानाशी संबंधित उदाहरण बघू.
🛰भूस्थिर उपग्रह
भूस्थिर म्हणजेच जिओन्सिक्रोनस उपग्रह हे पृथ्वीच्या भूमध्य रेषेवर स्थित असतात व ते पृथ्वीच्या गतीनुसार पृथ्वीसोबत फिरत असतात. हे भूस्थिर उपग्रह आपल्या नावाप्रमाणे पृथ्वीच्या कक्षेत एकाच स्थानावर स्थिर असतात. भारताने याच भूस्थिर उपग्रह प्रक्षेपणात स्वदेशी क्रायोजेनिक इंजिनाची यशस्वी चाचणी घेतली. क्रायोजेनिक इंजिनाच्या माध्यमातून आता भारताने उपग्रह प्रक्षेपणात आपला झेंडा पृथ्वीबाहेर फडकवला आहे. यामुळे भारत क्रायोजेनिक क्लबचा सदस्य झाला.
🚀क्रायोजेनिक इंजिन
जीएसएलव्हीच्या तिसऱ्या टप्प्यात क्रायोजेनिक इंजिन वापरण्यात येते. भौतिकशास्त्रात अत्याधिक कमी तापमान निर्माण करणे व त्याचा वापर करणे यास क्रायोजनिक्स म्हणतात. जीएसएलव्हीच्या टप्प्यात अवजड उपग्रहाला पुढे ढकलण्यासाठी मोठ्या प्रमाणात ऊर्जा लागते. त्यामुळे कमी इंधनाचा वापर करून उपग्रहाला सुमारे ८०० सेकंदापर्यंत ढकलत नेहण्यासाठी क्रायोजेनिक इंजिनाचा वापर करण्यात येतो. क्रायोजेनिक इंजिनमध्ये इंधन म्हणून उणे २५३ सेल्सिअस द्रवरूप हायड्रोजन तर ऑक्सिडायझर म्हणून उणे १८३ सेल्सिअस द्रवरूप ऑक्सिजन वापरले जाते. इंजिनसाठी लागणारे इंधन अतिशीत आहे. त्यामुळेच त्याला 'क्रायोजेनिक इंजिन' म्हणतात.
🚀क्रायोजेनिक क्लब
जगातील फारच मोजक्या देशांकडे क्रायोजेनिक इंजिनासारखे यान आहे. भारताने या क्षेत्रात आपला यशस्वी ठसा उमटवून अमेरिका, रशिया, जपान, फ्रान्स व चीन या देशांच्या पंक्तीमध्ये आपला समावेश पक्का केला.
⛽️चांगले इंधन
हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे चांगले इंधन वापरण्यात येत असल्यामुळे यापासून निर्माण होणारी ऊर्जा ही खूपच चांगली ऊर्जा असते. त्यामुळे रॉकेट उड्डान अति वेगाने करणे शक्य होते. भारताच्या इंजिनाचे नाव CE-२० असून, हिंदुस्तान एरोनॉटिक्स कंपनीने त्याचे उत्पादन केले आहे. त्याची चाचणी 'इस्रो'चे ज्वलन सुविधा केंद्र महेंद्रगिरी येथे केली जाते.
🔹फायदे
क्रायोजेनिक इंजिनच्या वापरामुळे फार मोठ्या प्रमाणात भारताची आर्थिक बचत होणार आहे. पूर्वी भारताचे उपग्रह युरोपीय अंतराळ संस्थेच्या 'एरिअन' या प्रक्षेपकांच्या माध्यमातून प्रक्षेपित केले जात होते. भारताचा आता तो खर्च वाचणार आहे. क्रायोजेनिक इंजिनच्या माध्यमातून जड उपग्रहाचे प्रक्षेपण करणेही आता सोपे होणार आहे. मार्क-३सारखी भारताची पहिली मानवी अवकाश मोहीम साकारणे शक्य होणार आहे. ही मानवी मोहिम २०२० ते २०२५ सालापर्यंत शक्य आहे. क्रायोजेनिक इंजिनमुळे जीएसएलव्हीच्या प्रक्षेपणात प्रगती झाल्याचे दिसून येते. भारताचे जी-सॅट ६, जीएसएलव्ही-डी-५ने यशस्वी प्रक्षेपण करून दाखवले.
🚀क्रायोजेनिक पुढची आव्हाने
एखाद्या प्रयोगशाळेत क्रायोजेनिक इंजिनासाठी लागणारे कमी तापमान तयार करणे आणि द्रवरूप वायूत साठवणे शक्य असले तरी उपग्रहात त्याचा वापर करणे अवघड जाते. हायड्रोजन आणि ऑक्सिजन वायूंना वेगवेगळ्या टाक्यामध्ये साठवून नंतर त्यांना एका पाइपद्वारे विशिष्ट कम्बशन चेंबरमध्ये आणणे तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक आहे.
______________________________________
आमचे MPSC Science हे चॅनेल जॉईन करण्यासाठी @MPSCScience येथे क्लिक करा , आणि नंतर जॉईन वर क्लिक करून चॅनेल जॉईन करा .
_______________________________________
Telegram.me/MPSCScience

Telegram
MPSC Science
Here u can get all letest info about science and technology, useful for comp. exams.
@eMPSCkatta
@ChaluGhadamodi
@Jobkatta
@Marathi
@MPSCEnglish
@MPSCPolity
@MPSCEconomics
@MPSCGeography
@MPSCHistory
@MPSCScience
@MPSCAlerts
@MPSCCSAT
@MPSCMaterial_mv
@eMPSCkatta
@ChaluGhadamodi
@Jobkatta
@Marathi
@MPSCEnglish
@MPSCPolity
@MPSCEconomics
@MPSCGeography
@MPSCHistory
@MPSCScience
@MPSCAlerts
@MPSCCSAT
@MPSCMaterial_mv
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
🔹गोवर
गोवर हा विषाणुजन्य आजार आहे. या आजारात एक्झॅन्थम या नावाने ओळखले जाणारे पुरळ त्वचेवर येतात. गोवर हा रुबेला, पाच दिवसाचा गोवर किंवा हार्ड मीझल्स या नावानेसुद्धा ओळखला जातो.
वर्णन : गोवर हा जगभर आढळणारा आजार आहे. सध्याच्या गोवर लसीकरणाच्या प्रथेआधी दर दोन किंवा तीन वर्षानी हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात गोवराची साथ येत असे. एक वर्षाआड येणारी लहान गोवराची साथ ही सामान्य बाब होती. तान्ह्या मुलापासून ते आठ महिन्यापर्यंतच्या मुलामध्ये गोवराविरुद्ध नैसर्गिक प्रतिकार शक्ती असते. ही प्रतिकारशक्ती मातेच्या गर्भाशयातील पेशींमधून मुलास मिळालेली असते.
माणसाला कोणत्याही वयात एकदा गोवर होऊन गेला की त्याला तो पुढच्या आयुष्यात परत होत नाही.
◾️कारण आणि लक्षणे
गोवराचे कारण पॅरामिक्झोव्हायरस नावचा विषाणू. अति संसर्गजन्य प्रकारातील हा विषाणू आहे. ज्यास गोवर झाला आहे त्याचा खोकला, शिंका यातून विषाणू पसरतो. ८५% गोवर या प्रकारे पसरतो. एकदा गोवराच्या विषाणूचा संसर्ग झाला की आठ ते पंधरा दिवसात विषाणूचा संसर्ग झालेल्या ९५% व्यक्तींना गोवर होतो. गोवराची लक्षणे दिसण्यापूर्वी तीन ते पाच दिवस गोवर विषाणूचा संसर्ग झालेला असतो. नंतरच्या चार दिवसात गोवराचे पुरळ अंगावर येण्यास प्रारंभ होतो.
गोवराचे पहिले लक्षण म्हणजे ताप, नाक वाहणे , डोळे तांबडे होऊन डोळ्यातून पाणी येणे आणि खोकला. काहीं दिवसात तोंडामध्ये गालाच्या आतील बाजूस पुरळ उठतात. ते वाळूच्या आकाराचे पांढरे पुरळ तांबूस उंचवट्यावर असतात. या पुरळांस कॉप्लिक पुरळ असे म्हणतात. हे गोवराचे नेमके लक्षण आहे. घसा सुजतो, तांबडा होतो आणि खवखवतो.
◾️उपचार
गोवरावर नेमके उपचार नाहीत. उपचार रुग्णास आराम वाटावा यासाठी केले जातात. इतर जीवाणू संसर्ग झाल्यास प्रतिजैविके देण्यात येतात. ताप उतरण्यासाठी असिटॅमिनोफेन देण्यात येते. गोवर झालेल्या लहान मुलाना कधीही अॅस्पिरिन देऊ नये
◾️प्रतिबंध
गोवराचा प्रतिबंध लसीने उत्तम प्रकारे करता येतो. गोवराची लस गोवराच्या विषाणूपासून बनवलेली आहे. गोवराच्या विषाणूवरील सर्व प्रथिने शिल्लक असल्याने लस दिल्यानंतर शरीरात प्रतिकारशक्ती निर्माण होते. भविष्यकाळात गोवराच्या विषाणूबरोबर संपर्क आल्यास शरीर विषाणूचा त्वरित प्रतिकार करते.. वयाच्या १५ महिन्यापूर्वी बालकाची प्रतिकारशक्ती पुरेशी निर्माण न झाल्याने गोवराची लस १५ महिन्यानंतर देण्यात येते. या वयात लस टोचल्यास तयार होणारी प्रतिकार शक्ती दीर्घकाळ टिकते.
गर्भवती महिलाना गोवराची लस देऊ नये. याचे कारण गर्भारपणात गोवराची लस दिल्यास जन्मलेल्या बळास गोवर होण्याची शक्यता असते.
---–-------–------------------------–-------------
जॉईन करा @MPSCScience

Forwarded from MPSC Science via @bold
भारताचे रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र : नाग
संपूर्ण लेख वाचण्यासाठी Instant View बटनावर क्लिक करा
अधिक माहितीसाठी जॉईन करा @MPSCScience

Telegraph
भारताचे रणगाडा विरोधी नाग क्षेपणास्त्र
नाग हे संपूर्णत: स्वदेशी बनावटीचे ए टी एम म्हणजे "अँटी टॅंक मिसाईल' (क्षेपणास्र) आहे. तिसऱ्या पिढीचे रणगाडा विरोधी नाग हे गाईडेड क्षेपणास्र 4 कि.मी. अंतराच्या परिसरात असलेल्या शत्रूच्या रणगाड्यावर अचूकपणे आदळून त्याचा विध्वंस करू शकते. याला HET असेही म्हणतात.…
Forwarded from MPSC Science via @bold
भारताची संपूर्ण स्वदेशी उपग्रह यंत्रणा 'नाविक'
संपूर्ण लेख वाचण्यासाठी Instant View बटन वर क्लिक करा.

भारतीय अवकाश संशोधन संस्थेने दि. 28 एप्रिल 2016 रोजी ' इंडियन रिजनल नेव्हिगेशन सॅटेलाईट सिस्टिम' (आयआरएनएसएस - IRNSS) मालिकेतील सातवा उपग्रह श्रीहरिकोटा येथून यशस्वीरीत्या अवकाशात सोडला. या यशस्वी प्रक्षेपणामुळे भारताची संपूर्ण स्वदेशी बनावटीची स्थितीदर्शक…