MPSC Geography
139K subscribers
7.81K photos
82 videos
565 files
1.07K links
Download Telegram
देश, चीनदेखील आंतरराष्ट्रीय व्यापार सुरू होता.
दूरशेत रायगड पावसाळी पर्यटन
आंबा नदीच्या काठावर आणि सह्याद्री पर्वताच्या अंतर्गत असलेले रायगड जिल्ह्यातील दूरशेत (ता. खालापूर) हे गाव. हे गाव मोठमोठ्या डोंगर व दऱ्यांमुळे पर्यटनस्थळ म्हणूनही ओळखले जाते. तसेच महाराष्ट्रातील अनेक ट्रेकिंग ठिकाणांमधील एक प्रसिद्ध ठिकाण आहे. आजच्या धावपळीच्या जीवनशैलीपासून दूर जाऊन निसर्गाला जवळून पाहण्याचे हे एक सुंदर ठिकाण आहे. दूरशेत हे गाव पाली आणि महाडच्या दोन गणेश मंदिरांदरम्यान आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि कर्तलाब खान यांच्यामध्ये उंबरखिंडसाठी लढाई झाली होती. त्यामुळे हे एक ऐतिहासिक स्थळ म्हणूनही ओळखले जाते.

नाना फडणवीस वाडा, वाई : नाना फडणवीसांचा 245 वर्षांचा मेणवलीचा वाडा भारावून टाकणारा आहे. वाईपासूनच 10 कि.मी. अंतरावर मेणवली हे ठिकाण आहे. या ठिकाणचा घाट आणि नाना फडणवीस यांचा वाडा पेशवेकालीन स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना आहे. आजच्या काळातही स्थापत्य कलेला प्रेरणा देणारा हा वाडा असल्याचे जाणवते.

ताम्हणी घाट : सह्याद्रीच्या पर्वत रांगामध्ये वसलेल्या पश्चिम घाटामध्ये असलेले निसर्गरम्य ठिकाण म्हणजे ताम्हिणी घाट. मुळशी धरणाचा नयनरम्य देखावाही बघायला मिळतो आणि या छोट्याशा वर्षासहलीला नदीतील साहसी खेळांची (रिव्हर राफ्टिंग) जोडही देता येते. ताम्हिणी घाटात जाण्यासाठी मुंबई- गोवा महामार्गाने कोलाडपर्यंत जावे लागते. कुंडलिका नदीवरील पूल ओलांडला, की डाव्या बाजूला मुळशी धरणावरून पुढे पुण्याला जाणारा रस्ता लागतो. कोलाड आणि मुळशी धरणाच्या मधल्या भागात हा ताम्हिणी घाट आहे.

प्रबळगड : महाराष्ट्रामधल्या वेगवेगळ्या किल्ल्यांवर ट्रेकिंगला जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. महाराष्ट्रामध्ये चढण्याच्या दृष्टीने असे अनेक किल्ले धोकादायक आहेत. यातलाच एक किल्ला म्हणजे प्रबळगड. पनवेलजवळ असलेला हा किल्ला तब्बल 2300 फूट उंच आहे. प्रबळगड हा भारतातला सगळ्यात धोकादायक किल्ला मानला जातो. या किल्ल्यावर जायचा रस्ता प्रचंड धोकादायक आहे.

ट्रेकिंग स्थळे
माथेरानच्या कुशीत वसलेले भिवपुरी, दहीसरजवळील चिंचोटी, मुंबईपासून 2 तासांच्या अंतरावर असणारे तुंगारेश्वर, सह्याद्रीच्या पर्वतरांगात विल्सनडॅमपासून तयार झालेला इगतपुरीजवळील रांधा फॉल, खारघर परिसरातील पांडवकडा, खोपोली येथील झेनिथ धबधबा, मुंबई- पुणे महामार्गावरील पळसदरी, पनवेल परिसरातील गाढेश्वर धबधबा, फणसाड धबधबा, मुरुड-जंजिरा येथील सवतकडा, नवी मुंबई घणसोली गावाजवळील गवळीदेव धबधबा, बदलापूर जवळील कोंडेश्वर धबधबा, वांगणीजवळील भगीरथ धबधबा, नेरळजवळील टपालवाडी, भिवपुरीजवळील आषाणे धबधबा, माळशेज घाटाजवळील भिदबीचा धबधबा, निवळी घाटाजवळील निवळी धबधबा, कर्जतजवळील मोहिली धबधबा, मुरबाडजवळील पळुया धबधबा या ठिकाणी तुम्ही ट्रेकसुद्धा करू शकता. ठाणे जिल्ह्यातील जव्हार डोंगरदऱ्यांमधील दाभोसा धबधबा, नाशिक-त्र्यंबकेश्वर परिसरात असणारे कावनई. गडगडा, त्रिंगलवाडी, हरिहर, बसगड, अंजनेरी इत्यादींसारख्या बऱ्याच किल्ल्यांची सैर पावसात करता येते. धुळे, नंदुरबारजवळील तोरणमाळ हे ठिकाण पावसाळ्यात पाहण्यासारखे आहे. पुण्याहून भोरमार्गे महाडला जाणाऱ्या वाटेवर वरंधाघाट लागतो. वरंधाघाटालगतच कावळ्या या किल्ल्यावर जाता येते. डोंगरातून वाहणारे छोटे-छोटे झरे, धबधबे, बाजूला खोल दरी आणि त्या दरीत दिसणारे छोटेसे गाव आणि त्या गावालगत वाहणारी नदी, असे वेड लावणारे सौंदर्य वरंधघाटात आहे. वरंधघाटात उतरल्यावर शिवथरघळ येथील गुहा आणि गुहेबाहेर पडणारा पाऊस आणि धबधबा पाहण्यासारखा आहे.

माळशेज घाट :
अवघ्या महाराष्ट्राला आठवण होते ती माळशेज घाटाची. आकाशाला भिडलेल्या उत्तुंग कड्यांवर कोसळणारा मुसळधार पाऊस आणि शुभ्र खळाळत फेसाळत येणारे धबधबे, हिरव्या गालिच्यांवर हळुवार सरकरणाऱ्या दाट ढगांची गर्दी, त्यातून वळणे घेत मध्येच बोगद्यात जाणारा रस्ता हे अनुभवायचे असेल, तर अहमदनगर-कल्याण रस्त्यावरच्या माळशेज घाटात जायलाच हवे.

कणेरी मठ, कोल्हापूर :
कोल्हापूरपासून दहा-बारा कि.मी.वर असलेल कणेरीमठ या ठिकाणाची सहल ग्रामीण जीवनशैलीची सुंदर ओळख करून देते. कणेरीमठ येथील सिद्धगिरी म्युझियमप्रेक्षणीय आहे. ही सहल मोकळी हवा, हिरवागार परिसर आणि शहरातील दैनंदिन जीवनापेक्षा खूप वेगळा अनुभव देणारी अशीच ठरेल. सिद्धगिरी म्युझियम हे ठिकाण पुणे-बंगळूर महामार्गावर आहे.

टिपेश्वर वाघोबा :
यवतमाळ जिल्ह्याच्या मुख्यालयापासून अवघे ------ किलोमीटर अंतर असलेल्या टिपेश्वर अभयारण्यात वाघांचे मनसोक्त दर्शन गेल्या काही दिवसांपासून होत आहे. दुर्मिळ प्राणी समजल्या जाणाऱ्या आणि सर्वांचे आकर्षण असलेल्या वाघांचे सहज दर्शन होऊ लागल्याने अभयारण्यात पर्यटकांची दिवसेंदिवस गर्दी वाढत आहे.
टिपेश्वर येथे वाघोबाचे दर्शन घेण्यासाठी जावयाचे असल्यास पांढरकवडा येथून राष्ट्रीय महामार्ग 7 अदिलाबादकडे जाताना डाव्या बाजूस सुन्ना गावाजवळून
अभयारण्यात प्रवेश करता येतो.

कुडा लेणी :
मुरुड-जंजिऱ्यापासून जवळच असणाऱ्या कुडा येथील लेणी आसपासच्या निसर्गसौंदर्यामुळे पर्यटकांना आणि वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्यशैलीमुळे प्राचीन इतिहासाच्या अभ्यासकांना आकर्षित करतात. मुंबई-गोवा महामार्गावर मुंबईपासून माणगावच्या आग्नेयला कुडा हे रायगड जिल्ह्यातील एक शांत खेडेगाव आहे.

मालवण देवबाग :
देवबागच्या समुद्र किनाऱ्यावरील "सुनामी आयलंड' बघण्याची उत्सुकता होती..
"सुनामी आयलंड' हा एक निसर्गाचा चमत्कार आहे. या आयलंडला देवबागच्या किनाऱ्यावरून बोटीने जावे लागते. या सोयी उत्तम व किफायतशीरही आहेत. हा आयलंड तसा फार पूर्वीपासून या ठिकाणी आहे.

गोनी किल्ला :
जांभीवलीहून या किल्ल्याला जावे लागते. हा प्रवास लोणावळ्याहून सुरू होतो. बरोबर मार्गदर्शक हवा. लोणावळा-भीमाशंकर ही वाट उजव्या हाताला जंगलातून ही वाट जाते. उजवीकडे प्रचंड कातळ आणि डावीकडे खोल दरी. अरुंद वाट पार करताना कमालीच एकाग्रतेची आवश्कता आहे. येथे बहिरीदेवाची, श्रीगणेशाची आणि भवानीदेवीची मूर्ती आहे.
समुद्रकिनारा

श्रीवर्धन, हरिहरेश्वर :
रायगड जिल्ह्यातील ही पर्यटनस्थळे आहेत. येथील सुखद हवेची झुळूक, मऊ वाळू आणि समुद्राचे पाणी पर्यटकांना आकर्षून घेते. समुद्री अन्न, मासे, झिंगे, बोंबील यांची दुर्मिळता जाणवत नाही. श्रीवर्धन येथे पेशव्यांचे स्मारक आहे. पेशवे मूळचे श्रीवर्धन येथील होते. हरिहरेश्वर शहर हे शांत आणि आकर्षक म्हणून प्रसिद्ध आहे. येथील पुळण व हरिहरेश्वरचे मंदिर प्रसिद्ध आहे.

वेंगुर्ले-मालवण :
लांबवर विस्तारलेली पांढरी शुभ्र वाळू, चिकू, नारळ, आंबा अशा फळझाडांनी सजलेल्या टेकड्या यांनी वेंगुर्ले पर्यटनस्थळ म्हणून पर्यटकांची मान्यता मिळाली आहे. ही दोन्ही पर्यटनस्थळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहेत. वेंगुर्ल्याच्या पूर्व-पश्चिम आणि उत्तरेस खडकाळ प्रदेश आहे, तर माडांच्या झाडांमध्ये लपलेले मालवण शहरही खडकाळ क्षेत्रांनी वेढलेले आहे. मालवणचे खाद्यपदार्थही लोकप्रिय आहेत.

गणपतीपुळे :
रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटकांचे आकर्षण ठरलेले गणपतीपुळे या ठिकाणास नेत्रदीपक समुद्रकिनारा लाभला आहे. येथील स्वयंभू गणेशाचे मंदिर कित्येकांचे श्रद्धास्थान आहे. स्वच्छ समुद्र किनारा, स्वच्छ पाणी, महत्त्वपूर्ण वनस्पती, माड आणि पाणथळ झाडे यांनी गणपतीपुळे समृद्ध बनले आहे. येथून 25 किलोमीटर अंतरावर रत्नागिरी हे जिल्ह्याचे ठिकाण आहे.

डहाणू- बोर्डी :
ठाणे जिल्ह्यातील डहाणू हे समुद्रकिनाऱ्याला लागूनच विस्तारलेले शहर आहे. डहाणू ते बोर्डी असा 17 किलोमीटरचा किनारा विस्तारला आहे. डहाणू फळझाडांच्या रांगांनी सजलेले आहे. चिकूसाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे. पर्शियनांचे धर्मस्थळ उद्वाडा हे येथून जवळच आहे.
#eMPSCkatta_Current_Affairs

🔹राज्यातील 22 जीआयमध्ये जळगावातील केळी, वांग्यांचा समावेश

देशातील केळी उत्पादनात जळगावचा वाटा १६ टक्के आहे, पण भौगोलिक उपदर्शन (जीआय अर्थात जीआॅग्रॉफीकल इंडिकेशन) नसल्याने या केळीची वाताहत झाली. ही बाब लक्षात घेता जळगावच्या केळीला युरोप, आखाती राष्ट्रांची द्वारे खुली व्हावीत यासाठी तब्बल साडेतीन वर्षे अथक परिश्रमानंतर जळगावच्या केळीला जीआय मानांकन मिळाले आहे. केळीप्रमाणेच भरीताच्या वांग्यांनाही जीआय मानांकन मिळाले आहे.

राज्यात आज फक्त २२ कृषी उत्पादनांना जीआय मानांकन मिळाले. त्यात फक्त जळगाव व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी दोन उत्पादनांचा समावेश आहे. जिल्ह्यात मागील पाच वर्षे ५० हजार हेक्टरपर्यंत केळीची सरासरी लागवड झाली. देशाच्या केळी उत्पादनात जळगावचा वाटा १६ टक्के आहे. पण निर्यातीबाबत फारसी प्रगती झाली नाही. पंजाब, दिल्ली, मुंबईपर्यंतच केळी पाठविण्यात येत होती. देशात उत्तर प्रदेश, छत्तीसगढ नव्हे तर सेव्हन सिस्टर राज्यांतही केळीची लागवड होऊ लागल्याने जळगावच्या केळीची मागणी कमी झाली. जळगावच्या केळीत फायबर अधिक आहे. तापी व गिरणा खोऱ्यातील गाळाच्या जमिनीत रसायनांच्या कमी वापरात केळी उत्पादन घेण्याचे वैशिष्ट्य शेतकऱ्यांनी जपले. पण निर्यातीची संधी मिळाली नाही.

काय आहे जीआय कायदा

९५ टक्के आंतराष्ट्रीय व्यापार हा जागतिक व्यापार संघटनेच्या देखरेखीत होतो. या संघटनेने उत्पादनांच्या निर्यातीसाठी जीआय कायदा आणला. देशात २००१ मध्ये तो स्वीकारण्यात आला. या कायद्यांतर्गत चार करारांनुसार जीआय मानांकन असलेल्या संस्थांना निर्यातीसाठी महत्त्व देण्यात येते. ही बाब जिल्ह्याचा कृषी विभाग व शेतकरी यांनी समजून घेतली.

तांदलवाडीच्या शेतकऱ्यांचा पुढाकार

केळीला जीआय मानांकन मिळावे यासाठी तांदलवाडी (ता. रावेर) येथील शशांक पाटील व त्यांच्या सहकारी शेतकऱ्यांनी आपल्या निसर्गराजा कृषी विज्ञान मंडळाला जीआय मानांकन मिळावे यासाठी पुढाकार घेतला. मागील साडेतीन वर्षे त्यासाठी दिल्ली येथील वाणिज्य मंत्रालयांतर्गत आयोजित जीआय मानांकनच्या सुनावण्यांना हजेरी लावली. त्यासाठी रावेरातून ५० ते ५३ किलोचे केळीचे घड दिल्ली येथे न्यावे लागायचे. दाक्षिणात्य जिल्ह्यातूनही केळीला मानांकन मिळण्यासाठी अर्ज आले होते. एवढी स्पर्धा असताना जळगावच्या शेतकऱ्यांनी बाजी मारली व जीआय मिळविले. ३० डिसेंबर २०१६ रोजी त्यासंबंधीचे पत्र वाणिज्य मंत्रालयाकडून मिळाले.

१६० देशांमध्ये निर्यात

जळगावची केळी व भरीताची वांगी यांची निर्यात होण्यास जीआय मानांकनामुळे चालना मिळेल. अलीकडेच आखाती राष्ट्रांमध्ये केळीची निर्यात झाली आहे. पाकिस्तानकडूनही केळीची मागणी आहे. ज्या संस्थांना जीआय मानांकन आहे त्यांच्या उत्पादनांच्या निर्यातीला जागतिक व्यापार संघटना प्राधान्य देते. जीआय मानांकन प्राप्त उत्पादन दर्जेदार, खात्रीलायक असल्याचा संकेत जागतिक व्यापार संघटनेने आपल्या व्यापारात सहभागी १६० देशांना दिला आहे. यामुळे आखाती, युरोप, आशियाई आदी १६० देशांमध्ये केळी व वांग्यांची निर्यात करता येईल.

भरीताच्या वांग्यांनाही जीआय मानांकन
खान्देशकन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे माहेर असलेल्या आसोदा ता.जळगाव येथील किशोर चौधरी व त्यांच्या सहकारी शेतकऱ्यांनी नवनिर्मिती शेतकरी मंडळाच्या माध्यमातून भरीताच्या वांग्यांना जीआय मानांकन मिळण्यासाठी वाणिज्य मंत्रालयाकडे नोंदणी केली. या मंडळानेही साडेतीन वर्षे सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करून हे मानांकन मिळविले आहे. आसोदासह बामणोद, पाडळसा, भालोद भागातील भरीताची वांगी प्रसिद्ध आहे. जिल्ह्यात दीड हजार हेक्टरवर भरीताच्या वांग्यांची लागवड जुलै, आॅगस्ट, सप्टेंबर, आॅक्टोबर या महिन्यांमध्ये केली जाते. त्याचे बियाणे कृषी केंद्रांवर मिळत नाही. हे बियाणे परंपरेनुसार खादीच्या स्वच्छ कापडात जतन केले जाते. वाफ्यात त्याची पावसाळ््याच्या सुरुवातीलाच रोपे तयार करतात. कांदे, भात प्रमाणे त्याच्या रोपांची लागवड केली जाते. साधारणत: ७५ ते ८० दिवसात त्याचे उत्पादन सुरू होते. जळगावचे भरीत पुणे, मुंबईतील हॉटेलमध्येही पाठविले जाते. या वांग्यांच्या निर्यातीला चालना मिळावी यासाठी त्यांनीही जीआय मानांकन मिळविले. वांग्यांनाही ३० डिसेंबर २०१६ रोजी केंद्रीय वाणिज्य मंत्रालयातर्फे मानांकन मिळाले. जिल्हा कृषी विभागाने पुणे येथील ग्रेट मिशन ग्रूप कन्सल्टन्सीचे डॉ.गणेश हिंगमिरे यांची यासाठी मदत झाली.

आमच्या कृषी विज्ञान मंडळाने साडेतीन वर्षांपूर्वी केळीला जीआय मानांकन मिळण्यासाठी वाणिज्य मंत्रालय (भारत सरकार) यांच्याकडे अर्ज केला. त्यासाठी आम्हाला तीनदा दिल्ली, मुंबई येथे केळी शास्त्रज्ञ, तज्ज्ञांसमोर सादरीकरण करावे लागले. स्पर्धा मोठी होती. पण जळगावच्या केळीचा गोडवा, त्याचे उपपदार्थ, त्यातील जीवनसत्व, फायबर ही वैशिष्ट्ये महत्त्वाची ठरली. अखेर आम्हाला यश मिळाले. -शशा
ंक पाटील, अध्यक्ष, निसर्गराजा कृषी विज्ञान मंडळ, तांदलवाडी ता.रावेर (जळगाव)

जळगावची भरीताची वांगी राज्यभर प्रसिद्ध आहेत. त्यांचा मोठा आकार, अत्यल्प बिया, पाणीदारपणा, विशिष्ट चव हे देशात कुठेच आढळत नाही. या सर्व वैशिष्ट्यांची नोंद केंद्रीय वाणिज्य विभागाने घेतली. याचा आम्हाला आनंद आहे. -किशोर चौधरी, अध्यक्ष, नवनिर्मिती शेतकरी मंडळ, आसोदे ता.जळगाव

जीआय मानांकनासाठी भाजीपाला, पपई व इतर पिके घेणारे शेतकरीही अर्ज सादर करू शकतात. प्रक्रिया उद्योगांबाबतच्या अडचणी असल्याने उत्पादन जादा आले तर दर पडतात. पण जीआय मानांकनामुळे आपल्याला निर्यातीची द्वारे खुली होतील. कृषी विभाग त्यासाठी सतत मदतीसाठी पुढे येईल. -अनिल भोकरे, कृषी उपसंचालक, जळगाव

https://t.me/chalughadamodi/3685
Forwarded from MPSC Material
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Loksatta - लोकसत्ता
🔹तामिळनाडूतील सत्यमंगलम अभयारण्य

भारताच्या पश्चिम घाटात वसलेले तामिळनाडूतील सत्यमंगलम वन्यजीवन अभयारण्य आणि व्याघ्र प्रकल्प हे संरक्षित क्षेत्र आहे. सत्यमंगलमला २००८ मध्ये वन्यजीव अभयारण्य घोषित करण्यात येऊन २०११ मध्ये त्याची व्याप्ती वाढविण्यात आली. १,४११.६ चौरस कि.मी.चे क्षेत्र असलेले सत्यमंगलम तामिळनाडूतील सर्वांत मोठे अभयारण्य आहे. २०१३ मध्ये त्याला व्याघ्र प्रकल्प घोषित करण्यात आले. सत्यमंगलम उष्णकटीबंधीय शुष्क जंगल असून, ते पूर्व आणि पश्चिम घाटाला जोडते. २००९ मध्ये करण्यात आलेल्या प्राणिगणनेनुसार येथे १० वाघ, ८६६ भारतीय हत्ती, ६७२ गवे आणि २७ बिबटे होते. तथापि, २०१२ च्या गणनेत पंचवीसहून अधिक वाघ येथे दिसून आले. जगात सर्वाधिक आशियाई हत्ती येथेच आहेत. सत्यमंगलममध्ये हरणांच्या विविध प्रजाती असून, जंगली म्हशींचे कळपही आढळून येतात. या अभयारण्यात इलुगा आणि सोलिगा या दोन आदिवासी जमातींच्या वसाहती असून, मध आणि इतर वनसंपदेद्वारे त्यांचा उदरनिर्वाह चालतो. कुख्यात चंदनतस्कर वीरप्पनचे तस्करी साम्राज्यही याच जंगलात होते. तो हत्तींना मारून त्यांच्या दाताची तसेच चंदनाच्या झाडांची तस्करी करीत असे. प्रसिद्ध कन्नड अभिनेते राजकुमार यांचे अपहरण करणाऱ्या वीरप्पनने अनेकांची हत्या केली होती. २००४ मध्ये तामिळनाडू पोलिसांनी या क्रूरकर्म्याला ठार केले होते.

https://t.me/MPSCGeography/794
🔹दुधवा राष्ट्रीय उद्यान

उत्तर प्रदेशातील दुधवा राष्ट्रीय उद्यान वाघ आणि रेनडिअरसाठी जगप्रसिद्ध आहे. दुधवाचा उत्तर किनारा नेपाळसोबतच्या आंतरराष्ट्रीय सीमेला लागून असून, त्याच्या दक्षिणेला सुहेली नदी वाहते. दुधवात घनदाट हिरवेगार जंगल, उंच गवत आणि अनेक प्रकारचे वृक्ष आढळून येतात. हरणांच्या अनेक प्रजातींशिवाय वाघ, बिबट्या, रेनडीअर, हत्ती, कोल्हा, तडस आणि एकशिंगी गेंडा आदी प्राणी येथे आहेत. मोरासह पक्ष्यांच्या अनेक प्रजातींचेही हे वस्तिस्थान आहे. दुधवा हे उत्तर प्रदेशातील जैव विविधतेने समृद्ध असे सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान असून ते खिरी जिल्ह्यात आहे. १ फेब्रुवारी १९७७ साली दुधवा जंगलाला राष्ट्रीय उद्यान घोषित करण्यात आले. त्यानंतर १९८७-८८ मध्ये किशनपूर वन्यजीव क्षेत्राला दुधवात सामील करून याला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा दिला गेला. दुधवात सरासरी १५०० मि.मी. पाऊस होतो. नोव्हेंबर ते फेब्रुवारीदरम्यान येथे कमाल तापमान २० ते २० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान ४ ते ८ अंश सेल्सिअस असते. पहाटे धुके आणि रात्री थंडी पडते. मार्च आणि मेदरम्यान कमाल तापमान ३० ते ३५ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २० ते २५ अंश सेल्सिअससह वातावरण आल्हाददायक असते. जून ते आॅक्टोबर या काळात उन्हाळा असला तरी येथे मुसळधार पाऊस पडतो.
https://t.me/MPSCGeography/796
Forwarded from Loksatta - लोकसत्ता
New Doc 2017-01-25 - पेंच व्याघ्र प्रकल्प
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
भारतातील राज्यांचा निर्मितीनुसार क्रम.

@MPSCGeography
🔹गंगा नदी :-
---------------------------------------------

• उगम :- उत्तराखंडात उत्तर काशी जिल्ह्यात गंगोत्री हिमनदीपासून (७०१० मी) भगीरथी आणि देवप्रयाग येथे अलकनंदापासून 'गंगा' नावाचा
प्रवाह.

• त्रिभुज प्रदेश :- प. बंगाल व बांग्लादेशात गंगा- ब्रम्हपुत्रा त्रिभुज प्रदेश.

• गंगेच्या प्रवाहाची निर्मीती : भगीरथी व
अलकनंदा नद्यांच्या संयुक्त प्रवाहास.

• भगीरथी : गंगोत्री हिमनदीची हिमगुहा.

• अलकनंदा : तिबेट सरहद्दीजवळ अलकनंदा शीर्षप्रवाहाचा उगम. विष्णुगंगा व धौलीगंगा यांचा एकत्रित प्रवाह.

• डावा किनारा : रामगंगा, गोमती, तमसा किंवा पूर्व तोन्स, घाघरा (शरयू), गंडकी, बुरी गंडक, कोसी, महानंदा.

• उजवा किनारा : यमुना ( उपनद्या चंबळ, सिंद, बेटवा, केन) ; शोण, दामोदर
-----------------------------------------
Join us @MPSCGeography
🔹 यमुना नदी :-

• उगम :- उत्तरराखंडात उत्तर
काशी जिल्ह्यात जन्मोत्री हिमनदी

• संगम : गंगा & यमुनेचा संगम अलाहाबाद (प्रयाग)

• डावा किनारा : तोन्स, कार्वान, सेंगर

• उजवा किनारा : गिरी, बाणगंगा, चंबळ, सिंद, बेटवा, केन

• गंगा नदीची सर्वात लांब आणि महत्त्वाची उपनदी यमुना नदी. बहुतेक प्रवाह गंगेला समांतर.
-------------–-------------------
Join us t.me/MPSCGeography
🔹शोण नदी :-
------------------------------------
• उगम : अमरकंटक पठार (६०० मी)

• संगम : मनेर (पाटणा) येथे गंगा-शोण संगम.

• जोहिला, गोपत, रिहांद, कनहार आणि उत्तर कोयल.
-----------------------------------
t.me/MPSCGeography