MPSC Geography
139K subscribers
7.77K photos
82 videos
562 files
1.06K links
Download Telegram
#eMPSCkatta_Current_Affairs

🔹जादूच्या तांदळाची पन्नास वर्षे

जगभरातील लाखो लोकांना उपासमारीपासून वाचविणार्या भारताच्या जादूई तांदळाचा म्हणजे आयआर आठ जातीच्या तांदळाचा सुवर्ण महोत्सव साजरा केला जात आहे. आशिया त्यातही भारतात उपासमारीच्या सीमेवर असलेल्या लोकांना जगविण्यासाठी एक चांगला पर्याय या तांदळाच्या रूपाने मिळाला होता व त्यामुळेच त्याला जादूचा तांदूळ असे नांव पडल्याचे सांगितले जाते.

५० च्या दशकात देशात तसेच जगाच्या कांही भागात खाद्यान्न संकट ओढवले होते त्यावेळी भरपूर उत्पादन व तेही कमी दिवसांत देणारी तांदळाची ही जात विकसित करण्यात आली होती. या तांदळाचे आशियातील अनेक भूकेल्यांची भूक भागविली. फिलिपिन्स येथील आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थेत क्रॉस ब्रिडींगच्या सहाय्याने ही जात विकसित केली गेली होती.खोल संशोधनानंतर ती जगासमोर आयआर आठ या नावाने आणली गेली व शेतकर्यांमध्येही ही जात फार लोकप्रिय ठरली.

आंध्रात ही जात प्रथम लावली गेली तेव्हा सर्वसाधारण तांदळाचे पीक हाती यायला १६० ते १७० दिवस लागतात त्याऐवजी हा तांदूळ १३० दिवसांत व बंपर स्वरूपात शेतकर्यांना उत्पादनात मिळाला. त्यावरून त्याला मिस्टर आयआर आठ असे नांवही दिले गेले.

हा तांदूळ म्यानमारमध्ये मॅग्या, मलेशियात पादीरिया, इंडोनेशियात पेटा बास आठ, मेक्सिकोत मिलागरो फिलिपिनो या नावाने ओळखला जातो. पाकिस्तान, बांग्लादेश, चीन, ब्राझील, अर्जेंटिना, श्रीलंका, तैवान, कोरिया व अमेरिकेतही या जातीचा तांदूळ आवडीने खाल्ला जातो व तो शेतकर्यांसाठी फायदेशीर पीक ठरला आहे. आंध्रातील एका शेतकर्याने सुरवातीलाच या तांदळाच्या विक्रीतून झालेल्या नफ्यात होंडा मोटरबाईक खरेदी केली होती व या तांदळाचे नांव होंडा राईस असे ठेवले होते.
Forwarded from Deleted Account
Forwarded from Deleted Account
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
ठोकळा- PSI/STI/ASO

Bee Publication

IMP for Upcoming STI/PSI Exam
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
ठोकळा Bee Publication.pdf
5.4 MB
ठोकळा- बी पब्लिकेशन

PSI-STI-ASO Guide

Bee Publication
#eMPSCkatta_Current_Affairs

🔹लवकरच रद्द होणार गव्हावरील आयात कर

गव्हावर जारी करण्यात आलेला १० टक्के आयात कर रद्द करण्याबाबत केंद्र सरकार आता विचाराधीन असून तापमानात हिवाळय़ामध्येही झालेली वाढ पाहता, हा निर्णय मिळणा-या संकेतामधून घेण्यात येणार असल्याचे समजते. विभागाच्या माहितीनुसार, गव्हाच्या उत्पादनावर तापमानात होणा-या बदलामुळे मोठय़ा प्रमाणात परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी आणि किमतीत होणारी वाढ रोखण्यासाठी आयात कर घटविल्याने व्यापक मदत होणार असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले. या प्रस्तावाला पंतप्रधान कार्यालय आणि अर्थ मंत्रालयाकडे मंजुरीसाठी अन्न मंत्रालयाकडून पाठविण्यात आले आहे.

तापमानातील बदलाचा कमी-अधिक प्रमाणात गव्हाच्या उत्पादनावर परिणाम होतो. तापमान आगामी वर्षात फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात अधिक राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. जर तापमानात १ डिग्री सेल्सियसने वाढ झाल्यास गव्हाच्या उत्पादनात १० टक्क्यांनी घट होण्याची शक्यता आहे. याबाबत कृषिमंत्री राधामोहन सिंह आणि कृषि सचिव शोभा पटनायक यांनी गव्हाच्या पिकाबाबतचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे.
#eMPSCkatta_Current_Affairs

🔹जर्मनीत शरणार्थी मुसलमान बनत आहेत ख्रिश्चन

आपला देश सोडून जर्मनीत आलेले काही मुसलमान ख्रिश्चन धर्म स्वीकारत आहेत. अशा लोकांची संख्या अधिक नसली, तरी ती वाढत आहे, असे वृत्त जर्मनीची सरकारी माध्मय संस्था डॉयट्शे वेलेने दिले आहे.

या लोकांच्या धर्मांतराची कारणे वेगवेगळी आहेत. सबकी वजहें भी अलग अलग हैं. बर्लिन येथील एका चर्चमध्ये वेरोनिका, फरीदा आणि मतीन या इराणी नागरिकांच्या धर्मांतराचे उदाहरण या संस्थेने दिले आहे. मी खूप खूप खुश आहे. मला काय वाटच आहे, हे मला सांगता येत नाहीये, असे मतीन म्हणत असल्याचे बातमीत म्हटले आहे.

अशा प्रकारे अनेक मुस्लिम शरणार्थी ख्रिश्चन बनले आहेत. जर्मनीत 2015 मध्ये सुमारे नऊ लाख शरणार्थी आलेले आहेत. चर्च अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे, की ख्रिश्चन बनणाऱ्यांची संख्या खूप जास्त नाही परंतु लोक धर्मांतर करत आहेत, हे नक्की. मात्र या संदर्भात आकडेवारी जाहीर करण्यात आलेली नाही. जर्मनीच्या वायव्य भागात असलेल्या स्पेयर येथील चर्चचे पादरी फेलिक्स गोल्डलिंगर यांनी सांगितले, आमच्या चर्चमध्ये धर्मांतराची तयारी करत असलेले अनेक शरणार्थी समूह आहेत. अशा अर्जांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यातील बहुतांश लोक इराण आणि अफगानिस्तानमधील आहेत, मात्र काही जण सीरिया आणि इरिट्रिया येथील असल्याचेही गोल्डलिंगर यांनी सांगितले.

मात्र या लोकांना लगेच ख्रिश्चन बनवले जात नाही. धर्मांतराची तयारी सुमारे एक वर्ष चालते. या दरम्यान धर्मांतरास इच्छुक असलेल्यांना धर्मांतराची आपली इच्छा परत तपासून पाहायला सांगितले जाते. गोल्डलिंगर म्हणतात, लोक ख्रिश्चन धर्म स्वीकारत आहेत, याचा आम्हाला स्वाभाविकच आनंद आहे. परंतु ते आपल्या निर्णयावर ठाम राहतील, हेही खूप आवश्यक आहे. मी त्यांच्याबाबत खात्री देऊ शकत नाही, परंतु बाप्तिस्मा झाल्यानंतर त्यांच्यापैकी बहुतेक जण ख्रिश्चन म्हणूनच जगतात.

लिंके म्हणतात, की धर्मांतर करणारे काही लोक इराणमध्ये चर्चच्या संपर्कात होते, परंतु तेथे धर्मांतरावर बंदी आहे. म्हणून त्यांना तेथून पलायन करावे लागले. यातील काही जणांची युरोपला जाताना ख्रिश्चन लोकांशी गाठ पडली. अर्थात् काही प्रकरणांमध्ये जर्मन समाजात उत्तम प्रकारे मिसळता यावे किंवा शरण मिळण्याची शक्यता वाढावी, यासाठी धर्मांतर झाल्याचे चर्चचे अधिकारी मान्य करतात.

मात्र आपापल्या भागांमध्ये या लोकांना छुपेपणानेच वावरावे लागते. शरणार्थी शिबिरांमध्ये त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते, कारण तिथे बहुसंख्या मुस्लिमांची असते, असे युनियन ऑफ फ्री जर्मन इव्हँजेलिकल चर्चेसचे स्थलांतरविषयक अधिकारी थॉमस क्लाम्ट यांनी एएफपी या वृत्तसंस्थेला सांगितले.
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
Pavel Durov. ( Russian )

The Founder of Telegram Messaging App.
ह्युमिक अँसिड

१५ कारणे का वापरावे पिकांसाठी ह्युमिक अँसिड

सेंद्रिय शेतीचे महत्त्व आता सर्वांनाच समजले आहे. परंतु हि शेती अधिक कार्यक्षम पद्धतीने कशी करु शकतो हे शेतक-याने जाणुन घेणे खुप महत्वाचे आहे. सेंद्रिय शेती अधिक फायदेशिर करण्यासाठी शेतीसाठी लागणारे आवश्यक घटकांचा म्हणजेच माती, पाणी, हवा यांचा अधिक प्रभावीपणे वापर कसा करता येईल ते पहाणे गरजेचे आहे. यासर्व घटकांचा पुरेपुर वापर करण्यासाठी ह्युमस /ह्युमिक अँसिडचा वापर करणे आवश्यक आहे. ह्युमिक अँसिडचा वापर करणे प्रत्येक शेतक-यासाठी अनिवार्यच झाले आहे.

ह्युमस /ह्युमिक अँसिड?

ह्युमस म्हणजे सेंद्रिय घटक म्हणजेच पालापाचोळा, जनावरांची विष्टा, शेतातील इतर सेंद्रिय पदार्थ यांच्या विघटनातुन तयार होणारा पदार्थ आहे. हा पदार्थ म्हणजे अनेक सेंद्रिय घटकांचे मिश्रण असुन हे पिकांच्य सर्वांगिण वाढीसाठी अतिशय आवश्यक आहे.

ह्युमिक अँसिडचे गुणधर्म

ह्युमिक अँसिड हे खत नसुन यात अतिशय अल्प प्रमाणात सुक्ष्म व मुख्य अन्नद्रव्ये असुन मातीचे भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्म सुधारणारे भुसुधारक आहे.हे मानवनिर्मीत नसुन पुर्णपणे नैसर्गिक पदार्थ आहे.ह्युमिक अँसिडमध्ये कार्बनचे प्रमाण अधिक असुन हायट्रोजन अतिशय अल्प प्रमाणात असतो. तसेच त्यात ४% पर्यंत नत्र असते.ह्युमिक अँसिड हे मुख्य करुन पावडर, दाणेदार स्वरुपात तसेच द्रवरुपातही वापरता येते.

ह्युमिक अँसिडचे फायदे

ह्युमिक अँसिडमुळे मातीची रचना सुधारते तसेच पिकाची नत्र, स्फुरद, पालाश शोषण्याची क्षमता ही सुधारते.
मातीचा सामु स्थिर ठेवण्यास फायदेशिरनत्र स्थिरिकरण क्षमतेला चालना देऊन मातीतील नत्राची कमतरता भरुन काढते.ह्याचाच परिणाम त्या मातीतील पीक सशक्त व टवटवीत रहाण्यास फायदेशिर ठरते.
ह्युमिक अँसिडचा वापर केल्यास पिकांसाठी आवश्यक असणा-या बुरशींची वाढ होऊन ह्या बुरशीमुळे मातीपासुन उद्भवणारे रोगांपासुन संरक्षण मिळण्यास मदत होते.
ह्युमसयुक्त मातीमधील जलधारण क्षमता साधारण मातीच्या सातपट अधिक असते म्हणुनच दुष्काळयुक्त भागात ह्युमिक अँसिडचा वापर खुप महत्वाचा आहे.
जमिन हलकी होउन त्यात हवा खेळती राहते व मुळांची वाढ चांगली होते.याच्या वापरामुळे जमिनीतील स्फुरद, कल्शिअम, लोह यांचे उपलब्ध रुप तयार होते व पिकास हि अन्नद्रव्ये उपलब्ध स्वरुपात मिळतात.
बीजप्रक्रिया म्हणुन वापर केल्यास बियांची उगवण चांगली होण्यास मदत होते.
ह्युमिक अँसिडच्या वापरामुळे जिवाणुंना कार्बन पुरविला जातो व त्यामुळे जिवाणुंची संख्या वाढते.सोडियम व इतर विषारी रसायनांपासुन मातीवर होणारे दुष्परिणाम थांबवण्यास हे अतिशय उपयोगी पडते.
युरिया तसेच इतर रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिन नापिक होण्यापासुन वाचवते.रासायनिक खतांची कार्यक्षमता ३०% पर्यंत वाढवते त्यामुळे खतांचा खर्च कमी येतो.
सर्वात महत्वाचे म्हणजे पिकांच्या पांढ-या मुळींची वाढ जलद होते.
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
देशभरातील मेट्रो प्रकल्प
Forwarded from Deleted Account