MPSC Geography
139K subscribers
7.8K photos
82 videos
564 files
1.07K links
Download Telegram
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
🚫 सर्व सदस्यांसाठी टेलिग्राम विषयी काही महत्त्वाचे 🚫

बरेच दिवसापासून म्हणजे अगदी सुरवातीपासून ( चॅनेल्स सुरु झाल्यापासून ) मला एक प्रश्न विचारला जातोय
" टेलिग्राम वरील वाचून झालेले / मागील msg डिलीट कसे करायचे ? "

बरेच दिवस झाले याबद्दल लिहावं असं ठरवत होतो पण योग आला .
असो , मी हि चॅनेल्स सुरु करताना खूप पुढचा विचार करूनच सर्व Messaging Apps च्या पडताळणी नंतर , त्यामधील फीचर्स पाहूनच शेवटी टेलिग्राम हे ऍप आपल्या या सुविधेसाठी निवडले होते.

तर, आपल्या msg डिलीट करण्याच्या प्रश्नाबाबत बोलायचे तर , असे काही करण्याची गरज नाही , म्हणजे सोप्या भाषेत msg डिलीट करण्याच्या फंदात पडू नका, कारण असा कोणताही पर्याय तुमच्याकडे नाही आहे( तो पर्याय फक्त Admin कडे आहे).

मग उरतो प्रश्न कि, असा पर्याय का नाही?
तर टेलिग्राम ह्या ऍप वरील सर्व msg हे आपल्या मोबाईल मध्ये सेव्ह न होता ते सर्वर वरती सेव्ह होतात( सोप्या भाषेत सांगायचे तर , ते online सेव्ह होतात). आता मोबाईल मध्ये सेव्ह होत नाहीत म्हणजे मोबाईल मधील मेमरी खात नाहीत.

बऱ्याच जणांचा गैरसमज आहे की , टेलिग्राम वरील msg मुळे टेलिग्राम ऍप खूप जास्त जागा ( मेमरी ) घेते. पण असं काही नाही , माझी खात्री आहे की आपल्या मोबाईल मधील जास्तीत जास्त 60-80 Mb जागा हे ऍप घेत असेल.

तसेच टेलिग्राम सेटिंग मध्ये जाऊन तुम्ही मीडिया ऑटो डाउनलोड , फोटो डायरेक्ट गॅलरी मध्ये सेव्ह करावेत कि नको हेही निवडू शकता. त्यामुळे या ऍप ची साईझ आणखी कमी होण्यास मदत होईल.

तुम्ही जसजसे मागील msg वाचत जाल तसतसे मागील msg लोड होत जातील, अगदी आम्ही केलेली पहिली पोस्टही तुम्ही पाहू शकता .

तेंव्हा आता msg डिलीट करायच्या फंदात पडू नका व अगदी निःसंकोचपणे आपल्या या सेवेचा लाभ घ्या .

आणि हो आपल्या या टेलिग्राम चॅनेल्स च्या सेवेमध्ये आपल्या सर्व मित्राना जॉईन करायला विसरू नका.

प्रशासक- @eMPSCkattaAdmin
--------------------------------------------

https://telegram.me/empsckatta
पीक उत्पादनात आघाडीवर असणारी राज्ये
भारतातील पिकांचे ऋतू
For more updates join us @MPSCGeography
#eMPSCkatta_Current_Affairs

🔹खरिपाच्या वाढलेल्या क्षेत्रामुळे रब्बीच्या पेरण्या खोळंबल्या

नाशिक - नगर , नाशिक, जळगाव , धुळे, नंदूरबार जिल्ह्यांत यंदा खरिपाचे क्षेत्र गेल्यावर्षीच्या तुलनेत 3 लाख हेक्टरने वाढले आहे . त्यामुळे रब्बीच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. गेल्या वर्षी विभागात रब्बीच्या 58 .33 टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या होत्या . यंदा आतापर्यंत 28 टक्के पेरण्या उरकल्या आहेत. नगरमध्ये ज्वारीच्या चार लाख 65 हजार 751 हेक्टरपैकी दोन लाख 12 हजार 835 म्हणजेच 45 टक्क्यांपर्यंत पेरण्या पूर्ण झाल्या .

खरिपाच्या काढण्या पूर्ण झाल्यावर मोकळ्या झालेल्या क्षेत्रात शेतकरी गव्हासह हरभऱ्याची लागवड करतील . रब्बीचा हंगाम 15 सप्टेंबरपासून सुरू झाला असून ऑक्टोबरच्या सुरवातीपर्यंत ज्वारीची पेरणी शेतकरी करतात .

ज्वारीची काढणी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात होते. ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात करडई , सूर्यफुलाची लागवड होते आणि या पिकांची काढणी 15 जानेवारीपर्यंत होते . ऑक्टोबर - नोव्हेंबरमध्ये गव्हासह हरभऱ्याची लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल राहतो .

जिल्हानिहाय रब्बीचे सर्वसाधारण आणि प्रत्यक्ष पेरणी झालेले क्षेत्र हेक्टरमध्ये असे ः नाशिक- 1 लाख 20 हजार 729 - 16 हजार 941 , धुळे- 81 हजार 868 - 15 हजार 921 , नंदूरबार - 71 हजार 486 - 3 हजार 534 , जळगाव - 1 लाख 52 हजार 656 - 13 हजार 944 , नगर - 6 लाख 45 हजार 103 - 2 लाख 49 हजार 438 .

रब्बीच्या पेरण्यांची टक्केवारी

जिल्ह्याचे नाव गेल्यावर्षी यंदा
नाशिक 13 . 90 14
धुळे 31 . 62 19
नंदूरबार 18 . 95 05
जळगाव 39 . 33 09
नगर 75 .01 39

पेरणी झालेल्या क्षेत्राची टक्केवारी
ज्वारी - 42
गहू - 10
मका - 18
हरभरा - 21
Forwarded from Deleted Account
Forwarded from MPSC Material
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
#eMPSCkatta_Current_Affairs

🔹आंबा बागायतदार मधनिर्मिती करणार

जांभूळ हनी, मोहरी हनीप्रमाणे कोकणच्या हापूसची ओळख ‘अल्फान्सो हनी’ म्हणून होणार आहे. त्यासाठी रत्नागिरी जिल्ह्य़ातील बागायतदार मधुमक्षिकापालनाचा जोडधंदा करणार आहेत. यासंदर्भात गुरुवारी १० नोव्हेंबरला झालेल्या कार्यशाळेत महाबळेश्वर येथील तज्ज्ञ डॉ. सुनील पाटील यांना आंबा बागायतदारांना मधुमक्षिकापालनाविषयी माहिती दिली.

जिल्हा परिषदेच्या शामराव पेजे सभागृहात ही कार्यशाळा झाली. महाबळेश्वर येथील मधुमक्षिकापालन संशोधन केंद्राचे डॉ. सुनील पाटील यांनी शेतकऱ्यांना माहिती दिली. याप्रसंगी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा पुरवठा अधिकारी जयप्रकाश फड, आंबा उत्पादक संघाचे पदाधिकारी, नारळ संशोधन केंद्राचे वैभव शिंदे, सुधाकर मराठे, जिल्हा परिषद कृषी अधिकारी एस. डी. देशमुख यांच्यासह शेकडो बागायतदार उपस्थित होते.

हापूसचे उत्पादन वाढविण्यासाठी कृषी विभागाकडून आंबा बागांमध्ये ‘सतिरी’ जातीच्या मधमाशा पालन केले जाणार आहे. परागीभवनाची क्रिया ज्या मध्यस्थामार्फत होते, तेच मारले गेल्याने मोहोरात पुरेशा संख्येने नर व स्त्रीपुष्प असूनही पुरेशा प्रमाणात परागीभवन न झाल्याने फलधारणाच होत नाही. यावर कृषी विभागाकडून उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या जातीची मधमाशी ही कोकणातील स्थानिक जात आहे. ती पेटीमध्ये पाळता येते. परागीभवनाच्या क्रियेत पर्यायाने फलोत्पादनवाढीसाठी ही मधमाशी अत्यंत उपयोगी ठरू शकते. नारळाच्या उत्पादनात भरघोस वाढ होते.
अशा प्रकारचे प्रयोग जांभूळ, मोहरीच्या लागवडीमध्ये झालेले आहेत. त्या बागांमधून तयार होणाऱ्या मधाला फळाचे नाव दिले जाते. त्याप्रमाणे आंब्याच्या बागेतही अशा प्रकारचे मधुमक्षिकापालनाचा प्रयोग केला जाणार आहे.

कोल्हापूरसह महाबळेश्वर येथे सातिरी जातीच्या मधमाशांचे स्टेशन आहे. त्या ठिकाणी मधमाशांच्या पेटय़ा शेतकऱ्यांसाठी मिळू शकतात. एका पेटीला पाच हजार रुपये खर्च येतो. मधाच्या निर्मितीबरोबरच आंब्याच्या उत्पादनातही भरघोस वाढ होऊ शकते, असे डॉ. पाटील यांनी या वेळी स्पष्ट केले. उदय बने म्हणाले की, हापूस आंब्याची ही नवीन ओळख निर्माण होणार आहे.

बाजारामध्ये अल्फान्सो हनी चांगल्या प्रकारे वितरित होईल. अशा प्रकारचे नवीन ट्रेंड आले तरच शेतीचा चेहरामोहरा बदलू शकणार असल्याचे त्यांनी सांगितले.
भाजीपाला लागवडीविषयी मार्गदर्शन करताना वैभव शिंदे यांनी शेतकऱ्यांना महत्त्वपूर्ण सल्ले दिले. हिरवा माठ, तोंडली, वाल यासारख्या भाज्यांना बाजारामध्ये मागणी आहे. हिरवा किंवा लाल माठाची एक गुंठय़ातील लागवड शेतकऱ्यांना चार ते पाच हजार रुपयांची कमाई करून देऊ शकते. बाजारात मागणी असलेल्या भाजीचीच लागवड केली तर त्यातून फायदा होईल.

त्याचप्रमाणे तयार केलेली भाजी प्रोटीन पॉनिक (पॅकिंग करून) म्हणून विकली तर त्याला प्रतिसादही चांगला मिळू शकतो, असे शिंदे यांनी सांगितले.
Channel photo updated
#eMPSCkatta_Current_Affairs

🔹गुंटूर येथील मिरची होणार स्वस्त

पुणे - देशातील मिरचीची सर्वांत जास्त उत्पादन आणि आशिया खंडातील मोठी बाजारपेठ असलेल्या गुंटूर जिल्ह्यात यंदा मिरचीच्या उत्पादनात २० ते २५ टक्के वाढ अपेक्षित आहे . त्यामुळे गेल्या दोन वर्षांत वाढलेल्या भावांत घट होण्याचा अंदाज व्यक्त होत आहे . पुण्यासह महाराष्ट्रातील काही भागांत या गुंटूर येथील मिरचीची आवक होत असते .
#eMPSCkatta_Current_Affairs

🔹आज दिसणार सुपरमून. .

पुणे - आज ( सोमवार) सायंकाळी सात वाजून बावीस मिनिटांनी खगोलप्रेमींना सुपरमून बघण्याची संधी मिळणार आहे .
पौर्णिमेचा चंद्र पृथ्वीच्या जवळ येत असेल, तर त्याला सुपरमून म्हणतात . त्यावेळी चंद्रबिंब चौदा टक्के मोठे व तीस टक्के जास्त तेजस्वी दिसते . चंद्राचे पृथ्वीपासूनचे अंतर सरासरी 3 लक्ष 84 हजार किलोमीटर एवढे आहे . पंरतु , आज हे अंतर 3 लक्ष 56 हजार 509 किलोमीटर एवढे असणार आहे .
खगोलप्रेमींसाठी हा दूग्धशर्करा योग जवळजवळ 68 वर्शांनी साधून आला आहे .
Forwarded from MPSC Material
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
कोरिओलीस बल

जॉईन करा @MPSCGeography
#eMPSCkatta_Current_Affairs

🔹इथेनॉलच्या धोरणासाठी पंतप्रधान अनुकूल

पुणे - देशातील साखर कारखान्यांकडून इथेनॉल खरेदीसाठी वास्तववादी धोरण ठरविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतंत्र बैठक घेण्याची तयारी दर्शविली असून संसद अधिवेशनानंतर ती होईल , अशी माहिती माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी येथे दिली .

मांजरी येथील "वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ' (व्हीएसआय ) येथे आयोजित " शुगरकेन व्हॅल्यू चेन -व्हीजन शुगर 2015 ' या परिषदेत " साखर बाजारातील जागतिक घडामोडी आणि भारतीय साखर उद्योगाची वाटचाल ' या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते . केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी , सहकारमंत्री सुभाष देशमुख या वेळी उपस्थित होते .

केंद्र सरकारने योग्य दर दिल्यास हवे तेवढे इथेनॉल पुरविण्याची राज्यातील साखर कारखान्यांची तयारी असल्याचेही या वेळी पवार यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले , "" इथेनॉलच्या भावाच्या धोरणात सातत्य ठेवले जात नाही . त्यामुळे यंदा साखर कारखान्यांनी इथेनॉल पुरवठ्यासाठी 50 टक्केही निविदा भरल्या नाहीत . ही बाब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगितली. त्यामुळे मी आणि नितीन गडकरी यांच्यासमवेत स्वतंत्र बैठक घेऊन इथेनॉलच्या भावासंदर्भात चर्चा करण्याचे आश्वासन पंतप्रधानांनी दिले आहे . ''

साखर कारखान्यांच्या वेगवेगळ्या कर्जांचे पुनर्गठन करण्याची मागणीही या वेळी पवार यांनी केली . केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आणि पंतप्रधानांमार्फत याबाबत अनुकूल निर्णय घेण्याचा प्रयत्न करू , असे आश्वासनही त्यांनी या वेळी दिले .

विदर्भ आणि मराठवाड्याला " व्हीएसआय ' मार्फत उत्तम दर्जाचे ऊस बेणे पुरविण्याची तयारीही पवार यांनी दर्शवली . परंतु , त्यासाठी राज्य सरकारने विदर्भ आणि मराठवाड्यात जालना येथे पाण्याची सुविधा असलेली प्रत्येकी शंभर एकर जमीन उपलब्ध करून द्यावी , अशी मागणी त्यांनी केली .

या वेळी बोलताना उसाखालील संपूर्ण क्षेत्र ठिबकखाली येण्याची आवश्यकता नितीन गडकरी यांनी व्यक्त केली होती . त्याला पवार यांनी विरोध दर्शवला .

ते म्हणाले , "" उसाला ठिबकने पाणी देण्यासाठी मुख्यमंत्री आणि गडकरी यांची बैठक झाली ही चांगली बाब आहे . मात्र, ठिबकसाठी पाइपने पाणी पुरवावे लागते . पाटाचे , कालव्याचे, नदी आणि ओढ्यातून पाणी आणून ठिबकने देण्यासाठी पाइप , 24 तास वीज आवश्यक असते . त्यासाठी मोठी गुंतवणूक करावी लागेल .''

. . . तर शेतकऱ्यांचा फायदा किती ?

साखर कारखाने सुरू होण्यापूर्वीच शेतकऱ्यांना " एफआरपी ' पेक्षा अधिक रक्कम देण्याची स्पर्धा सुरू झाली आहे . परंतु , त्यासाठी कारखान्यांना कर्ज काढावे लागणार असून त्याची फेड शेतकऱ्यांच्या पैशातूनच होणार आहे . यामुळे शेतकऱ्यांचा किती फायदा होईल , याचा विचार करण्याची वेळ आल्याचेही पवार यांनी या वेळी सांगितले . साखर कारखाने बंद का पडत आहेत, याचा आढावा साखर आयुक्तांनी घेण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी सांगितले .