MPSC Geography
139K subscribers
7.8K photos
82 videos
564 files
1.07K links
Download Telegram
New Doc 31 - भूगोल
Forwarded from MPSC Material
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔹वातावरणाचे थर -
वातावरणाची सरासरी उंची किंवा जाडी १६०० किमी असून भूपृष्ठपासून जसजसे उंच जावे तसतशी वातावरणाची घनता कमी होत जाते.

वातावरणाचे मुख्य थर

📌 तपांबर - भूपृष्ठाच्या अगदी नजीकचा वातावरणाचा थर म्हणजे तपांबर होय, याची सरासरी जाडी ११ किमी आहे. या थरात वातावरणातील ७५% घटक आढळून येतात. पाऊस, वारे, ढगनिर्मिती आदी हवामान विषयक या थरात आढळून येतात.

📌 तपस्तधी - तपांबर व स्थितांबर या थरांना अलग करणारा उपथर म्हणजे तपस्तधी होय. उंचीनुसार तापमानात घट होण्याची क्रिया या उपथरात थांबते.

📌 स्थितांबर - तपांबरानंतर सुमारे ५० किमी उंचीपर्यंतचा थर म्हणजे स्थितांबर होय. या थरातील वातावरणात पाण्याची वाफ, धूलिकण, नसतात. व हवा शुष्क असते.

📌 स्थितस्तबधी - स्थितांबराच्या वरचा सुमारे ३ किमी जाडीचा थर म्हणजे स्थितस्तबधी होय. या थरातील तापमान स्थिर असते. या थरात दोन्ही बाजूना ओझोन वायूचा थर आढळतो. हा वायू सूर्यापासून येणारी अतिनील किरणांचे रक्षण करतो.

📌 मध्यांबर - स्थितस्तबधी नंतर भूपृष्ठापासून सुमारे ८० किमी चा थर म्हणजे मध्यांबर होय. या थरात वाढत्या उंचीनुसार तापमानात घट होते.

📌 मध्यस्तबधी - पृथ्वीच्या वातावरणातील सर्वात कमी नोंद ज्या थरात होते तो थर म्हणजे मध्यस्तबधी होय.

📌 दलांबर - मध्यस्तबधी या थरानंतर अत्यंत विरळ असलेला हवेचा थर म्हणजे दलांबर होय. या थरात उंचीनुसार तापमान वाढते.

📌 आयनांबर - दलांबराच्या नंतरचा थर म्हणजे आयनांबर आहे. या थरात उंचीनुसार तापमान वाढते. या थरातील अतितापमानामुळे हेवेचे कण विद्युतप्रभारित होतात.

📌 बाह्यंबार - आयनांबराच्या वरचा थर म्हणजे बाह्यांम्बर होय. भूपृष्ठापासून ४८० किमी उंचीपासून वरील भागात हा थर पसरलेला आहे. या थरातील विविध वायूंचे अनु, रेणू, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्ष्णातील मुक्त होऊन अंतराळात विलीन होतात.
Forwarded from Deleted Account
New Doc 11
Forwarded from Deleted Account
वारे(भूगोल)
Forwarded from Deleted Account
वारे(भूगोल).pdf
186 KB
१] कल्पकम हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
१] महाराष्ट्र २] तामिळनाडू ३] कर्नाटक ४] राजस्थान

२] काक्रापारा हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
१] गुजरात २] मध्यप्रदेश ३] तामिळनाडू ४] राजस्थान

३] नरोरा हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
१] मध्यप्रदेश २] तामिळनाडू ३] गुजरात ४] उत्तर प्रदेश

४] कैगा हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
१] गुजरात २] महाराष्ट्र ३] कर्नाटक ४] राजस्थान

५] कुडनकुलम हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
१] कर्नाटक २] महाराष्ट्र ३] तामिळनाडू ४] राजस्थान

उत्तरे - १] २, २] १, ३] ४, ४] ३, ५] ३
Forwarded from Deleted Account
भारत व जगातील काही महत्वाच्या नद्या
#eMPSCkatta_Current_Affairs

🔹तांदळाची प्रथिने व जस्तयुक्त प्रजाती विकसित

प्रथिनांचा समावेश असलेली तांदळाची प्रजात इंदिरा गांधी कृषी विश्वविद्यालयाने विकसित केली असून त्याचा उपयोग मुलांना पोषक आहार मिळवून देण्यासाठी होणार आहे. छत्तीसगडमधील आदिवासी भागात कुपोषण मोठय़ा प्रमाणात आहे. इंदिरा गांधी कृषी विद्यापीठाचे वनस्पती रेणवीय जीवशास्त्र व जैवतंत्रज्ञान विभागाचे प्राध्यापक डॉ. गिरीश चंडेल यांनी सांगितले की, आमच्या संशोधकांनी सात वर्षे मेहनत करून भाताची प्रथिनयुक्त प्रजाती तयार केली आहे. मुलांमध्ये असलेली प्रथिनांची कमतरता भरून काढण्यासाठी तांदळाच्या या प्रजातीचा वापर केला जाणार आहे.
भात हे राज्यातील लोकांचे पूरक अन्न असून त्याचा वापर मोठय़ा प्रमाणात केला जातो. आम्ही सूक्ष्मपोषके व प्रथिनांचा समावेश तांदळाच्या प्रजातीत केला आहे. आपल्याकडे सध्या ज्या तांदळाच्या प्रजाती उपलब्ध आहेत त्या प्रथिनयुक्त नाहीत, त्यामुळे त्यात कबरेदकेच असतात. प्रथिने व
जस्त यांचे पुरेसे प्रमाण असलेली तांदळाची प्रजात तयार करण्यात आली आहे.

नव्याने विकसित करण्यात आलेली तांदळाची प्रजाती प्रथिनयुक्त असून त्यात १० टक्के प्रथिने आहेत. नेहमीच्या तांदळाच्या प्रजातीत ३ टक्के प्रथिनांचा समावेश असतो. नवीन प्रजातीत जस्ताचे प्रमाण ३० पीपीएम आहे. छत्तीसगडच्या आदिवासी भागात कुपोषणाचे प्रमाण गेल्यावर्षी जास्त दिसून आले होते व ती मुले वजनाने कमी असल्याचे लक्षात आले होते. बस्तर, दंतेवाडा व कोंडगाव तसेच नारायणपूर या जिल्ह्य़ातील पाच लाख बालकांचे वजन अपेक्षेपेक्षा खूप कमी आहे.

इतर जिल्ह्य़ांपेक्षा तेथे कुपोषणाचे प्रमाणही अधिक आहे. मुलांचे वजन वाढण्यासाठी ‘वजन त्योहार’ योजना आखण्यात आली असून मुलांसाठी पोषक आहार आठवडा साजरा केला जाणार आहे.
भूगोल - मारियाना गर्ता
भूगोल - काटेपूर्णा
नद्यांची हि वैशिष्ट तुम्हाला माहीत आहे का?

-‘नाईल’ ही जगातली सगळ्यात लांब नदी आहे. तिची लांबी साधारण ६,६५० किमी आहे. जगातली बरीच महत्त्वाची शहरं नदीच्या काठी वसलेली आहेत.
-‘सिंधू’ नदीच्या नावावरून भारत देशाला ‘हिंदुस्थान’ हे नाव पडलं.
-गोदावरी ही पश्चिम घाटातून उगम पावणारी भारतातली सर्वात मोठी नदी आहे.
-‘पंजाब’ या राज्याच्या नावाचा अर्थ ‘पाच नद्यांचा भूभाग’ असा होतो.
-भारतातला सर्वात वेगाने वाहणारा ‘जोग’ धबधबा कर्नाटक राज्यातल्या ‘शरवती’ नदीतून उगम पावतो.
-------------------------------
जॉईन करा @MPSCGeography
🔹गांडूळाच्या विष्ठेमध्ये काय असते. ?

देशी गांडुळाच्या विष्ठेमध्ये सगळया खनिजांचे अनंत भंडार असते. त्या विष्ठेमध्ये भोवतालच्या मातीपेक्षा 7 पट जास्त नाट्रोजन असतो, 9 पट जास्त स्फुरद(फॉस्फेट), 11 पट जास्त, पलाश(पोटॅश), 8 पट चुना(कॅल्शीअम), 10 पट मग्न(मॅग्नेशिअम), 10 पट गंधक (सल्फर), ह्या सोबतच बाकीचे खनिजं जास्त प्रमाणात असतात. ही गांडुळांची विष्ठा मुळाजवळ येऊन पडते, त्यातील सर्व अन्नद्रव्य मुळयांना मिळतात व सोबतच विष्ठेमध्ये असणारे उपयुक्त जंतू नवीन  ताकद आणि  स्फूर्ती  घेऊन ह्युमसच्या निर्मीतीच्या कामाला लागतात. 
जगातील विविध स्थळांची टोपननावे किंवा ठळक वैशिष्टये


👉🏾 *इंग्लंडचे उद्यान*
– केंट

👉🏾 *यूरोपाचे काश्मीर*
– स्वित्झर्लंड

👉🏾 *वादळी शहर*
– शिकागो

👉🏾 *पीत नदी*
– हो हँग हो

👉🏾 *भारताचे स्वित्झर्लंड*
– काश्मीर

👉🏾 *लवगांचे बेट*
– झांजीबार

👉🏾 *गुलाबी शहर*
– जयपूर

👉🏾 *खड़काळ शहर*
– अँबरडीन

👉🏾 *पायाखालील प्रदेश*
– ऑस्ट्रेलिया

👉🏾 *पाच नदयाचा प्रदेश*
– पंजाब

👉🏾 *हजार तळ्यांचा देश*
– फिनलँड

👉🏾 *निर्जनतम बेट*
– ट्रिस्टन डी क्यूबा

👉🏾 *भारताचे व्हेनीस*
– अलेप्पी

👉🏾 *पाचूंचे बेट*
– श्रीलंका

👉🏾 *दक्षिणेतील ब्रिटन*
– न्यूझीलंड

👉🏾 *भारताचे उद्यान*
– बंगलोर

👉🏾 *भूकंपाचे शहर*
– फिलाडेल्फिया

👉🏾 *उत्तरेकडील व्हेनीस*
– स्टॉकहोम

👉🏾 *कमलपुष्पांचा देश*
– फ़्रान्स व कॅनडा

👉🏾 *अमर शहर*
– रोम

👉🏾 *मंदिरांचे माहेरघर*
– बनारस

👉🏾 *मेपल वृक्षांचा देश*
– कॅनडा

👉🏾 *काळा खंड*
– आफ्रिका

👉🏾 *श्वेत शहर*
– बेलग्रेड

👉🏾 *जगाचे छप्पर*
– पामीरचे पठार

👉🏾 *भारताचा मसाला मळा*
– केरळ

👉🏾 *भूमध्य समुद्राची किल्ली*
– जिब्राल्टर

👉🏾 *गोऱ्या माणसाची दफन भूमी*
– गिनीचा किनारा

👉🏾 *मोत्यांचे बेट*
– बहारीन

👉🏾 *राजवाडयांचे शहर*
– वॉशिंगटन

👉🏾 *अज्ञात खंड*
– आफ्रिका

👉🏾 *उंच इमारतीचे शहर*
– न्यूयार्क

👉🏾 *भव्य अंतराचे शहर*
– कोलकाता

👉🏾 *कांगारूंचा देश*
– ऑस्ट्रेलिया

👉🏾 *सूर्यास्ताचा देश*
– ब्रिटन

👉🏾 *उगवत्या सूर्याचा देश*
– जपान

👉🏾 *मध्यरात्रीच्या सूर्याचा देश*
– नॉर्वे


🏺🏺
Forwarded from Deleted Account
भूगोल:-
सह्याद्री तील सर्वात लहान खिंड- पलक्कड खिंड
कोका टेकड्या - भंडारा
कर्कवृत्ताला दोन वेळा छेदून जाणाऱ्या नद्या- मही, साउथ कोयल
भारतीय शीत वाळवंट स्थान- पीरपंजाल च्या पश्चिमेला
गोदावरी व महानदी या दरम्यान चा पर्वत/शिखर- महेंद्रगिरी(1501)
पंजाब हिमालयातील सर्वात उंच पर्वत- नंगा पर्वत (8126)
धातू कामासाठी प्रसिद्ध शहर - कटक (ओरिसा)
Forwarded from MPSC Material
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
भारताच्या राज्य पुनर्रचनेचा काळानुसार बदलता नकाशा...

Join @MPSCGeography
#eMPSCkatta_Current_Affairs

🔹शेतीविकासाची प्रस्तावित 'नीती'

शेतीमध्ये क्रांती आणण्यासाठी आता 'नीती आयोग' सरसावला असून, त्या संदर्भातील व्यूहरचनाही प्रस्तावित करण्यात आली आहे. व्यापक विचारमंथन, व्यावहारिक व वास्तववादी प्रयत्नांच्या माध्यमातून त्याला आकार येऊ शकेल. शेतीची उत्पादकता, उत्पादन, लाभप्रदता वाढणे ही काळाची गरजच आहे. 


नीती आयोग देशाच्या शेतीमध्ये दुसरी क्रांती आणण्यासाठी कटिबद्ध झालेला दिसतो. शेती हा विषय घटक राज्यांच्या अधिकार व कार्यक्षेत्रात असल्यामुळे नीती आयोग आपला कार्यक्रम व धोरण आराखडा कार्यवाहीसाठी घटक राज्यांच्या कार्यवाही व्यवस्थेकडे सोपवणार असे दिसते. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात दुप्पट वाढ करण्यासंबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या जाहीर आश्‍वासनाच्या पार्श्‍वभूमीवर नीती आयोगाने भारतीय शेती मुक्त करण्यासाठी त्रिसूत्री व्यूहरचना प्रस्तावित केली आहे. 


आयोगाच्या मते 1) राज्य पातळीवर कृषी माल विपणन व्यवस्था सुधारणे, (2) जमीन खंडावर कसायला घेण्याच्या पद्धतीत बदल करणे, 3) जंगल सुधारणा - अशा तिहेरी सुधारणांमुळे (या सर्व बाबतीत घटक राज्यांनाच सुधारणा कराव्या लागतील.) भारतीय शेती व्यवस्था अधिक चैतन्यशील होऊन उच्चतर उत्पन्न वृद्धीदर गाठू शकेल. 


आयोगाचे सदस्य रमेशचंद यांनी शेतीतील सुधारणांसाठी पंतप्रधान कार्यालयास एक सविस्तर प्रस्ताव सादर केला होता. त्या सुधारणा राज्यांनी केल्यास शेतकऱ्यांना मोठे फायदे होतील, असे अपेक्षित आहे. सामान्य शेतकरी गरिबीच्या खाईतून बाहेर पडण्यास या नव्या शेती विकास प्रस्तावांचा हातभार लागेल व शेतकऱ्यांचे उत्पन्न पाच वर्षांच्या आत दुपटीने वाढेल, असे अभिप्रेत आहे. आयोगाची भावना अशी आहे, की प्रस्तावित बदल राज्य सरकारे सहज व त्वरित कार्यवाहीत आणू शकतील. 


*त्रिसूत्री व्यूहरचनेअंतर्गत घटकांचा विचार करता शेतीसंबंधी प्रस्तावित बदलातील प्रमुख मुद्दे साधारणतः पुढीलप्रमाणे आहेत.* 

1) जमीन खंडाने देण्याच्या कायद्यात सुधारणा करताना केंद्रीय कायद्यांना सुसंगत बदल करणे.

2) कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्यात किमान 10 बदल करून सुधारित कायदा शेतकरी उत्पादकांच्या अधिक सोईचा करणे.

3) करार शेती कायदा सोपा करणे.

4) खासगी व्यापारी थेट शेतकऱ्यांकडून माल खरेदी करू शकतील अशी व्यवस्था.

5) शेतकऱ्यांना थेट ग्राहकास माल विकण्याचे स्वातंत्र्य.

6) कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापार करण्याचे एकच परवानापत्र देण्याची व्यवस्था.

7) एकबिंदू कर आकारणी (कर प्रपात परिणाम टाळण्यासाठी).

8) फळे व भाजीपाला यांना कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्याच्या बाहेर ठेवणे.

9) कृषी उत्पादनावरील कर आकारणीचे वाजवीकरण.

10) ई-पद्धतीच्या (online) शेतमाल खरेदी - विक्रीला प्रोत्साहन देण्यासाठी ई-नाम (Electronic national agricultural marketing) प्रोत्साहन.

11) कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापार करण्यासाठी त्या बाजार क्षेत्रात व्यापाऱ्याचे प्रत्यक्ष दुकान असलेच पाहिजे, ही अट रद्द करणे. 

येत्या काही दिवसांत नीती आयोग घटक राज्यांच्या कृषिमंत्री व कृषी खात्याच्या प्रमुख सचिवांशी चर्चा करणार आहे. आवश्‍यक त्या ठिकाणी पंतप्रधान कार्यालयाची मदत घेतली जाणार आहे, त्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क साधला जाणार आहे. 


*प्रस्तावित बदलांमुळे :*

1) शेतकऱ्यांच्या उत्पन्नात दुप्पट वाढ येत्या पाच वर्षांत होईल.

2) शेतकऱ्यांचे दारिद्य्र कमी होईल.

3) शेतमाल खरेदी - विक्रीची थेट पद्धत मध्यस्थ नष्ट करेल.

4) विपणन सुधारणेमुळे शेतीमाल व्यापारात खासगी व्यापारी मोठ्या प्रमाणात प्रवेश करतील, त्यामुळे शेतमालाच्या किमती सुधारतील.

5) शेतमालाच्या साठेबाजीवर नियंत्रण ठेवता येईल. 


खरा प्रश्‍न आहे तो शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करून उत्पादकता व उत्पादन वाढविण्याचा. त्यासाठी शेतमालाच्या किमती वाढणे, शेतीची लाभप्रदता वाढणे आवश्‍यक आहे. या प्रस्तावित धोरणात शेतीसाठी लागणाऱ्या आदानाच्या (पाणी, वीज, खते, बियाणे, औषधे व यंत्रे) किमती व उपलब्धतेसंबंधी, विपणनासंबंधी उल्लेख नाही. शेतमालाच्या (विशेषतः नाशवंत) सुयोग्य साठवणूक व्यवस्थेच्या विकासाचाही उल्लेख नाही. शेती उत्पादनासाठी वाजवी विमा व्यवस्थेबद्दलही विचार होण्याची गरज आहे. शेतमालावर मोठ्या प्रमाणावर प्रक्रिया करणारे उद्योग वाढविण्याकडे लक्ष देण्याचीही गरज आहे. शेती क्षेत्राच्या विकासासाठी जैविक परिचयाची सहकारी संघटन व्यवस्था सक्षम करावी लागेल. एकंदरीतच, प्रत्यक्ष जमिनीवर येऊन, शेतकऱ्यांशी चर्चा करून, फलदायी / उत्पादक उपाययोजना करण्यासाठी मंत्री व सचिव एवढ्याच पातळीला चर्चा करून चालणार नाही. उपक्रमशील शेतकरी, शेती अर्थतज्ज्ञ, कृषी शास्त्रज्ञ, कृषी माल व्यापारी, कृषी पतपुरवठा, कृषी आदान व्यापारी यांच्या समन्वित राज्य मंडळाबरोबर (तसे तयार करणे आवश्‍यक आहे) चर्चा करून व्यवहार्य प
्रस्ताव ठेवणे शहाणपणाचे ठरेल. 


प्रस्तावित व्यूहरचनेच्या अनुषंगाने काही अडचणीही लक्षात घेतल्या पाहिजेत. पहिली अडचण म्हणजे संघराज्यातील सर्व घटक राज्यांनी सुसंगत धोरण व कार्यक्रम प्राधान्याने राबवण्याची. दुसरा महत्त्वाचा मुद्दा दुर्लक्षित राहिला आहे तो शेती उत्पन्नावर अधिक प्रत्यक्ष कर आकारणीचा. प्रा. राज समितीचा कृषी धारणा कर (AHT) याबाबतीत लक्षात घेण्याची गरज आहे. नव्या धोरणातील जंगलविषयक सुधारणांचे स्वागत केले पाहिजे; पण त्यात वनवासी व आदिवासी लोकांच्या आर्थिक हक्कांना संरक्षण देण्याचा विचार झाला पाहिजे. कृषी माल विपणनाच्या बाबतीतील प्रस्तावित बदल वरकरणी शेती उत्पादकांना स्वातंत्र्य देणारे वाटले तरी त्याचा प्रत्यक्ष प्रभावी लाभ व्यापारी मध्यस्थच घेणार आणि शेतीचे भांडवलदारी 'व्यापारी'करण होणार, हाही धोका संभवतो. वाढीव किमतीचा लाभ उत्पादकाला नव्हे तर व्यापाऱ्यालाच अधिक होणार आणि तोही शेतकऱ्याच्या नावाने. या सर्व बाबींचा विचार करूनच ठरवायला हवे. 
🔹महाराष्ट्रातील खनिज संपत्ती व संबंधित जिल्हे :-

🔘 *खनिज जिल्हे दगडी कोळसा* - सावनेर, कामठी, उमरेड (नागपूर), वणी(यवतमाळ), गुग्गुस, बल्लारपूर (चंद्रपूर)
🔘 *बॉक्साईट* - कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
🔘 *कच्चे लोखंड* - रेड्डी (सिंधुदुर्ग)
🔘 *मॅग्नीज* - सावनेर (नागपूर), तुमसर (भंडारा),
सावंतवाडी (सिंधुदुर्ग)
🔘 *तांबे* - चंद्रपूर, नागपूर
🔘 *चुनखडी* - यवतमाळ
🔘 *डोलोमाईट* - रत्नागिरी, यवतमाळ
🔘 *क्रोमाई* - भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग
🔘 *कायनाईट* - देहुगाव (भंडारा)
🔘 *शिसे व जस्त* - नागपूर

" देशाच्या खनिज उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा- *३.९%* आहे, *१२.३३%* क्षेत्र खनिजयुक्त आहे. "

*महाराष्ट्रातील प्रमुख औष्णिक वीजनिर्मिती केंद्रे :-*

*औष्णिक केंद ठिकाण/जिल्हा*
🔴 *पारस* - अकोला
🔴 *एकलहरे* - नाशिक
🔴 *कोराडी,खापरखेडा* - नागपूर
🔴 *चोला (कल्याण)* - ठाणे
🔴 *बल्लारपूर* - चंद्रपूर
🔴 *परळीवैजनाथ* - बीड
🔴 *फेकरी (भुसावळ)* - जळगाव
🔴 *तुर्भे (ट्रॉम्बे)* - मुंबई
🔴 *भिरा अवजल (जलविद्युत)* - रायगड
🔴 *कोयना (जलविद्युत)* - सातारा
🔴 *धोपावे* - रत्नागिरी
🔴 *जैतापूर (अणुविद्युत)* - रत्नागिरी

*महाराष्ट्रातील प्रमुख लघुउद्योग :लघुउद्योग ठिकाण*
🔵 *हिमरुशाली* - औरंगाबाद
🔵 *पितांबरी व पैठण्या* - येवले (नाशिक)
🔵 *चादरी* - सोलापूर
🔵 *लाकडाची खेळणी* - सावंतवाडी
🔵 *सुती व रेशमी कापड* - नागपूर, अहमदनगर
🔵 *हातमाग साडय़ा व लुगडी*- उचलकरंजी
🔵 *विडीकाम* - सिन्नर (नाशिक), अहमदनगर,सोलापूर
🔵 *काचेच्या वस्तू* - तळेगाव, ओगलेवाडी
🔵 *रेशमी कापड* - सावळी व नागभीड (चंद्रपूर),
एकोडी (भंडारा)

*महाराष्ट्रातील प्रमुख संशोधन संस्था :*
🔶 *इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ जिओमॅग्नेटिझम* - मुंबई
🔶 *भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटर*, - मुंबई
🔶 *टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सेस* - मुंबई
🔶 *इंटरनॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ पॉप्युलेशन स्टडीज* - मुंबई
🔶 *कॉटन टेक्नॉलॉजिकल रिसर्च लॅबोरेटरी* - मुंबई
🔶 *नॅशमल केमिकल लॅबोरेटरी* - पुणे
🔶 *नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरॉलॉजी* - पुणे
🔶 *वॉटर अँड लॅण्ड मॅनेजमेंट इन्स्टिटय़ूट (वाल्मी)* - औरंगाबाद
🔶 *भारत इतिहास संशोधन मंडळ,* - पुणे
🔶 *भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर* - पुणे
🔶 *सेंट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ कॉटन रिसर्च*- नागपूर
🔶 *महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था (मेरी)* - नाशिक
🔶 *अॅटोमिक एनर्जी कमिशनचे मुख्यालय* - मुंबई
🔶 *खार जमीन संशोधन केंद्र* - पनवेल.

संकलन - सोमनाथ माळी