MPSC Geography
139K subscribers
7.77K photos
82 videos
562 files
1.06K links
Download Telegram
महत्त्वाच्या दऱ्या  

🚣🏻काश्मीर दरी : पीरपंजाल व मुख्य हिमालयाच्या झास्कर रांगेदरम्यान ही प्रसिद्ध काश्मीर दरी आहे. काश्मीर दरीची लांबी सुमारे १३५ किमी तर रुंदी सुमारे ८० किमी इतकी आहे.

🚣🏻कांग्रा दरी : हिमाचल प्रदेशातील ही दरी धौलाधर रांगेच्या पायथ्यापासून बियास नदीच्या दक्षिण भागापर्यंत पोहचलेली आहे.

🚣🏻कुलू दरी : रावी नदीच्या उध्र्व प्रवाहात कुलू दरी आहे.

🚣🏻काठमांडू दरी : नेपाळमध्ये महाभारत रांगेच्या उत्तरेला काठमांडू दरी आहे.

🚣🏻शिवालिक रांगा/ बाह्य हिमालय (Outer Himalaya) : हिमालय पर्वताच्या सर्वात बाहेरील रांग म्हणजे शिवालिक रांग. या रांगेलाच ‘बाह्य हिमालय’ असे म्हणतात.
हिमालयाच्या इतर रांगेच्या उत्पत्तीनंतर शिवालिक टेकडय़ांची निर्मिती झाल्याने हिमालयातील नद्यांनी वाहून आणलेला गाळ या ठिकाणी साठत गेला व येथे सपाट मदानी प्रदेशाची निर्मिती झाली यालाच ‘डून’ असे म्हणतात उदा. डेहराडून (उत्तराखंड), उधमपूर व कोटला (जम्मू व काश्मीर), शिवालिक रांगांच्या पूर्व भागात नेपाळपर्यंत वनांचे दाट आच्छादन आहे, तर पश्चिमेकडे हे आच्छादन कमी होताना दिसते.
📚🙏
________________________________________
आमचे चॅनेल जॉईन करण्यासाठी @MPSCGeography येथे क्लिक करा
💎 💎 💎 एमपीएससी मंत्र : भूगोल : संज्ञा, संकल्पनांचा अभ्यास 💎 💎 💎
.
सामान्य अध्ययन पेपर- १ मध्ये इतिहास व भूगोल अशा दोन घटकांचा समावेश होतो. यातील भूगोल या घटकामध्ये कृषी व पर्यावरण या उपघटकांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे साहजिकच भूगोल विभागाला अधिक महत्त्व देणे अपेक्षित आहे. अर्थव्यवस्था आणि पर्यावरण या दोन विषयांच्या अभ्यासामध्ये भौगोलिक आयाम व संबंधित भौगोलिक पायाभूत संकल्पना माहीत असणे आवश्यक ठरते. त्यामुळे पूर्व व मुख्य अशा दोन्हीही परीक्षांच्या तयारीसाठी भौगोलिक संज्ञा व संकल्पना पक्क्या करून घेणे महत्त्वाचे आहे. या विषयाची तयारी नेमकी कशी करता येईल ते जाणून घेऊयात..

पूर्वपरीक्षेच्या अभ्यासक्रमात आयोगाने भूगोल विषयाचे भौतिक, सामाजिक व आर्थिक असे ठळक तीन उपविभाग केले आहेत. पर्यावरणविषयक बाबी भौतिक भूगोलामध्ये व कृषीविषयक बाबी आर्थिक भूगोलामध्ये समाविष्ट करता येतात. मुख्य परीक्षेच्या तयारीतही भूगोलाचे हेच तीन उपविभाग करून अभ्यास केल्यास पूर्व व मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमातील एकत्रित मुद्दे आधी तयार करता येतील.
विज्ञानाप्रमाणे भूगोलाचा अभ्यासही व्याख्यांच्या व प्रक्रियांच्या संकल्पनांच्या आधारे केल्यास कमी वेळेत विषयाचे चांगले आकलन होण्यास मदत होते. अभ्यासामध्ये काही ठळक बाबींचा क्रम लावावा. सर्वात आधी महत्त्वाच्या संज्ञा व संकल्पना समजावून घ्याव्यात. त्यानंतर निरनिराळ्या भौगोलिक प्रक्रिया (उदा. भूरूप निर्मिती, भूकंप/ वादळ आदींची निर्मिती) समजून घेणे आवश्यक ठरते.

प्राकृतिक भूगोल व हवामान

* भूगोलाच्या शाखा, पृथ्वीची उत्पत्ती, रचना, पृथ्वीचे कलणे, वातावरण, अक्षांश, रेखांश, हवामानाचे घटक, प्रमाणवेळ इत्यादी पायाभूत संकल्पना व्यवस्थित समजून घ्याव्यात.

* भूरूपांपकी केवळ प्रसिद्ध नद्या, पर्वत, सरोवरे इत्यादींचा अभ्यास केल्यास अभ्यासाचे ओझे हलके होईल.

* भारतातील हिमालयीन व द्विकल्पीय नदीप्रणालींचा तुलनात्मक अभ्यास आवश्यक आहे.

नदीप्रणालींच्या अभ्यासातच जल व्यवस्थापनातील- पाण्याची गुणवत्ता, भूजल व्यवस्थापन, नदीजोड प्रकल्प, पर्जन्य जलसंचय अशा महत्त्वाच्या संकल्पना अभ्यासायला हव्या. यामुळे पाणी या नसíगक संसाधनाचा मूलभूत अभ्यास पूर्ण होईल. कृषी व इतर कारणांसाठी वापर, व्यवस्थापन इत्यादी मुद्दे कृषीविषयक घटकाच्या तयारीमध्ये समाविष्ट करता येतील.

भौगोलिक घटना/ प्रक्रिया

* मान्सूनची निर्मिती, वितरण, देशाच्या/ राज्याच्या दृष्टिकोनातून महत्त्व, ऋतू निर्मिती, मृदा निर्मिती, समुद्री प्रवाह, भूकंप, ज्वालामुखी इत्यादी प्रक्रिया पूर्व, मुख्य परीक्षेतील इतर घटक विषयांच्या तयारीसाठीही महत्त्वाच्या आहेत.

* कोणत्याही भौगोलिक घटना/ प्रक्रियेच्या अभ्यासामध्ये पुढील मुद्दे समजून घ्यावे लागतात- भौगोलिक व वातावरणीय पाश्र्वभूमी, घटना घडू शकते/ घडते ती भौगोलिक ठिकाणे, प्रत्यक्ष घटना/ प्रक्रियेचे स्वरूप, घटनेचे/ प्रक्रियेचे परिणाम, पर्यावरणीय बदलांमुळे घटनेवर/ प्रक्रियेवर होणारे परिणाम, असल्यास आर्थिक महत्त्व, देशातील- राज्यातील उदाहरणे, अलीकडेच घडलेल्या महत्त्वाच्या घटना/ प्रक्रिया, चालू घडामोडी.
_______________________________________
Join us @MPSCGeography
 ★|| eMPSCkatta ||★

भारतातील महत्त्वाचे रेल्‍वे समुद्री पूल 🚊


 १) पंबन रेल्‍वे पूल :- 
रामेश्‍वरमजवळ पंबन बेटापासून मुख्‍य किनारी येण्‍यासाठी बांधण्‍यात आलेला हा रेल्‍वे पूल आहे. १९११ साली याची सुरुवात झाली. 
१४ फेब्रुवारी १९१४ साली हा लोकांसाठी खुला करण्‍यात आला. 
पंबन रेल्‍वे पूल हा भारतामधील पहिला 
समुद्री पूल आहे. 
२०१० साली वांद्रे-वरळी सी-लिंकला सुरुवात होण्‍यापूर्वी हा भारतामधील सर्वात लांब समुद्री पूल होता. 
काँक्रिट खांबाचा यात वापर करण्‍यात आला आहे. 
दोन खांबामध्‍ये इतके अंतर ठेवण्‍यात आले आहे, की ज्‍याच्‍यामधून नौका आणि जहाजे जाऊ शकतील. 
याला समांतर असा पूल बांधण्‍यात आला आहे. १९८८ साली लोकांसाठी हा रस्‍ता खुला करण्‍यात आला.

-----------------------
 २) वांद्रे-वरळी सी लिंक :- वांद्रे-वरळी सी लिंकचे अधिकृत नाव राजीव गांधी सी लिंक असून दक्षिण मुंबईतील वरळी ते वांद्रे यांना जोडणारा हा पूल आहे. 
यासाठी काँक्रिट स्‍टील मटेरियल वापरण्‍यात आले आहे. 
नरीमन पॉईंटला जोडणाऱ्या फ्री वे चा हा एक भाग आहे. 
या पुलासाठी १६०० कोटी इतका खर्च आला आहे. हिंदुस्‍तान कन्‍स्‍ट्रक्‍शन कंपनीने बांधलेला आणि महाराष्‍ट्र राज्‍य रस्‍ते विकास महामंडळाने 
देखरेख केलेला हा पूल आहे. 
३० जून २००९ साली ८ पैकी ४ मार्ग खुले करण्‍यात आले. 
२४ मार्च २०१० साली सर्व ८ मार्ग खुले केले गेले.
वरळी आणि वांद्रे यांच्‍यातील अंतर कमी करण्‍यासाठी हा पूल बांधण्‍यात आला आहे.
-----------------------

३) कांडरौर पूल :- हिमाचल प्रदेश मधील बिलासपूर येथे सतलज नदीवर हा पूल बांधण्‍यात आला आहे. 
कांडरौर गावात हा पूल आहे. 
कांडरौर पुलाची उंची ८० मी. इतकी आहे. 
१९५९ साली याची सुरुवात झाली आहे आणि १९६४ साली हा खुला करण्‍यात आला. 
पुलाची रुंदी ७ मीटर आहे. नदीच्‍या पात्रापासून ६० मीटर उंचीवर हा पूल बांधण्‍यात आला आहे. जगातील सर्वांत उंचीवर बांधण्‍यात आलेल्‍या पुलापैकी एक आणि आशियामधील सर्वांत उंच पूल अशी याची ख्‍याती आहे. 
कांडरौर पूल हा हमीरपूर जिल्‍हा आणि बिलासपूर जि‍ल्‍हा यांना जोडतो. बिलासपूरपासून आठ
कि.मी. अंतरावर राष्‍ट्रीय महामार्ग क्रमांक ८८ वर आहे.
---------------------

४) विद्यासागर सेतू :- विद्यासागर सेतूला दुसरा हुगळी पुल असेही
म्‍हणता येईल. 
पश्चिम बंगालमधील हुगळी नदीवर कोलकाता आणि हावडा या दोन शहरांना जोडणारा हा सेतू आहे. 
या सेतूवरून जाणाऱ्या वाहनांना टोल टॅक्‍स द्यावा लागतो, मात्र सायकलींना
हा कर नाही. 
विद्यासागर सेतू हा आशियाईतील सर्वांत लांब पुलांपैकी एक आहे. १९व्‍या शतकातील सुधारक ईश्‍वरचंद विद्यासागर यांचे नाव या सेतूला देण्‍यात आले आहे.
हावडा पूल आणि विवेकानंद सेतू यासारखे अनेक समांतर पूल आहेत. या सेतूच्‍या कामाची सुरुवात १९७८ साली झाली आणि १० ऑक्‍टोबर १९९२ रोजी याचे उद्घाटन करण्‍यात आले. याची रुंदी ३५ मीटर असून, लांबी ४७५ मीटर इतकी आहे. 
या सेतूचे बांधकाम विख्‍यात ब्रेथवेट बर्न आणि जेसेप किंवा बीबीजे यांनी केले आहे. 
या सेतूवर १८२.८८ मीटर लांबीची समांतर केबल वायर जोडण्‍यात आली आहे.
__________________________________________
आमचे चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा :@MPSCGeography
__________________________________________
Telegram.me/MPSCGeography
केंद्रीय पीक संशोधन केंद्र. :=

===========================
१)केंद्रीय ऊस संशोधन केंद्र.
=लखनौ (उत्तरप्रदेश)
२)केंद्रीय गहू संशोधन केंद्र.
=कर्नाल (हरियाणा)
३)केंद्रीय आवळा संशोधन केंद्र
=फैजाबाद (उत्तरप्रदेश)
४)केंद्रीय नारळ संशोधन केंद
=कासरगोड (केरळ)
५)केंद्रीय केळी संशोधन केंद्
=कळांडूथोराई (तामिळनाडू)
६)केंद्रीय डाळिंब संशोधन केंद्र
=सांगोला, सोलापूर
७)केंद्रीय द्राक्ष संशोधन केंद्र
=मांजरी (पुणे)
८)केंद्रीय दूध संशोधन केंद्र
=कर्नाल (हरियाणा)
९)केंद्रीय बटाटा संशोधन केंद्र
=सिमला
१०)केंद्रीय संत्री संशोधन केंद्र
=नागपूर
११)केंद्रीय मेंढी व लोकर संशोधन केंद्र
=अंबिकानगर (गुजरात)
१२)केंद्रीय गवत व चारा संशोधन केंद्र
=झाशी (मध्‍यप्रदेश)
१३)केंद्रीय मधुमक्षिका संशोधन केंद्र
=पुणे
१४)केंद्रीय काजू संशोधन केंद्र
=पहूर
१५)केंद्रीय ताग संशोधन केंद्र
=बराकपूर (पश्चिम बंगाल)
१६)केंद्रीय तंबाखू संशोधन केंद्र
=राजमहेंद्री (आंध्रप्रदेश)
१७)केंद्रीय लिंबुवर्गीय फळ संशोधन केंद्र
=नागपूर
१८)केंद्रीय सोयाबीन संशोधन केंद्र
=इंदोर (मध्‍यप्रदेश)
१९)केंद्रीय कापूस संशोधन केंद्र
=नागपूर
२०)केंद्रीय ज्‍वारी संशोधन केंद्र
=राजेंद्रनगर (आंध्रप्रदेश)
२१)केंद्रीय अळंबी संशोधन केंद्र
=सोलन
२२)केंद्रीय उंट संशोधन केंद्र
=जोरबीट (राजस्‍थान)
२३)केंद्रीय ताग संशोधन केंद्र
=बराकपूर (पश्चिम बंगाल)
२४)केंद्रीय लाख संशोधन केंद्र
=रांची (झारखंड)
२५)केंद्रीय फळ संशोधन केंद्र
=गणेशखिंड (पुणे)
२६)मसाला पीक संशोधन केंद्र
=केरळ
२७)इंटरनॅशनल क्रॉप रिसर्च फॉर सेमीअॅरिड ट्रॉपिक्‍स
=हैदराबाद (आंध्रप्रदेश)
_______________________________________
Join our channel here @MPSCGeography
_______________________________________
Telegram.me/MPSCGeography
• महाराष्ट्र --- लावणी, कोळी नृत्य

• तामिळनाडू --- भरतनाट्यम

• केरळ --- कथकली

• आंध्र प्रदेश --- कुचीपुडी, कोल्लतम

• पंजाब --- भांगडा, गिद्धा

• गुजरात --- गरबा, रास

• ओरिसा --- ओडिसी

• जम्मू आणी काश्मीर --- रौफ

• आसाम --- बिहू, जुमर नाच

• उत्तरखंड --- गर्वाली

• मध्य प्रदेश --- कर्मा, चार्कुला

• मेघालय --- लाहो

• कर्नाटका --- यक्षगान, हत्तारी

• मिझोरम --- खान्तुंम

• गोवा --- मंडो

• मणिपूर --- मणिपुरी

• अरुणाचल प्रदेश --- बार्दो छम

• झारखंड- कर्मा

• छत्तीसगढ --- पंथी

• राजस्थान --- घूमर

• पश्चिम बंगाल --- गंभीरा

• उत्तर प्रदेश --- कथक
______________________________________
🌍 @MPSCGeography 🌍
Forwarded from MPSC Material
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
वातावरणातील कार्बन डायॉक्साईड पातळी यावर्षी एल निनो परिणामामुळे वाढणार आहे, ती ४०० पीपीएम (पार्टिकल्स पर मिलियन) इतकी होईल असा अंदाज नवीन संशोधनात वर्तवला आहे. कार्बन डायॉक्साईडची पातळी वाढल्याने हरितगृह परिणाम वाढणार आहे.

मेट ऑफिस हॅडली सेंटर फॉर क्लायमेट चेंज व युनिव्हर्सिटी ऑफ एक्सटर यांचे संशोधक रिचर्ड बेटस यांनी सांगितले, की वातावरणात कार्बन डायॉक्साईडचे प्रमाण मानवी उत्सर्जनांमुळे वाढत आहे. अलीकडच्या एल निनो परिणामामुळे ते अधिकच वाढले आहे. सागरी पृष्ठभागावरच्या तापमानातील फरकांमुळे कटीबंधीय प्रशांत महासागरातील प्रवाहात काही बदल होतात, त्याला एल निनो परिणाम असे म्हणतात. त्यामुळे परिसंस्था तप्त बनतात व कटीबंधीय परिसंस्था कोरडय़ा पडतात. त्यामुळे कार्बनचे शोषण कमी होऊन वणवे पेटतात.

मानवी उत्सर्जन हे १९९७/९८ च्या एल निनोपेक्षा २५ टक्के जास्त असून त्यामुळे यावर्षी कार्बन डायॉक्साईडचे प्रमाण वाढले आहे असे त्यांनी सांगितले. मोसमी हवामान अंदाज प्रारूप व सागरी तापमानाचा संख्याशास्त्रीय संबंध यामुळे यावर्षी कार्बन डायॉक्साईडची वाढ ३.१५ पीपीएम इतकी आहे. २०१६ मध्ये सरासरी ४०४.४५ पीपीएम इतका अंदाज असला तरी हे प्रमाण सप्टेंबरमध्ये ४०१.४८ पीपीएम राहील. वैज्ञानिकांनी गेल्या महिन्यात कमाल अंदाज ४०७ पीपीएम इतका दिला आहे. कार्बन डायॉक्साईडची मापने मौना लोआ या हवाईतील वेधशाळेने घेतली असून तेथून सतत त्यावर लक्ष ठेवले जात असते. १९५० पासूनचे हवामान बदल तेथील माहितीमुळे टिपता आले आहेत. कार्बन डायॉक्साईडच्या प्रमाणात मोसमानुसार कमी जास्त होत असून वनस्पती उन्हाळ्यात कार्बन डायॉक्साईड शोषतात व नंतर हिवाळा व इतर ऋतूत तो जास्त प्रमाणात बाहेर सोडतात. मौना लोआ येथे कार्बन डायॉक्साईडचे प्रमाण ४०० पीपीएम इतके नोंदले गेले असून ते सप्टेंबपर्यंत कमी होण्याची शक्यता होती. पण तसे घडणार नाही कारण एल निनोमुळे तापमान वाढ तर झाली आहेच, शिवाय कटीबंधीय परिसंस्था तापल्याने वणवे लागत आहेत.

कार्बन डायॉक्साईड वाढल्यानेही वणवे पेटत आहेत. नैसर्गिक प्रक्रियात वातावरणातील कार्बन डायॉक्साईड खेचला जातो, पण मानवी उत्सर्जन कमी झाले तरी त्याचे प्रमाण अधिकच असते. वैज्ञानिकांच्या मते मानवी आयुष्यकाळात प्रथमच कार्बनचे प्रमाण ४०० पीपीएमपेक्षा अधिक राहील. नैसर्गिक चक्रे मानवी प्रभावाशी कशी आंतरक्रिया करतात यावर हवामान विज्ञानातील घटक अवलंबून असतात. यातून हवामानाची नवी प्रारूपे शक्य असतात, असे मेट ऑफिस हॅडली सेंटरचे ख्रिस जोन्स यांनी सांगितले. हे संशोधन ‘नेचर क्लायमेट चेंज’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे.
_______________________________________
Join us here @MPSCGeography
@MPSCGeography

(Y) महाराष्ट्रातील जिल्हावार धरणे :-

●››अमरावती जिल्हा: ऊर्ध्व वर्धा धरण

●››अहमदनगर जिल्हा : आढळा प्रकल्प,ढोकी धरण, तिरखोल धरण, निळवंडे धरण, पळशी धरण, भंडारदरा धरण,मांडओहळ धरण, ज्ञानेश्वरसागर तलाव(मुळा धरण, रुई छत्रपती धरण,लोणीमावळा धरण, विसापूर तलाव,सीना धरण, हंगा धरण, ज्ञानेश्वरसागर तलाव(मुळा धरण)

●›› औरंगाबाद जिल्हा : गराडा तळे,गौताळा तलाव, जायकवाडी धरण,नागद तलाव, निर्भोर तळे

●›› उस्मानाबाद जिल्हा : तेरणा धरण

●›› कोल्हापूर जिल्हा : रंकाळा तलाव

●›› गडचिरोली जिल्हा : दिना

●›› गोंदिया जिल्हा : इटियाडोह

●›››चंद्रपूर जिल्हा : पेंच आसोलामेंढा

●››जळगाव जिल्हा : अग्नावती धरण,अंजनी धरण, अभोरा धरण,काळा बंधारा, कृष्णपुरी बंधारा, गाळण पाझर तलाव, गिरणा धरण,जामदा बंधारा, तोंडापुरा धरण,दहीगाव बंधारा, धामणगाव बंधारा,पांझण उजवा कालवा,पिंपरी बंधारा,बहुळा धरण, बळाड बंधारा, बुधगाव बंधारा, बोरी धरण,भोकरबारी प्रकल्प, मंगरूळ धरण,मन्याड धरण, महरून तलाव, मोर धरण,म्हसवा बंधारा, वडगाव बंधारा, वाघूर धरण, वाडी पाझर तलाव, सातगाव डोंगरी, सार्वेपिंप्री बंधारा,सुकी धरण, हतनूर धरण, हिवरा धरण, होळ बंधारा (एकूण ३२)

●›› ठाणे जिल्हा : भातसा धरण, बरवी,सूर्या धामणी, सूर्या कवडासे

●››धुळे जिल्हा : अक्कलपाडा धरण,अंचोळे, कानोली, गोंदूर तलाव,डेडरगाव तलाव, देवभाने, नकाणे तलाव,पुरमेपाडा, मांडळ, राक्षी, हरणमाळ तलाव

●››नंदुरबार जिल्हा : यशवंत तलाव,

●›› नागपूर जिल्हा : उमरी कान्होजी,कामठी खैरी , कोलार, निम्न वेणा (वाडेगाव), निम्न वेणा (नांद) ,पेंच तोतलाडोह , पेंच रामटेक ,पेंढारी धरण, मनोरी धरण,रोढोरी धरण, साईकी धरण.

●›› नांदेड जिल्हा : इसापूर धरण, निम्न दुधना धरण, विष्णुपुरी धरण

●›› नाशिक जिल्हा : अर्जुनसागर,केल्झार धरण, गंगापूर धरण,गिरणा धरण, चणकापूर धरण,,लोहशिंगवे धरण, हरणबारी धरण, पुणे गाव, कारजवन, तिसगाव, ओझरखेड,वाघाड, पालखेड, भावली धरण, मुकणे धरण, कडवा, दारणा धरण

●›› परभणी जिल्हा : कर्परा धरण, लोअर दुधना धरण, पूर्णा येलावारी,पूर्णासिद्धेश्वर, येलदरी धरण

●›› पुणे जिल्हा : आंध्रा धरण, उरवडे बंधारा, खडकवासला धरण, घोड धरण,चपेटधरण, चासकमान धरण, चंचवड बंधारा, टेमघर धरण, डिंभे धरण,तुंगार्ली धरण, देवघर धरण,पवना प्रकल्प, पानशेत धरण,पिंपळगावधरण, पिंपोळी बंधारा, भाटघर धरण,भुशी धरण, भूगाव बंधारा, माणिकडोह धरण, मारणेव्बाडी बंधारा,मुळशी धरण, येडगाव धरण, रिहे बंधारा,लवळे बंधारा, लोणावळा तलाव, वडज धरण, वरसगाव धरण, वळवण धरण, वाळेण बंधारा, वीर धरण, शिरवटा धरण,आयएनएस शिवाजी तलाव, हाडशी बंधारा १, हाडशी बंधारा २ (एकूण ३४)

●›› बुलढाणा जिल्हा :खडकपूर्णा धरणनळगंगा धरण वाण,पेंटाळी

●›› बीड जिल्हा : माजलगाव धरण,मांजरा धरण

●›› भंडारा जिल्हा : इंदिरासागरप्रकलप, कऱ्हाडा तलाव प्रकलप, खांब तलाव प्रकलप, चांदपूर तलाव प्रकलप,बहुळा धरणप्रकलप, बालसमुद्र प्रकलप,इतीयाडोह प्रकलप , बाघ शिरपूरप्रकलप, बाघ पुजारीटोला प्रकलप,बाघ कालीसरार प्रकलप , गोसीखुर्दप्रकलप

●›› मुंबई जिल्हा : मोडक सागर, तानसा,विहार, तुळशी

●›› यवतमाळ जिल्हा: पूस ,अरुणावती ,बेंबळा

●›› वर्धा जिल्हा : ऊर्ध्व वर्धा धरण,डोंगरगाव प्रकल्प, धाम धरण(महाकालीजलाशय), नांद प्रकल्प,निम्न वर्धा धरण, पंचधारा प्रकल्प,पोथरा प्रकल्प, बेंबळा प्रकल्प, बोरप्रकल्प, मदन उन्न,ई प्रकल्प, लाल नाला प्रकल्प, वडगाव प्रकल्प,वर्धा कार नदी प्रकल्प, सुकळी लघुप्रकल्प (एकूण १४)

●›› सातारा जिल्हा : उरमोडी धरण,कण्हेर धरण, कास तलाव,कोयना धरण(शिवसागर), जांभळी जंगल तलाव,तापोळा तलाव, तारळी धरण, धोम धरण, बलकवडी धरण, बामणोली तलाव,मोती तलाव, मोरणा धरण, वेण्णा तलाव (एकूण १२)

●›› सिंधुदुर्ग जिल्हा : तिलारी धरण,देवधर धरण

●›› सोलापूर जिल्हा : आष्टी तलाव,उजनी धरण , एकरुख तलाव, कंबर तलाव,गिरणीतलाव,पाथरी तलाव, भीमा-सीना नद्यांना जोडणारा भूमिगत कालवा , बुद्धिहाळ तलाव,यशवंतसागर (उजनी) तलाव,संभाजी तलाव,सिद्धेश्वर तलाव, हिप्परगी तलाव,एकरुखे तलाव, होटगी तलाव (एकूण ११)

●›› हिंगोली जिल्हा : येलदरी धरण,सिद्धेश्वर धरण.
_____________________________________
Join us @MPSCGeography
🔹राज्य - राजधानी

(1)मध्यप्रदेश 🇮🇳 भोपाल

(2) राजस्थान 🇮🇳 जयपुर

(3)महाराष्ट्र 🇮🇳 मुंबई

(4) उत्तर प्रदेश 🇮🇳 लखनऊ

(5)आंध्र प्रदेश 🇮🇳 हैदराबाद

(6)जम्मू कश्मीर🇮🇳श्रीनगर ,जम्मू

(7)गुजरात 🇮🇳 गांधीनगर

(8)कर्नाटक 🇮🇳 बेंगलूरु

(9) बिहार 🇮🇳 पटना

(10)उड़ीसा 🇮🇳 भुवनेश्वर

(11) तमिलनाडु 🇮🇳 चेन्नई

(12) पश्चिम बंगाल 🇮🇳 कोलकाता

(13)अरुणाचल प्रदेश 🇮🇳 ईटानगर

(14)असम 🇮🇳 दिसपुर

(15) हिमाचल प्रदेश 🇮🇳 शिमला

(16)पंजाब 🇮🇳 चंडीगढ़

(17) हरियाणा 🇮🇳 चंडीगढ़

(18) केरल 🇮🇳 तिरुवनंतपुरम

(19) मेघालय 🇮🇳 शिलांग

(20) मणिपुर 🇮🇳 इंफाल

(21) मिजोरम 🇮🇳 आईजोल

(22) नागालैंड 🇮🇳 कोहिमा

(23)त्रिपुरा 🇮🇳 अगरतला

(24)सिक्किम 🇮🇳 गंगटोक

(25)गोवा 🇮🇳 पणजी

(26)छत्तीसगढ़ 🇮🇳 रायपुर

(27) उत्तराखंड 🇮🇳 देहरादून

(28) झारखंड 🇮🇳 रांची

(29)तेलंगणा 🇮🇳 हैद्राबाद

-------------------------------------------------------------
To join our channel click on @MPSCGeography
🔹चंद्रासंबंधीची माहिती :

चंद्र हा पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे.

चंद्र पृथ्वीपासून 3,82,144 किलोमीटर अंतरावर आहे.

चंद्राचा व्यास 3,478 किलोमीटर आहे.

चंद्राची गुरुत्वाकर्षण शक्ति पृथ्वीच्या सहापटीने कमी आहे.

चंद्रास सूर्यापासून मिळणार्‍या उष्णतेच्या फक्त 7% भाग परावर्तीत करतो. यामुळे चंद्राचा प्रकाश आपणास शितल वाटतो.

चंद्र व पृथ्वीच्या परिवलन व परिभ्रमन गतीमुळे चंद्र दररोज 50 मिनीटे उशिरा उगावतो.

चंद्राचा हा कालावधी अमवश्या ते पौर्णिमा असा मनाला जातो. हा कालावधी 29 दिवस आहे. याला चंद्रमास असे म्हणतात.

चंद्राचा 59% भाग पृथ्वीवरून दिसतो.

चंद्राच्या पृथ्वीभोवतीच्या परीभ्रमणामुळे पृथ्वीवर चंद्रग्रहण व सूर्यग्रहण हे दोन अविष्कार पाहावयास मिळतात.

चंद्र, सूर्य आणि पृथ्वी यांच्यातील आकर्षण आणि प्रतीकर्षण बलामुळे पृथ्वीवरील समुद्रात भरती व ओहोटी येते.

पोर्णिमेला आणि अमावश्येला चंद्र, सूर्य व पृथ्वी एकाच रेषेत येते. या दिवशी चंद्र व सूर्य यांच्या एकति गुरुत्वीय बलामुळे पृथ्वीवर सर्वात मोठी भरती येते. याला उधानाची भरती म्हणतात.

अष्टमिला चंद्र आणि सूर्य पृथ्वीला काटकोन करतात या दिवशी येणार्‍या भरतीला भांगेची भरती असे म्हणतात.
________________________________________
आमचे चॅनेल जॉईन करण्यासाठी @MPSCGeography येथे क्लिक करा.
Forwarded from MPSC Material
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from MPSC Material
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
जागतिक लोकसंख्येच्या 1 टक्के लोक निर्वासित

‘‘जागतिक निर्वासित दिनानिमित्त संयुक्त राष्ट्रसंघाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार 2015 या वर्षाच्या अखेरीस 6.53 कोटी नागरिकांना घर सोडावे लागले. याचा अर्थ असा की जगाच्या एकूण लोकसंख्येच्या 1 टक्के नागरिकांना जबरदस्तीने बेघर व्हावे लागत आहे. स्वदेशातील अशांतता, युद्धजन्य वातावरण व इतर काही कारणांमुळे इतर देशांमध्ये स्थलांतर करणार्‍या जगभरातील नागरिकांच्या संख्येने यंदा उच्चांक गाठला आहे. स्थलांतरितांच्या संख्येने प्रथमच 6 कोटींचा आकडा पार करून अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.

अफगाणिस्तान, इराक, सीरिया, येमेन, पॅलेस्टाईन येथील अशांत परिस्थितीमुळे मोठ्या संख्येने नागरिक युरोपमध्ये प्रवेश करत आहेत. बेघर झालेल्यांपैकी 60 टक्के नागरिक त्यांच्याच देशात इतरत्र आश्रय घेत असले तरी 40 टक्के नागरिक देशच सोडून जात आहेत.

या देशांमधील स्थिती अजूनही सुधारण्याची चिन्हे नसताना स्थलांतरितांमुळे त्यांना सामावून घेणार्‍या देशांमध्ये नवे प्रश्न निर्माण होत आहेत. या देशांमधील गुन्ह्यांमध्ये 17 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

मानवतेच्या दृष्टिकोनातून बहुतेक देश स्थलांतरितांना आश्रय देत असले तरी त्यांच्या अर्थव्यवस्थेवर आणि पर्यायाने समाजावर पडणार्‍या ताणामुळे सामाजिक तणाव निर्माण होऊ लागला आहे. जर्मनीमध्ये सर्वाधिक निर्वासितांनी आश्रय घेतला आहे. यामुळे या समस्येतून मार्ग काढण्यासाठी युरोपमधील देश एकत्र येत आहेत.

निर्वासितांची परिस्थिती -

* 7.34 अब्ज : जगाची लोकसंख्या

* 6.53 कोटी : निर्वासितांची संख्या

* 58 लाख : निर्वासितांमध्ये झालेली वाढ

* 49 लाख : सीरियामधील निर्वासित

* 27 लाख : अफगाणिस्तानमधील निर्वासित

* 11 लाख : सोमालियामधील निर्वासित
______________________________________
Join us @eMPSCkatta
🔹भारतातील सर्वात लांब :

1.भारतातील सर्वात लांब नदी - गंगा नदी (2,510 किमी.)
2.भारतातील सर्वात लांब धरण - हिराकुंड धरण (महानदीवर, ओरिसा)
3.भारतातील सर्वात लांब बोगदा - जवाहर बोगदा
4.भारतातील सर्वात लांब लेणी - अजिंठा
5.भारतातील सर्वात लांब रेल्वेमार्ग- जम्मूतावी ते कन्याकुमारी
6.भारतातील सर्वात लांब रेल्वेपुल - सोन नदीवरील पूल
7.भारतातील सर्वात लांब रस्ता - पूलगांधी सेतु
8.भारतातील सर्वात लांब विधुत रेल्वे मार्ग- दिल्ली ते कलकत्ता
9.भारतातील सर्वात लांब पूल - हावडा ब्रीज
10.भारतातील सर्वात लांब समुद्रावरील पुल
- सी-लिंक, मुंबई (वरळी-बांद्रा)
_______________________________________
Join us @MPSCGeography
             
🚩महाराष्ट्रातील जिल्ह्यांना जोडणारे इतर राज्यांच्या 🏳 सीमा :-


१) मध्य प्रदेश 🐯 :-
नंदूरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया..

२) कर्नाटक 🌮 :-
कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड..

३) आंध्र प्रदेश 🍂 :-
गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड..

४) गुजरात 🌾 :-
ठाणे, नाशिक, नंदूरबार, धुळे..

५) दादरा, नगर-हवेली 🏄🏼 :-
ठाणे, नाशिक..

६) छत्तीसगड :-
गोंदिया, गडचिरोली..

७) गोवा 🌴:-
सिंधुदुर्ग..
_______________________________________
Join us @MPSCGeography
महाराष्ट्राचा भूगोल ••••••
दख्खनवरील पठारे
------------------------------------------------------------
-----------------------
अ.क्र. पठार. जिल्हा.
------------------------------------------------------------
-----------------------
१) अहमदनगर पठार. अहमदनगर.
२) सासवड पठार. पुणे.
३) औंध पठार. सातारा.
४) पाचगणी पठार (टेबललँड) सातारा.
५) खानापूर पठार. सांगली.
६) मालेगांव पठार. नाशिक.
७) बुलढाणा पठार. बुलढाणा.
८) तोरणमाळ पठार. नंदुरबार.
------------------------------------------------------------
-----------------------
दख्खन पठारावरील अन्य डोंगर (टेकड्या)
------------------------------------------------------------
-----------------------
अ. क्र. डोंगर. जिल्हा.
------------------------------------------------------------
-----------------------
०१) अस्तंभा डोंगर. नंदुरबार.
०२) गाळणा डोंगर. धुळे-नंदुरबार.
०३) अजिंठा डोंगर. औरंगाबाद.
०४) वेरुळ डोंगर. औरंगाबाद.
०५) हिंगोली डोंगर. हिंगोली.
०६) मुदखेड डोंगर. नांदेड.
०७) गरमसूर डोंगर. नागपुर.
०८) दरकेसा टेकड्या गोंदिया.
०९) चिरोली डोंगर. गडचिरोली.
१०) भामरागड. गडचिरोली.
११) सुरजागड. गडचिरोली.
------------------------------------------------------------
-----------------------
महाराष्ट्रातील महत्त्वाची शिखरे.
------------------------------------------------------------
-----------------------
अ. क्र. शिखर. उंची जिल्हा
------------------------------------------------------------
-----------------------
०१) कळसुबाई. १६४६. अहमदनगर.
०२) साल्हेर. १५६७. नाशिक.
०३) महाबळेश्वर. १४३८. सातारा.
०४) हरिश्चंद्रगड. १४२४. अहमदनगर.
०५) सप्तश्रुंगी. १४१६. नाशिक.
०६) तोरणा. १४०४. पुणे.
०७) अस्तंभा. १३२५. नंदुरबार.
०८) त्र्यंबकेश्वर. १३०४. नाशिक.
०९) तौला. १२३१. नाशिक.
१०) वैराट. ११७७. अमरावती.
११) चिखलदरा. १११५. अमरावती.
१२) हनुमान. १०६३. धुळे.
------------------------------------------------------------
-----------------------
महाराष्ट्रातील प्रमुख घाट.
------------------------------------------------------------
-----------------------
अ. क्र. घाट. मार्ग
------------------------------------------------------------
-----------------------
०१) थळ (कसारा) घाट. मुंबई-नाशिक.
०२) बोरघाट. पुणे-मुंबई.
०३) खंबाटकी घाट. पुणे-सातारा.
०४) दिवा घाट. पुणे-बारामती.
०५) कुंभार्ली घाट. कराड-चिपळुण.
०६) आंबा घाट. कोल्हापुर-रत्नागिरी.
०७) आंबोली घाट. सावंतवाडी-बेळगांव.
०८) फोंडा घाट. कोल्हापुर-पणजी.
------------------------------------------------------------
-----------------------
महाराष्ट्र : राष्ट्रीय उद्याने.
------------------------------------------------------------
----------------------------
अ.क्र. उद्याने जिल्हा क्षेत्रफळ.
------------------------------------------------------------
----------------------------
०१) ताडोबा चंद्रपुर. ११६.५५०
०२) संजय गांधी. ठाणे-मुंबई उपनगर. ८६.९८५
०३) नवेगांव. भंडारा १३३.८८०
०४) पेंच नागपुर. २५९.७१०
(जवाहरलाल नेहरु).
०५) गुगामल. अमरावती. ३६१.६८०
०६) चांदोली. सातारा, सांगली, ३१७.६७०
कोल्हापुर, रत्नागिरी
------------------------------------------------------------
--------------------------
महाराष्ट्र : व्याघ्र प्रकल्प.
------------------------------------------------------------
--------------------------------
अ.क्र. व्याघ्र प्रकल्प. जिल्हा क्षेत्रफळ
(चौकिमी)
------------------------------------------------------------
--------------------------------
०१) मेळघाट व्याघ्र प्रकल्प. अमरावती २७६९
०२) ताडोबा अंधारी चंद्रपुर. १७२८
०३) सह्याद्री (चांदोली). सातारा, रत्नागिरी
११६६
कोल्हापुर, रत्नागिरी
०४) पेंच (नेहरु)क्षेत्रफळ नागपुर. ७४१
०५) नागझिरा गोंदिया
------------------------------------------------------------
---------------------------------
महाराष्ट्र : थंड हवेची ठिकाणे
------------------------------------------------------------
-----------------------
अ.क्र. जिल्हा ठिकाण
------------------------------------------------------------
-----------------------
०१) सातारा महाबळेश्वर, पाचगणी.
०२) रायगड. माथेरान.
०३) बीड. चिंचोली.
०४) औरंगाबाद. म्हैसमाळ.
०५) पुणे लोणावळा, खंडाळा, भीमाशंकर,
तोरणा
०६) अमरावती चिखलदरा.
०७) नागपुर. रामटेक.
०८) जळगांव. पाल.
०९) रत्नागिरी दापोली, माचाळ.
१०) ठाणे जवाई, सुर्यमाळ.
११) नाशिक. सप्तश्रुंगी.
१२) नंदुरबार. तोरणमाळ.
१३) अहमदनगर. भंडारदरा.
१४) कोल्हापुर. पन्हाळा, विशालगड.
१५) अकोला नर्नाळा.
१६) सिंधुदुर्ग. अंबोली.
---------------------------
---------------------------------
-----------------------
महाराष्ट्र : गरम पाण्याचे झरे.
------------------------------------------------------------
-----------------------
अ.क्र. जिल्हा झरे
------------------------------------------------------------
-----------------------
०१) जळगांव. चांगदेव, अडावेद, उपनदेव.
०२) रायगड. साव, उन्हेर.
०३) अमरावती सालबरडी.
०४) नांदेड. उनकेश्वर.
०५) यवतमाळ. कापेश्वर.
०६) ठाणे वज्रेश्वरी, अकलोली, सतीवली.
०७) रत्नागिरी उन्हर्वे, अरवली, फनसवने,
राजापौर उन्हाळे, तूरळ, गोळवली.
महाराष्ट्र : लेण्या
------------------------------------------------------------
-----------------------
अ.क्र जिल्हे लेण्या
------------------------------------------------------------
-----------------------
०१) औरंगाबाद. अजिंठा & वेरुळ, म्हैसमाळ व
गलवाडा.
०२) नाशिक. पांडव, भिलवाडा, मुंगी-तुंगी,
चांदवड,
चांभार, अंकाई-टंकाई लेण्या.
०३) पुणे कार्ले, बेडसा, भादे, लेण्याद्री, चावंड,
जीवधन.
०४) नांदेड. माहूर & शिऊर.
०५) लातूर. खरोसा (औसा)
०६) जालना भोकरदन.
०७) जळगांव. घटोत्कच लेणी.
०८) कोल्हापुर. हिद्रापूर.
०९) ठाणे सोपारा, अंबरनाथ, अशरगड, लोणाड.
१०) सिंधुदुर्ग. आचरा.
११) सातारा लोणारवाई.
१२) उस्मानाबाद. धाराशिव.
१३) अकोला पातूर.
१४) चंद्रपुर. भद्रावती.
१५) बीड. अंबाजोगाई.
१६) मुंबई उपनगर. महाकाली, जोगेश्वरी, मंडपेश्वर,
कान्हेरी(मुंबई ठाणे सिमेवर).
१७) रायगड. धारापूरी (एलीफंटा अरोरा.)
गांधारफणी, चामले, कोंडगांव, कोल,
कोंडाणे, कुडा, पाले, खडसावळे.
------------------------------------------------------------
-----------------------
महाराष्ट्र : अष्टविनायक
------------------------------------------------------------
-----------------------
अ.क्र. अष्टविनायक. स्थान
------------------------------------------------------------
-----------------------
०१) महागणपती रांजणगांव (पुणे)
०२) चिंतामणी थेऊर. (पुणे)
०३) मोरेश्वर. मोरगांव. (पुणे)
०४) विघ्नहर. ओझर. (पुणे)
०५) गिरिजात्मक. लेण्याद्री (पुणे)
०६) बल्लाळेश्वर. पाली (रायगड)
०७) वरद विनायक. महाड. (रायगड)
०८) सिध्दी विनायक. सिध्दटेक (अहमदनगर)
------------------------------------------------------------
-----------------------
महाराष्ट्र : औष्णिक विद्युत प्रकल्प
------------------------------------------------------------
-----------------------
अ.क्र. प्रकल्प. ठिकाण.
------------------------------------------------------------
-----------------------
०१) कोराडी, खापरखेडा नागपुर.
०२) दुर्गापूर. बल्लारपूर (चंद्रपुर)
०३) डहाणू, चोला ठाणे.
०४) एकलहरे नाशिक.
०५) बीड. परळी वैजनाथ.
०६) फेकरी भुसावळ.
०७) पारस. अकोला.
०८) ऊरण. रायगड.
------------------------------------------------------------
-----------------------
महाराष्ट्र : अभयारण्ये.
------------------------------------------------------------
-----------------------
कोकण प्रशासकीय विभागातील अभयारण्ये
०१) कर्नाळा, फनसाड रायगड.
०२) तुंगारेश्वर, तानसा ठाणे.
०३) मालवण. सिंधुदुर्ग.
------------------------------------------------------------
-----------------------
पुणे प्रशासकीय विभागातील अभयारण्ये
०१) भिमाशंकर अभयारण्य. पुणे व ठाणे.
०२) कोयना अभयारण्य. सातारा.
०३) सागरेश्वर अभयारण्य. सांगली.
०४) राधानगरी अभयारण्य. कोल्हापुर.
०५) मयुरेश्वर सूपे अभयारण्य. पुणे
------------------------------------------------------------
-----------------------
नाशिक प्रशासकीय विभागातील अभयारण्ये
०१) रेहेकुरी अभयारण्य. अहमदनगर.
०२) माळढोक पक्षी अभयारण्य. सोलापुर &
अहमदनगर.
०३) कळसुबाई व हरिश्चंद्र अभयारण्य. अहमदनगर.
०४) यावल अभयारण्य. जळगांव.
०५) अनेर धरण अभयारण्य. नंदुरबार.
------------------------------------------------------------
-----------------------
औरंगाबाद प्रशासकीय विभागातील
अभयारण्ये.
०१) जायकवाडी पक्षी अभयारण्य. औरंगाबाद
व नगर.
०२) नायगांव मयुर अभयारण्य बीड.
०३) येडशी रामलिंग घाट अभयारण्य.
उस्मानाबाद.
०४) गवताळा औटरम घाट अभयारण्य. औरंगाबाद
व जळगांव.
------------------------------------------------------------
-----------------------
अमरावती प्रशासकीय विभागातील अभयारण्ये
०१) ढाळकोळकाज/मेळघाट, वाणअभयारण्य.
अमरावती.
०२) काटेपूर्णा अभयारण्य. वाशिम.
०३) पैनगंगा अभयारण्य. नांदेड व यवतमाळ.
०४) अंबाबर्वा, ज्ञानगंगा, लोणार अभयारण्य
बुलढाणा.
०५) नर्नाळा अभयारण्य. अकोला.
०६) टिपेश्वर अभयारण्य. यवतमाळ.
नागपुर प्रशासकीय विभागातील अभयारण्ये
०१) नागनागझिरा गोंदिया
०२) बोर. वर्घा व नागपुर
०३) अंधारी चंद्रपुर
०४) चपराळा, भांबरागड. गडचिरोली....
________________
_________________________
Join us @MPSCGeography
🔹जगातील भौगोलिक उपनाव व त्यांची टोपण नावे :

भौगोलिक उपनाव - टोपणनाव

1) ऑड्रियाटिकची राणी - व्हेनिस (इटली)
2) उगवत्या सूर्याचा प्रदेश - जपान
3) काळे खंड - आफ्रिका
4) कांगारूची भूमी - ऑस्ट्रेलिया
5) गगनचुंबी इमारताचे शहर - न्यूयॉर्क
6) चीनचे अश्रू - व्हंग हो नदी
7) गोर्‍या माणसाचे कबरस्तान - गिनीचा किनारा
8) जगाचे छप्पर - पामिराचे पठार
9) दक्षिणेकडील इंग्लंड - न्यूझीलंड
10) नाईलची देणगी - इजिप्त
11) पवित्र भूमी - पॅलेस्टाईन
12) पाचुचे बेट - श्रीलंका
13) पूर्वेकडील ब्रिटन - जपान
14) भूमध्य सागराची किल्ली - जिब्राल्टर
15) मध्यरात्रीच्या सूर्याचा प्रदेश - नॉर्वे
16) गव्हाचे कोठार - युक्रेन
______________________________________
Join our channel here @MPSCGeography
🔹भारतातील सर्वात लांब :

1.भारतातील सर्वात लांब नदी - गंगा नदी (2,510 किमी.)
2.भारतातील सर्वात लांब धरण - हिराकुंड धरण (महानदीवर, ओरिसा)
3.भारतातील सर्वात लांब बोगदा - जवाहर बोगदा
4.भारतातील सर्वात लांब लेणी - अजिंठा
5.भारतातील सर्वात लांब रेल्वेमार्ग- जम्मूतावी ते कन्याकुमारी
6.भारतातील सर्वात लांब रेल्वेपुल - सोन नदीवरील पूल
7.भारतातील सर्वात लांब रस्ता - पूलगांधी सेतु
8.भारतातील सर्वात लांब विधुत रेल्वे मार्ग- दिल्ली ते कलकत्ता
9.भारतातील सर्वात लांब पूल - हावडा ब्रीज
10.भारतातील सर्वात लांब समुद्रावरील पुल
- सी-लिंक, मुंबई (वरळी-बांद्रा)
______________________________________
To join this channel click here @MPSCGeography