MPSC Geography
139K subscribers
7.79K photos
82 videos
564 files
1.07K links
Download Telegram
🔹भूगोल व कृषी

📔‘एसआरटी’ भात लागवड तंत्र

एसआरटी (सगुणा राइस तंत्र) हे शून्य मशागत तंत्र आहे. भातशेती करताना या तंत्रज्ञानामध्ये उखळणी, नांगरणी, चिखलणी आणि कोळपणी यासारख्या अवजारांनी करावयाच्या मशागतीची गरज नाही. हा संवर्धित शेतीचा प्रकार आहे.
यामध्ये पाणी, इंधन, बियाणे, खर्च, वेळ आणि शेतकर्यांचे श्रम याची बचत होऊन पीक उत्पादन आणि जमिनीच्या सुपीकतेमध्ये वाढ होते.

📔 विविध पिके घेणे शक्य -

प्रक्षेत्रावर एसआरटी पद्धतीने भात लागवडीसाठी शेताची आखणी, गादीवाफ्याची निर्मिती, गादीवाफ्यावर भात बियाण्यांची टोकण करण्यासाठी साचाचा वापर, युरिया-डीएपी ब्रिकेटचा वापर, प्रकाश सापळ्याचे फायदे, यांचा विचार करावा लागतो.
अतिपाऊस किंवा अवर्षण या दोन्ही प्रकारच्या परिस्थितीला तोंड देऊन चांगले उत्पादन देण्याची क्षमता या पद्धतीमध्ये आहे.

भात पिकानंतर याच गादीवाफ्यावर रब्बी हंगामामध्ये वाल, कांदा, कोबी, भेंडी, हरभरा, मका, गहू, पालेभाज्या आणि उन्हाळी हंगामामध्ये वैशाखी मूग, भुईमूग, चवळी, भेंडी, सूर्यफूल, इ. पिके घेता येणे शक्य आहे.


📔संवेदनशील पिकांसाठी कमी उंचीचे हरितगृह

हरितगृहामध्ये विविध पिकांची लागवड आता आपल्याकडे वाढू लागली आहे. मात्र, हरितगृहाच्या उभारणीसाठी होणारा सुरवातीचा भांडवली खर्च अधिक असल्याने सामान्य शेतकरी त्याकडे फारसा वळत नाही. यावर कमी उंचीच्या पिकासाठी कमी उंचीची स्वस्त हरितगृहे अत्यंत उपयोगी ठरू शकतात. असे एक प्रारूप अमेरिकेतील ग्रोवर्स सप्लाय या कंपनीने विकसित केले आहे.
विविध भाजीपाला किंवा फूलपिके हे कमी उंचीची असून, हवामान व प्रकाशासाठी संवेदनशील मानली जातात. त्यांच्या वाढीसाठी कमी उंचीची हरितगृह किंवा शेडनेटगृह फायद्याचे ठरू शकते. अमेरिकेमध्ये लो टनेल ग्रीनहाउसेस प्रसिद्ध असली, तरी त्यामध्येही सोयीस्कर बदल ग्रोवर्स सप्लाय कंपनीने केले आहेत.

- हे हरितगृह एका माणसाच्या साह्याने उलगता किंवा घालता येते. गरजेनुसार त्यांच्या बाजूची आच्छादने उघडता किंवा बंद करता येतात. त्यामुळे हवामानाच्या गरजेनुसार त्वरित बदल करून घेता येतात. वार्याचा तीव्र वेगाचा परिणाम पिकावर होत नाही.

- हरितगृहाच्या छतावरील आच्छादनासाठीही पूर्ण पारदर्शक ते काळे, चंदेरी रंगाचे असे विविध पर्याय त्यांनी उपलब्ध केले आहेत. पिकांच्या वाढीच्या विविध अवस्थेमध्ये आवश्यक त्याप्रमाणे प्रकाशाचे नियोजन करता येते. त्याच प्रमाणे नैसर्गिक वायूविजन पद्धतीने आतील हवामानही नियंत्रित ठेवले जाते.

📔 असे आहे ही कमी उंचीचे हरितगृह -

ही सहजतेने उलगता येणारी टनेल्स 26 फूट आणि 30 फूट रुंदीमध्ये उपलब्ध असून, त्याची लांबी 24, 36 किंवा 48 फूट ठेवता येते. याची उंची मध्यावर पाच फूट असून, बाजूला केवळ 32 इंच आहे.

- यासाठी वापरलेली स्टीलची फ्रेमही 14 गेज, तिहेरी गॅलव्हनाइजड प्रकारातील आहे.

- प्रत्येक खांबासाठी योग्य त्या जाडीचा पाया वापरला जातो.

- प्रत्येक ठिकाणी गाडी किंवा यंत्रे आत आणण्यासाठी खास चेनची सोय केलेली आहे.
🔹नागार्जून वनऔषधी उद्यान

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील नागार्जून वन औषधी उद्यानात 600 पेक्षा अधिक दुर्मिळ वनऔषधी, सुगंधी वनस्पतीचे जतन केले गेले आहे. संपदंर्शावरील खडसींग या वनस्पतीपासून शेतकर्‍यांना व्यावसायिक शेती करण्यासाठी सुंगधी वनस्तीची लागवड व प्रशिक्षण देण्यात येत आहे. नागार्जुन वनस्पती उद्यानात सुगंधी औषधी वनस्पतीची रोपे व बियाणे शेतकर्‍यांसाठी ठेवण्यात आली आहेत.

यात कोरफड, शतावारी कंरज, बिहाडा, गुग्गुळ, अडूळसा, पानफुटी, निरगुडी, सुगंधी गवत, तिखाडी, खस (वाळा), ही रोपे तर कौचा, अश्‍वगंधा, अक्कलकारा, बिक्झा इत्यादींच्या बियाण्यासह विविध दुर्मिळ औषधी वनस्पतीचा समावेश आहे. मसाले पदार्थाची विविध जाती येथे असून, मसाले शेतीनंतर विदर्भात सुंगधी औषधी वनस्पतीच्या व्यावसायिक शेतीवर भर देण्यात येत आहे. पारंपरिक शेतीसोबत विदर्भातील शेतकरी मसाले, सुगंधी औषधी वनस्पतीसारख्या व्यावसायिक शेतीची कास धरीत आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या नागार्जुन औषधी वनस्पती उद्यान विभागाने शेतकर्‍यांना बघण्यासाठी तिखाडी तेल प्रकल्प उभा केला आहे.

या प्रकल्पाचा आदर्श घेत विदर्भातील शेतकर्‍यांनी तिखाडी तेल गवताची व्यावसायिक शेती सुरू केली आहे. अंजनगाव सुर्जी येथील शेतकरी विवेक संगवई यांनी तिखाडी गवताची लागवड केली असून, यापासून तिखाडी तेल निर्मितीचा प्रकल्प उभारला आहे. तिखाडी तेलाचा उपयोग गुडघे, सांधेदुखीवर करण्यात येतो. नागपूर जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी माईनमुळा (कोलिअस) या औषधी वनस्पतीची शेती सुरू केली आहे. भंडारा, वर्धा जिल्ह्यात वनस्पतीची लागवड करण्यात आली आहे.
New Doc 1 - Page 1
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
10,000+ members thnx and congratulations friends

Join your friends @MPSCGeography
०१. हिमालयाच्या रोहतांग खिंडीनजीक कोणत्या नदीचा उगम आहे?
बियास

०२. भारताच्या कोणत्या राज्याची राजधानी सात वन्य टेकड्यांवर आहे?
केरळ-तिरुवनंतपुरम

०३. कोणत्या राज्यात देशातील पहिले गायींचे अभयारण्य (Cow's Sanctuary) स्थापन्यात येणार आहे?
मध्य प्रदेश

०४. कोणत्या शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखतात.
औरंगाबाद

०५. हुंडरू धबधबा भारताचा कोणत्या शहराजवळ आहे?
रांची

०६. फेकरी हा औष्णिक विद्युतप्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
जळगाव

०७. मिनिकॉय, कदमत व बित्रा कोणत्या केंद्रशासीत प्रदेशाचे प्रांत आहेत?
लक्षद्वीप

०८. भारतीय पठारी प्रदेशाने किती क्षेत्र व्यापले आहे?
१२ लाख चौ.कि.मी.

०९. नर्मदा नदीच्या दक्षिण भागात असलेले भारतातील सर्वात मोठे पठार कोणते?
दख्खनचे पठार

१०. महाराष्ट्रास लागून कोणत्या राज्याची सीमा सर्वात जास्त लांब आहे?
मध्य प्रदेश

११. महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला सातपुडा पर्वतरांगा व गाविलगड टेकड्या आहेत?
उत्तर

१२. परभणी व नांदेड जिल्ह्यातील डोंगरांच्या रांगेला कोणती रांग म्हणतात?
निर्मळ रांग

१३. 'V' आकाराची दरी कशामुळे तयार होते?
नदीचे अपघर्षण

१४. दगडी कोळशाचा निकृष्ठ दर्जाचा प्रकार कोणता आहे?
Lignite

१५. बावन्न दरवाजांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते?
औरंगाबाद

१६. Table Land नावाने कोणता भाग ओळखला जातो?
पाचगणी

१७. हाफलांग हे पर्वतीय पर्यटन स्थळ कोणत्या राज्यात आहे?
आसाम

१८. पोलो खेळाचा उगम कोणत्या राज्यात झाला आहे?
मणिपूर

१९. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वांत खोल भाग कोणता?
मरियाना गर्ता

२०. गोवरी' कोणत्या भारतीय राज्यातील नृत्य-नाटक आहे?
राजस्थान

२१. घूमरा नृत्यात कोणत्या देवतेची पूजा केली जाते?
दुर्गा

२२. ग्रेट बॅरियर रीफ' कोणत्या महासागरात आहे?
प्रशांत महासागर

२३. या पैकी कोणत्या ग्रहाची कक्षा पृथ्वीच्या सर्वात जवळ आहे?
शुक्र
🔹महाराष्ट्रातील जिल्ह्यांना जोडणारे इतर राज्यांच्या सीमा

१) मध्य प्रदेश- नंदूरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया

२) कर्नाटक - कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड.

३) आंध्र प्रदेश- गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड.

४) गुजरात - ठाणे, नाशिक, नंदूरबार, धुळे.

५) दादरा, नगर-हवेली- ठाणे, नाशिक.

६) छत्तीसगड- गोंदिया, गडचिरोली.

७) गोवा- सिंधुदुर्ग.
🔹महाराष्ट्र --- लावणी, कोळी नृत्य

• तामिळनाडू --- भरतनाट्यम

• केरळ --- कथकली

• आंध्र प्रदेश --- कुचीपुडी, कोल्लतम

• पंजाब --- भांगडा, गिद्धा

• गुजरात --- गरबा, रास

• ओरिसा --- ओडिसी

• जम्मू आणी काश्मीर --- रौफ

• आसाम --- बिहू, जुमर नाच

• उत्तरखंड --- गर्वाली

• मध्य प्रदेश --- कर्मा, चार्कुला

• मेघालय --- लाहो

• कर्नाटका --- यक्षगान, हत्तारी

• मिझोरम --- खान्तुंम

• गोवा --- मंडो

• मणिपूर --- मणिपुरी

• अरुणाचल प्रदेश --- बार्दो छम

• झारखंड- कर्मा

• छत्तीसगढ --- पंथी

• राजस्थान --- घूमर

• पश्चिम बंगाल --- गंभीरा

• उत्तर प्रदेश --- कथक
भुगोल


०१. हिमालयाच्या रोहतांग खिंडीनजीक कोणत्या नदीचा उगम आहे?
>>> बियास

०२. भारताच्या कोणत्या राज्याची राजधानी सात वन्य टेकड्यांवर आहे?
>>>तिरुवनंतपुरम

०३. कोणत्या राज्यात देशातील पहिले गायींचे अभयारण्य (Cow's Sanctuary) स्थापन्यात येणार आहे?
>>>मध्य प्रदेश

०४. कोणत्या शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखतात.
>>>औरंगाबाद

०५. हुंडरू धबधबा भारताचा कोणत्या शहराजवळ आहे?
>>> रांची

०६. फेकरी हा औष्णिक विद्युतप्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
>>> जळगाव

०७. मिनिकॉय, कदमत व बित्रा कोणत्या केंद्रशासीत प्रदेशाचे प्रांत आहेत?
>>> लक्षद्वीप

०८. भारतीय पठारी प्रदेशाने किती क्षेत्र व्यापले आहे?
>>> १२ लाख चौ.कि.मी.

०९. नर्मदा नदीच्या दक्षिण भागात असलेले भारतातील सर्वात मोठे पठार कोणते?
>>> दख्खनचे पठार

१०. महाराष्ट्रास लागून कोणत्या राज्याची सीमा सर्वात जास्त लांब आहे?
>>> मध्य प्रदेश

११. महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला सातपुडा पर्वतरांगा व गाविलगड टेकड्या आहेत?
>>> उत्तर

१२. परभणी व नांदेड जिल्ह्यातील डोंगरांच्या रांगेला कोणती रांग म्हणतात?
>>> निर्मळ रांग

१३. 'V' आकाराची दरी कशामुळे तयार होते?
>>> नदीचे अपघर्षण

१४. दगडी कोळशाचा निकृष्ठ दर्जाचा प्रकार कोणता आहे?
>>> Lignite

१५. बावन्न दरवाजांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते?
>>> औरंगाबाद

१६. Table Land नावाने कोणता भाग ओळखला जातो?
>>> पाचगणी

१७. हाफलांग हे पर्वतीय पर्यटन स्थळ कोणत्या राज्यात आहे?
>>> आसाम

१८. पोलो खेळाचा उगम कोणत्या राज्यात झाला आहे?
>>> मणिपूर

१९. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वांत खोल भाग कोणता?
>>> मरियाना गर्ता

२०. गोवरी' कोणत्या भारतीय राज्यातील नृत्य-नाटक आहे?
>>> राजस्थान

२१. घूमरा नृत्यात कोणत्या देवतेची पूजा केली जाते?
>>> दुर्गा

२२. ग्रेट बॅरियर रीफ' कोणत्या महासागरात आहे?
>>> प्रशांत महासागर

२३. या पैकी कोणत्या ग्रहाची कक्षा पृथ्वीच्या सर्वात जवळ आहे?
>>> शुक्र

२४. कोणत्या नदीचे गौतमी आणि वशिष्ठ हे दोन प्रकार आहेत?
>>> गोदावरी

२५. भारतातील कोणत्या राज्यात ओजापाली नृत्य केले जाते?
>>> आसाम

२६. जगोई, चोलोम व थांग-ता कोणत्या शास्त्रीय नृत्याचे अंश आहेत?
>>> मणिपुरी

२७. भारतातील कोणत्या राज्यात ड्यूक्स नोज हे शिखर आहे?
>>> महाराष्ट्र

२८. इरुवका हा सण कोणत्या भारतीय राज्यातील शेतकर्यांद्वारे साजरा केला जातो?
>>> आंध्र प्रदेश

२९. पॉपीर आणि चालो नृत्य कोणत्या राज्यातील आहे?
>>> अरूणाचल प्रदेश

३०. वारली पेंटीग्ज मूळच्या कोणत्या राज्यातील आहेत?
>>> महाराष्ट्र

३१. लावी जत्रा भारतातील कोणत्या राज्यात भरते?
>>> हिमाचल प्रदेश

३२. फिग्रीन ऑफ गोरा देव' (tribal horse God) ही कोणत्या भारतीय प्रदेशातील कला आहे?
>>> गुजरात

३३. पनिहारी भारतातील कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे?
>>> राजस्थान

३४. कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या भारतीय राज्यात आहे?
>>> सिक्किम

३५. झाबुआ हा आदिवासी भाग कोणत्या राज्यात आहे?
>>> मध्य प्रदेश

३६. भारतात वनांखालील सर्वाधीक भूभाग कोणत्या राज्यात आहे?
>>> मध्य प्रदेश

३७. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण सर्वात कमी आहे?
>>> नंदुरबार

३८. कोणत्या राज्यात रबराची सर्वाधीक लागवड होते?
>>> केरळ

३९. महाराष्ट्रातील कोणता प्रदेश 'तलावाचा प्रदेश' म्हणून ओळखला जातो?
> >> पूर्व विदर्भ

४०. राज्यातील कोणत्या जिल्ह्यात पहिला सहकारी साखर कारखाना उभारण्यात आला ?
>>> अहमदनगर

४१. महाराष्ट्रात कोणत्या नदीची लांबी सर्वात कमी आहे ?
>>> नर्मदा

४२. 'श्रीशैल्यम जलविद्युत प्रकल्प' कोणत्या नदीवर बांधलेला आहे ?
>>> कृष्णा

४३. महाराष्ट्राने भारताचा किती टक्के भाग व्यापलेला आहे?
>>> ९%

४४. महाराष्ट्रातील कोणत्या सीमेला सातपुडा पर्वतांची रांग आहे?
>>> उत्तर सीमेला

४५. महाराष्ट्राला किती किमी चा समुद्रकिनारा लाभला आहे?
>>> ७२० किमी

४६. कोल्हापूर हे शहर कोणत्या नद्या च्या काठावर वसले आहे?
>>> पंचगंगा

४७. महाराष्ट्रात सह्य़ाद्री पर्वताची लांबी किती कि.मी. आहे?
>>> ४४० कि.मी.

४८. महाराष्ट्रातील राळेगणसिध्द हे गाव कोणत्या तालुक्यात आहे?
>>> पारनेर (अहमदनगर जिल्हा)
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
नक्की वाचा:

शेतीला धंदा बनवू नका ,
हे करू नका ,ते करू नका...
हे सगळं बस झालं आता....

स्वतः आर्थिक नियोजन मांडून ...शेती ही कंपनी मानून नीट चालवल्या शिवाय शेतकरी सुखी होणे नाही... ( लोकसत्ता )
★|| eMPSCkatta ||★

जॉईन करा www.empsckatta.blogspot.in या ब्लॉग चे अधिकृत टेलिग्राम चॅनेल.

जॉईन करण्यासाठी @empsckatta यथे क्लिक करा , चॅनेल ओपन होईल , त्यानंतर चॅनेल च्या तळाशी असणाऱ्या JOIN या ऑप्शन वर क्लिक करा.

किंवा

Telegram.me/eMPSCkatta येथे क्लिक करा , चॅनेल ओपन होईल , त्यानंतर चॅनेल च्या तळाशी असणाऱ्या JOIN ऑप्शन वर क्लिक करा.
________________________________________
आपल्या मित्रांनाही जॉईन करा.
🔹सह्याद्री पर्वत
--------------------------------
• सह्याद्रीची निर्मिति *प्रस्तरभंगामुळे* झाली आहे

• सह्याद्री हा *अवशिष्ट* पर्वत आहे

• सह्याद्री पर्वतास *पश्चिमघाट* असेही म्हणतात

• सह्याद्री पर्वत *कोकण किनार पट्टीस समांतर* आहे

• सह्याद्री पर्वताचा विस्तार उत्तरेस *सातमाळा डोंगरा पासून( तापी नदी)* ते दक्षिणेस *कन्याकुमारी* पर्यन्त आहे

• सह्याद्री पर्वताची *लांबी १६०० किमी* असून, महाराष्ट्रात त्याची *४४० किमी* आहे

• सह्याद्री पर्वताने (पश्चिम घाट) *दक्खननच्या पठराची पश्चिम सीमा* निश्चित केली आहे

• सह्याद्री पर्वत समुद्र किनाऱ्या पासून *सरासरी ३० ते ६० किमी* अंतरावर आहे

• सह्याद्री पर्वताची *उंची ९१५ ते १२२० मीटर* आहे

• सह्याद्री पर्वताची *उंची दक्षिणेकडे कमी* होत जाते तर *उत्तरेकड़े वाढते*

• सह्याद्री पर्वताची *रुंदी उत्तरेस जास्त असून दक्षिणेस कमी* आहे

• सह्याद्रीचा *पूर्व उतार मंद* असून पश्चिम किनारपट्टी खचल्यामुळे *पश्चिम उतार तीव्र* आहे
--------------------------------
🔹भारतातील महत्वाची सरोवरे

१) वूलर सरोवर = जम्मू - काश्मीर = भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर

२) दाल सरोवर = जम्मू - काश्मीर = श्रीनगर शहर या सरोवराच्या काठावर वसलेले आहे.

३) चिल्का सरोवर = ओडिशा = भारतातील सर्वात मोठे खा-या पाण्याचे सरोवर

४) लोणार सरोवर = महाराष्ट्र = उल्कापातामुळे निर्माण झालेले जगातील एकमेव सरोवर

५) हुसेनसागर सरोवर = आंध्रप्रदेश = गौतम बुद्धाचा सर्वात मोठा पुतळा हुसेनसागर येथे आहे.

६) सांबर सरोवर = राजस्थान = भारतातील सर्वाधिक खा-या पाण्याचे
सरोवर

Join us @MPSCGeography
🔹भारतातील प्रमुख नद्या व त्यांच्या काठावरील शहरे

ब्रम्हपुत्रा : दिब्रुगड, गुवाहाटी
 महानदी : कटक
 साबरमती : अहमदनगर
 गोदावरी : नाशिक
 सतलज : फिरोजपुर, लुधियाना
 कावेरी : तिरूचिरापल्ली, श्रीरंगपट्टणम
 कृष्णा : विजयवाडा
 गोमती : लखनौ
 मुशी : हैद्राबाद
 गंगा : हरिव्दार, वाराणशी, पाटणा, कानपूर, इलाहाबाद.
 शरयु : आयोध्या
 तापी : सूरत
 नर्मदा : जबलपुर
 हुबडी : कोलकाता
 चंबळ : कोटा
 झेलम : श्रीनगर
 यमुना : दिल्ली, आग्रा

Join us @MPSCGeography
Forwarded from MPSC Material
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM