MPSC Geography
139K subscribers
7.79K photos
82 videos
564 files
1.07K links
Download Telegram
वेण्णा नदी - Page 1
🔴- आदिवासी समुह लक्षणे व वैशिष्ट्ये


*🔻- लक्षणे -*---

१) आदिवासी समुह हा निश्चित भूप्रदेशात राहनारा एक सजातीय समुह आहे.

२) प्रत्येक आदिवासी समुहाला व जमातीला एक विशिष्ट असे नाव परंपरेनुल़सार प्राप्त झालेले असते.
उदा- गौंड, कोरकू, भिल्ल इत्यादी.

३) प्रत्येक आदिवासी जमातीची भाषा भिन्न असते. ती बोलीभाषा असु शकते किंवा लिपीबद्ध भाषा सुद्धा असु शकते. भारतात सुमारे ४०० पेक्षा अधिक बोलीभाषा बोलनारे आदिवासी समुह आहेत.

४) एकाच पुर्वजापासुन आपली निर्मिती झाली असे माननारा हा समुह आहे. म्हनजे तो रक्तबंध आणि विवाह नात्यावर आधारित असनारा समुह आहे.

५) पोषाख पद्धती, विवाह पद्धती, रितीरिवाज, इत्यादी बाबतवएकवआदिवासि समुह दुसऱ्या आदि़वासि समुहापेक्षा वेगळा असतो.

६) निरक्षरता हे आदिवासि समुहाचे ठळक वैशिष्ट्य अाहे.

७) जादूटोना व धर्म यांच्या आचरनाला आदिवीसि समुहात विशेष महत्व दिले जाते.

८) यंत्र सामुग्रीचा उपयोग, औद्योगीक विकास याबाबतित हा समुह अगदी प्राथमिक अवस्थेत असतो.

९) आदिवासी समुहातील लोक उपजिविकेल़साठी सभोवतालच्या नैसर्गिक पर्यावरनावर अवलंबून असतात. साधी अर्थव्यवस्था व सरळ व सोपी समाजव्यवस्था हे आदिवासी समुहाचे महत्वपुर्ण असे सामान्य लक्षन आहे.
=========
*🔻- आदिवासी समुह वैशिष्ट्य-*

१) *विशिष्ट भूप्रदेश*---
एका आदिवासी जमातीची एका विशिष्ट भूप्रदेशात वस्ती असते.
उदा - ठाणे जिल्ह्यातील डहानुचा परिसर सोजून अन्यत्र वारली आदिवासी जमातीची वस्ती आढळत नाहि.
कोरकू, कोलाम व अन्य आदिवासी समुहाची वस्ती एक विशिष्ट भूप्रदेशात असव्याचे दिसुन येते. कोनत्याही अडचनी आल्या तरा ते अापली वस्ती सोडून जान्यास तयार नसतात.

२) *समूहाचा आकार*---
आदिवासी समुहाचा आकार लहान असतो. आदिवासींच्या काहू गावांमध्ये वा वस्त्यांमध्ये २०-२५ घरे म्हनजेच १००-१५० लोक रहात असतात . दुर्गम परिसर व समुहाची सदस्य संख्या कमी यामुळे त्यांच्या सामाजिक संपर्काचे क्षेत्र अत्यंत मर्यादित असते.

३) *रक्त संबंधांवर आधारीत सजातीय समुह*---
आपला पुर्वज एकच आहे अशी धारना आसाऱ्या काही कुटुंबाचा एक गट म्हनजे कुळ होय. एकाच कुळातील सदस्यांमध्ये बंधुत्वाचे नाते असते. एका आदिवासी जमातीत वा समुहात कुळांची संख्या मर्यादित असते. स्वत:चे कुळ सोडून अन्य कुळातील वधुशी किंवा वराशी विवाहसंबंध जोडले जातात.

४) *विवाहपद्धती*---
विवाह हे केवळ वधू- वर या देन व्यक्तिंना जोडनारे बंधन नसुन ते देन कुटुंबांना व कुळांना जोडनारे साधन आहे.़,अशी आदिवासी समुहाची धारना आहे. या समुहात वधूपित्याला योग्य ते मुल्य देउन वधू प्राप्त केली जाते. वधूमुल्य देणे ही वधूजवळ असलेल्या पात्रतेची व गुनांची पावता हेय असे मानले जाते. विवाहापुर्वी मुलगी आर्थिक स्वरुपाची कार्य करत असते. यामुळे विवाहानंतर पतिचे आर्थिकनउत्पन्न वाढते व वडिलांचे कमि होते. म्हनुन वधूमुलिय देने योग्य आहे , असे आदिवासी समुहात मानले जाते.

५) *कुटुंबपद्धती*---
या समुहात सामान्यपने दोन पिढ्यांचे एकत्र कुटुंब असते. या कुटुंबात भावंडांचे एकमेकांवर वि़लक्षन प्रेमव असते. आदिवासी समुहात पितृसत्ताक कुटुंबपद्धती मोठ्या प्रमानावर आहे. तसेच काही मोजक्या समुहात मातृसत्ताक पद्धती आहे. या समुहात कुटुंबप्रमुखांचा अधिकार व नियंत्रण बिनातक्रार मान्य केले जाते. कुटुंबसदस्यांच्या आर्थिक, धार्मिक, राजकिय व सामाजिक वर्तनावर कुटुंबसंस्थेचे बारीक लक्ष असते.

६) *आर्थिक स्थिती*---
आदिवासींच्या जिवनावश्यक गरजा मर्यादित असुनदेखिल त्या पुर्ण करन्यासाठी त्यांना झगडावे लागते. आदिवासि कंदमुळे गैळा करने, शिकार, मासेमारी, पशुपालन ,शेती, मोलमजुरी यांसारख्या आर्थिक क्रिया करतात. वस्तीच्या सभोवती असनाऱ्या नैसर्गिक बक्यावरनावर त्यांनी कोनत्या आर्थिक क्रिया कराव्यात हे अवसंबुन असते. आर्थिक क्रिया करताना ते परंपरागत अवजारे व पद्धतिंचा वापर करतात.
उदा - भाला, धनुष्य बान , कोयता यांचा शिकार करन्यासाठी उपयोग करतात. नफा मिळवने हे त्यांचे ध्येय नाही. जीवनाश्यक मुलभूत गरजा भागविता येतिल एवढेच उत्पन मिळविन्याचा ते प्रयत्न करतात. परंतु तेवढे देखिल उत्पन त्यांवा मिळत नाही. यामुळेवजवळ जवळ सर्वच आजटदिवासी दारिद्य्रा खालिल जिवन जगतात.

७) *धर्म व जादूचा प्रभाव*---
आजिवासींच्या जिवनावर धर्म व जादूचा प्रभाव आहे. निसर्ग पुजा व पुर्वज पुजा हे दोन प्रकार त्यांच्यात दिसुन येतात. तेवस्वत:च्या शरिरावर कुसचिन्ह गौंदवून घेतात. तसेचवघरांवर ही कुलचिन्हांची चित्रे काढतात. यामळे शरिराचे व घराचे संरक्षन होते अशी त्यांची धारना आहे. भूत, पिशाच यांची बाधा झाल्यामळेच रोग होतात, असा त्यांचा विश्वास आहे. म्हनुनच सर्व आदिवासी समुहांमध्ये मात्रिकाला महत्वपुर्ण स्थान प्राप्त झाल्याचे दिसुन येते.

८) *शिक्षण व मनोरंजनाची साधने*---
दुर्गम भागात राहनाऱ्या आदिल़वासिंचे जिवन खडतर असते. नाचगाणी, नक
ला, खेळ, देवदेवतांचे उत्सव यामुळे त्यांच्या जिवनात एक वेगळेच चैतन्य निर्माण होते. युवागृहे किंवा शयनगृहे यांना त्यांच्या जिवनात खास महत्व आहे. वयाच्या चौथ्या वर्षी मुलांना व मुलींना युवागृह या संस्थेत दाखल करतात. विवाह होइपर्यंत मुले व मुली युवागृहाचे सदस्य असतात. जमातीचा इतिहास, प्रथा, परंपरा याची माहिती युवागृहे आपल्या सदस्यांना देतात. युवागृहाचे हे शैत्षनिक कार्य आदिवासी समुहासाठी अत्यंत महत्वाचे असते.

९) *स्त्रियांचा दर्जा*---
आदिवासी समुह आर्थिकदृष्ट्या अप्रगत असले तरीही या समुहांमध्ये स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीची वागनुक दिली जाते. बहुताश आदिवासी जमातींमध्ये स्त्रियांचा आर्थिक क्रियांनध्ये समावेश असतो. काही समुहांमध्ये स्त्रियांना पुरोहित म्हनुन विधी करन्याचा तसेत मृत कुटुंबसदस्याच्या प्रेताचा अग्निसंस्कार करन्याचा अधिकार आहे.

१०) *जीवनपद्धती*---
आदिवासी समुह सदस्यांचे परस्पर संबंध हे रक्तसंबंध व दर्जा यावर आधारलेले असतात. रुढी, परंपरा,श्रद्धा इत्यादींनी त्यांचे सामाजिक जिवन नियंत्रित केले जाते. त्यांचेवखाने- पिने, रहानीमान इत्यादींमध्ये एकरुपता असल्याचे दिसुन येते. दऱ्याखोऱ्यातील नैसर्गिक संकटांना तोंड देताना त्यांना परस्पराच्या सहकार्याची गरज लागते. त्यामुळेच त्यांच्या सामाजीक जिवनावर समुहभावनेचा प्रभाव अधिक प्कमानात असतो.
============================================

*🔴- शेतकरी समुह अर्थ व स्थिती -*

*🔻- अर्थ-*---
शहरी क्षेत्रात श्रीमंत, मध्यम व गरिब असे तिन गट अाढळतात. आर्थिक स्थितीमधिल तफावतीमुळे या तीन्ही गटाची जिवनपद्धती वेगवेगळी असते. ग्रामिन क्षेत्रातही श्रीमंत वा बागायतदार शेतकऱ्यांचे मध्यम शेतकरी, अल्पभुधारक शेतकरी, व भुमिहीन शेतमदुर असे भिन्न गट आहेत. ग्रामीण समुहात जमिनविषयक संबंध अत्यंत महत्ल़वाचे आहेत. या समुहातुनच हे उपसमुह निर्मान झाले आहेत. या सर्व उपगटाची अार्थिक स्थिती भिन्न असली तरी आचार विचारांची पद्धती , जीवनविषयक दृष्टीकोन यांत काही फारसा फरक नसतो. सर्वात महत्वाचे म्हनजे या सर्वांच्या शेती या व्यवसायाचे स्वरुप. समान असते. निसर्गाची अवकृपा झाली की, त्याचा फटका लहान व मोठ्या शेतकऱ्यांना सारख्याच प्रमानात बसतो. शेतमजुरांची उपलब्धता ही मध्यम शेतकऱ्यांप्रमानेच बागायतदारामचीही समस्या होउ लागली आहे. शेतमालाच्या अल्प किंमती व उत्पादन खर्च जास्त याचा ताळेबंद जमत नसल्यामुळे "शेती करने परवडत नाही " ही ओरडवग्रामीन भागात सार्वत्रिक स्वरुपाची बनली आहे. या दृष्टीनेच आपन ग्रामीनक्षेत्रामधिल शेतकरी या विशाल आकाराच्या समुहाची ओळख करुन घेत आहोत.
======

*🔻- भारतिय शे़तकऱ्यांची जिवनविषयक स्थिती -*

विभिन्न शास्त्रांनधिल अध्ययन, सर्वेक्षन, नेत्याचे विचार यांसारख्या विविध माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनविषयक स्थितीचे चिन्ह पुढील प्रमाने मांडले जाते.
भारतीय शेतकरी कर्दबाजारी आहेत. तेनअल्पशिक्षित व कर्जबाजारी असून परंपरावादी व सनातनी वृतीचे आहेत. ते शेती व्यवसायाकडे व्यापारी दृष्टीतून पाहन्यापेक्षा पोट भरन्याचा एक मार्ग या दृष्टीने पाहतात. यामुळे शेतीव्यवसायातील उत्पन्न व उत्पादन सिमीत राहिले आहे. ते शासनाने ठरवलेल्या विकास योजनांचा मोकळ्या मवाने स्विकार करत नाहीत. उत्पादन वाढीसाठी खासवप्रयत्न करन्याची प्रेरना व वैज्ञानिक दृष्टीकोनाचा अवलंब करन्याची वृत्ती त्यांच्यामध्ये नाही.
शेती उत्पादनाची हेतु व उत्पादन तंत्र यांमध्ये सुधारना झाल्याशिवाय त्यांच्या आर्थिक व जीवनविषयक स्थितीमध्ये फारसा बदल घडून येने शक्य नाही.

*शेतकरी संघटना*---
सुमारे ७०% लोक शेतीव्यवसायाशि निगडित आहेत. असे असऩुन देखिल शेतकरी संघटित नाहीत. ब्रिचिश राजवटी पासुनचे चित्र गेल्या २०-२५ वर्षांपासुन बदलु लागले आहे. शेतीव्यवसायासी ल़संबंधित विविध प्रश्नानी ग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्मान झाला आहे. शेतकऱ्यांच्या या असंतोषातुनच अनेक राज्यांमध्ये आंदोलने सुरु झाली व त्यांच्या संघटना निर्माण झाल्या.
शासनाचे धोरन व निर्णय यांवर प्रभाव टाकनाऱ्या संघटित गटांना हितसंबंधि गट व दबाव गट संबोधले जाते. शेतकरी संघटनेच्या सामुहिक प्रयत्नातुन प्राप्त झाल़्ेल्या अनेक गौष्टींकडे नजर टाकली , की या संघटनेने दबाव गट म्हनुन आपले स्थान निर्मान करन्यास यश प्राप्त केले आहे.
औद्योगिक क्षेत्रातिल दबावगटांच्या तुलनेत शेतकरी संघटना या दबावगटाचा प्रभाव फारच कमी आहे. शेतकरी संघटनांची शक्ती व प्रभाव फारसा वृद्धींगत न होन्याची कराने कोनती, हे देखिल तपासुन पाहता येईल. फुमशेती,वनौषधी, जैविक शेति , करन्याकडे शेतकऱ्यांचे मन वळविने , ग्रामीन जीवनात सुधारना घडवून आननाऱ्या चळवळि घडवून आनने, यांसारखी अनेक विधायक काम करन्यास शेतकरी संघटनांना भरपूर वाव आहे असे म्हनता येईल. थोडक्यात , शेतकऱ्यांचे हितसंबंध व त्यांच्या मागन्या शासनासम
ोर सुस्पष्चपने मांडन्याचे आणि शेतकऱ्यांना संघटित करन्याचे महत्वपुर्ण कार्स शेतकरी संघटनांनी केले आहे. म्हनुनच शेतकरी संघटनेच्या राजकिय, आक्थिक व सामाजिक क्षेत्रामधिल कार्याला तसेच त्याच्या अध्ययनाला महत्व प्राप्तवझाले आहे असे म्हनता येईल.
--------------------------------------
Forwarded from  Shashi
जगातील सगळ्यात उंच ठिकाणे

1) माउंट एवरेस्टः नेपाळमध्ये सगरमाथा म्हटली जाणारी ही जगातले सगळ्यात उंच टोक आहे. 1955 मध्ये भारताकडून याचं सर्वेक्षण करण्यात आले होते. याची उंची 8,848 मीटर एवढी आहे. ब्रिटिश सर्वेक्षक सर जॉर्ज एवरेस्ट यांच्या सन्मानार्थ या पर्वताला माऊंट एवरेस्ट असे नाव देण्यात आले.

2) के 2: पाकिस्तान व्याप्त काश्मिरमध्ये येणारे कंचनजंघा 2 हे जगातले दुसर्‍या क्रमांकाचे उंच पर्वत आहे. के2 या नावाने ओळखले जाणारे हे पर्वत 8,611 मीटर उंच आहे.

3) कंचनजंघाः भारतातले सिक्किम आणि नेपाळच्यामध्ये कंचनजंघा हा पर्वत आहे. जगातले तिसर्‍या क्रमांकाचा हा पर्वत आहे. कंचनजंघाची उंची 8,586 मीटर आहे.

4) ल्होत्सेः हा पृथ्वीवरचा चौथ्या क्रमांकाचा पर्वत आहे. हा पर्वत दक्षिण कोलमार्गे माउंट एव्हरेस्टला जोडलेला आहे. ल्होत्सेचे सर्वोच्च शिखर समुद्रसपाटीपासून 8,516 मी उंच आहे. कंचनजंघासारखेच ल्होत्से पर्वतदेखील माउंट एव्हरेस्टच्या बाजूलाच आहे.

5) मकालूः माउंट एवरेस्टपासून फक्त 19 किलोमीटर अंतरावर हा मकालू पर्वत आहे. 8,485 मीटर उंच हा पर्वत नेपाळ आणि चीनच्यामध्ये आहे.

6) चोयुः 8,201 मीटर उंच असणारा हा पर्वत नेपाळ आणि चीनच्या सीमेवर आहे.

7) धौलागिरीः नेहमीच सफेद बर्फाच्या आच्छादनामध्ये असणारे हे धौलागिरी पर्वत नेपाळमध्ये आहे. 8,167 मीटर उंच असलेले हे पर्वत चढणं सगळ्यात कठीण मानलं जातं.

8) मनास्लुः 8,163 मीटर उंच असलेले हे पर्वतही नेपाळमध्ये आहे. चोयु पर्वताच्या बाजूला असलेल्या या मनास्लु पर्वतावर पहिल्यांदी माणुस 1956 मध्ये चढला होता.

9) नंगा पर्वतः पाकिस्तान व्याप्त काश्मिरच्या गिलगिट बालटिस्तानमध्ये हा पर्वत आहे. या पर्वताची उंची 8, 126 मीटर आहे. नंगा पर्वतवर चढणे खुप कठीण मानले जाते. या पर्वतावर चढणं एवढं कठीण आहे ही या पर्वताला ‘किलिंग माउंटन’ असेही म्हटले जाते.

10) अन्नपूर्णाः 8,091 मीटर उंचीचे हे अन्नपूर्णा पर्वत उत्तर मध्य नेपाळमध्ये आहे. माऊंट एवरेस्ट चढायला जाणारे अनेकदा अन्नपूर्णावर अभ्यास करतात.

11) नंदा देवीः 7,810 मीटर उंच नंदा देवी पर्वत हे भारतामधे असलेले सगळ्या मोठे पर्वत आहे. उत्तराखंडच्या गढवाल मंडलमध्ये येणारे हे पर्वत 1988 पासून जागतिक वारसा म्हणून मान्यता मिळाले आहे.
★|| eMPSCkatta ||★
.
👉 भूकंप का होतात?
.
भूगर्भातील दोन खडक किंवा प्लेट्सचे एकमेकांवर जोरदार घर्षण होते. हे खडक प्लेट्स एकमेकांना ढकलत असतानाच प्रचंड दबावामुळे दुभंगतात. या प्रक्रियेचा पृथ्वीच्या पृष्ठभागावर जाणवणारा परिणाम म्हणजेच भूकंप होय.
.
हे खडक किंवा प्लेटची भूकंपादरम्यान आणि नंतरही पुन्हा एकत्र होईपर्यंत हालचाल होत राहते.
.
भूकंपाचे मोजमाप :
भूकंपाची नोंद घेणाऱ्या यंत्रास ‘सेस्मोग्राफ’ अथवा ‘सेस्मॉमीटर’ असे नाव आहे. तसेच भूकंपाची ’महत्ता’ मोजण्यासाठी ‘रिश्टर स्केल’ ह्या एककाचा वापर केला जातो. हे एक गणिती एकक आहे. पाच स्केलच्या भूकंपातून निर्माण होणारी ऊर्जा, चार रिश्टर स्केलच्या भूकंपाच्या दहापट असते. भूकंपाची ’तीव्रता’ मापण्याचे एक वेगळे अ-गणिती स्केल आहे. त्याचा संबंध भूकंपाने होणाऱ्या नुकसानीशी निगडित असतो, ऊर्जेशी नसतो.
वाचा सविस्तर: http://empsckatta.blogspot.in/2015/05/blog-post_61.html?m=1
काही भूगोल विषयक ऑडिओ नोट्स: