MPSC Geography
139K subscribers
7.77K photos
82 videos
563 files
1.07K links
Download Telegram
🔹सूर्यासंबधीची माहिती :

सूर्याचे पृथ्वीपासून अंतर - 14,95,00,000 किलोमीटर
 सूर्याची किरणे पृथ्वीवर येण्यास लागणारा वेळ - आठ मिनिटे
 सूर्याचा व्यास - 13,91,980 कि.मी. पृथ्वीच्या व्यासाच्या 108 पट
 सूर्याची गुरुत्वाकर्षण शक्ति - पृथ्वीच्या 28 पट जास्त आहे.
 सूर्याला परिवलनास लागणारा कालावधी - 26.8 दिवस
 सूर्याच्या बाह्य कक्षेतील तापमान - 60000 से.
 सूर्याच्या आंतरभागातील तापमान - 30,0000 से. पेक्षाही अधिक
 सूर्यकुलातील एकूण ग्रह - आठ
🔹महादजी शिंदे

पेशवाईतील मुत्सद्दी. इ.स. १७३०-१२ फेब्रुवारी १७९४ रोजी त्यांचे निधन झाले. पुण्यात शिंदे छत्री नामक त्यांचे स्मारक उभारण्यात आले आहे.

महादजी शिंदे यांचे नाव मराठ्यांच्या इतिहासात शिवाजी महाराज, बाजीराव यांच्यानंतर महान सेनानी म्हणून घेतले जाते. इंग्रजांकडून मानाने यांना द् ग्रेट मराठा असे म्हटले जात. पानिपतच्या तिसऱ्या लढाईनंतर यांनी मराठा साम्राज्याला पुन्हा उभारी मिळवून देण्याचे काम केले. पहिल्या इंग्रज मराठा युद्धामध्ये त्यांनी इंग्रजाचा काही लढायांमध्ये निर्णायक पराभव केला व इंग्रजांना तह करण्यास भाग पाडले. त्यामुळे त्यांच्या निधनापर्यंत मराठा साम्राज्याला स्थैर्य लाभले.

सैनिकी कारकीर्द

दक्षिण भारत

महादजी शिंदे वयाच्या दहाव्या वर्षापासूनच रणांगणावर आपले अस्तित्व दाखवण्यास सुरुवात केली होई. १७४० च्या निजामा विरुद्धच्या लढाईत त्यांनी दत्ताजी शिंदे व त्रिंबक किन्नड यांना साथ दिली होती. १७४२ मध्ये बेळूर च्या लढाईत महादजीने भाग घेतला होता या लढाईत मराठ्यांनी निझामच्या सैन्याला परतावून लावले होते.

उत्तर भारत

१७४५ ते १७६१ दरम्यान ( जो मराठ्यांचा राज्य विस्तारातील सुवर्णकाळ मानला जातो) त्या काळात महादजी शिंदे यांनी जवळपास ५० लढायांचे नेतृत्व/ सहभाग घेतला, मालव, राजपुताना, बुंदेलखंड,१७४७, मारवाड १७४७ व हिम्मत नगर १७४८. ब्रिज, दोआब, रोहिलखंड, दिल्ली कुंजपुर तसेच पानिपतच्या तिसऱ्या लढाईत हिररीचा सहभाग होता. यातील महादजीची महत्त्वाच्या लढाया म्हणजे चंद्रावती गंज १७४६, फतेहाबाद १७४६ बडी साद्री

मल्हाराव होळकरांच्या साथीत शिंदे यांनी अनेक राजपूत संस्थाने मराठा साम्राज्याखाली आणली. रतन गढ, लालगढ, बिकानेर, लासवारी, लाखमगढ, कुंभेर, डीग ही मराठा साम्राज्याला जोडली गेली. तसेच जोधपूर व जयपूर ह्या मोठ्या राजपूत राज्यांनी मराठा वर्चस्व मान्य करून टाकले. मथुरा हे मुघल सत्ते खाली होते ते मराठा अख्यारीत आणून व येथील काही हिंदू मंदिरांचा जिर्णोद्धार करण्यात आला व मथुरेला संस्कृत शिक्षण केंद्र म्हणून शिंद्यांचा अधिपत्याखाली तयार झाले. जानेवारी १७५८ मध्ये महादजी यांनी ग्वाहलेर येथे शिंद्यांचे केंद्र म्हणून बनवले.

ग्वालहेरचे शासक

जयाप्पा शिंदे जे शिंदे घराण्याचे प्रमुख होते ते २५ जुलै १७५५ रोजी राजस्थानमधील नागौर येथील लढाईत मारले गेले, त्यानंतर दत्ताजी शिंदे व जनकोजी शिंदे यांच्या कडे शिंदे घराण्याची सुत्रे आली. मराठ्यांच्या वाढत्या लष्करी वर्चस्वाला इस्लामी जिहादाचे उत्तर म्हणून लवकरच उत्तर भारतात अब्दाली विरुद्द मराठे असा मोठा सामना तयार झाला. बुरुडी घाटावरील लढाईत दत्ताजी शिंदेची नजीब कडून क्रुरपणे हत्या झाली. शिंद्यांनी अब्दालीविरुद्दच्या पानिपतच्या तिसऱ्या लढाईत हिररीने सहभाग घेतला होता. या लढाईत जनकोजी शिंदे मारला गेला, तसेच महादजी देखिल लढता लढता घायाळ झाले होते. मराठ्यांनी युद्धात पळ काढल्यानंतर महादजी यांनी यशस्वीपणे माघार घेतली, या लढाईत त्यांचा पाय लुळा पडला तो पुढील जन्मभर तसाच राहिला. पानिपतच्या लढाईनंतर साहजिकच शिंदे घराण्याची सुत्रे महादजी कडे आली. मराठे अब्दाली युद्धातील पराभवानंतर मराठा साम्राज्याचे विकेंद्रीकरण झाले व शिंदे हे स्वतंत्र मराठा सस्थानिक बनले व ग्वाहलेर हे त्यांचे संस्थान बनले.

पानिपतच्या लढाईनंतरची कारकीर्द

पानिपतच्या लढाईतील विनाशानंतर महत्त्वाचे होते की मराठयांचे उत्तर भारतावरील वर्चस्व पुन्हा प्रस्थापीत करणे, १७७० मध्ये महादजीने भरतपूरच्या जाट राजा नवल सिंग याचा पराभव केला व मराठ्यांचे वर्चस्व पुन्हा प्रस्थापित झाले. १७७७ मध्ये पेशव्यांचे कोल्हापूर संस्थानाशी खटके उडाले होते यात महादजीने निर्णायक कामगीरी केली.

पहिले इंग्रज-मराठा युद्ध

1७७३ मध्ये नारायणराव पेशवे याचा खून झाला. व रघुनाथराव स्वयंघोषित पेशवा बनला. बाराभाईच्या कारभारानुसास नारायणरावचा मुलगा सवाई माधवराव पेशवा बनला व रघुनाथरावला पेशवे पदावरुन हटवले या बारभाई मध्ये महादजी व नाना फडणीसांची भूमिका महत्त्वाची होती. रघुनाथरावांना हा निर्णय पटला नाही व त्यांनी इंग्रजांची मदत घेण्याचे ठरवले.

वडगावची लढाई

१७७७ मध्ये नाना फडणीस यांनी कलकत्ता कौन्सिल बरोबर केलेला कराराचा भंग करत फ्रेंचाना पश्चिम किनारपट्टी वर बंदर उभारायची परवानगी दिली. ब्रिटीशांनी प्रत्युतरादाखल मुंबईवरुन सैन्य पाठवले. जानेवारी १७७९ मध्ये ३,९०० ब्रिटीश सैन्य कर्नल एगर्टन च्या नेतृत्वाखाली पुण्यावर चालून गेले. वाटेत रघुनाथरावांचे सैन्यही येउन मिळाले. मराठ्यांच्या सैन्य महादजी शिंदे व् तुकाजी होळकर यांच्या नेतृत्वाखाली होते. ब्रिटीश सैन्याच्या वाटेत असंख्य अडथळे आणून त्यांचा चाल थंडावली व त्यांनी तळेगाव येथे तळ टाकला. महादजींनी वाटेतील सर्व रस्त्यामधील गावातील कुरणे जाळली विहरी विषमय करून टाकल्या, तसेच मुंबईकडून येणारी रसदही पूर्णपणे तोड्न टाकली. ब्रिटीश सैन्याचे अ
न्नपाण्याहून हाल होउ लागले. ब्रिटीशांनी माघार घेण्याचे ठरवले १२ जानेवारी १७७९ रोजी मध्य रात्री मराठ्यांनी ब्रिटीशांवर आक्रमण केले व सर्व बाबतीत चित करून वडगाव येथे शेवटी ब्रिटीश सैन्य महादजींना शरण आले.

१६ जानेवारी रोजी वडगावचा तह झाला. इस्ट इंडिया कंपनीने १७७३ पासुन मिळवलेला सर्व प्रांत परत करण्यात यावा असे ठरले. यात साष्टी, ठाणे व जवळपास सर्व गुजरात पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आला. महादजीने ब्रिटीशांना युद्दाचा खर्च म्हणून ४१,००० रुपये देखिल वसूल केले. रघुनाथरावाला मराठ्यांच्या हाती देण्यात यावे असे ठरले त्यानुसार १८ जानेवारी १७७९ रोजी रघुनाथराव व त्याचा सैन्याला पकडण्यात आले. तसेच महादजीने सखाराम बापूचा पराभव करून त्याला सिंहगडाच्या तुरुंगात रवानगी केली

सिप्री येथील हार

ब्रिटीश गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टींन यांनी वडगाव चा तह मुंबईच्या अधिकाऱ्यांना यावर सही करण्याची परवानगी नव्हती असा युक्तीवाद करत नामंजूर केला व शमलेले युद्ध पुन्हा सुरु करण्यास आदेश दिले, oकर्नल गोडार्ड यांनी ६००० ची फौज फेब्रुवारी १७७९ मध्ये घेउन अहमदाबाद काबीज केले व १७८० मध्ये भासीं बंगालमधून निघून कॅप्टन पॉपहॅम नी ग्वाहलेर काबीज केले. वॉरन हेस्टींग नी महादजी शिंदेंना अजून नामोहरम करण्यासाठी मेजर केमॅकला पाठवले. महादजी शिंद्यांच्या फौजेला गाठून हैराण केले फेब्रुवारी १७८१ मध्ये ब्रिटीशांनी सिप्री येथे महादजी शिंद्यांच्या सेनेचा पराभव केला. सिप्रीच्या पराभवानंतर देखिल महादजीने आपल्या आघाड्या शाबूत ठेवत ब्रिटीशांना आव्हान दिले. ब्रिटीशांच्या प्रमाणेच महादजीचे सैन्य संख्येने जास्त व ब्रिटीशांच्या शिस्तबद्द सैनिकांप्रमाणेच तुल्यबळ असल्याने महादजीवर पूर्णपणे मात करणे अवघड गेले, तसेच महादजीलाही ब्रिटीशांच्या आधुनिक युद्धतंत्रापुढे त्यांना अजून मात देणे अवघड गेले.

सालबाईचा तह १७ मे १७८२

महादजीच्या इंग्रजांकडून पराभव झाल्या नंतर महादजीने इंग्रजाबरोबर मुत्सदीने तहची बोलणी केली जो सालाबाईचा तह या नावाने ओळखला जातो. या तहानुसार इंग्रजांनी सवाई माधवरावला पेशवा म्हणून मान्यता दयावी व रघुनाथरावला वेतन द्यावे. या तहानुसार शिंद्यांना यमुनेच्या पश्चिमेकडील सर्व प्रांत परत मिळाला व उज्जैन मध्ये माघार घ्यावी लागली.

इंग्रजाशी तहानंतर इंग्रजांशी असलेल्या शस्त्र संधीचा उपयोग महादजीने चांगलाच उपयोग करून घेतला.

@mpschistory
🔹केंद्रीय पीक संशोधन केंद्र. :=
===========================
१)केंद्रीय ऊस संशोधन केंद्र.
=लखनौ (उत्तरप्रदेश)
२)केंद्रीय गहू संशोधन केंद्र.
=कर्नाल (हरियाणा)
३)केंद्रीय आवळा संशोधन केंद्र
=फैजाबाद (उत्तरप्रदेश)
४)केंद्रीय नारळ संशोधन केंद
=कासरगोड (केरळ)
५)केंद्रीय केळी संशोधन केंद्
=कळांडूथोराई (तामिळनाडू)
६)केंद्रीय डाळिंब संशोधन केंद्र
=सांगोला, सोलापूर
७)केंद्रीय द्राक्ष संशोधन केंद्र
=मांजरी (पुणे)
८)केंद्रीय दूध संशोधन केंद्र
=कर्नाल (हरियाणा)
९)केंद्रीय बटाटा संशोधन केंद्र
=सिमला
१०)केंद्रीय संत्री संशोधन केंद्र
=नागपूर
११)केंद्रीय मेंढी व लोकर संशोधन केंद्र
=अंबिकानगर (गुजरात)
१२)केंद्रीय गवत व चारा संशोधन केंद्र
=झाशी (मध्‍यप्रदेश)
१३)केंद्रीय मधुमक्षिका संशोधन केंद्र
=पुणे
१४)केंद्रीय काजू संशोधन केंद्र
=पहूर
१५)केंद्रीय ताग संशोधन केंद्र
=बराकपूर (पश्चिम बंगाल)
१६)केंद्रीय तंबाखू संशोधन केंद्र
=राजमहेंद्री (आंध्रप्रदेश)
१७)केंद्रीय लिंबुवर्गीय फळ संशोधन केंद्र
=नागपूर
१८)केंद्रीय सोयाबीन संशोधन केंद्र
=इंदोर (मध्‍यप्रदेश)
१९)केंद्रीय कापूस संशोधन केंद्र
=नागपूर
२०)केंद्रीय ज्‍वारी संशोधन केंद्र
=राजेंद्रनगर (आंध्रप्रदेश)
२१)केंद्रीय अळंबी संशोधन केंद्र
=सोलन
२२)केंद्रीय उंट संशोधन केंद्र
=जोरबीट (राजस्‍थान)
२३)केंद्रीय ताग संशोधन केंद्र
=बराकपूर (पश्चिम बंगाल)
२४)केंद्रीय लाख संशोधन केंद्र
=रांची (झारखंड)
२५)केंद्रीय फळ संशोधन केंद्र
=गणेशखिंड (पुणे)
२६)मसाला पीक संशोधन केंद्र
=केरळ
२७)इंटरनॅशनल क्रॉप रिसर्च फॉर सेमीअॅरिड ट्रॉपिक्‍स
=हैदराबाद (आंध्रप्रदेश)

Join us @MPSCGeography
The earliest proposed map of the Pakistan. @MPSCGeography
Forwarded from MPSC Science
🔹वारणा नदी

सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांच्या सीमेवरून वाहणारी कृष्णा नदीची महत्त्वाची उपनदी. या नदीचा उगम सह्याद्री पर्वतातील पथरपुंज पठाराजवळ प्रचितगडावर सस. पासून ९१४ मी. उंचीच्या प्रदेशात होतो. प्रथम वारणा नदी वायव्येकडून आग्नेयीकडे व नंतर पूर्वेकडे वाहते.
ती कृष्णा नदीस सांगली शहराच्या नैर्ऋत्येस सु. दीड किमी. अंतरावर सस. पासून ५८४ मी. उंचीच्या प्रदेशात हरिपूर येथे मिळते. संगमाजवळ वारणा नदीचे पात्र ७० मी. रुंद आहे.
काडवी व मोरणा या वारणेच्या प्रमुख उपनद्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील काडवी नदीचा उगम सह्याद्री पर्वतात आंबा घाटाजवळ सु. ७०० मी. उंचीच्या प्रदेशात होतो.
सुमारे ३५.४ किमी. वाहून काडवी नदी सागाव जवळ वारणा नदीस मिळते. काडवी नदी मिळाल्यावर तिचा प्रवाह बराच विस्तारित होतो. काडवी नदी वारणा नदीस जवळजवळ समांतर वाहते. पोटफुगी, आंबरडी, अंवीर व कांद्रा हे प्रमुख ओढे काडवी नदीस मिळतात.
सांगली जिल्ह्यातील मोरणा ही वारणेची दुसरी महत्त्वाची उपनदी. या नदीचा उगम धामवडे टेकडीजवळ होतो. ही नदी दक्षिणेस व आग्नेयीस वाहते. या नदीची लांबी सु. २७.३५ किमी. आहे. तिच्या खोऱ्यात विस्तृत पानमळे आढळतात. शिराळा तालुक्यातील मांगळे गावाजवळ मोरणा नदी वारणेस मिळते. उजव्या बाजूने कानसा नदी उदगिरीपासून २० किमी. वाहत जाऊन पन्हाळा तालुक्यात माळेवाडी-जवळ वारणेस मिळते. शाली व अंबार्डी या वारणेच्या इतर उपनद्या होत.
वारणा खोऱ्याचा विस्तार सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यांत झाला असून त्याचा अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार अनुक्रमे १६०४७' उ. ते १७०१५' उ. आणि ७३०३०' १५" पू. ते ७४०३०' पू. यांदरम्यान आहे. या खोऱ्याची लांबी १४९ किमी., सरासरी रुंदी २१ किमी. व एकूण क्षेत्र २,०९५ चौ. किमी. आहे. वारणा खोऱ्यात शिराळा, वाळवा, मिरज (जि. सांगली), शाहूवाडी, पन्हाळा, हातकणंगले, शिरोळ (जि. कोल्हापूर), पाटण (जि.सातारा) या आठ तालुक्यांचा समावेश होतो.
भूवैज्ञानिक दृष्ट्या वारणा खोरे दख्खन ढाली प्रदेशात वायव्य भागात येते. वारणा नदीच्या खोऱ्यात विविध प्रकारची भूरूपे असल्याने येथील स्थलाकृती अत्यंत गुंतागुंतीची आहे. पश्चिमेकडे कोकण व पूर्वेकडे दख्खन पठार यांदरम्यानच्या संक्रमण पट्ट्यात वारणा खोरे असल्याने दोन्ही प्राकृतिक विभागांतील गुणधर्म वारणेच्या खोऱ्यात आढळतात. खोऱ्यातील पश्चिमेकडील प्रदेश पूर्वेकडील प्रदेशापेक्षा जास्त उंचसखल आहे.
वारणेचे खोरे पश्चिम घाटामुळे पर्जन्यछायेच्या प्रदेशात येते, त्यामुळे पाऊस कमी पडतो. मॉन्सून काळात पाऊस पडतो, परंतु इतर कालावधी कोरडा असल्याने वारणेच्या खोऱ्यातील नद्यांना पावसाळा वगळता इतर काळात पाणी फारच कमी असते.
वारणा नदीचे खोरे सुपीक आहे. भात, ज्वारी, ऊस, भुईमूग ही महत्त्वाची पिके या खोऱ्यात होतात. शाहूवाडी तालुक्यात आंबोळी येथे वारणा नदीवर एक मोठा प्रकल्प आणि सांगली जिल्ह्यात चांदोली व शिराळा तालुक्यात वारणा पाटबंधारे हा मोठा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. मोरणा नदीवर शिराळा तालुक्यातील प्रकल्प, तर शाहूवाडी तालुक्यात पोटफुगी नदीवर काडवी प्रकल्प पूर्ण करण्याची योजना आहे.
यांशिवाय वारणेच्या खोऱ्यात अनेक कोल्हापूरी बंधारे व काही लघू पाटबंधारे प्रकल्प पूर्ण झालेले आहेत, तसेच वारणानगर (कोडोली) सारखी गावे उद्योगधंद्यांमुळे विकास पावली आहेत. या खोऱ्यातील खेड्यांना जोडणारे अनेक पक्के रस्ते, जिल्हा प्रमुख रस्ते व ग्रामीण रस्ते आहेत. परंतु या खोऱ्यात लोहमार्ग व हवाई वाहतूक यांची सोय नाही. कोल्हापूर, मिरज, सांगली ही या खोऱ्यातील लोकांना जवळची रेल्वेस्थानके आहेत.

@MPSCGeography
*🔮- जिल्हा विशेष -🔮*
----------------------------------------
🔹उस्मानाबाद
--------------------------------------

🔸 उस्मानाबाद जिल्हा १९०४ ला निर्माण झाला.
🔸 उस्मानाबादचे पुर्वीचे नाव - धाराशिव .
🔸 क्षेत्रफळ - 7569 km
🔸 स्थान व विस्तार - मराठवाडा विभागात व औरंदाबाद प्रशासकिय विभागात
🔸 उस्मानाबादच्या पुर्वेस - लातूर
🔸 आग्नेय व दक्षिनेस - कर्नाटक
🔸 नैरत्य व पश्चिमेस - सोलापुर
🔸 वायवयेस - अहमद नगर ,
🔸 उत्तरेस - बिड
*- तालुके ८ -*---
१) उस्मानाबाद
२) उमरगा
३) कळंब
४) तुळजापुर
५) परंडा
६) भूम
७) लोहारा
८) वाशी

🔸 जिल्ह्याच्या उत्तर सिमेवरून मांजरा नदी वाहते.
🔸 जिल्ह्यातील दोन जोंगरांची नावे १) बालाघाट २) येडशी
🔸 मांजरानदी काठी वसलेले शहर --- कळंब
🔸 उस्मानाबाद - भोगावती नदी काठी वसले आहे.
🔸 जिल्ह्यातील थंज हवेचे ठिकान ---- येडशि-रामलिंग.
🔸 हवामान - उष्ण व कोरडे
🔸 अभयारन्य - येडशि
🔸 प्रमुख नद्या - तेरना व मांजरा.
🔸 पानमळ्यांसाठी जिल्ह्यात " "तुरोरी" गाव प्रसिद्ध आहे.
🔸 बोरांसाठी - शिराळगाव प्रसिद्ध.
🔸 " चांदनी " येथे मत्स्यबिज केंद्र आहे.
🔸 जिल्ह्यातील सर्वाधिकवकुक्कुटपालन व शेळीपालन - उमरगा तालुका
🔸 पेढ्यांसाठी प्रसिद्ध - कुंथलगिरी
🔸 जिल्ह्यातील लोहमार्ग उस्मानाबाद तालुक्यातुन गेला आहे.
🔸 जिल्ह्यात दोन किल्ले आहेत
🔸 जिल्ह्यात पुराणवस्तु संग्रहालय - तेर या गावी आहे.
🔸 मोठा मानस्तंभ कुंतलगिरी येथे आहे.
🔸 यात्रा ठिकाणे --
१) सोनारी - काळभैरवनाथ यात्रा
२) अणदूर - खंडोबाची यात्रा
३) तुळजापुर - तुळजाभवानी यात्रा
४) तेर - गौरोबा काका यात्रा

🔸लालसाळ संशौधन केंद्र - तुळजापुर
🔸 हंसराज स्वामिंचा मठ - परंडा
🔸 तेरना नदीचा उगम तेरखेड जवळ होतो.
🔸 प्राकृतिक रचनेनुसार परंडा पठारी प्रदेशात मोडतो.
🔸 परंडा तालुक्यात चांदनी धरन आहे.
🔸 उमरगा तालुक्यात जकेकुर येथे धरन आहे.
🔸 जैनधर्मियांचे तीर्थक्षेत्र - कुंथलगिरी.
🔸 रामगंगा हे धरन भुम तालुक्यात आहे.

🔸 भिमा नदीची उपनदी - सीना
🔸 जिल्ह्याच्या पुर्व भागात जास्त पाऊस पडतो.
🔸 परंड्याच्या भुईकोट किल्यातील " मुलुख मैदान तोफ " सद्या विजापुर येथे आहे.
🔸 महसुललउपविभाग - भूम
🔸 आलमप्रभुंची समाधी - भूम
🔸 संत गौरोबा काकांची समाधीव- --- तेर
🔸 बसवेश्वर यात्रा जेवळी
🔸 त्रिविक्रम मंदिर - कुंथलगिरी
🔸 तेरचे पुर्वीचेलनाव - तगर
🔸 दुध उत्पादनातवअग्रेसर तालुका --- भूम
🔸 उमरगावशहरातुन NH -9 हा राष्ट्रीय महामार्गवगेला आहे.
🔸 येडशि येथे कातडी बाजार भरतो.
🔸 जिल्ह्यातील राज्यमार्गांची लांबील- 890 km
---------------------------------------------------
🔹भारतातील महत्वाची शहरे :

🔷अमृतसर -  सुवर्ण मंदिर

🔶अहमदाबाद - साबरमती आश्रम

🔷आग्रा - लाल किल्ला

🔶कन्याकुमारी - महात्मा गांधी मेमोरिअल

🔷कानपूर - कातड्याच्या वस्तु

🔶कोडाई कॅनॉल - थंड हवेचे ठिकाण

🔷कोणार्क -  सूर्य मंदिर

🔶गंगोत्री -  गंगा नदीचा उगम

🔷चंदिगड - पंजाब व हरियानाची संयुक्त राजधानी

🔶जयपूर - जंतर मंतर वेधशाळा

🔷जोधापूर - मोती महल

🔶डलहौसी -  थंड हवेचे ठिकाण

🔷औरंगाबाद - बावत्र दरवाजांचे शहर

🔶नागपूर -  मध्यवर्ती वसलेले शहर

🔷मुंबई -  नैसर्गिक बंदर

🔶नाशिक -  सात टेकड्यांवर वसलेले शहर

🔷पोरबंदर -  महात्मा गांधींचे जन्म स्थळ

🔶हैदराबाद -  चारमिनार

____________________________________

Join us @MPSCGeography
🔹महाराष्ट्रातील प्रमुख नदयाचा संगम

👉🏾 *कृष्णा - कोयना*
- कराड

👉🏾 *कृष्णा - वेण्णा*
- माहुली

👉🏾 *कृष्णा - वारणा*
- हरिपूर

👉🏾 *वेण्णा- वर्धा*
- वर्धा ( सावंगी )

👉🏾 *कृष्णा - पंचगंगा*
- नरसोबाची वाडी

👉🏾 *गोदावरी - प्राणहिता*
- सिरोंचा

👉🏾 *गोदावरी - प्रवरा*
- टोके

👉🏾 *तापी - पांझरा*
- मुडावद ( धुळे )

👉🏾 *तापी- पूर्णा*
- चांगदेव

_______________________
@MPSCGeography
🇮🇳 *भारत विशेष*🇮🇳

👉🏾 *अक्षांश*
- ८°४' उत्तर ते ३७°.६' उत्तर

👉🏾 *रेखांश*
– ६८°.७' पूर्व ते ९७°.२५' पूर्व

👉🏾 *क्षेत्रफळ*
- ३२,८७,२६३ चौ. कि .मी
( जगात ७ वा क्रमांक )

👉🏾 *दक्षिण - उत्तर विस्तार*
- ३२१४ कि. मी

🔹भारतातील नदीकाठी वसलेली शहरे

👉🏾 *गंगा*
- हरिद्वार ,कानपूर ,पाटणा, बनारस

👉🏾 *यमुना*
- दिल्ली, आग्रा ,मथुरा

👉🏾 *महानदी*
- कटक ,संबळपुर

👉🏾 *नर्मदा*
- जबलपूर

👉🏾 *गंगा ,यमुना ,सरस्वती*
- अलाहाबाद

👉🏾 *हुगळी*
- कोलकाता ,हावडा

👉🏾 *मुशी*
- हैद्राबाद

👉🏾 *गोमती*
- लखनौ

👉🏾 *शरयू*
- अयोध्या

👉🏾 *क्षिप्रा*
- उज्जैन
🔴पुणे प्रशासकीय विभागाबद्दल संपूर्ण  माहिती 🔴

1. पुणे जिल्हा

जिल्हयाचे मुख्य ठिकाण - पुणे        
         क्षेत्रफळ - 15,643 चौ.कि.मी. 

लोकसंख्या - 94,26,959 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)

तालुके - 14 - जुन्नर, आंबेगांव, खेड (राजगुरूनगर), इंदापूर, शिरूर, मावळ (वडगाव), वेल्हे, पुणे शहर, दौंड, भोर, हवेली (पुणे), मुळशी (पौड), पुरंदर (सासवड), बारामती. 

सीमा - उत्तर व पूर्वेस अहमदनगर जिल्हा, पश्चिमेस रायगड जिल्हा, दक्षिणेस सातारा जिल्हा आहे. आग्नेयेस सोलापूर तर वायव्येस ठाणे जिल्हा आहे. 

जिल्हा विशेष

 

'विधेचे माहेरघर' असे पुणे शहरास म्हणतात. याच ठिकाणी महात्मा ज्योतीबा फुल्यांच्या समाज-परिवर्तनाच्या कार्यास सुरुवात झाली. आगरकर, गोपाळ कृष्ण गोखले, महर्षी धोंडो केशव कर्वे यासारख्या नररत्नाचे कर्तृत्व याच पुण्याने फुलविले. लोकमान्य टिळकांची ही कर्मभूमी होय. 

राष्ट्रकूट, राजवटीत या गावाचा पुनवडी नावाने उलेख केला जाई. 'पुण्य'या शब्दावरून 'पुणे' हे नाव पडले असावे, अशी एक उपपती मांडली जाते. 

देशातील सर्वात पहिले उपग्रह दळणवळण केंद्र जुन्नर तालुक्यात आर्वी येथे 1971 पासून कार्यरत अष्टविनायकापैकी (1) श्री विघ्नेश्वर, ओझर (2) श्री गणपती, राजणगांव (3) गिरजात्मक, लेण्याद्री (4) चिंतामणी, थेऊर (5) मोरेश्वर, मोरगाव या पाच अष्टविनायकाचे स्थान या जिल्हात आहे. 

महत्वाची स्थळे

 

पुणे - मुळा-मुठा नद्यांच्या संगमावर पुणे शहर आहे. शिवाजी महाराजांचे बालपण, पेशव्यांची राजधानी, शनिवारवाडा यांमुळे पुण्यास ऐतिहासिक महत्व आहे. पुण्यात शिक्षण विभागाचे संचालनालय, महाराष्ट्र राज्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, महाराष्ट्र राज्य पाठयपुस्तकनिर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, महाराष्ट्र शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुण्याजवळच्या मोसरी येथे राष्ट्रीय एड्स अनुसंधान संस्था. 

तसेच निगडी येथे 'अप्पूघर' हे करमणुकीचे केंद्र आहे. 

पिंपरी-चिंचवड - पिंपरी-चिंचवड, परिसरात अनेक उधोगधंदे आहेत. चिंचवड येथे श्री. मोरया गोसावी या सत्पुरुषाची समाधी आहे. स्कूटर, रिक्षा, मोटार, कृत्रिम धागा, पेनिसिलीन, रसायने इत्यादीचे कारखाने येथे आहेत. निगडी येथील 'अप्पूघर' हे एक करमणुकीचे केंद्र आहे. 

जुन्नर - जुन्नर जवळच सातवाहन काळातील शिवनेरी हा किल्ला आहे. येथेच शिवाजी महाराजाचा जन्म झाला. किल्यावर शिवाईदेवीची मंदिर आहे. जुन्नर गावात दादोजी कोंडदेवांचा वाडा होता. 

आळंदी - हे ठिकाण इंद्रायणीकाठी असू येथे श्री. ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आहे. 

देहू - हे इंद्रायणी नदीच्या काठावर असून संत तुकाराम महाराजाचे जन्मस्थान म्हणून ओळखले जाते.

चाकण - येथील भुईकोट किल्ला प्रसिद्ध आहे. कांद्यांची बाजारपेठ म्हणूनही चाकण प्रसिद्ध आहे. 

लोणावळा - हे थंड हवेचे ठिकाण आहे. येथून जवळच वळवण धरण, कार्ले-भाजे येथील कोरीव लेणी प्रेक्षणीय आहेत. नाविक प्रशिक्षण केंद्र व अनेक कारखाने येथे आहेत. 

जेजूरी - महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबांचे देवस्थान आहे. 

आर्वी - आर्वी हे जुन्नर तालुक्यात असून येथे 'विक्रम' हे उपग्रह दळणवळण केंद्र आहे. 

राजगुरूनगर - हुताम्मा राजगुरूंचे हे गाव आहे. 

भीमाशंकर - येथील शंकराचे मंदिर प्रसिद्ध आहे. येथे अभयारण्य आहे. 

उरुळी कांचन - येथे निसर्गोपचार केंद्र आहे. येथून जवळच भुलेश्वर हे यात्रेचे ठिकाण आहे. 

दौंड - दौंड हे तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. येथे रेल्वे जंक्शन असल्यामुळे येथून लोहमार्गाने वेगवेगळ्या ठिकाणी जाता येते. 

वालचंदनगर - येथे साखर कारखान्यासाठी लागणारी यंत्रसामुग्री तयार केली जाते. तसेच प्लॅस्टिकचा व वनस्पती तुपाचा कारखानाही येथे आहे. 

सासवड - हे पुरंदर तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. येथे सोपानदेवीची समाधी आहे. जवळच पुरंदर किल्ला आहे. सासवडचा परिसर अंजीर, सीताफळ, डाळिंब, पेरु इत्यादींच्या बागांसाठी प्रसिद्ध आहे. 

भोर - हे तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. येथे रंग, मेणकापड इत्यादींचे कारखाने आहेत. येथून जवळच भाटघर धरण व बनेश्वर ही सहलीची ठिकाणी आहेत. 

वेल्हे - हे तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. येथून जवळ राजगड व तोरणा हे किल्ले आहेत. 

वढू - येथे संभाजी महाराजांची समाधी आहे. 

पौंड - हे मुळशी तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. येथून जवळच मुळशी धरण आहे. 

पुणे प्रशासकीय विभागास पश्चिम महाराष्ट्र म्हटले जाते. 

1997 पासून पुणे येथे देशातील पहिली मुलींची सैनिक शाळा आहे. 

ग्रामसेवक व ग्रामसेविका प्रशिक्षण प्रशिक्षण केंद्र पुणे जिल्ह्यातील मांजरी येथे चालविले जाते. 

पुणे नागरी संकुल हे देशातील आठव्या व राज्यातील दुसर्‍या क्रमांकाचेनागरी संकुल आहे. 

राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था (NARI), भोसरी (पुणे) 

महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ मुख्यालय, पुणे 

राष्ट्रीय विषाणू संस्था, पुणे 

महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, पुणे 

राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळा (NCL), पुणे 
भारतीय कृषि उधोग प्रतिष्ठान, उरळी कांचन (पुणे) 

महाराष्ट्र विकास प्राधिकरण (यशदा), पुणे 

सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन, खडकवासला 

फिल्म अँड टेलिव्हीजन इन्स्टिट्यूट, पुणे 

नॅशनल डिफेन्स अकादमी, खडकवासला (पुणे)

 

2. सांगली जिल्हा

जिल्ह्याचे मुख्य ठिकाण - सांगली  
               क्षेत्रफळ - 8,572 चौ.कि.मी. 

लोकसंख्या - 28,20,575 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)

तालुके - 10 - खानापूर, कवठे महाकाळ, वाळवे, तासगाव, जत, शिराळे, आतपाडी, पलूस, मिरज, कडेगाव. 

सीमा - उत्ततेस व ईशान्येस सोलापूर जिल्हा, उत्तरेस व वायव्येस सातारा जिल्हा, पूर्वेस कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्हा, पश्चिमेस रत्नागिरी जिल्हा, दक्षिणेस व नैऋत्येस कोल्हापूर जिल्हा असून दक्षिणेस कोल्हापूर पर्यंत कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्हा.

जिल्हा विशेष -

 

1 ऑगस्ट 1949 रोजी सातारा जिल्हाचे विभाजन करून उत्तर सातारा आणि दक्षिण सातारा असे दोन जिल्हे निर्माण केले. नंतर 23 नोव्हेंबर 1960 ला फेरफार करून दक्षिण सातारा जिल्ह्याचे रूपांतर सांगली जिल्ह्यात करण्यात आले. 

सांगली जिल्ह्याला कलावंताचा जिल्हा म्हणतात. 

हळद व द्राक्ष उत्पादनासाठी प्रसिद्ध. रबी ज्वारीला या जिल्ह्यात 'शाळू'म्हणून ओळखले जाते. 

प्रमुख स्थळे

 

सांगली - शहराच्या मध्यभागी गणेशदुर्ग हा किल्ला असून येथील गणेशमंदिर प्रसिद्ध आहे. 

मिरज - येथील भुईकोट किल्ला व मिरासाहेब अवलियाचा दर्गा प्रसिद्ध आहे. 

औंदुबर - या गावात दत्तात्रय मंदिर असून हे मंदीर नरसिंह सरस्वती यांच्या स्मरणार्थ बांधण्यात आले. ब्राम्हण कुटुंबात 1304 मध्ये जन्माला आलेले हे संत संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. कृष्णा नदीच्या काठावर भवनेश्वरीचे मंदीर आहे. 

बहादूरवाडी - या गावात माधवराव पेशव्यांनी 1761 च्या सुमारास किल्ला बांधला. 

बेडग - ता. मिरजपासून 11 कि.मी. अंतरावर असलेले हे गाव अनेक मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे. 

भोपाळगड - ता. खानपूरच्या दक्षिण पूर्वेस एक किल्ला असून तो शिवाजीच्या ताब्यात होता. 

भोसे - येथे दांडोबा महादेव गुफा प्रसिद्ध असून या गुहेत यादव राजा सिंघण यांचा शिलालेख आहे. 

देवराष्ट्र - हे गाव खानापूर तालुक्यातील असून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची जन्मभूमी होय. या गावात अनेक प्राचीन लेण्या आहे. 

कासबे दिग्रज - मिरज तालुक्यातील हे गाव पाच हिंदू मंदिरे व दोन जैन बस्तीसाठी प्रसिद्ध आहे. 

कुंडल - तासगाव तालुक्यातील या गावात हिंदूच्या लेण्या आहे. 

शिराळा - या तालुक्याच्या गावात देश-विदेशातील लोक नागपंचमीसाठी येथे येतात. 

मच्छिंद्रगड - कर्हाड तालुक्यातील उत्तरेस शिवाजीने हा किल्ला बांधला.

 

3.सातारा जिल्हा

जिल्ह्याचे मुख्य ठिकाण - सातारा         
    क्षेत्रफळ - 10,480 चौ.कि.मी. 

लोकसंख्या - 30,03,922 (सन 2011 च्या जनगणनेनुसार) 

तालुके - 11 - खंडाळा, फलटण, वाई, माण, जावळी, लाख महाबळेश्वर, कोरेगांव, खटाव, सातारा, पाटण, कराड. 

सीमा - उत्तरेस पुणे जिल्हा, पूर्वेस सोलापूर जिल्हा, पश्चिमेस रत्नागिरी जिल्हा, दक्षिणेस सांगली जिल्हा असून वायव्येस रायगड जिल्हा आहे. 

जिल्हा विशेष -

 

रयत शिक्षण संस्थेच्या ज्ञानगंगेचा उदय याच जिल्ह्यात झाला. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी 1919 मध्ये कराड तालुक्यात रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली 1924 मध्ये या शिक्षण संस्थेचे कार्यालय सातारा येथे नेण्यात आले. 

येथेच छत्रपती शाहूचा राज्यभिषेक 1708 मध्ये झाला. 

ऐतिहासिक शूरवीराचा जिल्हा. मराठा काळापासून या जिल्ह्याला लष्करी परंपरा लाभली आहे. 

प्रमुख स्थळे

 

सातारा - सातारा शहरामध्ये शिलाहार वंशातील राजा दूसरा भोज याने 1990 मध्ये 'अजिक्यतारा' हा किल्ला बांधला आहे. येथील छत्रपती वस्तुसंग्रहालय प्रसिद्ध आहे. जवळच सज्जनगड या किल्यावर समर्थ रामदास स्वामींची समाधी आहे. 

महाबळेश्वर, पाचगणी - हे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे.महाबळेश्वर येथे महाबळेश्वराचे मंदीर. 

वाई - महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोषनिर्मिती मंडळाचे संपादकीय कार्यालय येथे आहे. 

पाटण - येथे 'शिवाजीसागर' हा जलाशय आहे. 

कर्हाड - एथे कृष्णामाईचे मंदीर व यशवंतराव चव्हाणांची समाधी आहे. 

औंध - औंधचे वस्तुसंग्रहालय प्रसिद्ध आहे. 

प्रतापगड - महाबळेश्वर तालुक्यात शिवरायांनी 1656 मध्ये या गडाची उभारणी केली. याच कडावर अफझलखानाचा वध झाला.

चाफळ - छत्रपती शिवाजी महाराज व समर्थ रामदासस्वामी याची भेट येथे झाली.

सज्जनगड - स्वामी समर्थ रामदास यांचे कार्यस्थान. यांच्या वास्तव्याने गडास 'सज्जनगड' असे नाव देण्यात आले आहे. 

म्हसवड - येथे 12 व्या शतकातील सिद्धनाथाचे मंदीर, कल्याणी चालुक्य राजा जगदेकमल्ला याचा शिलालेख मंदिरात आहे. 

माहुली - ता. सातारा पासून 5 कि.मी. अंतरावर पूर्वेस कृष्णा व वेन्ना या दोन नद्यांना संगम.

मसूर - ता. कराड येथे समर्थ रामदास स्वामींनी बांधलेले मारूतीचे मंदी