MPSC Geography
139K subscribers
7.77K photos
82 videos
563 files
1.07K links
Download Telegram
For more updates join us @MPSCGeography
०१. हिमालयाच्या रोहतांग खिंडीनजीक कोणत्या नदीचा उगम आहे?
बियास

०२. भारताच्या कोणत्या राज्याची राजधानी सात वन्य टेकड्यांवर आहे?
तिरुवनंतपुरम

०३. कोणत्या राज्यात देशातील पहिले गायींचे अभयारण्य (Cow's Sanctuary) स्थापन्यात येणार आहे?
मध्य प्रदेश

०४. कोणत्या शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखतात.
औरंगाबाद

०५. हुंडरू धबधबा भारताचा कोणत्या शहराजवळ आहे?
रांची

०६. फेकरी हा औष्णिक विद्युतप्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
जळगाव

०७. मिनिकॉय, कदमत व बित्रा कोणत्या केंद्रशासीत प्रदेशाचे प्रांत आहेत?
लक्षद्वीप

०८. भारतीय पठारी प्रदेशाने किती क्षेत्र व्यापले आहे?
१२ लाख चौ.कि.मी.

०९. नर्मदा नदीच्या दक्षिण भागात असलेले भारतातील सर्वात मोठे पठार कोणते?
दख्खनचे पठार

१०. महाराष्ट्रास लागून कोणत्या राज्याची सीमा सर्वात जास्त लांब आहे?
मध्य प्रदेश

११. महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला सातपुडा पर्वतरांगा व गाविलगड टेकड्या आहेत?
उत्तर

१२. परभणी व नांदेड जिल्ह्यातील डोंगरांच्या रांगेला कोणती रांग म्हणतात?
निर्मळ रांग

१३. 'V' आकाराची दरी कशामुळे तयार होते?
नदीचे अपघर्षण

१४. दगडी कोळशाचा निकृष्ठ दर्जाचा प्रकार कोणता आहे?
Lignite

१५. बावन्न दरवाजांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते?
औरंगाबाद

१६. Table Land नावाने कोणता भाग ओळखला जातो?
पाचगणी

१७. हाफलांग हे पर्वतीय पर्यटन स्थळ कोणत्या राज्यात आहे?
आसाम

१८. पोलो खेळाचा उगम कोणत्या राज्यात झाला आहे?
मणिपूर

१९. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वांत खोल भाग कोणता?
मरियाना गर्ता

२०. गोवरी' कोणत्या भारतीय राज्यातील नृत्य-नाटक आहे?
राजस्थान

२१. घूमरा नृत्यात कोणत्या देवतेची पूजा केली जाते?
दुर्गा

२२. ग्रेट बॅरियर रीफ' कोणत्या महासागरात आहे?
प्रशांत महासागर

२३. या पैकी कोणत्या ग्रहाची कक्षा पृथ्वीच्या सर्वात जवळ आहे?
शुक्र

Join us @MPSCGeography
महाराष्ट्र जिल्हे निर्मिती

1⃣1 मे 1981 : रत्नागिरीपासून – सिंधुदुर्ग (27 वा जिल्हा)

औरंगाबादपासून – जालना (28 वा जिल्हा)

2⃣16 ऑगस्ट 1982 : उस्मानाबादपासून– लातूर (29 वा जिल्हा)

3⃣26 ऑगस्ट 1982 : चंद्रपूरपासून – गडचिरोली (30 वा जिल्हा)

4⃣1990 :मुंबईपासून – मुंबई उपनगर (31 वा जिल्हा)

5⃣1 जुलै 1998 : धुळेपासून – नंदुरबार (32 वा जिल्हा)

अकोल्यापासून – वाशिम (33 वा जिल्हा)

6⃣1 मे 1999 : परभणीपासून – हिंगोली (34 वा जिल्हा)

भंडार्यापासून – गोंदिया (35 वा जिल्हा)

7⃣1ऑगस्ट 2014 : ठाण्यापासुन -पालघर (36वा जिल्ह्या)
जॉईन करा @MPSCGeography
Forwarded from MPSC Material
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
आफ्रिकेतील लोकसंख्या वितरण :
निम्मी लोकसंख्या लाल रंगातील भागात राहते .

जाईन करा आमचे चॅनेल @MPSCGeography
वर्धा नदी
सकाळ सप्तरंग - पनामा कालवा - 1
सकाळ सप्तरंग - पनामा कालवा -2
नाशिक प्रशासकीय विभागाबद्दल संपूर्ण माहिती

1. नाशिक जिल्हा

जिल्ह्याचे मुख्य ठिकाण - नाशिक      
       क्षेत्रफळ - 15,530 चौ.कि.मी.

लोकसंख्या - 61,09,052 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)

तालुके - 15 - नसहिक, बागलाण (सटाणा), मालेगांव, सुरगणा, पेठ, कळवण, दिंडोरी, चांदवड, नांदगांव, निफाड, येवले, इगतपुरी, सिन्नर, त्रंबकेश्वर, देवळा. 

सीमा - उत्तरेस घुळे जिल्हा, पूर्वेस जळगांव जिल्हा, पश्चिमेस ठाणे जिल्हा, दक्षिणेस अहमदनगर जिल्हा असून आग्नेयेस औरंगाबाद जिल्हा, ईशान्येस धुळे जिल्हा, वायव्येस गुजरात राज्यातील डांग व सूरत हे दोन जिल्हे.

जिल्हा विशेष -

हा जिल्हा महाराष्ट्रातील पाच व गुजरातमधील दोन जिल्हयांनी वेढला आहे. निफाड व लासलगाव परिसर कांदा उत्पादनासाठी प्रसिद्ध. द्राक्षांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. देशातील पहिले मातीचे धरण नाशिक जिल्हातील गंगापूर येथे गोदावरी नदीवर बांधण्यात आले आहे. 

नाशिक शहर हे तापी व गोदावरी या नधांच्या खोर्‍यात वसलेल्या दख्खन पठाराचा भू-भाग आहे. गोदावरी काठी वसलेले हे शहर एक तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. येथे दर बारा वर्षांनी कुंभमेळा भरतो.

प्रमुख स्थळे

नाशिक - येथेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह 2 मार्च 1930 ला केला. नाशिक (ओझर) येथे मिग विमानाचा कारखाना व सिक्युरिटी प्रेस आहे. 

महाराष्ट्र राज्य पोलिस अकॅडमी ही संस्था नाशिक येथे आहे. 

त्र्यंबकेश्वर - बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक गणले जाणारे त्र्यंबकेश्वर हे स्थळ नाशिक जिल्ह्यातच आहे. 

मालेगाव - पेशव्याचे सरदार नारोशंकर यांनी बांधलेला भुईकोट किल्ला प्रसिद्ध आहे. 

येवले - तात्या टोपे यांचे जन्मगाव आहे. डॉ. आंबेडकरांनी येथेच आपला धर्मांतराचा निर्णय जाहीर केला होता. 

सापुतरा - निसर्गरम्य स्थळ व थंड हवेचे ठिकाण प्रसिद्ध आहे. 

भगूर - स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जन्मस्थान. 

नांदूर - मध्यमेश्वर - भरतपुर नावाचे अभयारण्य येथेच आहे. 

भोजापूर - खडकात कोरलेले खंडोबाचे मंदिर. 

देवळाली - सैन्याचे प्रशिक्षण केंद्र, थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध. 

गंगापूर - गोवर्धन म्हणून सातवाहन शिलालेखात उल्लेखलेले हे ठिकाण. 

सप्तश्रुंगी - साडेतीन पीठापैकी एक पीठ. मोठ्या संख्येने येथे लोक दर्शनाले येतात. 

सिन्नर - यादव साम्राज्याची सुरुवातीची राजधानी व 9 व्या शतकातील व 12 व्या शतकातील मंदिरासाठी प्रसिद्ध. 

दिंडोरी - शिवाजी व मोगल यांच्यात झालेल्या युद्धासाठी प्रसिद्ध. 

निलगिरीपासून कागदनिर्मिती - इगतपुरी (नाशिक)

महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था (MERI)- नाशिक 

महाराष्ट्र राज्य पोलीस अकादमी - नाशिक 

चलनी नोटा, पोस्ट कार्ड व तिकिटे छापण्याचा कारखाना - नाशिक 

नाशिक प्रशासकीय विभागास उत्तर महाराष्ट्र म्हंटले जाते. 

नाशिक जिल्ह्यात सातमाळा म्हणून ओळखल्या जाणार्‍या डोंगररांगांनाच औरंगाबाद जिल्ह्यात अजिंठ्याच्या डोंगररांगा असे म्हटले जाते.

नाशिक जिल्ह्यात वाहणार्‍या सर्व नधा नाशिक जिल्ह्यातच उगम पावतात. एकही नदी दुसर्‍या जिल्ह्यातून प्रवेश नाही. हे आगळे वैशिष्ट्य आहे. 

भारातातील पहिले मातीचे धरण गोदावरी नदीवर नाशिक जिल्ह्यात गंगापूर येथे बांधण्यात आले आहे. 

2. धुळे जिल्हा

जिल्ह्याचे मुख्य ठिकाण - धुळे           
     क्षेत्रफळ - 8,063 चौ.कि.मी. 

लोकसंख्या - 20,48,781 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)

तालुके - 4 - शिंदखेड, साक्री, धुळे, शिरपूर.

सीमा - उत्तरेस नंदुरबार जिल्हा व मध्य प्रदेशचा मेवाड जिल्हा, पूर्वेस जळगाव जिल्हा, पश्चिमेस नंदुरबार जिल्हा व गुजरात राज्य, दक्षिणेस नाशिक जिल्हा आहे. 

जिल्हा विशेष -

पूर्वी जळगाव आणि धुळे मिळून खानदेश हा एक जिल्हा होता. या जिल्ह्याचे मुख्यालय धुळे येथे होते. पुढे 1961 ला पश्चिम खानदेशाला धुळे जिल्हा असे नाव देण्यात आले. 

प्रमुख स्थळे

धुळे - नकाणे तलाव व डेडरगाव तलाव ही सहलीची केंद्रे आहेत. 

शिरपूर - धुळे जिल्ह्यातील शेतीमालाची मोठी बाजारपेठ. शिरपूरमधील बालाजी मंदिर प्रेक्षणीय आहे. 

दोंडाईचे - मिरचीच्या व्यापारासाठी दोंडाईचे विशेष महत्वाचे आहे. येथे स्टार्चचा कारखाना आहे. 

3. नंदुरबार जिल्हा

जिल्ह्याचे मुख्य ठिकाण - नंदुरबार             

क्षेत्रफळ - 5,034 चौ.कि.मी. 

लोकसंख्या - 16,46,171 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)

तालुके - 6 - नंदुरबार, अक्कलकुवा, तळोदे, नवापुर, शहादे, धडगांव (अक्राणी).

सीमा - उत्तरेस गुजरात व मध्य प्रदेश, पूर्वेस धुळे जिल्हा व मध्य प्रदेश, पश्चिमेस गुजरात राज्य, दक्षिणेस धुळे जिल्हा आहे. 

जिल्हा विशेष -

धुळे जिल्ह्याचे विभाजन करून 1 जुलै 1998 ला नंदुरबार या नव्या जिल्ह्याची निर्मिती झाली. या जिल्ह्यात आदिवासीचे प्रमाण जास्त असल्यामुळे या जिल्ह्यास आदिवासी जिल्हा म्हणून ओळखतात. 

सातपुडा पर्वतरांगामुळे हा जिल्हा गुजरात व मध्यप्रदेशापासून वेगळा झाला. 

या जिल्ह्