MPSC Geography
139K subscribers
7.77K photos
82 videos
563 files
1.07K links
Download Telegram
🔹कसे चालतात ‘राधानगरी’चे स्वयंचलित दरवाजे?


देशातील एकमेव स्वयंचलित दरवाजे राधानगरी धरणाला आहेत. स्थापत्य शास्त्राचा अद्भूत नमुना म्हणून ओळखले जाणारे सात स्वयंचलित दरवाजे तब्बल चौसष्ट वर्षांनंतरही धरणातील पाण्याचा सुरक्षितपणे विसर्ग करत आहेत. कोणत्याही यांत्रिक ऊर्जेशिवाय हे दरवाजे चालतात कसे? याबाबत उत्सुकता ताणली असून या दरवाजांमुळे जुनं ते सोनं ही म्हण खरी ठरली आहे. जल विसर्गाबरोबर कमालीचे सौंदर्यही या दरवाजांमुळे धरणाला प्राप्त झाले आहे.

राजर्षी शाहू महाराजांच्या दूरदृष्टीने साकारलेले राधानगरी धरण स्थापत्य शास्त्राचा अद्भूत नमुनाच आहे. जगप्रसिद्ध स्थापत्य शास्त्रज्ञ डॉ. एम. विश्‍वेश्‍वरय्या यांनी या धरणाचा स्थापत्य आराखडा तयार केला आहे. हे दरवाजे देशात एकमेव आहेत. त्यामुळे तो ऐतिहासिक ठेवा आहे. प्रत्येकी 14.48 बाय 1.48 मीटर्स आकाराच्या या सात दरवाजातून प्रतिसेकंद दहा हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होतो. या दरवाजांसाठी कोणत्याही प्रकारची यांत्रिक ऊर्जा वापरली जात नाही. या प्रत्येक दरवाजाच्या आतील बाजूला प्रत्येकी 35 टन वजनाचे सिमेंट काँक्रीटचे ब्लॉक्स बसवले आहेत. धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर अतिरिक्त होणार्‍या पाण्याच्या दाब लोखंडी दरवाजावर पडताच ब्लॉक्स वर उचलले जातात व स्वयंचलित दरवाजातून पाणी बाहेर फेकले जाते. या ब्लॉक्सवरील दाब 35 टनापेक्षा खाली आला असता ब्लॉक खाली बसतात. त्यामुळे पाण्याचा विसर्ग थांबतो. धरणात क्षमतेपेक्षा जादा होणार्‍या पाण्याचा विसर्ग या सात दरवाजातून होत असल्याने ‘धरणाचा राखणदार’ म्हणूनच हे दरवाजे ओळखले जात. 

1952 साली धरणात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा झाल्यानंतर या दरवाजांची रचना केली आहे. म्हणजे या दरवाजांना चौसष्ट वर्षे पूर्ण झाली आहेत. आज चौसष्ट वर्षानंतरही हे दरवाजे पूर्णक्षमतेने कार्यरत आहेत. त्यासाठी वापरलेले लोखंडी साहित्य उच्चत्तम दर्जाचे असल्यामुळेच हे दरवाजे आजही सक्षम आहेत. या दरवाजांचा देखभाल दुरुस्तीचा खर्चही नाममात्र आहे. दरवर्षी केवळ ग्रिसिंग ओव्हर ऑईलिंग केले जाते. एखादेवेळी सिमेंट काँक्रीटच्या ब्लॉकची झीज झाली तर त्याची डागडुजी केली जाते. मध्यंतरी हे दरवाजे काढून त्याजागी वक्राकार दरवाजे बसवण्याचा प्रस्ताव आला होता. मात्र, शाहूप्रेमी जनतेने हा ऐतिहासिक ठेवा काढल्यास तीव्र विरोध केल्याने हा प्रस्ताव बारगळला आहे. हे दरवाजे कायम ठेवून धरणाच्या उत्तरेकडील टेकडीजवळ नवीन वक्राकार दरवाजे बसवण्याचा प्रस्ताव विचाराधिन आहे. सात स्वयंचलित दरवाजातून अतिरिक्त पाण्याचा विसर्ग होऊन धरणाच्या मुख्य भिंतीवरील पाण्याचा दाब कमी होतो. त्यामुळे धरण सुरक्षित राहते. धरणाचा हा राखणदार चौसष्ट वर्षांनंतरही सुस्थितीत आहे. त्यामुळे जुनं ते सोनं ही म्हण या दरवाजांना चपखलपणे लागू होते.
Forwarded from MPSC Material
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
For more updates join us @MPSCGeography
०१. हिमालयाच्या रोहतांग खिंडीनजीक कोणत्या नदीचा उगम आहे?
बियास

०२. भारताच्या कोणत्या राज्याची राजधानी सात वन्य टेकड्यांवर आहे?
तिरुवनंतपुरम

०३. कोणत्या राज्यात देशातील पहिले गायींचे अभयारण्य (Cow's Sanctuary) स्थापन्यात येणार आहे?
मध्य प्रदेश

०४. कोणत्या शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखतात.
औरंगाबाद

०५. हुंडरू धबधबा भारताचा कोणत्या शहराजवळ आहे?
रांची

०६. फेकरी हा औष्णिक विद्युतप्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
जळगाव

०७. मिनिकॉय, कदमत व बित्रा कोणत्या केंद्रशासीत प्रदेशाचे प्रांत आहेत?
लक्षद्वीप

०८. भारतीय पठारी प्रदेशाने किती क्षेत्र व्यापले आहे?
१२ लाख चौ.कि.मी.

०९. नर्मदा नदीच्या दक्षिण भागात असलेले भारतातील सर्वात मोठे पठार कोणते?
दख्खनचे पठार

१०. महाराष्ट्रास लागून कोणत्या राज्याची सीमा सर्वात जास्त लांब आहे?
मध्य प्रदेश

११. महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला सातपुडा पर्वतरांगा व गाविलगड टेकड्या आहेत?
उत्तर

१२. परभणी व नांदेड जिल्ह्यातील डोंगरांच्या रांगेला कोणती रांग म्हणतात?
निर्मळ रांग

१३. 'V' आकाराची दरी कशामुळे तयार होते?
नदीचे अपघर्षण

१४. दगडी कोळशाचा निकृष्ठ दर्जाचा प्रकार कोणता आहे?
Lignite

१५. बावन्न दरवाजांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते?
औरंगाबाद

१६. Table Land नावाने कोणता भाग ओळखला जातो?
पाचगणी

१७. हाफलांग हे पर्वतीय पर्यटन स्थळ कोणत्या राज्यात आहे?
आसाम

१८. पोलो खेळाचा उगम कोणत्या राज्यात झाला आहे?
मणिपूर

१९. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वांत खोल भाग कोणता?
मरियाना गर्ता

२०. गोवरी' कोणत्या भारतीय राज्यातील नृत्य-नाटक आहे?
राजस्थान

२१. घूमरा नृत्यात कोणत्या देवतेची पूजा केली जाते?
दुर्गा

२२. ग्रेट बॅरियर रीफ' कोणत्या महासागरात आहे?
प्रशांत महासागर

२३. या पैकी कोणत्या ग्रहाची कक्षा पृथ्वीच्या सर्वात जवळ आहे?
शुक्र

Join us @MPSCGeography
महाराष्ट्र जिल्हे निर्मिती

1⃣1 मे 1981 : रत्नागिरीपासून – सिंधुदुर्ग (27 वा जिल्हा)

औरंगाबादपासून – जालना (28 वा जिल्हा)

2⃣16 ऑगस्ट 1982 : उस्मानाबादपासून– लातूर (29 वा जिल्हा)

3⃣26 ऑगस्ट 1982 : चंद्रपूरपासून – गडचिरोली (30 वा जिल्हा)

4⃣1990 :मुंबईपासून – मुंबई उपनगर (31 वा जिल्हा)

5⃣1 जुलै 1998 : धुळेपासून – नंदुरबार (32 वा जिल्हा)

अकोल्यापासून – वाशिम (33 वा जिल्हा)

6⃣1 मे 1999 : परभणीपासून – हिंगोली (34 वा जिल्हा)

भंडार्यापासून – गोंदिया (35 वा जिल्हा)

7⃣1ऑगस्ट 2014 : ठाण्यापासुन -पालघर (36वा जिल्ह्या)
जॉईन करा @MPSCGeography