MPSC Geography
139K subscribers
7.77K photos
82 videos
562 files
1.07K links
Download Telegram
@MPSCGeography

🔹भारतातील महत्वाची सरोवरे

१) वूलर सरोवर = जम्मू - काश्मीर = भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर

२) दाल सरोवर = जम्मू - काश्मीर = श्रीनगर शहर या सरोवराच्या काठावर वसलेले आहे.

३) चिल्का सरोवर = ओडिशा = भारतातील सर्वात मोठे खा-या पाण्याचे सरोवर

४) लोणार सरोवर = महाराष्ट्र = उल्कापातामुळे निर्माण झालेले जगातील एकमेव सरोवर

५) हुसेनसागर सरोवर = आंध्रप्रदेश = गौतम बुद्धाचा सर्वात मोठा पुतळा हुसेनसागर येथे आहे.

६) सांबर सरोवर = राजस्थान = भारतातील सर्वाधिक खा-या पाण्याचे सरोवर
____________________________________
अधिक माहितीसाठी आमचे @MPSCGeography चॅनेल जॉईन करा.
@MPSCGeography

🔹भारतातील महत्वाचे धबधबे

१) जोग / गिरसप्पा धबधबा = कर्नाटक राज्य = शरावती नदीवर आहे.

२) हुन्ड्रु धबधबा = झारखंड राज्य = सुवर्णरेखा नदी

३) धुवाधार धबधबा = मध्यप्रदेश राज्य = नर्मदा नदी

४) चित्रकोट धबधबा = छत्तीसगड राज्य = इंद्रावती नदी

५) शिवसमुद्रपूरम धबधबा = कर्नाटक राज्य = कावेरी नदी

६) गोकाक धबधबा = कर्नाटक राज्य = घटप्रभा नदी

७) चुलीया धबधबा = मध्यप्रदेश राज्य = चंबळ नदी

८) अथिरापल्ली धबधबा = केरळ राज्य = चालकुंडी नदी
🔹महाराष्ट्र- जिल्हे व त्यांची प्रसिद्धि

*१)मुंबई*--------भारताचे प्रवेशद्वार,
भारताचे प्रथम क्रमांकाचे
औद्योगिक शहर,भारताची,
राजधानी

*२)रत्नागिरी*---देशभक्त व
समाजसेवकांचा जिल्हा

*३)सोलापूर*----ज्वारीचे कोठार,
सोलापुरी चादरी

*४)कोल्हापुर*--कुस्तीगिरांचा जिल्हा
गुळाचा जिल्हा

*५)रायगड*-----तांदळाचे कोठार व
डोंगरी किल्ले असलेला
जिल्हा

*६)सातारा*----कुंतल देश व शुरांचा
जिल्हा

*७)बिड*------जुन्या मराठी कविंचा
जिल्हा,मिठगरांचा जिल्हा,
देवळादेवळा जिल्हा, ऊस
कामगारांचा जिल्हा

*८)परभणी*---ज्वारीचे कोठार

*९)उस्मानाबाद*--श्री.भवानी मातेचा
जिल्हा

*१०)औरंगाबाद*--वेरुळ-अजिंठा
लेण्यांचा जिल्हा,
मराठवाडयाची
राजधानी

*११)नांदेड*--संस्कृत कवींचा जिल्हा

*१२)अमरावती*--देवी रुख्मिणी व
दमयंतीचा जिल्हा

*१३)बुलढाणा*--महाराष्ट्राची
कापसाची बाजारपेठ

*१४)नागपुर*----संत्र्यांचा जिल्हा

*१५)भंडारा*-----तलावांचा जिल्हा

*१६)गडचिरोली*--जंगलांचा जिल्हा

*१७)चंद्रपुर*----गौंड राजांचा जिल्हा

*१८)धुळे*----सोलर सिटीचा जिल्हा

*१९)नंदुरबार*-आदिवासी बहुल
जिल्हा

*२०)यवतमाळ*-पांढरे सोने-
कापसाचा जिल्हा

*२१)जळगाव*--कापसाचे शेत,
केळीच्या बागा,
अजिंठा लेण्यांचे
प्रवेशद्वार

*२२)अहमदनगर*-साखर कारखाने
असलेला जिल्हा

*२३)नाशिक*---मुंबईची परसबाग,
द्राक्षांचा जिल्हा,मुंबईचा
गवळीवाडा
२४) सांगली - हळदीचा जिल्हा ,
कलावंतांचा जिल्हा
____________________________________
Join us @MPSCGeography
World divided into 7 regions with each having a population of 1 billion. @MPSCGeography
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
तुम्हाला माहित आहे का?
अमेरिका व रशिया मधील अंतर केवळ 3.8 km आहे.

जॉईन करा @eMPSCkatta
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
पाहिलाय का कधी लाव्हारस बाहेर पडताना ?

@eMPSCkatta
पानवळ रेल्वे पूल:
.
कोकण रेल्वेवरील पानवळ पूल हा एक अभियांत्रिकी चमत्कार आहे.

जॉईन करा आमचे चॅनेल @MPSCGeography
पानवळ रेल्वे पूल:
.
कोकण रेल्वेवरील पानवळ पूल हा एक अभियांत्रिकी चमत्कार आहे. हा पूल कोकण रेल्वेवरील रत्नागिरी आणि निवसर या दोन स्थानकांदरम्यान पानवळ नदीवर बांधला आहे. रत्नागिरी स्थानकापासून सुमारे सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या या पुलाची लांबी सुमारे 360 मीटर्स आणी उंची 64 मीटर आहे. सर्वसाधारणपणे इतक्या लांब पुलाच्या निर्माणासाठी अनेक गर्डर्स वापरले जातात; परंतु पानवळ पुलाच्या निर्मितीसाठी केवळ एक सलग गर्डर बनविला गेला. हा गर्डर इंक्रीमेंटल लॉंचिंग या पद्धतीने पुलाच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकापर्यंत लॉंच केला गेला. या गर्डर लॉंचिंगचा वेग सुमारे दोन फूट प्रती तास एवढा होता. अशाप्रकारचे गर्डर लॉंचिंग तंत्र भारतीय रेल्वेत पहिल्यांदाच वापरण्यात आले. या पुलाचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे याचा एक पिअर कुतुब मिनारपेक्षाही उंच आहे. या पुलावरून खाली पाहिले, तर जीप आगपेटीएवढी दिसते. या पुलावरून शंभर किलोमीटर प्रती तास वेगाने धावणारी गाडी पाहणे हा एक अविस्मरणीय अनुभव असतो. हिरव्यागार पर्वतांनी वेढलेल्या पानवळ पुलाखालून वाहणारे पानवळ नदीचे पात्र पुलावरून खूपच सुंदर दिसते. या पुलाची भौगोलिक स्थिती अशी आहे, की येथे वाऱ्याचा वेग धोकादायक पातळीपर्यंत जाऊ शकतो. ही शक्यता लक्षात घेऊन या पुलावर वाऱ्याचा वेग सतत मोजण्यासाठी ऍनॉमिमीटर बसविण्यात आले आहे. वाऱ्याचा वेग साठ किलोमीटर प्रतितासापेक्षा अधिक झाल्यास, गाडी निवसर आणि रत्नागिरी स्थानकावर थांबविण्यासाठी विशेष प्रणाली बसविण्यात आली आहे. रत्नागिरी ते हातखंबा रस्त्यावर पानवळ फाट्यावरून पानवळ पुलापर्यंत पोचता येते. ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात हा पूल पाहायला जाऊ शकतो.

JOIN us @MPSCGeography
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
MPSC भूगोल विशेष........

🔹गाल्फ प्रवाह

काय आहे गल्फा प्रवाह

📌उत्तर अटलांटिक महासागरातील जगप्रसिद्ध उबदार सागरी प्रवाह. १४९२ मध्ये कोलंबसच्या व १५१३ मध्ये पॉन्से द लेऑन या स्पॅनिश नाविकाच्या लक्षात तो आला होता. तो मेक्सिकोच्या आखातातून येतो, या समजुतीमुळे बेंजामिन फ्रँक्लिनने त्याला गल्फ स्ट्रीम हे नाव दिले.*

📌परंतु फ्लॉरिडाच्या सामुद्रधुनीपासून न्यू फाउंडलंडच्या आग्‍नेयीकडील ग्रँड बँक्सपर्यंत त्याची खास वैशिष्ट्ये दिसून येत असल्यामुळे, एवढ्या भागातच त्याचे हे नाव योग्य आहे. फ्लॉरिडा सामुद्रधुनीपासून नॉर्वेजियन समुद्रापर्यंतच्या प्रवाहास हे नाव अजूनही दिले जाते.
दक्षिण अमेरिकेच्या सेंट रॉक भूशिराजवळ दक्षिण विषुववृत्तीय प्रवाहाच्या दोन शाखा होतात.

📌त्यांपैकी उत्तरेकडील शाखा दक्षिण व मध्य अमेरिकेच्या किनाऱ्याकिनाऱ्याने कॅरिबियन समुद्रात आल्यावर तिला उत्तर विषुववृत्तीय प्रवाहाची वेस्ट इंडीजच्या दक्षिणेकडील शाखा मिळते. मग तो प्रवाह मेक्सिकोच्या आखातात जाऊन तेथून फ्लॉरिडाच्या सामुद्रधुनीतून बाहेर पडतो.

📌त्याला उत्तर विषुववृत्तीय प्रवाहाची अँटिलीस प्रवाह ही शाखा मिळते व मग खरा गल्फ प्रवाह सुरू होतो. येथे त्याचे तापमान २०० से. ते २४०से.; रुंदी सु.१०० किमी.; खोली. सु. ८०० मी.; वेग ताशी ६·५ किमी.; क्षारता उच्च व रंग गर्द निळा असून तो दर सेकंदास २·६ कोटी घ. मी. पाणी वाहून नेतो
पृथ्वीच्या परिवलनामुळे मिळणाऱ्या कोरिऑलिस प्रेरणेमुळे तो उजवीकडे वळू लागतो

📌अमेरिकेच्या आग्‍नेय किनाऱ्याला समांतर मार्गाने हॅटरस भूशिरापर्यंत गेल्यावर तो अधिक रूंद व संथ होतो, त्यात लहान लहान भोवरे दिसतात, खोली ४ ते ५ हजार मी. होते व तो सेंकदाला ८·२ कोटी घ.मी.पाणी वाहून नेतो. ग्रँड बँक्सकडे गेल्यावर त्याला लॅब्रॅडॉर हा थंड प्रवाह मिळतो. त्याचे काही फाटे गल्फ प्रवाह व किनारा यांच्या दरम्यान शिरतात आणि गल्फ प्रवाह कोरिऑलिस प्रेरणेमुळे किनार्‍यापासून दूर गेल्यामुळे तळाचे थंड पाणी वर येते. यामुळे किनारा व गल्फ प्रवाह यांच्यामध्ये थंड पाण्याची एक भिंतच उभी राहते.

📌गल्फ प्रवाहाच्या उजवीकडे न दक्षिणेस सारगॅसो समुद्राचे पाणीही उच्च क्षारतेचे व उबदार असते.
गल्फ प्रवाहात व उत्तर अटलांटिक प्रवाहचक्राच्या मध्यभागीच्या सारगॅसो समुद्रात सारगॅसो या विशिष्ट सागरी वनस्पतीची चकंदळे तरंगत असतात.

*📌गल्फ प्रवाहाच्या उजव्या बाजूच्या पाण्याची पातळी डावीकडील पातळीपेक्षा सु. ८० सेंमी. उंच असते. ग्रँड बँक्सजवळ उष्ण प्रवाहावरील आर्द्र हवा, थंड प्रवाहावरील थंड हवेत मिसळून बाष्पांचे सांद्रीभवन होते व दाट धुके पडते.*

📌 ते तेथील मासेमारी नौकांस धोक्याचे असते. सु. ४०० उ. अक्षांश व ५०० प. रेखांश येथे गल्फ प्रवाह कोरिऑलिस प्रेरणेमुळे ईशान्येकडे जाऊन पश्चिमी वाऱ्यांमुळे वाहणाऱ्याउत्तर अटलांटिक प्रवाहात मिसळून जातो.
पुढे हा प्रवाह यूरोपच्या पश्चिम किनार्‍यापर्यंत गेल्यावर त्याच्या दोन शाखा होतात.

📌 दक्षिणेकडील शाखा आयबेरियन द्विपकल्प, वायव्य आफ्रिका यांच्याजवळून थंड कानेरी प्रवाह म्हणून उत्तर विषुववृत्तीय प्रवाहाला मिळते.
उत्तरेकडील शाखा ब्रिटिश बेटे व नॉर्वे यांच्या किनाऱ्यांजवळून जाऊन पुढे आर्क्टिक महासागरात नाहीशी होते. तिचे तपमान अझोर्सच्या उत्तरेस १५·५० से. होते.

📌या प्रवाहामुळे कॅनडाचे हॅलिफॅक्स, रशियाचे मुरमान्स्क व ब्रिटिश बेटे आणि नॉर्वे यांची बंदरे हिवाळ्यात न गोठता खुली राहतात. गल्फ प्रवाहामुळे पश्चिम व वायव्य युरोपचे हवामान अधिक उबदार होते, असे समजले जाते.

📌तथापि हा परिणाम प्रवाहापेक्षा त्याने वेढलेल्या उबदार जलसंचयाचा आहे असे आता दिसून आले आहे; किंबहूना प्रवाह जेव्हा अधिक पाणी वाहून नेत असतो, तेव्हा यूरोपात तपमान थोडे कमीच होते असे आढळले आहे.
अमेरिकेहून यूरोपकडे जाणाऱ्या नौकांस गल्फ प्रवाहाचा फायदा मिळून वेळ व जळण यांची बचत होते. परंतु उलट बाजूने येणाऱ्या नौका मात्र हा प्रवाह टाळतात.

📌गल्फ प्रवाह, त्याच्या समुद्रपृष्ठावरील व खोल पाण्यातील लहानमोठ्या शाखा, खालून वाहणारा प्रतिप्रवाह, सागरतळावरील निक्षेपांवर होणारा परिणाम इत्यादींचे संशोधन आधुनिक पद्धतींनी चालूच आहे.
____________________________________
Join us @MPSCGeography
Forwarded from Talathi - तलाठी
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Talathi - तलाठी
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Talathi - तलाठी
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Talathi - तलाठी
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Talathi - तलाठी
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM