𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]
3.57K subscribers
8.5K photos
2.55K videos
91 files
195 links
आयुष्यात एकटं पडलेल्या लोकांसाठी, नवीन काहीतरी करून दाखवणाऱ्या जिद्दी लोकांसाठी त्यांचं हक्काचं व्यासपीठ.... ✍
तुमचे विचार एखाद्या व्यक्तीला प्रेरीत करुन एक चांगला व्यक्ती बनवु शकतात.. ☺️🙏🏻
☑Channel by- @AmolMoreAm

🌱Join @In_Process412G
Download Telegram
अनुभव...

✍️"आयुष्य ही अनुभवाची एक प्रयोगशाळा आहे. अनुभवातून जे शिक्षण मिळतं. ते जगातील कोणत्याही विद्यापीठात मिळतं नाही. सुगरण पक्षी ही सुंदर कला केवळ अनुभवातून शिकला.जीवनात प्रत्येक गोष्टीचा अनुभव घ्या. कारण जीवन हे एक practical आहे.यामध्ये यश मिळेल किंवा अपयश,पण प्रत्येक गोष्टीमधून काहीतरी शिकायला मिळेल.आणि हे अनुभवातून मिळालेलं शिक्षण जीवनातील सारे प्रश्न सोडवण्यासाठी पुरेस आहे.व्यक्तीने आयुष्यभर एक विध्यार्थी बनून या सुंदर सृष्टीकडून रोज काहीतरी शिकायला हव. कारण ह्या रोजच्या शिक्षणामध्ये आणि अनुभवामध्ये तुमच आयुष्य बदलण्याची ताकद आहे."
©️®️लेखन -:अनिल भगवान चव्हाण (ABC )
✍️संपर्क -:
@ABCanil

(कृपया वरील लिखाण कोणीही लेखकांच नाव खोडून share करू नये )
❤3👍2
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
विश्वास मरतो हे मात्र नक्की..
......... 💯✅👌👍
❤9👍1
संघर्ष 💯✌️

प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष हा असतोच कारण इथे प्रत्येकाला हेच वाटते की माझी परिस्थिती आणि माझा संघर्ष हा इतरांपेक्षा खूप मोठा आहे पण आजकाल श्रीमंत असो वा गरीब संघर्ष तर प्रत्येकाच्या आयुष्यात आहे 💯✅️ कोणी त्यांच्याकडे खुप संपत्ती आहे पण त्याला कसं आणि कुठे  खर्च करू म्हणून दिवसभर संघर्ष करतंय?? तर कोणी माझ्याकडे अजिबात संपत्ती नाही म्हणून दिवसभर दुःखी राहुन संघर्ष करतंय?? आजच्या आयुष्यात आहे तशी परिस्थिती स्वीकारून ती आपल्या प्रयत्नांनी कशी काय सुधारता येईल ?? यासाठी मार्ग शोधा आणि स्वतः मध्ये आनंदी राहा 💯✌️✅️❣️ संघर्ष हा आयुष्यभर असणारच आहे कारण काही वर्षांनंतर भले तुम्ही मोठे अधिकारी व्हाल तेव्हा ही संघर्ष हा असणारच तो म्हणजे आज कसं काय ही समस्या सोडवू?? म्हणून सत्यस्थिती स्वीकारा तिला झुंज द्या नक्कीच विजय हा तुमचाच आहे 💯✅️✌️

अनिल विठ्ठलराव तोटरे ❣️

#Swavicharanchi Perani 💯❣️
👍3
मानवतेचे मंदिर..

कोण आम्ही कुठूनी आलो हे,
न कुणा माहिती..
दोन दिसांचे येथे राहणे,
सोडूनि जाणे अंती..
नको अहंता फुका आभिमान काही
न आपुले येथे.
गाडी बंगला शेती -पोती
संग न करी आपणाते.
अहं कार हा प्रगती रोधक
आणिक असे शरीरा बाधक
गाडा याला अथवा मारा,
होवूनिया प्रखर साधक
काम आपुला प्रधान वैरी
पाळत ठेवा सदा यावरी
स्मरा शंकरा कसा जाळला
अधम अनसंगे त्रि नेत्री
क्रोध अग्नी -ताप तो
निमित्त मात्र झणी भडकतो.
सदा ही आपुली बुद्धी नासितो,
विपरीतशी वृत्ती घडवितो.
शांत करूया घ्या पशुते स्वाध्यायाने
असे साध्य ते माहूत जसा करी गजाते ठेवुनी
अंकुश आपुल्या हाते.
गरज तेवढे घ्यावे आपण का
दुजांचे करावे भक्षण?
लोभ रिपूशी नको समर्पण
समाज ऱ्हासाचे ते एक कारण
मोह नसावा कुठे तसू
भर का मिळावा यासी अवसर?
ध्येय मार्गातील तो एक अडसर
दूर करूया यासी सत्वर
मूढ 'मिजासी 'गाजे आपण
जाण्याचे ती नाव घेईना
मद दंभ यासी म्हणा झडकरी अव्हेरा
या दुर्गुणा नको घडाया वृथाच मत्सर
चला लोटूया यासी दूर वर,
मानवतेचे बांधू मंदिर...

शब्दांकन
✍️ दीप्ती शेवाळे...
❤3👍3
𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]
मानवतेचे मंदिर.. कोण आम्ही कुठूनी आलो हे, न कुणा माहिती.. दोन दिसांचे येथे राहणे, सोडूनि जाणे अंती.. नको अहंता फुका आभिमान काही न आपुले येथे. गाडी बंगला शेती -पोती संग न करी आपणाते. अहं कार हा प्रगती रोधक आणिक असे शरीरा बाधक गाडा याला अथवा मारा,…
.
.
ताई खुपच छान लिहिले आहे तुम्ही.. 👌🏻👌🏻
या लिखाणातून तुमची वाचनाची तसेच लिखानाची / ज्ञानाची पकड चांगल्याप्रकारे दिसुन येत आहे... 🥰👌✅💯

असेच लिहीत रहा.. आणि तुमचे चांगले विचार लोकांपर्यंत पोहचवत रहा...
धन्यवाद.. 😊🙏
❤4
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
व्हिडिओ फक्त 54 सेकंदाचा आहे..
परंतु त्या 54 सेकंदामध्ये खूप काही
पाहण्यासारखे आहे..
आणि त्यामधून खूपच घेण्यासारखे आहे.. 💯✌️
आपण मुलींना प्रत्येक वेळेस बाहेर जाताना खूप बंधणे घालतो कपडे नीट घाल.
रात्री नको फिरूस, नको जाऊस पार्टीला,मुले नाहीत चांगले खूप वाइट आहेत..
बाहेरची मुले खूप वाईट आहेत त्याची नजर चांगली नाही उगीच त्यांच्या डोळ्यासमोर कशाला जातेस त्यांची नजर चांगली नाही..काही गरज नाही बाहेर जाऊन पार्टी* करायची.. तु ऐक मुलगी आहे.. हे नको विसरत जाऊ की मुलींना फ्रीडम नसतो...हे प्रत्येकाच्या फॅमिली मध्ये मुलींना बोलले जाते..
परंतु ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे की. तो बाप आहे की मुलगा बाहेर जाऊन काय करत असतो ..तो बाप आपल्या मुलावरून तसा विचार करत आहे... की मुलाने कस रहायला पाहिजे ..की मुलगा बाहेर जाऊन काय रंग उधळत फिरत असतो...अस आपल्याला ह्या व्हिडिओ मधून दाखवून देण्याचा प्रयत्न करत आहेत. की मुलाने कस रहावे ते. असाच जर मुलींच्या बाबतीत प्रत्येक फॅमिली मध्ये विचार केला तर मुलींना सुद्धा एक चांगला फ्रीडम मिळेल.
मुलांना एवढेच सांगा की फक्त मुलींचा आदर कर..
✍अनिल मुद्दे..
👍8❤4
आपल्या स्वतःमध्ये अवसलेल्या सुप्त अंतर्गत ज्ञानाशी एकरूप होणे हा जीवनातला खरा आनंदमार्ग आहे,,,!✍🏻

संदर्भ अग्निपंख
अरुण तिवारी

@Ommshelke
❤8
आठवणी.. ✅

काही गोष्टी कधीच भेटत नसतात,
कारण देवाने त्या तुमच्यासाठी,
बनवल्याच नसतात तरी पण
जीव हा त्यांच्यातच गुंतून रहातो..
आयुष्यभरासाठी...

[ ..भेटावाच ही आशा कधीच नसते, फक्त कोणीतरी समजून घ्यावं हेच म्हणनं असतं.. ]
💐💐 ..शुभ रात्री.. 💐💐
#𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐
[ शोध स्वतः चा.. 😊 ]
- 𝐌𝐚𝐧𝐚𝐬.. 🦋
👍2❤1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
खरं प्रेम म्हणजे काय..??

हे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर
नक्कीच समजेल..
💯✅👌👍
#𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐
[ शोध स्वत: चा.. 😊 ]𝚃𝚎𝚕𝚎𝚐𝚛𝚊𝚖 𝙲𝚑𝚊𝚗𝚗𝚎𝚕..

.
.
.
🥰☺️😁😍👌❤️
रक्षाबंधनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.. 💐💐
____
❤12
देशातील पहिल्या तृतीयपंथी शासकीय शिक्षिका होण्याचा मान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रिया आवळेकर यांनी मिळवला आहे. रिया आवळेकर या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असून त्यांचे अगोदरचे नाव प्रविण असे होते. प्रवीण ते रिया असा संघर्षमय प्रवास अनेक खडतर प्रसंगातून त्यांनी पूर्ण केला.

#Riaavlekar #sindhudurg #marathinews
❤7
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
आज हा दिवस नसला तरी,
हा व्हिडिओ खुप काही सांगून जातो..
🥰😍🥰
- 𝐌𝐚𝐧𝐚𝐬.. 🦋
😁6❤3
आयुष्य हे सुख दुःख यांच्या
धाग्यांनी विणलेले जाळे आहे.
त्यामुळे सुख- दुःख हे आपल्या
आयुष्याचा भाग आहे.
मात्र दुःखाला वेचून बाहेर करून
सुखाला जवळ करत येणारा प्रत्येक क्षण
आपल्याला आनंदात घालवायचा असतो....

💐💐 ..शुभ रात्री.. 💐💐
👍3