𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]
3.57K subscribers
8.5K photos
2.55K videos
91 files
195 links
आयुष्यात एकटं पडलेल्या लोकांसाठी, नवीन काहीतरी करून दाखवणाऱ्या जिद्दी लोकांसाठी त्यांचं हक्काचं व्यासपीठ.... ✍
तुमचे विचार एखाद्या व्यक्तीला प्रेरीत करुन एक चांगला व्यक्ती बनवु शकतात.. ☺️🙏🏻
☑Channel by- @AmolMoreAm

🌱Join @In_Process412G
Download Telegram
प्रेम की आकर्षण...?की टाइमपास...?

©️®️लेखन -:अनिल भगवान चव्हाण (ABC )
✍️"खरं सांगायचं तर आजकाल प्रेमापेक्षा आकर्षण जास्त असतं.. मुलांना सुंदर मुलीच आकर्षण असतं.. आणि मुलींनाही सुंदर मुलगा, पैसा, जॉब यांच आकर्षण असतं.. खरं तर आकर्षण हा एक लोभच आहे.. हा प्रत्येक माणसातला गुण आहे.. समोर सुंदर मुली चालल्या की आपोआप त्यांच्याकडे नजर जाते.. मुलीसुद्धा मुलावर नजर मारतात. यालाच लाईन मारणे असं म्हणतात.. इथे माणूस काहीच विचार करत नाही.. समोरचा व्यक्ती कोन आहे? कोणत्या जातं, धर्म पंथचा आहे काहीच विचार नसतो. असतं फक्त ते शारीरिक आकर्षण सुंदरतेचा मोह हा मुलांमुलींना जवळपास सारखाच असतो.. त्यामुळे ही मुलं मुली लगेच मैत्री करतात आणि लगेच प्रेमातही पडतात. हे केवळ आकर्षणामुळे अश्या प्रेमात आज उद्या भविष्यात काय होईल? याचा पुरेपूर विचार केलेला नसतो..हे प्रेम इतकं वाढतं जातं की एकमेकांशिवाय करमत नाही.. मग काय दोघेही लग्नाच्या बंधनात अडकण्याचा विचार करतात.. मग येतो अडथळा मग जातं, धर्म,आईवडिलांची सहमती या अडचणी काहीजण यावर मातही करतात.. काही लोकं लव्ह मॅरेजला सहमती देतात.. तर काही देतं नाही.. ज्यांना सहमती मिळतं नाही.. अश्या व्यक्ती पळून जावून लग्न करतात.. भावनेच्या भरात हे केलेलं असतं.. त्यामुळे याला सर्वांची मान्यता नसते.. लग्नानंतर मग काही दिवस सुखात जातात आणि नंतर अडचणी निर्माण होतात. या अडचणी इतक्या वाढतं जातात की दोघांना एकत्र राहणे कठीण जातं.. यां अडचणी एक तर आपला नकारात्मक समाज निर्माण करतो किंवा आपसात असलेल्या मतभेदामुळे अश्या अडचणी येतात...त्यामुळे मग divorce घेतल्या जातो... सांगायचं तात्पर्य इतकंच आहे की भावनेच्या भरात आणि आकर्षणाच्या लोभात कोणताही निर्णय घेताना विचारपुर्वक घ्यावा.. ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो त्याच्यासोबत आयुष्यभर आपण राहू शकतो का? यासाठी इतर काही अडचणी असतील तर त्यावर वेळीच कशी मात करायची? याचा निर्णय घेणं आवश्यक आहे... मुळात प्रेम करू नये किंवा प्रेम विवाह करू नये असं मला म्हणायचं नाही.. तर प्रेम विचारपुर्वक करावं केवळ आकर्षण आणि सुंदरता किंवा पैशाच्या लोभात फसू नये... असं प्रेम केवळ टाईमपास ठरू शकत...त्यामुळे प्रेम असो वा इतर काही कोणतीही गोष्ट विचारपुर्वक करा. म्हणजे भविष्यात अडचणी कमी होतील.. एखाद्या वेळी खूप अडचणी असतील तर वेळीच सावध व्हा.. नाहीतर समुद्राच पाणी असो वा, प्रेम कोणत्याही गोष्टीतं डुबून जाण धोकादायक असतं.. कारण कधी कधी कायमच डुबून जाण्याची भीती असते.. म्हणून योग्यवेळी पोहायला शिका.. म्हणजे तुम्ही comfort zone मध्ये रहाल...!"✍️

प्रतिक्रिया नक्कीच कळवा माझा टेलिग्राम ID -:
@ABCanil

(कृपया हे लिखाण कोणीही लेखकांच नाव खोडून share करू नये जस आहे तसच share करा )🙏
👍5
आपण आपले आयुष्य जगत असताना...आपल्या संपर्कात खूप व्यक्ती असतात...काही व्यक्तींचे स्थान आपल्या आयुष्यात स्पेशल असतात..अगदी सूर्यदय पासून आपण त्या स्पेशल व्यक्तीला बोलत असतो..स्पेशल व्यक्तीला बोलल्यानंतर दिवस सुद्धा खूप छान जातो... कालअंतराने आपण त्या स्पेशल व्यक्तीला आदराने बोलल्यानंतर सुद्धा आपला राग येयला लागतो..
आपल्या आयुष्यात परमनंटली कोणीही स्पेशल बनून नाहीत राहत..
म्हणून आपल्या आयुष्यात आपण कोणाकडून कोणतीही अपेक्षा न करता स्वतःमध्ये खुश राहायला शिकायला पाहिजे..
✍️अनिल मुद्दे...
👍5
सुखी जीवन..
✍️"अपेक्षा कमी असल्या की जीवन आपोआप सुखी होतं..इवलासा जीव खूप कमी आयुष्य असूनही खूप सुखी आहे.. कारण अपेक्षा कमी आहेत.. म्हणून मनाला झेपेल तितक्याच कमीतं कमी अपेक्षा ठेवा. म्हणजे आयुष्य सुंदर होईल..!"✍️
©️®️✍️ABC's .Diaries...
Good Evening 🥰
❤5
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
आयुष्य एक अपुर्ण जीवन.. 🙂

श्वासात माझ्या मला
जाणवतो तुझा सहवास सखे..
तु जवळ नसता
मला होतो त्याचाच त्रास..
पहण्या तुझी एक झलक
अतुरलेय डोळे माझे..
कधी डोळे भरून पाहीन तुला
हिच लागलीये आस..
ह्या ह्रदयात धडधड वाढते
आठवण तुझी येता..
भिती वाटत रहाते नेहमी
तु जवळ नसता..
हरवले ते दिवस माझे
आठवतात त्या आठवणी..
येता झलक जुन्या दिवसांची
डोळ्यातून वाहते पाणी..
आयुष्याच्या पटलावर
पुन्हा माझे तसे दिवस येतील का..??
तुझ्यासोबत जगायचे आहे मला
तुझ्या आयुष्यात माझी तीच जागा जपुन ठेवशील का..??
Join 👉
@In_Process412
[ शोध स्वत: चा.. 😊 ]


✍ - तुझाच 𝐌𝐚𝐧𝐚𝐬..🦋
❤3👍2
.....✍
स्वतःच्या मनावर इतका संयम
असायला हवा की,परिस्थिती
कितीही वाईट असली तरी इतरांबद्दल नेहमी चांगला विचार
करता आला पाहिजे....!
संयम हा यश प्राप्तीचा पहिला मार्ग असतो!!
🙏🙏🏻
🌺..शुभ सकाळ..🌺
👍3❤2
वेळ आली तर मुलाला/मुलींना सोडा
पण स्वप्न पूर्ण करा
कारण मुलगा/मुलगी सोडून गेल्याने जितक्या यातना होतात ना
त्यापेक्षा जास्त यातना स्वप्न अपूर्ण राहिल्याने होते....

- तेजस्विनी प्र. राऊत
@TejuRaut
👍6
🌿माली प्रतिदिन पौधों में पानी देता है।
मगर फल सिर्फ मौसम में ही आता है, 🌿
🍁इसीलिये जीवन में धैर्य रखें
प्रत्येक चीज अपने समय पर होगी, 🍁
🌿प्रतिदिन बेहतर काम करें समय
पर फल जरूर मिलेगा !🌿

#Good_Morning 😊😍☺️
❤1👍1
आयुष्याची पोचपावती.. ✅

आज सहज कामानिमित्त बाहेर चाललो होतो,
जात असताना गावातल्या एका मोठ्या धनवान घरातल्या एका मोठ्या व्यक्ती ची चिता जळताना सहज मला दिसली..
आणि कळत नकळत मी तिच्याकडे पाहत असताना माझे अंतरमन मला म्हंटले, बघ ना हा व्यक्ती जेव्हा हा जिवंत होता तेव्हा कमीत-कमी 5/10 माणसं कायम याच्या सोबत असायची पण आज ह्याचा वाईट काळ आला तर ह्याच्या चितेसमोर याचा कोणच सगासोयरा, मित्रमंडळी थांबला सुद्धा नाही, मग याने आयुष्यात कमवले तर कमवले काय..??
मित्रांनो विषय जरी साधा असला तरी याचा अर्थ खुप खोलवर विचार करणारा आहे.. यावर एकदा नक्की विचार करा.., आपण ज्या लोकांच्या मध्ये आपलं पुर्ण आयुष्य घालवत असतो त्यात एकतरी तुमच्या हक्काची व्यक्ती, तुमच्यावर जिवापाड प्रेम करणारी, सु:ख- दु:खात साथ देणारी, तुमच्यावर नि संकोच विश्वास ठेवणारी आणि तिच्या आयुष्यात तुमचे खुप महत्त्वाचे स्थान आहे, तुम्ही नसाल तर तिला ही जगायची ईच्छा नसणारी अशी एक तरी व्यक्ती असावी तेव्हाच आपल्या मनाला वाटेल की खरच आपण आपलं आयुष्य चांगले जगलो, आणि आता आपल्याला खरोखर हे जग सोडताना अभिमान वाटेल की कोणतरी आहे की जो खरच तुम्ही जगात नसताना देखील तुमच्यावरच जीवापाड प्रेम करतोय हे सुख कशातच मिळु शकत नाही.. तेव्हाच आपलं जीवन सार्थक झाल्यासारखे वाटेल, कारण ह्या मतलबी जगात आठवण सोडली तर काहिच घेऊन जाता येत नाही.. हेच सत्य आहे..

[ आयुष्यात आपल्याला भेटलेली आपल्या हक्काची व्यक्ती, आणि आपण जपलेलं एक अनमोल नातं आणि आपण जपलेला आयुष्यभर गोड संवाद हीच आपल्या जीवनाची पोचपावती ठरते.. ]

🤍✨ ..शुभ सकाळ.. ✨🤍
#𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐
[ शोध स्वतः चा.. 😊 ]
✍🏻 -अमोल मोरे...
@AmolmoreAm
❤3👍1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
💐💐 ..पहिल्या श्रावणी सोमवाराच्या सर्वांना हार्दिक.. हार्दिक शुभेच्छा.. 💐💐
❤5👍3