निबंधाची मराठी माध्यमातून तयारी
890 subscribers
49 photos
1 video
10 files
20 links
मराठी माध्यमातुन निबंध लेखनाची तयारी!
Download Telegram
वर्णनात्मक परीक्षा आणि तिच्या विरोधात होणारी 'राजकीय उठाठेव' यावर चर्चा करणारा महेश लव्हटे या परीक्षार्थीने लिहलेला हा लेख जरुर वाचा.

ज्या विद्यार्थ्यांनी नवीन पद्धतीने अभ्यास सुरू केला आहे, त्यांचे म्हणने देखील तुम्हाला यात दिसून येईल.

@UPSCin_Marathi

https://www.loksatta.com/sampadkiya/features/mpsc-changed-main-examination-pattern-expecting-objective-examination-asj-82-3334771/
#SSM #CSM

#Essay

लोकशाही, पत्रकारिता, न्यायपालिका आणि स्वातंत्र्य या संदर्भात महत्त्वाचे विधान निबंधात वापरु शकता.

निबंधाचा - निष्पक्ष पत्रकारिता असल्यास सुरवात देखील यांच्या विधानाने करता येऊ शकते.

Join EssayInMarathi
🌸💖...टीम UpscInMarathi कडून आपणा सर्वांना...💖🌸

🎆🎊🎉नवीन वर्षाच्या खूप सार्‍या सदिच्छा 🎉🎊🎆

आपल्या सर्वांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होवो हीच प्रार्थना.

🌸खूप कष्ट घ्या आणि इच्छित गोष्ट घडवून आणा🌸

Join @EssayInMarathi
साधना साप्ताहिकाने 2022 मध्ये प्रकाशित केलेले सर्व पन्नास अंक आपल्याला सोबत जोडलेल्या लिंक वर मिळतील.

मराठी माध्यमातून निबंधाची तयारी करणार्‍यांना या अंकांचा विशेष फायदा होईल.

Join @EssayInMarathi

https://weeklysadhana.in/archives/2022
स्व-शिक्षण घेऊन इतरांना साक्षर करण्यात आयुष्य वाहिलेल्या ज्ञानज्योती साऊने क्रांतीबाची ज्योत आजन्म तेवत ठेवली. साऊ ने इथल्या स्त्रियांना मुक्तीचा मार्ग दाखवला आणि या मार्गक्रमणात त्या स्वतःच त्यांच्या वाटाड्या झाल्या.

🌸🙏🏾जयंती दिनी साऊ चरणी नतमस्तक🙏🏾🌸
सिनेमाच्या जन्माआधी अस्तित्वात असलेल्या कलांना लाखो वर्षांचा इतिहास आहे. कदाचित मानवाला इतर मानवसदृश वानरवंशांपासून वेगळे करण्याच्या अनेक कसोट्यांत त्याची कलानिर्मितीची क्षमता ही एक महत्त्वाची कसोटी असू शकेल.

कलेचे मानवी जीवनातील स्थान अधोरेखित करण्यासाठी या विधानाचा वापर करता येऊ शकतो.

Join @EssayInMarathi
आनंद, समाधान याच्या संदर्भातील निबंधात तुलनात्मक मांडणी करतांना हे सुभाषित वापरता येऊ शकेल.

Join
@EssayInMarathi
आपल्या पहिल्या निबंध लेखन कार्यशाळेच्या काही विद्यार्थिनीं/विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया.

पूर्व परीक्षेच्या अगोदरची शेवटची बॅच आहे. ज्यांना सहभागी व्हायचे आहे त्यांनी आजच प्रवेश निश्चित करा.

धन्यवाद.
👆 प्रवेश निश्चितसाठी दिलेली प्रक्रिया पूर्ण करा. धन्यवाद.
लोकसंख्या विस्फोट -

"Population growth is the primary source of environmental damage." - Jacques Yves Cousteau

"लोकसंख्या वाढ हा पर्यावरणाच्या हानीचा प्राथमिक स्त्रोत आहे." - जॅक यवेस कौस्टेउ

Join
@EssayInMarathi
आजच्या राज्यसेवा मुख्य परीक्षेतील निबंधावरून तर हेच दिसते की वर्णनात्मक पद्धतीच्या निबंधाच्या पेपरची सुरवातीला तरी काठिण्यपातळी कमी असेल.

Join @UPSCin_Marathi
#Essay #Quotes

आपण स्वतः मध्ये धैर्य, सहिष्णुता, क्षमाशीलता, संपुष्टात आणि स्वयंशिस्त हे आंतरिक मुल्य रुजवणे गरजेचे आहे. हे आंतरिक मुल्य आपल्याला कठीण काळात शांत आणि स्थिरचित्त राहण्यात मदत करतात तसेच राग, मत्सर आणि तिरस्कार या नकारात्मक भावनांपासून मुक्त राहण्यास मदत करतात. - दलाई लामा

Join
@EssayInMarathi
🇮🇳 प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वांना खूप सदिच्छा 🇮🇳

प्लेटोच्या 'रिपब्लिक' या ग्रंथात मांडण्यात आलेल्या "तत्त्वज्ञ राजा" या संकल्पनेत आजच्या रिपब्लिक (प्रजासत्ताक) संकल्पनेच्या अगदी विपरीत राज्यव्यवस्था सांगितली होती. ती व्यवस्था तत्कालीन अथेन्सच्या लोकशाही व्यवस्थेला पर्याय होती. पण तेव्हा पासून आजपर्यंत राज्यव्यवस्थेच्या संकल्पनेत झालेले स्थित्यंतरे आपल्याला लोकशाही-प्रजासत्ताक या सर्वमान्य कमीत कमी त्रुटी असणार्‍या राज्यपद्धती पर्यंत घेऊन आले आहे. तर आजच्या दिनी आपण प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना आपल्याला काही गोष्टी कटाक्षाने पाळायला हव्यात.

आपण काय मिळवले आणि पुढील येणार्‍या काळात आपण कशासाठी काम करणार आहोत याचा दृढनिश्चय करण्याचा हा काळ आहे. आपल्याला वारसा म्हणुन मिळालेल्या या प्रजासत्ताकाला असेच वृद्धिंगत करण्यासाठी आणि त्याला टिकवण्यासाठी कार्य केले पाहिजे. कालच आपण #NationalVotersDay साजरा केला त्या निमित्ताने एक गोष्ट नमूद करावीशी वाटते, की आपण जागरूक नागरिक म्हणून मतदान आणि राजकीय विचारप्रक्रियेत सहभागी झाले पाहिजे.

"मानव हा निसर्गतःच राजकीय प्राणी असतो" या ॲरिस्टॉटलच्या म्हणण्याप्रमाणे 'अ'राजकीय असे काही नसते.ही खुणगाठ मनाशी पक्की बांधुन घेतली पाहिजे. रॉबर्ट मिशेल्स यांच्या "अभिजनशाहीची पोलादी चौकट" या संकल्पनेत अब्राहम लिंकन यांची "लोकांची लोकांनी लोकांसाठी" चालवलेली व्यवस्था असलेली लोकशाही हरवून जायला नको. यासाठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांत आपण दृढनिश्चय करणे अगत्याचे आहे.

देश म्हणुन आपण आज सर्वच क्षेत्रात देदीप्यमान कामगिरी केली आहे. तिला पुढे नेत असताना देशांतर्गत सहिष्णुता, सौहार्द आणि सर्व समावेशकता टिकून राहिली पाहिजे हे देखील आपल्या समोरील आव्हान आहे. आज आपण ज्यांच्यांमुळे स्वातंत्र्य प्राप्त केले, ज्यांच्या बलिदानाने ते आजपर्यंत टिकले, जे त्या स्वातंत्र्याला अर्थपूर्ण करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतायत, या सर्वांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचे हे क्षण आहेत. त्यांच्या कर्तुत्वातून ऊर्जा अर्जित करून आपापल्या परीने देश सक्षमीकरणाच्या कार्यात सहभागी होऊन, लौकिक अर्थाने आपण प्रजासत्ताक चिरायू करू यात.

जय हिंद!

- ज्ञानेश्वर चंद्रकला गोरखनाथ जाधव.

(Team UPSCinMarathi)

@UPSCin_Marathi