1⃣ परीक्षांची परीक्षा
भाग १४
अनेकांना वाटतं की फॉर्म भरून झाले की शासन आणि कंपन्या लगेच तारीख जाहीर करतात. पण या तारखा ठरवण्यामागे एक मोठं गणित असतं, ज्यामध्ये उपलब्ध परीक्षा केंद्रांची संख्या, कॉम्प्युटर्सची आसन क्षमता आणि एकाच वेळी किती उमेदवार परीक्षा देऊ शकतात याचा अंदाज घेतला जातो.
जर उमेदवारांची संख्या लाखोंच्या घरात असेल, तर परीक्षा अनेक दिवस आणि वेगवेगळ्या सत्रांमध्ये म्हणजेच मल्टिपल शिफ्ट्समध्ये घेण्याचं नियोजन केलं जातं.
हे वेळापत्रक ठरवताना देशातील किंवा राज्यातील इतर मोठ्या परीक्षा एकाच दिवशी येणार नाहीत ना, तसेच निवडणुका किंवा सण-उत्सव यादरम्यान प्रशासकीय यंत्रणेवर ताण येणार नाही ना, हे देखील तपासलं जातं. पण या संपूर्ण नियोजनातही एजंट आधीच आपली फिल्डिंग लावून बसलेले असतात.
अधिकृत तारीख जाहीर होण्यापूर्वीच अंतर्गत सूत्रांकडून परीक्षेचे नेमके दिवस कोणते असणार आहेत, याची गुप्त माहिती हे लोक काढून घेतात. यामुळे सामान्य उमेदवारांना अंधारात ठेवून मर्जीतील उमेदवारांना तयारीसाठी आणि गैरप्रकाराचे नियोजन करण्यासाठी इतरांपेक्षा जास्त वेळ मिळतो.
एवढंच नाही, तर कोणत्या शिफ्टला कोणता पेपर येणार आणि त्यांचे सेट केलेले केंद्र नेमके कोणत्या सत्रात उपलब्ध होणार आहे, याचा अंदाज घेऊन आपल्या उमेदवारांना ठराविक शिफ्ट मिळावी यासाठी अंतर्गत यंत्रणेवर दबाव आणून सेटिंग केली जाऊ शकते. त्यामुळे परीक्षा कधी होणार हे ठरतानाच, कोणाचे नशीब कधी उघडणार याचा खेळ आधीच फिक्स करायचा प्रयत्न केला जाऊ शकतो.
क्रमशः
Join : @BloggerSwami

भाग १५
ऑनलाईन परीक्षा पद्धती ही पारदर्शक मानली जात असली तरीही ही पारदर्शकता परीक्षा नेमकी कोणत्या केंद्रावर होत आहे यावर अवलंबून असते.
सध्या भरती प्रक्रियेत दोन प्रकारची परीक्षा केंद्रे पाहायला मिळतात. पहिले म्हणजे मेट्रो शहरांमध्ये असलेले अद्ययावत, अधिकृत हायटेक परीक्षा केंद्र आणि दुसरे म्हणजे लहान शहरांतील किंवा गल्लीबोळात तात्पुरत्या स्वरूपात उभे केलेले खाजगी कॉम्प्युटर केंद्र.
या दोन्ही केंद्रांमधील सुविधा, सुरक्षा आणि तांत्रिक यंत्रणेत जमीन-अस्मानाचा फरक असतो.
अधिकृत हायटेक परीक्षा केंद्रात हजारो उमेदवारांची सोय असते. याउलट, गल्लीबोळातील केंद्रे ही लहान गाळे किंवा भाड्याने घेतलेल्या छोट्या जागेत तात्पुरती कॉम्प्युटर लॅब बनवून तयार केली जातात.
अधिकृत केंद्रांवर प्रवेश करण्यापूर्वीच मेटल डिटेक्टर, बायोमेट्रिक पडताळणी आणि चेहऱ्याची ओळख पटवणारी कडक तपासणी केली जाते. गल्लीबोळातील केंद्रांवर मात्र अनेकदा नावालाच सुरक्षारक्षक असतात आणि तपासणी यंत्रणा अत्यंत सुमार असते, जिथे गर्दीचा फायदा घेऊन ओळख पडताळणीत सहज पळवाटा शोधल्या जातात.
तांत्रिक सुरक्षिततेचा विचार केल्यास हायटेक केंद्रे ही आधुनिक फायरवॉल्स आणि सुरक्षित लोकल सर्व्हर्सनी सज्ज असतात. तिथे कोणत्याही कॉम्प्युटरवर स्क्रीन शेअरिंग किंवा रिमोट ॲक्सेस देणारे सॉफ्टवेअर सुरू झाल्यास मुख्य सर्व्हर लगेच तो कॉम्प्युटर लॉक करतो. गल्लीबोळातील लॅब्समध्ये मात्र जुन्या ऑपरेटिंग सिस्टिम्स वापरल्या जातात आणि देखरेखीच्या अभावामुळे इंटरनेटच्या माध्यमातून रिमोट ॲक्सेस सॉफ्टवेअर सहज इन्स्टॉल केले जाऊ शकते, ज्याचा वापर करून बाहेर बसलेला हॅकर उमेदवाराचा पेपर सोडू शकतो.
सीसीटीव्ही देखरेखीच्या बाबतीतही हायटेक केंद्रांवर प्रत्येक कॉम्प्युटरवर केंद्रीय नियंत्रण कक्षातून थेट वॉच ठेवला जातो. गल्लीबोळातील केंद्रांवर मात्र बसवलेले कॅमेरे कमी दर्जाचे असतात किंवा जाणीवपूर्वक अशा कोनात फिरवले जातात जिथे गैरप्रकार कॅमेऱ्यात कैद होणार नाही.
हायटेक केंद्रांवर अखंड वीज पुरवठ्यासाठी मोठे जनरेटर्स असतात, तर गल्लीबोळातील केंद्रांवर जनरेटर असतच अस नाही त्यामुळे अचानक वीज गेल्यास संपूर्ण सिस्टीम क्रॅश होते. अशा गोंधळात सुरक्षेचे नियम ढिले पडतात आणि त्याचा फायदा गैरप्रकार करणाऱ्यांना मिळतो.
मोठ्या कंपन्यांच्या अधिकृत केंद्रांवर कडक मोबाईल नेटवर्क जॅमर्स असतात, जे परीक्षा सुरू असताना संपूर्ण परिसरात सिग्नल ब्लॉक करतात. गल्लीबोळातील केंद्रांवर जॅमर्स निकृष्ट दर्जाचे असतात किंवा अंतर्गत सेटिंग करून ते जाणीवपूर्वक बंद ठेवले जातात, जेणेकरून ब्लूटूथच्या साहाय्याने बाहेरून माहिती पुरवणे सोपे व्हावे.
गल्लीबोळात असलेल्या परीक्षा केंद्रांच्या मालकांना पैशांचे आमिष दाखवून संपूर्ण यंत्रणा हायजॅक करणे सोपे जाते.
मोठ्या कंपन्यांच्या अधिकृत केंद्रांवर घोटाळ्यांना वाव कमी असला तरीही केंद्रावरील कर्मचारी मॅनेज झाले तर घोटाळा तिथे सुद्धा होतो. त्यामुळे ऑनलाइन परीक्षा सुरक्षित किंवा अधिकृत केंद्र सुरक्षित हा फक्त भ्रम ठरतो. खरी सुरक्षा ही यंत्रणा राबवणाऱ्यांच्या हातात असते.

ऑनलाइन परीक्षेबाबत बोलता बोलता MPSC द्वारे घेण्यात येणाऱ्या ऑफलाईन परीक्षेत सुद्धा पेपरफुटी झाली आणि पेपर रद्द करण्याची नामुष्की आयोगावर आली.
म्हणजे पेपर ऑनलाइन असो की ऑफलाईन पेपर फोडणारे जोपर्यंत आहेत तोपर्यंत कोणताही पेपर फोडू शकतात असा समज झाला तरी त्यात काही गैर नाही.
पुढच्या ३ पोस्ट मध्ये mpsc मध्ये झालेली पेपरफुटी कशी झाली कशी बाहेर आली सगळं सविस्तर माहिती देतो
जॉईन: @BloggerSwami

🔥 MPSC FDA पेपरफुटी प्रकरण
भाग १
(सौजन्य/स्रोत: मुंबई पोलीस क्राईम ब्रांच अधिकृत माहिती आणि मीडिया रिपोर्ट्स)
MPSC अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागातील 'अन्न व औषध निरीक्षक' (Food Inspector) परीक्षेचा पेपर कसा फुटला? ते मीडिया रिपोर्टस नुसार सांगतो
या प्रकरणाची सुरुवात नंदुरबार शहरातून झाली. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे ऋतुजा आणि गौरव हे दोघे एकाच कॉलनीत राहत होते. अभ्यासाच्या निमित्ताने त्यांची ओळख झाली आणि त्यांच्यात प्रेमसंबंध सुरू झाले. नंतरच्या काळात गौरवने अभ्यास सोडला, तर ऋतुजाला एका खाजगी फार्मास्युटिकल कंपनीत नोकरी लागली.
त्यातच तब्बल अन्न व औषध निरीक्षक (Group B) पदाच्या जागा निघाल्या. या पदाची जाहिरात १० वर्षांनी आली होती. ऋतुजाच्या वडिलांची (जे स्वतः शिक्षक आहेत) इच्छा होती की मुलीने सरकारी अधिकारी व्हावे. सरळ मार्गाने परीक्षा पास होणे कठीण असल्याने, त्यांनी एका ओळखीच्या फुटबॉल कोचमार्फत पुण्यातील एका मुख्य क्लास चालकाशी सेटिंग लावल्याचा आरोप आहे. यासाठी ५ लाख रुपये ॲडव्हान्स आणि उर्वरित रक्कम नंतर देण्याचे डील ठरले.
परीक्षा २२ मार्चला होणार होती. पण कथित डीलनुसार २० मार्चलाच ऋतुजाच्या मोबाईलवर एका ॲपद्वारे मूळ प्रश्नपत्रिका आली. क्लास चालकाने तिला प्रश्न तोंडपाठ करून चॅट डिलीट करण्यास सांगितले होते.
पण ऋतुजाने सुरक्षिततेसाठी आणि पुरावा म्हणून तो पेपर स्वतःकडे डाऊनलोड न करता, तिचा बॉयफ्रेंड गौरव याच्या मोबाईलवर फॉरवर्ड केला आणि सांगितले, हा पेपर तुझ्याकडे बॅकअप म्हणून ठेव.
क्रमशः
जॉईन @BloggerSwami

भाग २
२२ मार्चला परीक्षा संपल्यानंतर दुपारी १२:२८ वाजता ऋतुजाने त्या पुणे येथील क्लास चालकाला फोन केला. मीडिया रिपोर्टनुसार, तिने आनंदाने सांगितले की, १०० पैकी ९० प्रश्न ऑप्शन्ससहित अगदी जसेच्या तसे आले होते संशय येऊ नये म्हणून तिने ७८ प्रश्न बरोबर सोडवले आणि उरलेल्यांवर तुक्का मारला.
परीक्षा भारी गेल्यामुळे ऋतुजा अधिकारी होणार हे निश्चित झाले. मार्च ते जुलै या काळात ऋतुजाच्या घरच्यांनी तिच्यासाठी दुसरा एखादा मोठा अधिकारी मुलगा शोधण्यास सुरुवात केली आणि गौरवला डच्चू मिळाला. ऋतुजाच्या डोक्यातही अधिकारी पदाची हवा गेल्याने तिने गौरवला थेट नकार दिला आणि त्यांच्यात जोरदार भांडण होऊन ब्रेकअप झाले.
गौरव भाऊ पेपर देतच होता, त्यात ज्या कुचुपचू साठी तो थांबला तिने ऐनवेळी गोटी पलटी मार केलं. गौरवला माहीत होत की ती ५ लाखांच्या सेटिंगवर अधिकारी बनत आहे. गौरवकडे ऋतुजाने २० मार्चला बॅकअप म्हणून पाठवलेला तो मूळ पेपर, व्हॉट्सॲप चॅट्स आणि स्क्रीनशॉट्सचे डिजिटल पुरावे होते.
हाच पेपर ऋषीभाऊ नावाच्या एका प्रामाणिक उमेदवाराला हा कठीण गेला होता. आयोगाने मुलाखतीची लिस्ट लावली पण मार्क्स दाखवले नाहीत, म्हणून ऋषीभाऊने आक्षेप घेणारा एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर टाकला. हा व्हिडिओ पाहून गौरवने इंस्टाग्रामवर ऋषीभाऊशी संपर्क साधला आणि ऋतुजाच्या पेपरफुटीचे सर्व पुरावे त्याच्या हवाली केले.

भाग ३
ऋषीभाऊ आणि गौरवने आधी एफडीए आणि नंतर आयोगाकडे तक्रार केली. पण कथित दबावामुळे गौरव ऐनवेळी मागे हटला. त्याने आयोगाला लेखी दिले की, मी केवळ सहज चेष्टा म्हणून तक्रार केली होती, माझ्याकडे पुरावे नाहीत. याचा आधार घेऊन आयोगाने प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि सर्व आरोप तथ्यहीन असल्याचे सांगत स्वतःला क्लीन चिट दिली.
गौरव मागे हटला तरी ऋषी भाऊकडे सर्व पुरावे सुरक्षित होते. ऋषी भाऊने हे पुरावे घेऊन आमदार रोहित पवार यांची भेट घेतली. रोहित पवार साहेबांनी पत्रकार परिषद घेऊन सरकार आणि आयोगाला घेरल. वाढत्या दबावानंतर अखेर पोलिसात अधिकृत गुन्हा दाखल झाला आणि तपास मुंबई क्राईम ब्रांचकडे गेला.
मुंबई क्राईम ब्रांचने सायबर फॉरेन्सिक तपास करून चॅट्सचा डेटा रिकव्हर केला. क्राईम ब्रांचने एमपीएससी आयोगाला सादर केलेल्या प्राथमिक चौकशी अहवालात स्पष्ट नमूद केले की, "एका उमेदवाराला (ऋतुजा ) परीक्षपूर्वीच प्रश्नसंच मिळाला होता आणि तिला याचा थेट बेकायदेशीर लाभ झाला आहे." या अहवानंतर आयोगाने २५ जुलैच्या रात्री उशिरा अधिकृत परिपत्रक काढून ही संपूर्ण भरती प्रक्रिया (परीक्षा) रद्द केली.
पोलिसांनी पुण्यात क्लासेस चालवणाऱ्या मुख्य सूत्रधाराला आणि ऋतुजाच्या वडिलांना अटक केली असून त्यांच्यावर फसवणूक आणि परीक्षा गैरप्रकार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल केले आहेत.
एमपीएससी आयोगाने ऋतुजा पाटील हिच्यावर भविष्यातील सर्व सरकारी परीक्षा देण्यापासून कायमची बंदी (Permanent Blacklist) घातली आहे.
या पदासाठी आता पूर्णपणे नवीन आणि कडक डिजिटल सुरक्षेत पुन्हा परीक्षा घेतली जाणार आहे.

❤1
Blogger Swami pinned «🔥 MPSC FDA पेपरफुटी प्रकरण भाग १ (सौजन्य/स्रोत: मुंबई पोलीस क्राईम ब्रांच अधिकृत माहिती आणि मीडिया रिपोर्ट्स) MPSC अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागातील 'अन्न व औषध निरीक्षक' (Food Inspector) परीक्षेचा पेपर कसा फुटला? ते मीडिया रिपोर्टस नुसार सांगतो या प्रकरणाची…»
MMRDA च्या परीक्षेत झालेल्या कथित घोटाळ्याबद्दल समजण्यासाठी आधी हे वाचून घ्या म्हणजे समजण्यासाठी अडचण येणार नाही
परीक्षांची परीक्षा
भाग १ : प्रस्तावना
भाग २ : घोटाळ्यांचे मुख्य प्रकार
भाग ३: भरती प्रक्रिया, सेवाप्रवेश नियम इत्यादी
भाग ४: रिक्त पदांचा फायदा
भाग ५ : घोटाळ्याचे जाळे
भाग ६ : बनावट वेबसाईट
भाग ७ : घोटलेबाजांच्या जाळ्यात उमेदवार
भाग ८ : बनावट भरती, ट्रेनिंग
भाग ९ : कंत्राटी भरती
भाग १० : कंत्राटी कर्मचारी पर्मनंट कसे होतात
भाग ११ : परीक्षा घेण्यासाठी खासगी कंपन्याची निवड
भाग १२ : कंपन्यांची अर्ज भरण्याची सिस्टीम
भाग १३ : सिस्टीम मध्ये एन्ट्री
भाग १४ : परीक्षांच्या तारखा
भाग १५: ऑनलाइन परीक्षा आणि पारदर्शकता
क्रमशः
अजूनही खूप काही आहे
©👉Join : @BloggerSwami

🔥2👍1
paraadhaikaranaacai_dai.18.02.2026_raojaicai_jaahairaata_1.pdf
10.5 MB
MMRDA Recruitment 2026 Advertisement
भाग १
दिनांक १८ फेब्रुवारी रोजी भरती साठी जाहिरात आली होती. त्यातील सहायक अभियंता श्रेणी २/ कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या ८२ पदांच्या भरतीसाठी दिनांक ११ आणि १२ मे रोजी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) मार्फत ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली होती.
परीक्षेसाठी TCS च्या अधिकृत ION परीक्षा केंद्रांसह खासगी परीक्षा केंद्र सुद्धा दिलेले होते. परीक्षेचा निकाल पाकिस्तानच्या बर्थडेला म्हणजे दिनांक १४ ऑगस्ट रोजी रात्री साडेदहाच्या आसपास लागला.
निकाल पाहून ज्यांनी परीक्षा दिली होती त्यांची झोपच उडाली. सिव्हिलच्या इतिहासात चमत्कार झाला. पहिल्यांदाच पैकीच्या पैकी म्हणजे २०० पैकी २०० गुण ३ मुलांना मिळाले. तब्बल १९ मुलांना १९० पेक्षा जास्त गुण मिळाले.
ज्यांना याबद्दल काहीच माहिती नाही ते काय म्हणतील? हा मग मिळाले असतील पैकीच्या पैकी गुण... केला असेल त्या मुलांनी अभ्यास... तुम्हाला नाही पडले म्हणून तुम्ही आवाज करताय...
पण महोदय, तुम्हीच सांगा की सहायक अभियंता गट ब ची पोस्ट... त्यात अभ्यासक्रम म्हटला तर नॉन टेक्निकल मध्ये मराठी, इंग्रजी ह्या दोन भाषा, यासोबतच गणित बुद्धीमत्ता, चालू घडामोडी होतं सोबत टेक्निकल म्हटलं तर अक्खा सिव्हिल इंजिनिअरिंग चा अभ्यासक्रम होता.
परीक्षेचं स्वरूप पण लक्षात घ्या. २०० गुणांसाठी १०० प्रश्नांना २ तासांचा पेपर होता त्यात ३०-३० मिनिटांचे ४ सेक्शन केलेले होते. प्रत्येक सेक्शनमध्ये प्रत्येकी २५ असे सोडवायचे होते. त्या २५ प्रश्नांमध्ये टेक्निकल आणि नॉन टेक्निकल अशा सर्व अभ्यासक्रमावर प्रश्न होते. म्हणजे एका सेक्शन साठी २५ प्रश्न हे ३० मिनिटात सोडवायचे आणि जर प्रश्न वेळेच्या आधी जरी सोडवले तरीही पुढच्या सेक्शनमध्ये जाता येत नव्हतं आणि वेळेत प्रश्न सोडवले नाही तर ३० मिनिटांनी आपोआप पुढचा सेक्शन सुरू व्हायचा. हे असं प्रत्येक सेक्शन मध्ये होतं.
त्यात प्रश्नपत्रिका काढतांना प्रश्नांचा दर्जा हा मध्यम ते कठीण (Medium to Hard) होता. म्हणजे ह्या पेपरला मुलांना सोप्या पेपर पेक्षा कमी गुण मिळणार हे नक्की होतं.
११ आणि १२ मे रोजी अनेक शिफ्ट मध्ये जेव्हा ही परीक्षा झाली त्याच्या १२ दिवस आधी पुणे महानगरपालिकाची कनिष्ठ अभियंता पदासाठी परीक्षा झाली होती तसेच काही महिने आधीच वेगवेगळ्या विभागाकडून परीक्षा आयोजित करण्यात आल्या होत्या. या सर्व परीक्षा च्या इतिहासात जितके अवघड पेपर होते त्यात MMRDA च्या सहायक अभियंता पदाच्या पेपरचा समावेश होतो.
जेव्हा पेपरची काठिण्य पातळी ही सोपी ते मध्यम असायची तेव्हा सुध्दा २०० पैकी १८०च्या पुढे एखादा मुलगा गुण मिळवायचा आणि कटऑफ हा १६५ पर्यंत असायचा आणि जेव्हा पेपरची काठिण्य पातळी ही मध्यम ते अवघड असायची तेव्हा सुध्दा २०० पैकी १७०च्या पुढे एखादा मुलगा गुण मिळवायचा आणि कटऑफ हा १५५ ते १६० पर्यंत असायचा. पण ह्या भरती मध्ये पहिल्यांदाच पैकीच्या पैकी म्हणजे २०० पैकी २०० गुण ३ मुलांना मिळाले. तब्बल १९ मुलांना १९० पेक्षा जास्त गुण मिळाले. त्यावरून या पदभरती मध्ये घोटाळा झाल्याचा आरोप विद्यार्थी करत आहेत.
क्रमशः
✅Join 👉 @BloggerSwami

❤3
MMRDA परीक्षा कथित घोटाळ्याची सत्यता
भाग २
भाग १ मध्ये दिलेले मुद्दे जरी मान्य नसले तरीही पुढचा मुद्दा समोर येतो तो म्हणजे ज्या वेळी ही परीक्षा झाली त्याच्या जवळपास अनेक परीक्षा झाल्या त्या परीक्षा चे आणि ह्या परीक्षेचे निकाल पाहिले तर एक धक्कादायक माहिती समोर येते.
ज्या महामानवाला आधीच्या भरती मध्ये ७६ गुण मिळाले होते त्याला १९६ मिळाले, ज्याला ९६ होते त्याला १९८ मिळाले, ज्याला ११८ होते त्याला १९८ मिळाले म्हणजे १२ दिवसांत ही मार्कदुप्पट योजना कशी आली?
१२ दिवसांत इतकी अक्कल यायला कोणतं चूर्ण खाल्लं ह्यांनी?
अजुनही काही महामानव आहेत त्यांना याच्या आधीच्या एका परीक्षेत १०० पैकी किती गुण होते? ७.२५, ७.५०, १५, १६.२५, २०.५०.... आणि अचानक ह्यांचे गुण १९० च्या पुढे कसे गेले?

❤5
MMRDA परीक्षा कथित घोटाळ्याची सत्यता
भाग ३
स्पर्धा परीक्षा चा अभ्यास करणाऱ्या प्रत्येकाला हा अनुभव नक्कीच असणार की २०० पैकी १२० मिळणाऱ्या उमेदवाराला १६० पर्यंत जाण्यासाठी किमान २ ते ३ वर्ष लागतात.
पण काही विद्वानांची ही पहिलीच परीक्षा होती अस दिसतंय कारण त्यांचे नाव याआधी झालेल्या कोणत्याही परीक्षेच्या निकालात सापडत नाही. अचानक असे लोक स्वामी विवेकानंद कसे बनले?
बरं असा एखादा उमेदवार असता तर कुणीही मान्य केलं असतं पण तब्बल १९ उमेदवार १९० च्या पुढे आणि ३ उमेदवार २०० पैकी २०० मिळवणारे हे गूढ कुणालाच उकलेना...
निकाल बघितला असता असं लक्षात येतं की हे जे टॉपर्स आहेत त्यातले बहुतेकांनी एकाच परीक्षा केंद्रावर परीक्षा दिलेली आहे. म्हणजे सगळे टॉपर्स एका ठिकाणी नोकरीत लागायचंय म्हणून हम साथ साथ है म्हणत एकाच केंद्रावर जमा केले का?
पुण्यात सुद्धा परीक्षा केंद्र आहेत आणि मुख्य म्हणजे पुण्यात स्पर्धा परीक्षा देण्यासाठी, अभ्यासासाठी, क्लासेस साठी संपूर्ण महाराष्ट्रातून मुलं येतात. तरीही पुण्यातला टॉपर दुर्बीण घेऊनही सापडत नाही.
अजून भारी गंम्मत म्हणजे ह्या परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप होत आहे त्यात मुलांचा प्रश्न असा पण आहे की काही टॉपर्स हे महाराष्ट्रातील विविध भागात रहात असूनही परीक्षा देण्यासाठी एकाच केंद्रावर पोहचले कसे?

भाग ४
MMRDA परीक्षेत अजून एक पॅटर्न दिसला ते म्हणजे सलग आलेल्या टोपर्सचे रोल नंबर पण सलग आहेत. सलग म्हणजे इतके जवळ आहेत की ते एकाच लॅब ला हमखास बसू शकतात जसे शेवटचा नंबर 70, 77 असं...
कोणत्याही स्पर्धा परीक्षेत देशभरातून किंवा राज्यातून लाखो विद्यार्थी बसतात. प्रत्येकाची बौद्धिक क्षमता, अभ्यासाची पद्धत आणि पूर्वतयारी वेगळी असते. अशा वेळी एकाच केंद्रावर, एकाच वर्गात, एकमेकांच्या मागे-पुढे बसलेल्या उमेदवारांना सारखेच किंवा सर्वोच्च गुण मिळणे आणि त्यांनी सलग टॉपर येणे हे जवळपास अशक्य असतं हे समजण्यासाठी Probability चे फॉर्म्युला वापरण्याची सुद्धा गरज नाही.
सामान्यतः ऑनलाइन परीक्षेचे फॉर्म भरताना ज्यांचे अर्ज एकापाठोपाठ येतात, त्यांना सलग रोल नंबर मिळतात. म्हणजेच, हे उमेदवार एकाच गावचे, एकाच अभ्यासिकेतील किंवा ओळखीचे असण्याची शक्यता जास्त असते. पण ते सर्वच्या सर्व थेट टॉपरच्या यादीत सलग येणे यामागे काहीतरी पॅटर्न नक्कीच असला पाहिजे असा दाट संशय आहे.
मागील काही परीक्षांचा अनुभव पाहता, परीक्षा केंद्रांवर संगनमत करून उमेदवारांना शेजारी बसवले जाते. लॅब हॅकिंग, रिमोट ॲक्सेस किंवा परीक्षा केंद्रावरील कर्मचाऱ्यांच्या मदतीने अशा प्रकारची सेटिंग केली जाऊ शकते. जर सलग रोल नंबर असलेल्या उमेदवारांनी एकाच पद्धतीने उत्तरपत्रिका सोडवली असेल, तर तिथे डिजिटल कॉपी किंवा पेपर आधीच लीक झाल्याचा दाट संशय निर्माण होतो.

🔥2