Blogger Swami
441 subscribers
169 photos
12 videos
22 files
133 links
विविध विषयांवर अगदी सखोल लेखन

अभ्यास करून आणि मेहनतीने लिहितोय त्यामुळे फॉरवर्ड करायचं असेल माझ्या नावासह फॉरवर्ड करा.
कॉपी पेस्ट करून स्वतः च्या नावावर खपवण्याचे उद्योग करू नका.

©copyrights reserved
Download Telegram
काल १४ नोव्हेंबरला MMRDA च्या निकालाला ०३ महिने पूर्ण झाले आहेत...

१९ नोव्हेंबर ला समिती स्थापन होऊन ३ महिने पूर्ण होतील तसेच उमेदवारांच्या तक्रारी, आक्षेप दाखल करण्याला ०२ महिने पूर्ण होतील...

अद्यापही MMRDA च्या समितीने काय कार्यवाही केली आहे त्याबद्दल अधिकृतपणे काहीही सांगितलेलं नाहीये...

झालं प्रकरण शांत
लागले पोरं AE सोडून CEA आणि Craft instructor च्या तयारीला

आता तरी सांगा काय कार्यवाही केली ते

नाहीतर किमान आम्ही तक्रार केलेल्या ईमेल ला उत्तर देण्याची तसदी घ्या

@BloggerSwami
👍7
जास्त अभ्यास केला तर हा pen घेऊन जा😂
तेवढाच वेळ जास्त लागेल गोळे काळे करायला

पेपर जास्त वेळ सोडवल्याचं समाधान मिळेल.
नाहीतर 100 गोळे काळे करून सुध्दा 1 तासातले 10 मिनिटं ह्याच्या त्याच्या तोंडाकडे बघण्यात काय अर्थ नाही😂

मजाक बाजूला ठेवतो

हा पेन descriptive साठी चालेल भाई
पण गोळे काळे करायला चुकूनही नेऊ नका
कोरीव काम करून गोळ्यात रंग भरायला लागतो.
त्यात नवा असला तर फिकट चालतो.

कोणताही न्या पण जाड पेन न्या
स्केचपेन नेऊ नका फक्त😂😂

@BloggerSwami
🤣11😍1
काल ग्रुपवर विचारलं की
पोरांना AE पेक्षा JE आणि JE पेक्षा CEA पाहिजे
असं का🤔

दारुण वास्तव

खासगी उद्योगात नोकरीच्या संधी खूप कमी झालेल्या आहेत, ज्या आहेत त्यांना कामाच्या तुलनेत पगार तोडका म्हणू शकतो किंवा पगार ठीक असला तरी महागाई वाढल्याने पुरेसा नाही.

खासगीत स्थिरता नाही. अनेकदा नेमणूक झाली तर एकदा साईट संपली की तू कोण मी कोण सारखी परिस्थिती होते, पुन्हा नवीन जॉब शोधावा लागतो.

ह्या सर्व प्रकारामुळे सरकारी नोकरी पाहिजे असं वाटतं कारण सरकारी शिपाई असला तरीही रुबाब राहतो, समाजात पण जास्त भाव मिळतो, लग्नाच्या बाजारात किंमत जास्त असते, सरकारी नोकरी म्हणजे नुसती छपाई असं समजून तयारी करणारे तर 80% पेक्षा जास्त सापडतील.

जे अगोदरच नोकरीत आहेत त्यांना वरची पोस्ट हवी असते, मग त्यासाठी नियमांत बदल करून किंवा संघटना उभ्या करून किंवा इतर प्रकारे बढती कशी मिळेल, मग पगार जास्त, रुबाब जास्त, पैसा प्रतिष्ठा जास्त म्हणून प्रयत्न होतात आणि हे प्रकार घातक तेव्हा ठरतात जेव्हा तरण्या पोरांच्या घशातलं काढून पदोन्नत्या घेतल्या जातात.

मानसिकतेचा विचार केला तर अनेकजण असेही सापडतील की ज्यांना आपल्यापेक्षा वयाने लहान व्यक्ती आपल्यापेक्षा उच्च पदावर गेलेला चालत नाही, त्यात जर एक परीक्षा देऊन सरळ आपल्या डोक्यावर कुणी बसत असेल तर ते सहन करण्याची पात्रता कितीही मोठा अधिकारी असेल तरी त्यात असेलच असं नसतं त्यामुळे पदोन्नती करताना लोकसंख्येच्या प्रमाणात जागा वाढ करून पदोन्नती घेण्यापेक्षा तरण्या पोरांचं हिसकावून घेण्याचे प्रकार घडतात की काय असाच प्रश्न पडतो.

त्यात कहर म्हणजे परीक्षेची तयारी करणारे सुद्धा पडली जाहिरात की कर केस अस करून प्रशासनाला इतकं छळतात की प्रशासनाला  अडलं काम तर दे पदोन्नती, वाढवा कोटा पदोन्नती चा असं करावं लागतं.

या सर्व प्रकारामुळे अगदी तळाच्या पोस्ट जास्त शिल्लक राहून वरच्या केडर च्या पोस्ट कमी प्रमाणात उपलब्ध होतात किंवा उपलब्ध नसतात.

मग अनेकजणांना नाईलाजाने का होईना सरकारी नोकरी आहे ना मग शिपाई, कोतवाल जे पदरात पडेल ते पवित्र करून घ्यावं लागतं, आपण जे झालोय ते कसं महान आहे याचा प्रचार सुद्धा होतो.

त्यात CEA सारख्या पोस्ट साठी factual data पाठांतर करण्यासारखा तसेच एका ओळीतले प्रश्न जास्त असल्याने रट्टा मारण्याची सवय असलेल्याना जास्त डोक्याचं दही करावं लागत नाही. जसजसा वरच्या पोस्ट ला जातो तसतसा application based प्रश्न किंवा मोठेमोठे (जशा मी पोस्ट लिहितो😂 ) तसे प्रश्न विचारले जातात तेवढं प्रेशर झेलण्याची मेंदूला सवय असतेच असं नाही, त्यात चुका पण होऊ शकतात.

थोडक्यात मोठ्या पोस्ट सर्वांना पाहिजे पण जे चिकटले त्यांना परीक्षा देण्यास वाटणारी उदासीनता त्यामुळे सरळसेवा किंवा स्पर्धा परीक्षा यांचं ओरबाडून आपला फायदा करून घेण्याची वाढलेली वृत्ती, त्यातून नव्या पोरांना राहिलेल्या अत्यल्प संधी ( जागा जास्त दिसत असल्या तरीही उभं आडवं आरक्षण वगळून वाट्याला अत्यल्प येतात) यामुळे मिळेल ती नोकरी पाहिजे यामुळे खालच्या पदांना जास्त गर्दी वाढते.

रट्टा मारता मारता पोरं अर्थशास्त्रात असलेली कमी प्रतीची बेरोजगारी (underemployment) डोक्यावर घेऊन आयुष्यभर जगतात. जसं आज AEE ची लायकी असणारे अनेकजण काहींच्या केस केस खेळण्याच्या प्रकारामुळे CEA किंवा भूकरमापकवर अडकून पडलेले आहेत, त्यांना धड सोडता येईना, धड तिथे मन लावून काम करता येईना.

@BloggerSwami
❤13
वर दिलेले फोटो नीट बघून घ्या
खाली विश्लेषण करतो.

टीप: लगेच कॉपी करून chat gpt मारून प्रिंट काढलेला वेगळा फोटो बनवायची घाई नसावी😊

@BloggerSwami
👍1
Blogger Swami
वर दिलेले फोटो नीट बघून घ्या खाली विश्लेषण करतो. टीप: लगेच कॉपी करून chat gpt मारून प्रिंट काढलेला वेगळा फोटो बनवायची घाई नसावी😊 @BloggerSwami
गट क मध्ये २७ केडर आहेत.
फोटोत दाखवल्याप्रमाणे जर वर्गीकरण केलं तर craft instructor वगळून ९ मुख्य परीक्षा होतील.

Any degree च्या सर्व केडर साठी एकच परीक्षा होऊन मुख्यला प्रत्येकी १ तासाचे २ पेपर होतील

तसेच इतर केडर साठी दीड तासांचा एकच पेपर होईल.

म्हणजे एका दिवशी 2 केडरचे पेपर जरी ठेवले तरीही एक महिना लागेल मुख्य व्हायला (कारण शनिवारी आणि रविवारी पेपर होतात mpsc चे )

राहिला विषय craft instructor चा तर मुंबई साठी जाहिरातीत ५९ पुण्यासाठी ५२ इतके ट्रेड दिसताय इतर विभागासाठी पण वेगवेगळे आहेत. आपण ५९ पकडू max.

सगळ्यांचे पेपर वेगवेगळे घेणार की civil, mechanical, electrical, computer असे गट पाडून पेपर घेणार ते MPSC ला माहिती.

जर मुख्यला ५९ प्रश्नपत्रिका काढाव्या लागल्या, कारण सर्टिफिकेट वाले पण allow आहेत (खरी ती पोस्ट त्यांचीच आहे पण असो) तर मग ५९ पेपर घ्यायला रोज ३ पेपर घेतले तरीही २० दिवस सलग लागतील नुसत्या Craft Instructor साठी.

मुख्य परीक्षा घ्यायला पोरांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या नंतर घेतल्या जाऊ शकतात.

जस आता ०८ फेब्रुवारी ते ११ की १८ मार्च पर्यंत १२ वी चे बोर्डाचे पेपर आणि १० वी चे १५ फेब्रुवारी ते १५ मार्च पर्यंत १०वीचे बोर्डाचे पेपर आहेत.

समजा १५ मार्च ते ३१ मार्च पर्यंत ५वी ते ९वी चे पेपर घेतले तरीही एप्रिल मे हे 2 महिने मोकळे राहतात शाळा कॉलेजला.

तेव्हाच्या काळात गट क ची मुख्य परीक्षा तसेच इतर MPSC च्या परीक्षा घेतल्या जाऊ शकतात.

सगळं analysis मेहनतीने केलंय
त्यामुळे chatgpt वर हे टाकून शब्द बदलून स्वतः च्या चॅनलवर टाकण्याच्या आधी मेहनत लक्षात घ्या.

लिंक सह फॉरवर्ड करू शकता.
कारण माझा काही क्लास वगैरे नाहीये.😂
आणि मी वास्तव सांगतो, positive negative च्या थेअरी माझ्या डोक्यात नाही घुसत.
जे आहे ते वास्तव पुराव्यासह मांडतो.

@BloggerSwami
❤9👍3🤩2
Blogger Swami
गट क मध्ये २७ केडर आहेत. फोटोत दाखवल्याप्रमाणे जर वर्गीकरण केलं तर craft instructor वगळून ९ मुख्य परीक्षा होतील. Any degree च्या सर्व केडर साठी एकच परीक्षा होऊन मुख्यला प्रत्येकी १ तासाचे २ पेपर होतील तसेच इतर केडर साठी दीड तासांचा एकच पेपर होईल. म्हणजे…
वरच्या पोस्ट मध्ये जो अंदाज सांगितला तो आता सध्या गट क च्या जाहिरातीत असलेल्या केडर नुसार सांगितला आहे, जर अजून केडर वाढले तर त्यात बदल होऊ शकतो.

पुराव्यासह अंदाज यासाठी सांगितला की तयारी करण्यासाठी mind एकदम clear पाहिजे.

२४ जानेवारीला पूर्व झाली आणि राज्यसेवेसारखं २१ दिवसात पूर्व चा निकाल लागला, उमेदवार जास्त आहेत म्हणून २८ फेब्रुवारी पकडू निकाल लागायला (गोळे मशिनने चेक करतात माणूस नसतो त्यामुळे चिंता नसावी) म्हणजे फेब्रुवारी गेला, मार्चच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात मेन्सचे फॉर्म भरले तरीही जास्तीत जास्त लवकर म्हटलं तर एप्रिलमध्ये मेन्सची परीक्षा सुरू होऊ शकते.

केडर जास्त असल्याने मे मध्ये पण काही परीक्षा होतील.

निकाल लवकरात लवकर जून मध्ये लागेल.

म्हणजे परीक्षा पास करून लगेच बोहल्यावर चढण्यासाठी जे बाशिंग बांधून बसलेले असणार त्यांना पावसाला साक्षी ठेवावं लागेल. (तोपर्यंत झाडं तोडून बिकास झाला तर पाऊस नाही भेटणार)

असो आता सगळं MPSC वर अवलंबून आहे, कसं काय करतात ते...

अभ्यासक्रम जाहीर होईल तेव्हा समजेलच किती मेन्स होणार ते...
जर आलं MPSC चं पुढच्या वर्षीचं वेळापत्रक तर त्यावरून पण समजेल पण वेळापत्रक किती पाळलं जातं ते तुम्हालाही माहितीये...

आता अंदाज फक्त पुढच्या तयारीसाठी दिलाय...
ते पण सगळ्या गोष्टी अतितात्काळ झालं तर...
जर यथावकाश झुकझुकगाडी चालली तर दिवाळीत कार्यक्रम😂

त्या दृष्टीने तयारी ठेवा
कारण तयारी करायची म्हणजे खिसा खाली होतो (तुमच्या आईबापाचा म्हणजेच तुमचा)
सोबत मानसिक दडपण पण असतं.

आता झाल्या असतील concept clear

नोकरी, छोकरी सोडायची की ठेवायची हे यावरून ठरवू शकता, तुमची स्थिती तुमच्यापेक्षा चांगली कुणालाच माहिती नसणार त्यामुळे निर्णय घेण्यासाठी फक्त लाईट लावून दिलाय. 😊

@BloggerSwami
❤6
मला एक कळत नाही

काही टेलिग्राम चॅनल वाले

अमुक अपडेट द्यायची का?

उद्या एक चांगली बातमी देणार...

लवकरच💣..

नुसता सस्पेन्स
अरे तुंबलेल्या तुंबाड द्यायची असेल तर देऊन टाक आणि हो मोकळा

रियालिटी शो चालवतोय का?

इथं तुमच्या तुंबन्यामुळे माझ्या सारख्याना धडाधड DM येतात
काय अपडेट?
हा काय सांगणार?

माझं उत्तर एकच असतं
त्यालाच जाऊन विचार भाऊ

माझ्यात "अगं बाई अरेच्चा" नाही आलाय

मला जे पण माहिती असतं ते आणि मूल DM करून जे विचारतात ते चॅनलवर टाकतो जेणेकरून प्रत्येकाला तेच तेच सांगावं लागू नये.
जेव्हापासून चॅनल काढलाय तेव्हापासून जवळपास 90% DM कमी झाले आहेत.

त्यामुळे चॅनल वाल्याना नम्र विनंती झाली दिवाळी आता फुसके बार उडवून एकता कपूर च्या सिरीयल चालवू नका🙏

@BloggerSwami
🤣18🔥2🕊1
NCL बाबतीत लय DM आलेत
एकदाच्या concept clear करून टाकतो.
(4 DV केलेत त्यामुळे विश्वास ठेवू शकता)

वर फोटोत दिलेला कागद बघा.
हा हेच असतं NCL सर्टिफिकेट (Non Creamy Layer Certificate)

यात Part A मध्ये तुमचं कास्ट सर्टिफिकेट दिसेल
Part B मध्ये NCL
पण DV च्या वेळी हा कागद NCL म्हणून ग्राह्य धरला जातो✅ cast सर्टिफिकेट म्हणून नाही❎
त्यामुळे टाकताना याचा outward number वर भगवा गोल केलाय बघा तिथला टाका.
Date of issue ही खाली लाल गोल केलाय त्याप्रमाणे टाका.

त्या लाल गोल केलेल्या date पासून हिरवा गोल केलेल्या ठिकाणी जे लिहिलं असेल त्या काळात ते सर्टिफिकेट valid असतं. फोटोत दाखवलेलं २०२५-२६, २०२६-२७, २०२७-२८ साठी valid आहे कारण लाल रंगातली तारीख एप्रिल २०२५ नंतरची आहे आणि हिरव्या रंगातली मार्च २०२७ पर्यंत valid दाखवतय

गट क च्या जाहिरातीत २०२५-२६ किंवा २०२६-२७ च NCL मागितलंय

याचप्रमाणे तुमचं सर्टिफिकेट बघा
त्यात जर २०२५-२६, २०२६-२७ येत असेल तर ते सर्टिफिकेट चालेल.

२०२५-२६ म्हणजे १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ हे आर्थिक वर्ष असं बाकी वर्षांचं असतं.

आता समजलं असेल.
लिंक सह फॉरवर्ड करू शकता

@BloggerSwami
❤7
Blogger Swami
NCL बाबतीत लय DM आलेत एकदाच्या concept clear करून टाकतो. (4 DV केलेत त्यामुळे विश्वास ठेवू शकता) वर फोटोत दिलेला कागद बघा. हा हेच असतं NCL सर्टिफिकेट (Non Creamy Layer Certificate) यात Part A मध्ये तुमचं कास्ट सर्टिफिकेट दिसेल Part B मध्ये NCL पण DV च्या…
SEBC च्या उमेदवारांसाठी

2024-25 मध्ये जेव्हा SEBC चा GR आला तेव्हा sebc cast certificate आणि SEBC NCL हे दोन्ही एकत्र देण्याबाबत GR आला होता जेणेकरून एकदम ताण येऊ नये.

तेव्हा काहींना 3 वर्षाच्या validity चे NCL दिले होते तर काहींना 1 वर्षासाठी (मला 1 वर्षासाठी मिळालं होतं) आणि त्यातलं cast सर्टिफिकेट ग्राह्य धरण्याचे आदेश देण्यात आले होते.

मेजून२०२५ मध्ये मी जेव्हा नवीन NCL काढायला गेलो तेव्हा मला cast सर्टिफिकेट मागितलं मी ncl दिलं पण सेतू मध्ये नाकारलं मग मी GR दाखवला, त्यानंतर SDO ला भेटलो त्यांनी 3 अधिकारी बोलवले आम्ही अर्धा तास त्यावर चर्चा केली.

शेवटी SDO बोलले की हे certificate मी चालून घेतो पण तुला DV ला त्रास झाला तर तुझी जबाबदारी असेल

मी रिस्क घेतली नाही
आधी sebc cast सर्टिफिकेट नवीन काढलं त्यानंतर पुन्हा NCL काढलं

त्यानंतर 2 DV पण केले. (आधी 2 झाले होते)

मागच्या पोस्ट मध्ये जो फोटो टाकलाय ते नंतर काढलेलं आहे

आता ज्यांनी अपलोड केलेलं असेल त्यांनी सुध्दा आता नवीन SEBC cast सर्टिफिकेट काढून घ्या
पुन्हा त्रास नको DV ला
DV ला विचारलं तर नवं दाखवता येईल

लिंक सह फॉरवर्ड करू शकता

@BloggerSwami
❤3👍3
भावांनो आणि त्यांच्या बहिणीनो

२७ तारखेपर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत दिलेली आहे.
घाई का करताय फॉर्म भरतांना?
आधी कागदपत्रे गोळा करून घ्या त्यानंतर सावकाश अर्ज करा.
फक्त शेवटच्या दिवसापर्यंत वाट नका

Submit करण्याच्या आधी 2 वेळा पुन्हा चेक करून घ्या सगळं
घाई केली , चुका झाल्या तर जबाबदारी तुमची असते.

सायबर वाल्याकडून कधीच फॉर्म भरून घेऊ नका, त्याला काही घेणं देणं नसतं.

जर तुम्हाला स्वतःचा अर्ज भरता येत नसेल तर नोकरी कशी करणार?
कुणी आईच्या पोटातून शिकून येत नसतो त्यामुळे आधी शिका आणि नंतर अर्ज करा
10 मिनिटात कळतं कसा भरायचा अर्ज

वाटलं तर youtube वर चिक्कार विडिओ पडलेले आहेत त्यातले २-३ बघा आणि अंधविश्वास न ठेवता जस पटेल तस भरा.

अडचण आली तर सरळ हेल्पलाईन ला विचारा कारण त्यांच्या इतकी authentic माहिती कुणीही देऊ शकत नाही.

@BloggerSwami
👍3💯3❤2
अर्ज भरतांना

१. प्रोफाइल लॉक करून मगच अर्ज भरता येतो

२. अर्ज भरताना चूका केल्या तर त्याला सर्वस्वी जबाबदार तो उमेदवार असतो त्यामुळे अर्ज काळजीपूर्वक भरावा

३. शिक्षण टाकताना civil engineering टाका. BE, B Tech किंवा DCE वगैरे ineligible दाखवतात.

४. Ncl वर कधी काढलं त्याची आणि valid upto ची date असते त्यात २०२५-२६, २०२६-२७ येतं का ते बघा, येत असेल तर ते ncl चालेल नसेल तर चालणार नाही.

५. ज्यांनी २०२४-२५ मध्ये sebc काढलं त्यांचं ncl आणि cast सर्टिफिकेट तेव्हा एकच देत होते पण आता त्यात बदल झाला आहे, त्यामुळे कास्ट सर्टिफिकेट नवीन काढून घेणे. जरिही अर्ज दाखल केला असेल तरीही.

६. अर्जात चुका झाल्या असतील तर तो अर्ज cancel करून नवीन भरावा लागतो, पण तशी सोय mpsc ने उपलब्ध करून दिलेली आहे की नाही ते चेक करून बघा.

७. नवीन प्रोफाइल बनवता येत नाही कारण मोबाईल नंबर शेजारीणबाईचा द्याल पण आधार नंबर देण्यासाठी पायाची बोटं देऊन नवीन आधार काढणार का?

८. आधीच फॉर्म भरलेला असणाऱ्यांनी my account मध्ये जाऊन आधीच्या फॉर्म मध्ये view वर क्लिक करायचं त्यानंतर उजव्या बाजूला वर recheck eligibility करायचं, आपल्याला आपल्या शिक्षणानुसार ज्या पोस्ट पाहिजे त्यावर टिक आहे का ते बघा, असेल तर save करून submit करायचं

अर्ज भरण्याचं काम एकदम सोप्प असतं, जे दिलंय ते वाचायचं आणि त्यानुसार अर्ज भरायचा, तुमचा चुकतो यामुळे की तुमचं लक्ष नसतं किंवा फुकट्या सारखं कुणाकडूनही भरून घेतात किंवा पैसे फेकून सायबर वाल्याकडे जातात.

याव्यतिरिक्त काही अडचण आली तर सरळ mpsc ची हेल्पलाईन दिलेली आहे कॉल करायचा किंवा ईमेल टाकायचा कारण तेच सर्वात जास्त authentic माहिती देतात.

@BloggerSwami
❤3🔥3
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं

याव्यतिरिक्त काही बोललो तर राडे होतील

कोण ते नाही विचारायचं आजिबात
कॉमन इश्यू आहे म्हणून नाव खोडून टाकलंय

@BloggerSwami
🤣10🤩3💯3❤1
Forwarded from MPSC
जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

सदर जाहिरातीकरिता यापूर्वी अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना आरक्षणविषयक दावे व शैक्षणिक अर्हतेसंदर्भातील तपशील अद्ययावत करून विकल्प सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, त्यासाठी यापूर्वी सादर केलेला अर्ज रद्द (Application Cancel) करण्याची आवश्यकता नाही.
https://mpsc.gov.in/adv_notification/8#
👍1
⚠️Mpsc गट क शुद्धीपत्रक⚠️

✅अर्ज cancel करण्याची गरज नाही

✅आरक्षण, जातीचे दावे, NCL, domicile यात सुधारणा करू शकता.

✅प्रोफाइल मध्ये सुधारणा करून प्रोफाइल लॉक करायचं त्यानंतर recheck eligibility करून save आणि submit करायचं.

घ्या भाई चुका दुरुस्ती करून, पुन्हा चुकू नका.

@BloggerSwami
👍2🔥1
खरं = फायद्याचं
खोटं = तोट्याचं

हे गृहीतक थोडा वेळ बाजूला ठेवून वास्तववादी विचार करा.

CEA ही पोस्ट मुळात ITI साठी होती.
डिप्लोमा केलेले त्यात पात्र केले गेले
त्यानंतर ज्यांची डिग्री आहे ते पात्र केले गेले.

पण मुळात CEA पोस्ट ज्यांची होती त्या ITI वाल्याना हद्दपार केलं गेलं तर हा त्यांच्यावर अन्याय नाही का?

भलेही ते पात्र झाले तर M Tech, BTech Diploma यांच्यासोबत त्यांना परीक्षा द्यायला लावली तरीही त्यांच्यातले किती टिकतील हा देखील प्रश्न आहे.

ITI च्या जागा डिप्लोमा ने खाल्ल्या, डिप्लोमा च्या डिग्री ने खाल्ल्या,
सगळ्या सिव्हिल च्या ४०% कृषी ने खाल्ल्या.

मिळालेल्या CEA च्या बदल्यात JE आणि वरच्या काही पोस्ट पदोन्नती ने खाल्ल्या...

जीव: जीवस्य: जीवनम्

सगळं अन्नसाखळी सारखं वाटायला लागलंय आता😂

असो
वास्तव सांगितलं

यातून ज्यांना तोटा होईल ते मला शिव्या घालतील आणि हे सगळं खोटंय असं म्हणतील

यातून ज्यांना फायदा होईल ते मला देवमाणूस मानतील..

म्हणून आधीच म्हटलो
खरं = फायद्याचं
खोटं = तोट्याचं
हे बाजूला ठेवून वाचा.

@BloggerSwami
💯22❤2🔥2
हा प्रॉब्लेम असेल कुणाचा तर त्याने खाली दिलेली पोस्ट वाचण्याचे कष्ट घ्यावे😊

@BloggerSwami
🫡2👍1
Blogger Swami
हा प्रॉब्लेम असेल कुणाचा तर त्याने खाली दिलेली पोस्ट वाचण्याचे कष्ट घ्यावे😊 @BloggerSwami
जर तुमच्या घरची आर्थिक परिस्थिती तुम्हाला सांभाळण्याची असेल आणि तुम्हाला चोचले नसतील, चोचले म्हणजे बाहेर हॉटेलमध्ये जेवण, खंबे, हुक्के, सहली, पार्ट्या, अनावश्यक खरेदी, याचं त्याचं बघून गाडी जळते त्यामुळे मला पण ते पाहिजे असा हव्यास नसेल तर तुमचा खर्च फार कमी असतो.

जर खर्च कमी असेल तर तुम्हाला सांभाळणं तुमच्या घरच्यांना जास्त जड जात नाही अशा वेळी जर तुम्ही अभ्यासात सिरीयस दिसला  तर घरचे पुष्कळ वेळा साथ देतात आणि तुम्ही जॉब सोडून अभ्यास करू शकता.

पण त्यालाही लिमिट असतं. बाहेरची चमकधमक बघून किंवा मित्र नातेवाईक याचा भडका बघून घरचे किंवा/आणि तुमचा संयमाचा बांध फुटतो. आज अभ्यास केला आणि उद्या लगेचच पोस्ट मिळाली असं तूप खाऊन लगेच रूप येत असतं तर लाखो पोरं दहा दहा वर्षे अभ्यासिकेतल्या खुर्चीवर रात्रंदिवस टी शर्ट नाईट पॅन्ट घालून, एकवेळ डबा घेऊन जगले नसते हे कळत असूनही वळत नाही.

त्यामुळे आहे ते सुद्धा हातातून जातं...

काहींची स्थिती वेगळी असते. इच्छा असते १००% पण आत्मविश्वास नसतो.

आत्मविश्वास असो नसो, पोस्ट निघेलच याची शाश्वती कुणीही देऊ शकत नाही, जो देत असेल तो एकतर स्वतः चिवट्या आहे किंवा त्याच्या फायद्यासाठी तुम्हाला चिवट्या बनवत आहे किंवा त्याच्याकडे प्रश्नपत्रिका असेल आणि ती तुमची पाठ असून पेपरमध्ये तेच आलं आणि तुम्हाला सोडवता आलं इतकं असूनही तुम्ही मरेपर्यंत घोटाळा उघड नाही झाला तरच खात्री असते हे लक्षात घ्या.

तुम्ही लाख विवेकानंद असाल तरीही जर समजा MMRDA सारखं २००/२०० घेणारे राहिले पुढे उभे तर करणार काय?

इथं बाथरूममध्ये पडून सुध्दा लोकं मरतात आणि दुर्धर आजार असलेले सुध्दा ठणठणीत बरे होतात त्यामुळे आत्मविश्वास, मोटिव्हेशन वगैरे सगळं बोलाची कढी बोलाचा भात असतं.
भाई ने बोला करने का तो करने का असंच असतं मग त्याच्यात काय फळ मिळेल ते आपल्या हातात आजिबात नसतं.

पेपरची तयारी करायची की नाही हे तुम्ही मेहनत करणार आहात की नाही, जर मेहनत करून अपयश आलं तर ते सहन करण्याची ताकद तुमच्यात आहे की खचून जाऊन स्वतःचं अजून वाटोळं करून घेणार यावर अवलंबून आहे.

जर समजून घेण्याची क्षमता असेल, मेहनत असेल नशीब असेल तर जॉब करून सुद्धा पोस्ट निघू शकते.

Selection व्हायचं असलं तर कधी कधी शेजारच्याच्या PC मध्ये तिरपा डोळा करून पाहून उत्तरं जसे च्या तसे मारले आणि नशिबाने शेजारच्या सोबत तुमचंही सिलेक्शन झालं असेही उदाहरण आहेत.

माझा सरळसेवेचा अनुभव सांगतो. एका पेपरला IS code मध्ये दिलेल्या value ला चुकीचं उत्तर म्हणून ग्राह्य धरलं होतं. तिथे उत्तर बरोबर असूनही मार्क जाऊन माझ्या पुढे पोरं गेले आणि मी DV करून नुसत्या xerox वर सह्या मारून पुन्हा घरी बसलो.

दुसरा एक किस्सा सांगतो YCT चं smart scan मधल्या value शंभर वेळा वाचून गेलो. नशिबाने तोच प्रश्न आला. उत्तर दिलं आणि त्या पुस्तकातली ती value चुकलेली होती,  त्याच पेपरला 4 प्रश्नांचे तुक्के मारून आलो होतो, -ve होती. वाटलं होतं एखादं बरोबर आलं तरी लेव्हल होईल पण चारही चुकले, झाला गेम😂

त्यामुळे स्वतः किती खंबीर आहात, स्वतः च्या चुकांची जबाबदारी स्वतः घेऊ शकता की नाही यावरुन स्वतःला निर्णय घ्यावा लागतो.

तयारी कशी करायची तर standard books वापरायचे.

लोकं का हसतात ? त्यांच्या गाडीत किडा वळवळ करत असेल आणि गुदगुल्या होत असतील म्हणून हसत असतील असं समजून दुर्लक्ष करायचं. आपल्या मनाला माहिती असतं आपण काय करतोय, त्यामुळे लोकांसोबत विट्टी दांडू खेळतोय असं समजायचं आणि ३ टाईम कोलायचे, नाहीतर दुनिया घोड्यावर बसू देत नाही आणि पायी पण चालू देत नाही.

@BloggerSwami
❤11💯5🔥2🫡2👌1
JE साहेबांचे प्रताप
विचारलं तर म्हणतात " फाळकं उघडायला दगड नव्हता"
म्हटलं फोटो ज्या मोबाईल मध्ये काढला त्याने उघडायचं होतं.
दगडाजवळ उभा राहून फोटो काढला नसता तर मेमो दिला असता आता मात्र

थेट बडतर्फ

@BloggerSwami
🤣15🔥1
Blogger Swami
नवीन_SEBC_मराठा_आरक्षण_अधिनियम_व_दि_27_फेब्रुवारी_2024_चा_शासन_निर्णय.pdf
मराठा समाजाच्या उमेदवारांसाठी अतिमहत्वाची सूचना

तुमच्या Cast certificate आणि NCL वर फोटो मध्ये दिलेलं आहे त्याप्रमाणे SEBC act 2024 चा उल्लेख आहे का ते बघून घ्या.

नसेल तर तुमचं कास्ट सर्टिफिकेट आणि NCL जुन्या sebc act नुसार आहे जे DV च्या वेळी रद्द ठरवलं जाऊ शकतं.

त्यामुळे ज्यांच्या कास्ट सर्टिफिकेट आणि NCL वर उल्लेख नसेल त्यांनी अतितात्काळ नवीन काढून घ्या.

@BloggerSwami
🙏3