Blogger Swami
441 subscribers
169 photos
12 videos
22 files
133 links
विविध विषयांवर अगदी सखोल लेखन

अभ्यास करून आणि मेहनतीने लिहितोय त्यामुळे फॉरवर्ड करायचं असेल माझ्या नावासह फॉरवर्ड करा.
कॉपी पेस्ट करून स्वतः च्या नावावर खपवण्याचे उद्योग करू नका.

©copyrights reserved
Download Telegram
आज दुपारी 2 वाजेपासून 27 नोव्हेंबर रात्री 23:59 म्हणजे रात्री 12 वाजेला 1 मिनिट कमी असेपर्यंत ज्यांनी MPSC गट क पूर्व परीक्षा 2027 चा फॉर्म भरला नाही त्यांच्यासाठी अर्ज दाखल करण्यासाठी तसेच ज्यांनी अर्ज दाखल केला आहे त्यांना विकल्प दाखल करण्यासाठी लिंक ओपन होणार आहे.

@BloggerSwami
गट क मुख्य परीक्षा
CEA साठी अशाच प्रकारचा पॅटर्न असणार

Level : Diploma
English medium
Objective
No of Questions : 150
Marks : 300
वेळ : दीड तास (90min)

1/4th -ve म्हणजे चुकीच्या उत्तरासाठी 0.50 वजा होणार.

@BloggerSwami
👍3
Forwarded from MPSC
जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - शैक्षणिक अर्हतेबाबत प्रसिद्धिपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
डिप्लोमा धारकांसाठी
अर्ज दाखल करतांना

१. आधी व्यवस्थित प्रोफाइल बनवून घ्या. सर्व माहिती टाकून झाल्यावर पुन्हा cross verify करा.

२. शिक्षण टाकताना civil engineering टाका.

३. प्रोफाइल लॉक करा त्यानंतरच अर्ज दाखल करता येईल.

४. अर्ज दाखल करतांना कोणत्या post साठी eligible आहोत ते चेक करून घ्या. तिथे स्पष्टपणे लिहून येतं की you are eligible for this post.

५. काही अडचण आली तर उद्या भरा अर्ज. आज काही मुहूर्त नाहीये. घाईघाईने चुका करू नका. Mpsc च्या वेबसाईटवरOfficial contact number आणि email दिलेला आहे त्यावरच अडचणी सोडवून घ्या.

सर्वात महत्त्वाचे: काही महाभाग ज्यांना धड वाचता येत नाही किंवा लिहिलेलं समजत नाही ते डिप्लोमा eligible नाही म्हणून अफवा पसरवत आहेत त्यांना वाऱ्याला पण उभं करू नका.

आज window ओपन झालीये एखादा दोन दिवस वेबसाईटवर गर्दी राहील पुन्हा २४ तारखेपासून २७ तारखेपर्यंत गर्दी राहील त्यामुळे जर अर्ज भरतांना वेबसाईट डाऊन किंवा काही प्रॉब्लेम येत असेल तर एक दोन दिवस थांबून भरला तरीही चालेल. फक्त चुकवू नका

@BloggerSwami
❤3🔥2
जे पुण्यात किंवा मोठ्या शहरात आहेत, ज्याचा नेट speed चांगला आहे त्यांना काही प्रॉब्लेम येत नाहीये पण जे खेड्यात आहेत किंवा नेट चा speed कमी आहे त्यांच्यासाठी...

फॉर्म भरतांना पहाटे 4 वाजता उठून भरा... तोपर्यंत सगळी घुबड प्रजाती सोबत स्पर्धा करणारे झोपलेले असतात आणि पहाटेचे तारे 5 नंतर उगवतात.

पहाटे चार ते पाच मध्ये 3G चालवलं तरीही काहीच अडचण येत नाही😂
सगळ्यात भारी वेळ अर्ज दाखल करण्यासाठी👌

@BloggerSwami
🤣3👏2
नुसती लड लागलीये फटाक्यासारखी😂
अशाच पोस्ट राज्यसेवेला पण आल्या पाहिजेत.

Preference चा ताण घेऊ नका.
ही पूर्व परीक्षा आहे, आपण ज्याची मेन्स देऊ त्याच पोस्ट मिळणार आहेत, बळजबरीने तलाठी नाही बनवणार कुणी.

फक्त submit करण्याच्या आधी ज्याची मेन्स द्यायचिये ती पोस्ट आहे का टिक केलेली ते बघूनच submit करा.

@BloggerSwami
🤩2
उघड सांगतो भाई
अर्ज दाखल करताना काही problem आला तर सरळ सरळ हेल्पलाईनला ईमेल करून मोकळं व्हायचं.
ते पण आताच

अमका सर म्हटला अन तमका सर म्हटला असं नका करू
जर चुकला तर तुमचा सर त्याचं सर काढून बाजूला होऊन जाईल
कटेल तर तुमचंच सर

ईमेल च्या रिप्लाय ला पण 3 ते 5 दिवस लागू शकतात (गर्दी झाली तर जास्त वेळ पण लागू शकतो) त्यामुळे त्या दृष्टीने पण तयारी ठेवा. 2 आठवडे आहेत अजूनही त्यामुळे घाई नसावी अचूक माहिती भरा, चूकीला माफी नसते.

@BloggerSwami
❤3
डिप्लोमा वाले इकडे लक्ष द्या.

असं टाकून बघा.
जवळपास सर्वांच काम होऊन जाईल
जर तरिही अर्ज दाखल करण्यात अडचणी येत असतील तर हेल्पलाईन ला विचारा

@BloggerSwami
गट क च्या जाहिरातीत PWD CEA आणि WRD CEA व्यतिरिक्त ह्या जागा सिव्हिल साठी craft instructor म्हणून उपलब्ध आहेत.
(मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर या ठिकाणी वेगवेगळ्या दिलेल्या आहेत)
मोजून घ्या तुमच्या वाट्याला कास्ट नुसार किती येतात ते.

@BloggerSwami
❤1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
ज्यांचं नाव घेतल्याशिवाय आजही देश चालू शकत नाही अशा महान व्यक्तीला जयंती निमित्त विनम्र अभिवादन💐

🫡🌹चाचा नेहरू🌹🫡

@BloggerSwami
🫡9🔥1
Forwarded from Objective 2027
Audio
Descriptive MES परीक्षेतील पेपर चेकिंग मधील घोळ आणि अनियमितता यावरती रात्री सविस्तर voice chat घेतले होते.

हे घोळ स्वतः 2023 ते 2025 मधील परीक्षा दिलेले शुभम माने सरांनी आणि इतर विद्यार्थ्यांनी सविस्तर मांडले आहेत. पेपर चेकिंग मधील घोळाचे इतर सर्व पुरावे रात्रीच ग्रुप वरती share केलेले आहेत. सर्वांनी ऐका आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत share करा
👍
❤4
Objective 2027
Descriptive MES परीक्षेतील पेपर चेकिंग मधील घोळ आणि अनियमितता यावरती रात्री सविस्तर voice chat घेतले होते. हे घोळ स्वतः 2023 ते 2025 मधील परीक्षा दिलेले शुभम माने सरांनी आणि इतर विद्यार्थ्यांनी सविस्तर मांडले आहेत. पेपर चेकिंग मधील घोळाचे इतर सर्व पुरावे…
मी सुद्धा objective आणि descriptive दोन्ही mains दिलेल्या आहेत.

दोन्ही परीक्षा पद्धतीत गुणदोष आहेतच. मी स्वतः descriptive चांगल्या प्रकारे लिहू शकत असलो तरीही सध्या आयोगाचा कारभार पाहिला तर नाईलाजाने का होईना पण objective ला झुकतं माप द्यावंच लागतंय...

टीप : objective असो की descriptive जर सिस्टीम व्यवस्थित असेल तरच परीक्षा पारदर्शक होतात.

Objective मध्ये इतकंच की आपल्याकडे कार्बन कॉपी असते आणि आपले गुण मूड नुसार कुणी कमी करू शकत नाही.
बाकी V राधा समिती चा अहवाल आल्याशिवाय काहीच हालचाल होणार नाही याबाबत...

@BloggerSwami
❤4
Blogger Swami
मी सुद्धा objective आणि descriptive दोन्ही mains दिलेल्या आहेत. दोन्ही परीक्षा पद्धतीत गुणदोष आहेतच. मी स्वतः descriptive चांगल्या प्रकारे लिहू शकत असलो तरीही सध्या आयोगाचा कारभार पाहिला तर नाईलाजाने का होईना पण objective ला झुकतं माप द्यावंच लागतंय... टीप…
अजून एक महत्वाचा मुद्दा

आता objective पॅटर्न करून ऑगस्ट नंतर ह्या objective परीक्षा TCS IBPS मार्फत घेतल्या गेल्या तर आगीतून फुफाट्यात गेल्यासारखं नक्कीच होईल...

MMRDA चा भयानक अनुभव आहे... नशीब response sheet उपलब्ध होती माझ्याकडे म्हणून रिस्पॉन्स शीट मध्ये टोटल जास्त आणि निकालातल्या रिस्पॉन्स शीट च्या मार्कांची टोटल कमी आली त्याबाबत तक्रार करता आली. पण अद्यापही त्या तक्रारीवर रिप्लाय आलेला नाही.

आपल्याकडे mpsc ची कार्बन कॉपी असणं हाच मोठा आधार आहे... नाहीतर चित भी मेरी पट भी मेरी अंटा मेरे बाप का... आणि आपण बसलोय घसत...

@BloggerSwami
🔥4
ATP बद्दल DM येताय म्हणून अंदाज सांगतोय...

ATP ची जाहिरात नोव्हेंबरमध्येच येणं अपेक्षित आहे.

त्यासाठी मागच्या 2022 च्या syllabus मध्ये अगदी थोडेफार बदल होतील.

परीक्षा कधी होईल ते नाही सांगू शकत पण मे च्या आसपास तारीख देऊ शकतात

जागा किती तर एकूण 150 पकडल्या तरीही open general male साठी 30 ते 35 पकडून चला + sebc असाल तर 9 ते 10 जास्त म्हणजे 40 ते 45

sebc female असेल तर अजून 5 जास्त म्हणजे 45 ते 50

Obc male असेल तर एकूण 45 ते 50च्या आसपास
Obc female असेल तर 50 ते 55

टीप : हा अंदाज आहे, fix काही नाही.
पुन्हा असंच झालं तरिही मीच सांगितलं होतं चा मेसेज टाकणार नाही.

अभ्यासासाठी Act वगैरे वेबसाईटवर दिलेले आहेत डाउनलोड करून print काढून घ्या, Current साठी टॉपिक syllabus मध्ये दिलेले आहेत ते बघा.

Valuation साठी BN दत्ता, total station वगैरे साठी B C punmia वगैरे बघा.

Syllabus नवीन आला तर अजून डिटेल्स सांगेन.

कायदे कळत नसतील तर विनाकारण ह्या भानगडीत पडू नका. कारण 200 पैकी 160 च्या आसपास मिळाले तरच chances असतात ATP ला.

@BloggerSwami
❤5
Blogger Swami
ATP बद्दल DM येताय म्हणून अंदाज सांगतोय... ATP ची जाहिरात नोव्हेंबरमध्येच येणं अपेक्षित आहे. त्यासाठी मागच्या 2022 च्या syllabus मध्ये अगदी थोडेफार बदल होतील. परीक्षा कधी होईल ते नाही सांगू शकत पण मे च्या आसपास तारीख देऊ शकतात जागा किती तर एकूण 150 पकडल्या…
ATP बद्दल सांगितलं तर एकजण विचारतोय
चालू करू का बॅच😂

म्हटलं भाऊ थांब थोडं
तोपर्यंत व्हिडीओ ची स्क्रिप्ट लिहून ठेव
ग्रुप बनवून ठेव
बकरे शोधून ठेव

जास्त नाही 2 आठवडयापर्यंत थांब
तोपर्यंत अर्ध्या पोरांचं गट क चं भूत मानगुटीवरून उतरेल.

मग धंदा जोरात चालेल😁

तसंही MPSC आहे
समितीचं कारण पुढे करून वेळ पण घेऊ शकते उगाच नको धंद्यात खोट यायला😂

मला काय मला थोडीच खमंग ढोकळे, चटणी, लाह्या बत्ताशे विकायचेत...
विकायला बसलो तर नुकसान होईल इतक्या स्वस्तात देईल.. त्यापेक्षा आहे ते चालू दे भाऊ.

कोण ते विचारायचं नाही आजिबात...
आपलं पोट सपाट असलं तरीही पोटात सगळं राहतं, याची काडी त्याला नाही करत कधीच...

@BloggerSwami
🤣5
मुदतवाढ

@BloggerSwami
स्पर्धा परीक्षेच्या बाजारातील अनेक दुकानदार (सर्वच शिक्षक नसतात) किंवा त्यांनी कामाला ठेवलेले लोकं AI वापरून झटपट पुस्तकं, नोट्स बनवायला लागलेले आहेत त्यात भयंकर चुका होताय...

फक्त ब्रँड च्या नावाखाली, जाहिरातीच्या नावाखाली उमेदवार पण सर्रासपणे पुस्तकं, नोट्स खरेदी करताय...

Chat GPT, Gemini  सारखे AI टूल वापरून काम जरी झटपट होत असेल तरीही चुका खूप होतात कारण त्यांचा raw डेटा हा इंटरनेट वर उपलब्ध असलेली माहिती असतो मग त्यात फेसबुकवर, इंस्टा वर टाकलेली माहिती सुद्धा वापरली जाते.

तुम्ही कितीही प्रॉम्प्ट चांगल्या लिहिल्या तरीही चुका आढळतातच. AI ला चुका सांगितल्या तरीही माफी मागून AIपुन्हा त्याच त्याच चुका करतं, लूप मध्ये अडकतं...

AI आजिबात वापरू नका असंही म्हणत नाहीये फक्त वापरताना डोळसपणे वापरा. त्याला नोकर म्हणून वापरा... चुका दुरुस्त करा... आणि त्यानंतर जे विकायचं ते विका.
तसंही चूक झाली हे समजण्यासाठी स्वतःला तितकं knowledge असावं लागतं...

तुमच्या पुस्तक, नोट्स मधली एक चूक हजारो मुलांचं आयुष्य बरबाद करू शकते.

@BloggerSwami
💯5
काल १४ नोव्हेंबरला MMRDA च्या निकालाला ०३ महिने पूर्ण झाले आहेत...

१९ नोव्हेंबर ला समिती स्थापन होऊन ३ महिने पूर्ण होतील तसेच उमेदवारांच्या तक्रारी, आक्षेप दाखल करण्याला ०२ महिने पूर्ण होतील...

अद्यापही MMRDA च्या समितीने काय कार्यवाही केली आहे त्याबद्दल अधिकृतपणे काहीही सांगितलेलं नाहीये...

झालं प्रकरण शांत
लागले पोरं AE सोडून CEA आणि Craft instructor च्या तयारीला

आता तरी सांगा काय कार्यवाही केली ते

नाहीतर किमान आम्ही तक्रार केलेल्या ईमेल ला उत्तर देण्याची तसदी घ्या

@BloggerSwami
👍7