Blogger Swami
332 subscribers
144 photos
11 videos
17 files
127 links
विविध विषयांवर अगदी सखोल लेखन

अभ्यास करून आणि मेहनतीने लिहितोय त्यामुळे फॉरवर्ड करायचं असेल माझ्या नावासह फॉरवर्ड करा.
कॉपी पेस्ट करून स्वतः च्या नावावर खपवण्याचे उद्योग करू नका.

©copyrights reserved
Download Telegram
चला ग्रुप C चे MCQ टाकतो
रोज किमान 50 टाकेल
वेळ मिळाला तर रोज 100पण टाकेल
ते पण टॉपिक नुसार...

https://t.me/TheMPSCmcq

करा जॉईन जोपर्यंत पब्लिक चॅनल आहे तोपर्यंत
❤1
Forwarded from A
Pwd cea 174 jaga
Blogger Swami
Pwd cea 174 jaga
नक्की काय आहे?
900+ गाजर आहे का?
किंवा लोकमत ला माहिती नाही पण आपल्या असोसिएशन, चॅनल्स आणि ग्रुप्स ला जास्त माहिती आहे.

BMC JE वर मुलं जास्त बोलू नये किंवा केसेस मुळे सिव्हिल च्या जागा प्रमोशन आणि कृषी ला वाटून दिल्या जात आहेत म्हणून लक्ष भरकटवण्यासाठी pwd cea 900+तर म्हणत नसतील ना?

कुणीतरी तर खोटं बोलतंय हे नक्की

@BloggerSwami
🫡6👍3❤1
वर्णनात्मक (descriptive) चा हट्ट कशासाठी?

जर सिव्हिल च्या टेक्निकलचे पेपर तपासण्यासाठी कक्ष अधिकारी नावाच्या नॉन टेक्निकल लोकांची नेमणूक करावी लागत असेल तर त्यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की आयोगाकडे सध्या तरी descriptive चे पेपर तपासण्यासाठी योग्य असे मनुष्यबळ नाही.

वर्णनात्मक उत्तरपत्रिका तपासणीसाठी जो तपासणारा असेल त्याला त्या विषयाचं संपूर्ण ज्ञान असायला हवं, नाहीतर दिसलं अक्षर चांगलं, पेपर चांगला सजवला आणि दिले मार्क्स अशी गत होणारच...

आधी पेपर चेकिंग साठी माणसं (बाईमाणूस पण येते त्यात) शोधा आणि मग इतर सुधारणा बघता येतील.

डिजिटल इंडिया मध्ये Chat GPT दे रे भाऊ पेपर चेक करून असं व्हायला नको🙈

त्यापेक्षा सध्या तरी येड्या आपली objective बरी... असंच नाईलाजाने म्हणावं लागतं आहे.

@BloggerSwami
❤4👍1
काहीजण वर्णनात्मक (descriptive) चा आग्रह धरून ईमेल करताय त्यात त्यांनी सुचवलेल्या उपायांमध्ये काय दिसतं ते बघा

👉तपासलेल्या उत्तरपत्रिकेची स्कॅन कॉपी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणे.
✅ Objective मध्ये सुद्धा OMR sheet ची कार्बन कॉपी उमेदवारांना पेपर संपल्यावर लगेच मिळते, तसेच ऑनलाइन खात्यात पण उपलब्ध होते.

👉 प्रश्ननिहाय गुण जाहीर करणे.
✅ objective मध्ये तर उघड उघड गुण दिसतात प्रश्ननिहाय

👉स्पष्ट Marking Scheme / Evaluation Guidelines तयार करणे.
✅ objective मध्ये तर हे अगोदरच असतं, फक्त objective मध्ये रद्द होणारे प्रश्न कमी करण्यासाठी सुधारणा करण्यासाठी वाव आहे.

👉परीक्षकांमधील गुणांकनातील तफावत कमी करण्यासाठी Moderation प्रक्रिया राबवणे.
✅ ती आता पण आहे पण त्यात एक जण 135, दुसरा 100 तर तिसरा 65 असे दिले तर करायचं काय? त्यापेक्षा objective मध्ये fix pattern असतो, कशाला सोपं अवघड करत बसायचं?

👉निकालानंतर पुनर्तपासणी / Grievance Redressal ची पारदर्शक व्यवस्था उपलब्ध करून देणे.
✅ म्हणजे निकाल लागलेल्या नियुक्त्या लटकणार कारण थोडक्यात हुकलेले किंवा नाराज लोक आपलाच पेपर कसा भारी आणि गुण कमी कसे दिले (आपला तो बाब्या... सारखं) म्हणून केस केस खेळत बसतील

थोडक्यात हे उपाय नाहीत तर द्राविडी प्राणायाम आहेत.

Objective मध्ये त्रुटी नाहीत असं मी आजिबात म्हणत नाही, उलट descriptive ही objective पेक्षा चांगली जरी असली तरीही त्यासाठीची यंत्रणा आणि त्या पध्दतीतून निर्माण होणारे अडथळे म्हणजे भीक नको पण कुत्रं आवर सारखे आहेत.

त्यामुळे जोपर्यंत सक्षम पर्याय उपलब्ध होत नाहीत (कितीही घाई केली तरीही हे होण्यासाठी किमान2 ते 3 वर्ष हमखास जाणार) तोपर्यंत objectiveच हवी.

जर लेख मोठा म्हणून टिंगल करायची असेल तर descriptive कसं लिहिणार😂
आणि objective पाहिजे पण मोठं लिहिण्याची टिंगल करत असाल तर objective मधले उतारे कसे सोडवणार😂

वाचाल तर वाचाल

👌 @BloggerSwami
👌3
NLC INDIA LIMITED RECRUITMENT 

✅ Post: Graduate Executive Trainee (GET)

✅ एकूण जागा : 23

👉 Selection: GATE-2025 Score

वेबसाईट : येथे click करा

टीप : ऑनलाइन apply करण्यासाठी लवकरच window open होईल.

Join : @BloggerSwami
वर्णनात्मक (Descriptive) ही गट अ साठी कितीही योग्य असली तरीही व्यवस्थित पेपर चेक करणारे उपलब्ध नसतील तर त्या चांगल्या वर्णनात्मक चा उपयोग काय?

वर्णनात्मक मध्ये उमेदवाराची बुद्धिमत्ता स्पष्टपणे दिसून येते, तिथे उमेदवार हा पाठांतर करून आलाय की त्याला खरंच तो विषय समजलाय हे स्पष्ट होते.

पण त्याचवेळी पेपर तपासणाऱ्याला उमेदवारापेक्षा कित्येक पटीने जास्त ज्ञानाची आवश्यकता असते. नुसती model answer sheet देऊन त्यानुसार मुद्दे बरोबर आहेत की नाही हे बघून पेपर तपासणी होऊ शकत नाही तसेच AI कितीही प्रगत झालं तरीही AI ला जशा prompt दिल्या तसं तो वागतो आणि कित्येकदा AI च्या माहितीत अनेक चुका देखील आढळतात.

त्यामुळे पूर्वतयारी व्यवस्थित नसताना वर्णनात्मक चा प्रयोग हमखास अपयशी ठरताना दिसतोय.

@BloggerSwami
💯2🥰1
📢 महत्त्वाची अपडेट — जलसंपदा विभाग 🔥

जलसंपदा विभागाकडून MPSC मार्फत गट-क संवर्गातील पदांची भरती करण्यासाठी रिक्त पदांचा तपशील पाठवण्यात आला आहे.

👉 स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (CEA) — 957 पदे 🔥🔥

📌 ही संख्या विभागाच्या पत्रात नमूद आहे.
⚠️ मात्र 957 पदांची अंतिम जाहिरात येणे बाकी आहे. अंतिम पदसंख्या MPSC कडे पाठवलेल्या मागणीपत्रानंतर स्पष्ट होईल.

Process पुढे गेलेली आहे ✅🔥💯


Join @mpsc_learner
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
📢 महत्त्वाची अपडेट — जलसंपदा विभाग 🔥 जलसंपदा विभागाकडून MPSC मार्फत गट-क संवर्गातील पदांची भरती करण्यासाठी रिक्त पदांचा तपशील पाठवण्यात आला आहे. 👉 स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (CEA) — 957 पदे 🔥🔥 📌 ही संख्या विभागाच्या पत्रात नमूद आहे. ⚠️ मात्र 957 पदांची…
या पत्रावरून असं दिसतंय की WRD CEA ९५७+ येऊ शकतात. तयारी जरी झालेली असली तरीही येतीलच असं नाही. (WRD JE ८९७ आठवा)

येण्यासाठी ऑक्टोबर मध्ये गट क च्या जाहिरातीत समावेश होऊन फक्त डिप्लोमा असलेल्या उमेदवारांना अर्ज करण्यासाठी window open करून दिली पाहिजे.

सगळी प्रोसेस जास्तीत जास्त १५ नोव्हेंबर पर्यंत जरी पूर्ण झाली तरीही ३ जानेवारी ला परीक्षा देण्यासाठी ४५+ दिवस उपलब्ध राहतील.

हे १००% तेव्हाच होऊ शकतं जेव्हा मागणी जोरदार होईल.
मागणी तिथेच पुरवठा असतो

ज्यांना फक्त बॅचेस, पुस्तकं, ढोकळे विकायचे असतील ते अभ्यास करा म्हणतील... मग 2028 मध्ये का येईना...

अजूनही वेळ आहे आपल्याकडे
प्रयत्न करा... निवेदन द्या, सोशल मीडियावर बोला, ईमेल करा काहीही करा पण ह्या गट क च्या भरतीत WRD CEA आल्याच पाहिजे...

माझी पोस्ट माझी जबाबदारी

@BloggerSwami
💯4👍1
महसूल व वनविभाग पत्रक नीट वाचा.

मुद्दा क्र ०२ बघा
कनिष्ठ अभियंता हे पद MPSC च्या कार्यकक्षेत गेले आहे. याचा अर्थ MPSC मार्फत हे पद भरणार आहे.

मुद्दा क्र. ०४ नीट बघा यात MPSC गट क 2027 साठी मागणीपत्र पाठवायची आहेत त्यात जी पदे दिलेली आहेत त्यात कनिष्ठ अभियंता पदाचा उल्लेख आढळत नाही, त्यामुळे त्या पदासाठी मागणीपत्र जाईल की नाही हे अद्याप निश्चित झाले नाही.

उगाचच वन विभागाच्या कनिष्ठ अभियंता च्या जागा गट क मध्ये जाण्याबद्दल ठामपणे ह्या पत्रकाच्या आधारे कुणीही सांगू नये.

खरं बोलावं
उगाचच positive च्या नावाखाली अपेक्षा लावणं हे काही बरोबर नाही😊

जे बोलतो ते कागद बघून आणि वास्तव सांगतो
उगाचच हवेत गोळ्या मारून उपयोग नाही

@BloggerSwami
🔥4
शांत आणि संयमी राहून ठोस आर्थिक व सामाजिक बदल घडवून आणणारे... LPG धोरण तसेच लायसन्स राज नष्ट करणारे भारतीय आर्थिक सुधारणांचे जनक... मनरेगा, माहितीचा अधिकार, शिक्षण हक्क यांसारखे सर्वसमावेशक सामाजिक कायदे देऊन सर्वसामान्य नागरिकांना न्याय देणारे.... देशाची आर्थिक प्रगती आणि बँकिंग सुधारणा करणारे... कमी बोलून जास्त काम करणारे... २००८च्या जागतिक मंदीचा भारतावर परिणाम होऊ न देता भारताची प्रगती साधणारे... वेळोवेळी पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांच्या प्रश्नांची विषयाला धरून मुद्देसूद उत्तरे देणारे... भारताचे एक महान अर्थतज्ज्ञ, भारताचे माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन🙏💐
🙏8
✅ MPSC गट ब, गट क, PSI, STI, ASO, तलाठी भरती आणि सर्व स्पर्धा परीक्षा साठी इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, विज्ञान इत्यादी विषयांचे Topic wise MCQs देणारे एकमेव चॅनल

✅ रोज MCQ टाकले जात आहेत.

https://t.me/TheMPSCmcq
Blogger Swami
✅ MPSC गट ब, गट क, PSI, STI, ASO, तलाठी भरती आणि सर्व स्पर्धा परीक्षा साठी इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, विज्ञान इत्यादी विषयांचे Topic wise MCQs देणारे एकमेव चॅनल ✅ रोज MCQ टाकले जात आहेत. https://t.me/TheMPSCmcq
नॉन टेक चे MCQ रोज जमेल तसा टाकतो आहे.
टेक्निकल चे पण लवकरच टाकेल
जॉईन करून ठेवा चॅनल
आता फुकट देतोय म्हणून किंमत नसेलही कदाचित म्हणून

जर सिव्हिल च्या जागा add झाल्या तर मग paid करावा लागेल चॅनल😂
आधीच सांगतो जॉईन करून ठेवा पुन्हा म्हणू नका paid का केला ते😁

आता सुरुवातीला बेसिक लेव्हल चे प्रश्न टाकतोय नंतर advanced level चे टाकेल