Agrowon
6.08K subscribers
2.47K photos
3 videos
3 files
2.75K links
ॲग्रोवन डिजिटल'चे अधिकृत चॅनल...

- गावाकडच्या बातम्या
- शेतीविषयक बातम्या
- ॲग्रोवन पीक सल्ला
- ॲग्रोवन पशुसल्ला
Download Telegram
शुक्रवारी (ता. १४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूरमध्ये देशातील उच्चांकी ४३.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. यातच राज्यात वादळी पाऊस सुरू असून, आज (ता. १५) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी पावसाचा इशारा आहे. तर उर्वरित राज्यात विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

सविस्तर वाचा https://www.agrowon.com/weather-news/forecast-of-stormy-rain-in-maharashtra-continues
नाफेड (NAFED) -
नाफेडची नोंदणी बहुराज्य सहकारी संस्था कायद्यांतर्गत करण्यात आली आहे. भारत सरकारच्या कृषी मंत्रालयाच्या अंतर्गत असलेली सर्वोच्च संस्था आहे, भारतातील कृषी उत्पादनांसाठी विपणन सहकारी संस्थांशी व्यवहार करते.नाफेडचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे.
राज्यात वन्य प्राण्यांमार्फत होणाऱ्या नुकसानीसाठी देण्यात येणारी नुकसानभरपाईची रक्कम अल्प आहे. यात वाढ करण्यात येणार आहे,’’ अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.


सविस्तर वाचा https://www.agrowon.com/agriculture-latest-news/will-increase-wildlife-crop-damage-compensation-mungantiwar
सर्व शासकीय योजनांची नागरिकांना माहिती व्हावी, योजनांची गतिमान अंमलबजावणी व्हावी, यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये आजपासून (ता. १५) जत्रा शासकीय योजनांची हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. १५ मे पर्यंत राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमात प्रत्येक जिल्ह्यातील ७५ हजार नागरिकांपर्यंत योजनांची माहिती पोहचविली जाणार आहे.

सविस्तर वाचा https://www.agrowon.com/schemes-and-government-resolutions/fair-of-government-schemes
केळी उत्पादक संघ, महाराष्ट्रच्या वतीने येत्या २३ एप्रिलला जळगाव जिल्ह्यातील सावदा येथील प्रभाकर महाजन बहुद्देशीय सभागृहात सकाळी ११ वाजता केळी उत्पादकांची राज्यस्तरीय केळी उत्पादक परिषद आयोजिण्यात आली आहे, अशी माहिती संघाचे संस्थापक अध्यक्ष किरण चव्हाण यांनी दिली.

सविस्तर https://www.agrowon.com/agriculture-latest-news/state-level-banana-parishad-on-23rd-april-at-savda
जलजीवन अभियानांतर्गत शिरूर तालुक्यातील विठ्ठलवाडी आणि इतर १९ गावांच्या पाणी पुरवठ्यासाठी ३२९ कोटी ४५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या पाणीपुरवठा योजनेचे प्रातिनिधिक स्वरूपात उद्‌घाटन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते गुरुवारी (ता.१३) करण्यात आले.

सविस्तर वाचा https://www.agrowon.com/schemes-and-government-resolutions/329-crore-fund-for-water-supply
एप्रिल ते जून हे महिने दुभत्या जनावरांसाठी अधिक त्रासदायक ठरतात. दुभत्या जनावरांवर आजूबाजूच्या वातावरणाचा ताण हा कायम असतो. उन्हाळ्यात हिरवा चारा कमी प्रमाणात उपलब्ध असल्याने आणि कोरडा चाऱ्याची टंचाई निर्माण झाल्यास जनावरांच्या आहारात बदल होतो, त्यामुळे पचण्याच्या समस्या दिसतात.

सविस्तर वाचा https://www.agrowon.com/animal-care/animal-diseases/proper-feeding-management-for-dairy-animals-agrowon
नारळाचे झाड लागवड केल्यानंतर ६० ते ८० वर्षे चांगल्या प्रकारे उत्पादन देते. झाडापासून अधिक उत्पादन मिळविण्यासाठी योग्यप्रकारे खत,पाणी व्यवस्थापन करणे आवश्‍यक आहे.
२०२१-२२ च्या रब्बी हंगामात चिखलदरा तालुक्यातील पलश्‍या येथील नंदा काल्या चिमोटे हे आदिवासी शेतकरी राज्यस्तरावर गव्हाच्या उत्पादनात प्रथम आले आहेत. तर खारतळेगाव येथील सचिन क्षीरसागर यांनी हरभरा उत्पादनात राज्यात तृतीय क्रमांक पटकाविला आहे.


सविस्तर वाचा https://www.agrowon.com/agriculture-latest-news/tribal-farmers-first-in-the-state-in-wheat-production
स्टाॅक असतानाही खाद्यतेल आयात का वाढली?

ऐका आजचं शेतमार्केट पॉडकास्ट रात्री 8 वाजता
आज (ता. १६) मराठवाडा, विदर्भात वादळी पावसाचा इशारा आहे. तर उर्वरित राज्यात विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. राज्यातील उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज आहे.

सविस्तर वाचा https://www.agrowon.com/weather-news/stormy-rain-forecast-in-maharashtra-2
ज्येष्ठ निरूपणकार पद्मश्री डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुंबईतील खारघर येथील आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट मैदानावर हा सोहळा पार पडला.
बटाटा हे गुरांचं अन्न आहे?
फ्रान्सचा राजा बटाटे चोरीला उत्तेजन द्यायचा

ऐका Agri Unplugged पॉडकास्ट आज सायंकाळी ५ वाजता
कृषी यांत्रिकीकरण उपअभियानातील किसान ड्रोन योजनेच्या अनुदानास अखेर मुहूर्त लागला आहे. राज्यात पहिला किसान ड्रोन दाखल झाला आहे. पहिल्या टप्प्यात काही कृषी पदवीधर, तसेच निवडक शेतकरी उत्पादक कंपन्यांची (एफपीसी) योजनेसाठी निवड करण्यात आली आहे.


सविस्तर वाचा https://www.agrowon.com/schemes-and-government-resolutions/first-subsidized-kisan-drone-introduced-in-the-state
जिल्ह्यातील चिखली येथील व्यापाऱ्याने कोट्यवधीचा शेतीमाल खरेदी करुन हातवर केले आहेत. अशा व्यापाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करून अटक करावी, या मागणीसाठी शेकडो शेतकऱ्यांनी शनिवारी (ता.१५) रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात पोलिस अधिक्षक सारंग आवाड यांची भेट घेत निवेदन दिले.

सविस्तर वाचा https://www.agrowon.com/agriculture-latest-news/arrest-the-fraudsters
वातावरण बदलाचा हापूस आंब्यावर परिणाम होतो आहे. यंदा त्याच्या जोडीला उपद्रव आहे तो फुलकिडीचा (थ्रीप्स). थ्रीप्स १-२ मि.मी. लांबीचे, पिवळे, काळे, किंवा दोन्ही रंगाचे असतात. हे विषाणूजण्य रोगाचे वाहक आहेत. पानांच्या वरच्या बाजुला छोटे चंदेरी चट्टे पडतात. त्याला सिल्वरींग म्हणतात. नंतर असेच पांढरे चट्टे मोहोरावर पण येऊ लागतात.

सविस्तर वाचा https://www.agrowon.com/agroguide/pest-infestation-on-hapus-mango-in-ratnagiri-district
परसबागेतील कुक्कुटपालन व्यवसायातून जास्तीत जास्त नफा मिळविण्यासाठी सुधारित जातींचे संगोपन करावे. हा पूरक उद्योग करताना परसबागेत संगोपन करण्यात येणाऱ्या कोंबडीमध्ये कोणते गुणधर्म असावेत, संगोपनाचे फायदे याची माहिती असणे आवश्यक आहे. https://www.agrowon.com/agroguide/vanaraja-grampriya-srinidhi-chickens-should-be-reared-for-backyard-poultry-agrowon
उन्हाळ्यात बहुतांश जनावरांना लू आजाराची लागण होण्याची शक्यता असते. यामध्ये गुरे दगावल्याने शेतकरी संकटात सापडतो. सध्या तापमान वाढल्‍याने लू आजाराची ही शक्यता गृहित धरून पशुसंवर्धन विभागाकडून जनावरांसाठी उपचार पद्धती जाहीर करण्यात आली आहे. यामुळे पशुपालक व शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

सविस्तर वाचा https://www.agrowon.com/animal-care/animal-diseases/animals-are-at-risk-of-lu-disease-due-to-heat